Skip to main content

प्रो.देसाई एक वल्ली

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/05/2024 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो.देसाई एक वल्ली प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे गृहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे असं मला वाटु लागल्याने हा प्रपंच. भाऊसाहेब म्हणून मी त्यांना ओळखतो.हे गृहस्थ मुंबईच्या एका कॊलेज मधे गणिताचे प्रोफ़ेसर होते.त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मिसेस देसाई आणि प्रो.देसाई यांचं लव्ह म्यारेज होतं.ती त्यांची विद्यार्थीनी होती. ते म्हणतात”ती हुशार होतीच पण दिसायला पण सुन्दर होती.एकच तिला व्यंग होतं की लहानपणी तिला पोलियो झाल्याने ती एका पायाने लंगडत होती ते पुढे म्हणतात “माझं प्रेम आंधळं होतं” उतार वयात त्या दोघानी मुलांकडे रहाण्याचा निर्णय घेतला होता असा निर्णय कां घेतला त्याबाबत मला त्यांनी लेक्चर पण दिलं होतं. प्रोफेसरच ते म्हणा. ते म्हणाले, “हे बघा सामंत खूप लोक आम्हाला उपदेश देत काय तर म्हणे मुलांकडे कायमचं रहायला जाऊं नका,इकडचं घर(भारतातलं) तुम्ही विकू नका,ताट द्यावं पण पाट देऊं नये,सध्या भंरवश्याचे दिवस नाहीत वगैरे वगैरे. आम्ही सर्वांचं ऐकत होतो आणि आमच्या मनाचंच करणार होतो.पुढे ते सांगू लागले, “त्याचं असं आहे सामंत,आम्हाला असे पण लोक भेटले आणि त्यांचं म्हणणं असं की दूरवर विचार केल्यास एकमेकाच्या अडचणी सांभाळून राहिल्यास मुलांकडे पण दिवस जाऊ शकतात.मुलं इकडे (भारतात) रहात नसल्याने कुणाच्या तरी “दाढीला हात लाऊन कामं करून घ्यावी लागतातच ना!.” पुढे भाऊसाहेब सांगू लागले, ” सामंत, हे बघा काम सांगीतलं की खूप लोक पैसे देऊन सुद्धा कामात अडवाअडवी करतात.त्यांचीही चूक नव्हती म्हणा,” “अहो या वयात मुलांकडे जाऊन राहावं बघा” असाही लोक आम्हाला उपदेश देत असत. आता बघा सामंत, “ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे”हेच खरं ना? आम्ही सर्व तयारी करून मुलांकडे येऊन रहाण्याचं ठरवलं.इथे जस जसे अनुभव येऊं लागले तस तसे मी तुम्हाला विषय देऊन कविता लिहा म्हणून सांगत असतोच ना?” असं म्हणून प्रो देसाई थोडे भाऊक झाले. तर असे हे आमचे प्रो.देसाई उर्फ भाऊसाहेब.वेळोवेळी ते मला भेटल्यावर आपलं मन माझ्याकडे मोकळं करीत असतात.आणि मग एखाद्या विषयावर कविता लिहायला उद्वीप करीत असतात एव्हडंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3618
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया