भारतात बरेचदा हि बातमी ऐक्यायला मिळते कि "अमुक अमुक राजकारणी , उद्योजक हा अमुक अमुक वर्षे कोणत्यातरी फसवणुकीचं घोटाळ्याच्या आरोपाखाली अमुक अमुक वर्षे तुरंगात होता आणि सध्या एक तर सुटला तरी किंवा पॅरोल वर सुटला
माझ्य पुढे हा प्रश्न नेहमी पडलाय कि
१) साधारणपणे गुन्हा शाबीत होऊन कोर्टातर्फे तुरंगवासाची शिक्षा सुनावली जाते आणि मग आपण असे म्हणून शकतो कि हा हा गुन्हा शाबीत झाल्यामुळे हि व्यक्ती तुरंगात आहे
२) असा खटला किंवा त्याआधी त्याचे पोलीस आणि सरकारी वकील तपस करीपर्यंत त्याला न्यालयीन कोठडी ची विनंती करतात आणि कोर्ट ती देते किंवा त्यावर काही निर्बंध लावून त्याला कोठडीत ठेवीत नाही , जर अशी न्यायालयीन कोठडी असली तर ती गुन्ह्याची शिक्षा नसते , मग प्रश्न हा कि या बातम्यांचा अर्थ काय
अ ) भुजबळ ४ वर्षे तुरंगात होते म्हणे काय? गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा मिळाली म्हणजे क्रिमिनल रेकॉर्ड आले का ती फक्त खटल्याआधीची न्यायालयीन कोठडी होती ?
ब) डी एस कुलकर्णी आणि कुटुंब २ कि काय वर्षे तुरंगात होते .. म्हणजे काय? गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा मिळाली म्हणजे क्रिमिनल रेकॉर्ड आले का ती फक्त खटल्याआधीची न्यायालयीन कोठडी होती ?
गुन्हेगार सगळ्या देशात आहेत पण येथे समाज माध्यमांना एखाद्याला पकडल्याची बातमी देताना अतिशय काळजीपूर्वक राहावे लागते , पोलिसांनी एखाद्याला पकडले तर त्याचे वर्णन "जणू आरोप सिद्ध झाला" असे करता येत नाही . न्यायालयं कोठारी असेल तर तसे स्पष्ट सांगावे लागते बरेचदा काही कारणाने न्य्यालाय असा हि आदेश देतो कि " सध्या तरी आरोपीचे नाव उघड करता येणार नाही "
प्रतिक्रिया
18 May 2024 - 9:30 am | कंजूस
न्यायालयीन कोठडी मुदत कोर्टाच्या आदेशाने वाढवून घ्यावी लागते.
प्रथमदर्शी पुरावे मिळवून कोर्टाच्या आदेशाने तुरुंगात रवानगी होते. पुरावे खोटे ठरवून किंवा विरोधी भक्कम पुरावे आणून सुटका करून घेता येते. तोपर्यंत तारखा पडतात आणि तुरुंगातून सुटका होण्यास वेळ लागतो. दिरंगाई होण्याचे कारण म्हणजे युक्तिवाद, खंडन, साक्षीदार न येणे यात बराच वेळ जातो. तुंबलेले खटले प्रचंड असणे यामुळेही सुनावणी तारखा लवकर पडत नाहीत. कायद्याचे हात लांब आहेत म्हणतात पण त्याच बरोबर निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये हे सर्वोच्च धरतात.
एका सिने कलाकाराचं उदाहरण आहे. पहिल्या पंचनाम्यात त्यांच्याकडे हत्यार होते. ते सूपुर्द करायला सांगितले नंतर तेव्हा नाही दिले. म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा आणखी एक गुन्हा वाढला.
(पूर्वी एक सहकर्मचारी वकीली शिकत होता. त्याची पुस्तके वाचून चर्चा करत असे. तो केसी कॉलेजमध्ये शिकत होता. मोठमोठे वकील तिकडे भाषणासाठी येत. मानवत खून खटल्याचा काळ होता आणि चर्चा चालत.)
खटल्यांमध्ये कायद्याच्या विविध कलमाखाली आरोप केलेले असतात. उदाहरणार्थ मृत्यूला जबाबदार असेल तर खून, किंवा हल्ला करताना मृत्यू घडणे , इतरांच्या मदतीने खुनाचा प्लान बनवणे, इतरांच्या खुनाच्या प्लानमध्ये सहभागी होणे, जाणून बुजून मरेल असा हल्ला करणे, ठार करण्याचा हेतू नव्हता परंतू आघात केला तो जीवघेणा ठरला वगैरे अनेक उपकलमे असतात आणि प्रत्येकाचे गांभिर्य वेगवेगळे धरून त्याप्रमाणे कमी अधिक शिक्षा होतात.
कित्येकवेळा आर्थिक बाबतीत वगैरे चार्जशीटच दाखल करत नाहीत वेळेवर. तेव्हाही आरोपी तुरुंगात खितपत पडतो. सर्व आर्थिक घोटाळ्याचा करता करविता हाच आहे हे सिद्ध करणारे पुरावे पोलिसांकडून लवकर दाखल होत नाहीत. हे फार गुंतागुंतीचे प्रकरण असते आणि अर्थतज्ज्ञांची मदत लागते. कायद्याचा कीस पडत राहतो. एकेका शब्दाचा आलं होतो. वेळ जातो.
18 May 2024 - 3:02 pm | चौकस२१२
दिरंगाई होण्याचे कारण
एवढा वेळा लागण्याचे कारण भारतातील न्यालयातील गर्दी हे असावे असे वाटते
पण दुसरं मुद्दा असा किती " अमुक मुख अमुक घोट्यालासाठी अमुक व्यक्ती ४ वर्षे तुरुंगात होते अश्या बातम्या माध्यमे प्रसारित करतात / छापतात येतात " पण याचा अर्थ खटला पूर्ण झाला असे नाही आणि ती शिक्षा होती असं नाही ..