एन्ट्रॉपी, पैसा आणि हिरण्यगर्भ.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
18 Apr 2024 - 3:07 am

सूर्याकडुन आपल्याला नक्की काय मिळतं?
प्रकाश. उष्णता ?
पण म्हणजे नक्की काय ?
एनर्जी.
मग समजा सुर्यावरुन पृथ्वीवर जितकी एनर्जी आली त्या एनर्जीमधील किती एनर्जी पृथ्वी अवकाशात परत सोडते, रेडीयेट करते ?
५०% ? ९०%? ९९%?
बरं . थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम काय ?
"एनर्जी कॅन नायदर बी क्रियेटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. "
मग परत एकदा विचार करुन सांग - पृथ्वी सुर्यापासुन मिळालेली किती एनर्जी परावर्तित करते ?
१००% !
ग्रेट. मग सुर्यापासुन आपल्याला नक्की काय मिळतं ?

ओह डॅम्न !!!!
हिंट : थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम !

व्हॉला ! सुर्याकडुन आपल्याला जास्त युजेबल , काम करण्यासाठी वापरता येइल अशी एनर्जी मिळत आहे आणि आपण ती काम करता येणार नाही अशा एनर्जी मध्ये रुपांतरीत करुन परावर्तीत करीत आहोत ! १००% !
हेच वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर ?
एन्ट्रॉपी ! सुर्याकडुन आपल्याला लो एन्ट्रॉपी अर्थात वापरता येण्याजोगी एनर्जी मिळत आहे ?
बट नाऊ, द क्वेश्चन इज - सुर्याला लो इन्ट्रॉपी कोठुन मिळत आहे / मिळाली आहे ?
ब्लॅकहोल. ब्लॅकहोल इन्फायनाईट ग्रॅव्हीटीमुळे सर्वच मॅटर शोषुन घेतो , अर्थात ब्लॅकहोल सर्वच सिस्टीमची इन्ट्रॉपी कमी करत आहे , अर्थात ब्लॅकहोल हेच सुर्याच्या लो इन्ट्रॉपी चा मुळ स्त्रोत आहे !
पर्फेक्ट !
_______________

हे सगळं निरर्थक इन्टलेक्च्यल मास्टर्बेशन आहे, ह्याचा दैनंदीन जीवनात काडीमात्र उपयोग नाही.

बरं. दैनंदिन जीवनात आपण जे काही उपद्व्याप करतो , धंदे व्यवसाय करतो ते कशासाठी करतो?
ओफ्कोर्स पैशासाठी.
आपल्याला पैसा कोण देतं ?
कंपनी देते .
कंपनीला ?
बँक देते .
बॅन्केला ?
रीझर्व बॅन्क .
रीझर्व बॅन्क मनात आणेल तसे नोटा छापुन वाटु शकत नाही नाहीतर करन्सी डीव्हॅल्युएशन होऊन इन्फ्लेशन वाढेल अन सगळाच डोलारा कोलमडेल . मग रीझर्व बॅन्कला पैसा कोठुन मिळत आहे ? पैसा छापायची क्षमता कोठुन मिळत आहे ?
सोव्हरीन बॉन्डस ? फोरेन रीझर्व्हरस ? ग्रोस डोमेस्टीक प्रॉडक्शन . आंतरर्राष्ट्रीय व्यापारातील आपल्या उलाढालीतुन . डॉलर सोबत असलेल्या एक्स्जेंज रेटमधुन !
बरं मग डॉलर ला ताकत कोठुन मिळत आहे ?
सोन्यातुन ! जेवढ्या प्रमाणात सोने असेल तेवढेच डॉलर अमेरिका छापेल ना ! The Bretton Woods system .
पण ती तर निक्सन ने ७१ मध्येच बंद केली ना ! अर्थात अमेरिका मनात आणेल तितके डॉलर छापु शकते , छापत आहे .
व्हॉट द फक ?
येस . अमेरिकेचे नॅशनल डेट ३० ट्रीलीयन च्या घरात गेले आहे , त्यांच्या जी.डी.पी पेक्षाही जास्त ! पण त्यांना काय, ते कधीही परत फेडु शकतात , काय तर नोटाच छायच्या आहेत . घे कागद अन छाप नोटा.
भें*द, ह्या फेडरल रीझर्व बँकेच्या आ*%^ %^$ !
हे त्याहीहुन जुने आहे. फेडरल रीझर्व १९०० नंतर आले ना कधीतरी ? हे त्याच्याही आधीचे आहे - इट्स अलेझांडर हॅमिल्टन १७९१. त्याने सेंट्रल बँकेचा पाया घातला ! लक्षात येतंय का , त्याने काय तयार करुन ठेवलं आहे ? अखंड डॉलरचा/ पैशाचा/ धनाचा अदृष्य अनाकलनीय अखंड स्त्रोत ! अ फायनाशियल ब्लॅकहोल !
डॅम्न.
आता नीट विचार करुन सांग - पैसा , धन म्हणजे नक्की काय ?
आजची अन भविष्याची सोय ?
सोय म्हणजे नक्की कसली सोय ?
पोटाची अन सोटाची . ख्या ख्या ख्या .
सेक्स चं नंतर बोलु पण आत्ता सांग - सो पैसा म्हणजे भविष्यातील अन्न ?
येस. पुर्वी सगळेच हंटर गॅदरर होते , पण जेव्हा आपण माणसं शेती करायला लागलो , तेव्हा भविष्यात अन्न्नाची साठवणुकीची सोय झाली आणि त्याचा रीतसर व्यापार करता यावा म्हणुन आधी सोनं , नंतर रुपये, नंतर कागदी नोटा अर्थात पैसा.
पर्फेक्ट आता सांग अन्न कसं तयार होतं ?
अर्थातच शेतीतुन .
आणि शेती कशामुळे शक्य होते ?
हे काय , जमीन , पाणी , हवा ...

आणि ?

आईच्या गावात ! सूर्य !!
आलं आलं लक्षात . पुढचा प्रश्न कळाला - सूर्याला एनर्जी कोठुन मिळते ? - लो इन्ट्रॉपी कोठुन मिळते ? तर ब्लॅकहोल .

व्हॉला !

______________

आता ऑन अ खंप्लीटली डिफरंट नोट :

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्॥
स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥ १ ॥
In the beginning there was the One in it’s splendor, as the Golden Womb, manifested as the sole Lord of land, skies, water, space and that beneath and that deity upheld the earth and the heavens.
This is the deity we shall worship with our offerings.

यं करन्दसी अवसा तस्तभाने अभ्यैक्षेतां मनसारेजमाने
यत्राधि सूर उदितो विभाति कस्मै देवायहविषा विधेम ॥६॥
It is that to whom heaven and earth, look up, blessed with the ability to think, while over them the sun, rising, brightly shines.
This is the deity we shall worship with our offerings.

बास का ? म्हणजे आता हिरण्यगर्भ म्हणजे ब्लॅकहोल का ? चला पुष्पक विमान काढा बाहेर. पान बिडी मारुन येऊ. ख्या ख्या ख्या.

हा हा हा . ज्याला जे समजायचं ते समजु द्या ! आम्हाला कोणाला काहीही पटवुन द्यायचे नाही. हे सारं स्वांन्तःसुखाय आहे. हे सारं आम्हाला कळलं आहे असा आमचा दावा नाही आणि ज्याला आम्ही देव मानतो त्यालाही ठाम खात्रीलायक रित्या कळले असेलच असेही आमचा खात्रीलायक दावा नाही. हे घ्या कलकत्ता साधा विथ चटणी पान. =))

को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः |
अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६॥
But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen?

इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न |
यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥
Whence all creation had its origin, the creator, whether he fashioned it or whether he did not, the creator, who surveys it all from highest heaven, he knows — or maybe even he does not know.

ख्या ख्या ख्या.

ॐ शांति: शांति: शांति: ||

_______________________________________

मुक्तकप्रतिभा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Apr 2024 - 5:47 am | कंजूस

ख्या ख्या ख्या.

हा हा हा. मजा आली. सुरचित असे अन्न धान्य खाऊन अत्यंत विस्कळीत विष्ठा निर्माण करणे या एंट्रॉपीवर्धक व्यवसायास जीवन ऐसे नाव..

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2024 - 9:21 am | प्रसाद गोडबोले

गवि , तुम्ही पॅन्डोरा बॉक्स ओपन करताय =))))

जीवन म्हणजे काय ? लिहुन ठेवलं आहे त्याच्यावरही (पण फक्त नीट घासुन पुसुन चकचकीत करुन प्रकाशित करायला वेळ होत नाहीये.)

ब्लॅकहोल म्हणजे समजा शुन्य एन्ट्रॉपी ते एक अशी अवस्था की सर्वात जास्त मॅक्स एन्ट्रॉपी आहे , ह्या दोन बिंदुं मधील स्ट्रेट लाईन वर अन्न ते विष्ठा हा हे एन्टर्व्हल अत्यंत निग्लिजिबल आहे , मेजर झीरो.
एन्ट्रॉपीच्या नक्की ठराविक क्ष लेव्हल पासुन ते ठराविक य लेव्हल मध्येच जीवन , सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स , सेल्फ प्रीझर्व्हिंग कॉन्शश्नेस का बरें उत्त्पन्न होत असावी हा एक गहन प्रश्न आहे.
पण ह्या इन्टर्व्हल च्या बाहेर पडुन पाहिलं तर लो एन्ट्रॉपी सतत वाढत आहेच. त्याचा जीवनाच्या अस्तित्वाशी संबंध नाही . आणि जर एन्ट्रॉपी वाढण्याला तुम्ही जीवन असं म्हणत असाल - तर it has for more interesting interpretations, because that means the entire universe is one big alive thing !

तस्मात कुठेतरी काहीतरी नव निर्माण होताना जे दिसत आहे , तो कशाचा तरी शेवट आहे, आणि एकुणच प्रोसेस ही अखंड ट्रान्स्फोर्मेशन्ची आहे . आता तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातुन पाहता हा तुमचा चॉईस !
आदी, मध्य, अंत, म्हणा की ब्रह्मा विष्णु , महेश म्हणा की मॅट्रिक्स म्हणा की एन्ट्रॉपी वेव्ह च्या उतारावर चालेलं सर्फिंग म्हणा की शिवशक्तीचे नृत्य म्हणा ... त्याला काहीच फरक पडत नाही !
It's just there for sure and it doesn't bother itself with anything .

अमृतानुभवाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज रचित संस्कृत श्लोक आहे त्यांची आठवण झाली -

मुलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये
क्षिणाग्रमुलमध्याय नम: पूर्णाय शंभवे ॥

जीवन म्हणजे काय ? लिहुन ठेवलं आहे त्याच्यावरही (पण फक्त नीट घासुन पुसुन चकचकीत करुन प्रकाशित करायला वेळ होत नाहीये.)

येऊ द्या. प्रतीक्षेत.

बाकी जीवन म्हणजे एंट्रोपी वाढवण्याचा एकमेव मार्ग असे नसून, ब्रह्मांडाच्या सततच्या यज्ञात आपली यथाशक्ती समिधा. खारीचा वाटा इ इ.

विश्वात जो एकमेव "उद्देश" भासतो त्याला अल्प हातभार आणि त्याच्याशी अलाईन होणे.

विषय आहे गहन खरा. लिहीत रहा.

आणि हो. अलबत.. जीवन म्हणजे मनुष्य आणि पृथ्वीवरील प्राणी इतकेच अर्थात नव्हे. जीवन म्हणजे जे आहे असे वाटते ते सर्व.

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2024 - 9:42 am | प्रसाद गोडबोले

पर्फेक्ट !

जीवना पेक्षा हे जीवनाचे एक्स्प्लनेशन जास्त भयावह आहे.

विश्वाची एन्ट्रॉपी वाढवण्यात मिपा जबाबदार आहे हे आज कळले.

उग्रसेन's picture

18 Apr 2024 - 8:20 am | उग्रसेन

ख्या ख्या ख्या.

सुर्यापासुन आपल्याला नक्की काय मिळतं ?

देवभोळ्या मतदारांवर प्रभाव पाडणारा सूर्यतिलक =))

लेखकास समुपदेशनाची गरज आहे, अशी शक्यता वाटते.
काळजी घ्या. दोन-चार चांगले मित्र करा.

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 10:27 am | अहिरावण

ते लै पोचलेलं बेणं आहे. शे दोनशे समुपदेशकांना एकावेळी "घाटावर" पोचवेल अन ओल्डमंक अख्खा पिऊन रस्त्याच्या मधल्या पट्ट्यावरुन सरळ चालून दाखवेल.

याच्याशी ना मैत्री चांगली ना दुश्मनी !

एक नोट त्याच्या मांडीखाली सरकवून द्यायची, आणि जय गुरुदेव म्हणून कलटी मारायची...

आपल्याला आपला जीव प्यारा !! :)

Bhakti's picture

18 Apr 2024 - 2:01 pm | Bhakti

समुपदेशकांना एकावेळी "घाटावर" पोचवेल अन ओल्डमंक अख्खा पिऊन रस्त्याच्या मधल्या पट्ट्यावरुन सरळ चालून दाखवेल.

हा भाई :)
त्याची पहिला लेख वाचला होता तेव्हा, काहीतरी 'रंगीत सरबत' पिऊन माऊलींचा एक श्लोक आठवला असं त्यात होतं, म्हटलं हे काय combination आहे :)

उग्रसेन's picture

18 Apr 2024 - 5:47 pm | उग्रसेन

पहिला लेख वाचला होता तेव्हा, काहीतरी 'रंगीत सरबत'

रंगीत सरबतामुळे असं होतं व्हय. खपलो. वारलो. उचला. =))

अहिरावण's picture

19 Apr 2024 - 10:28 am | अहिरावण

तर हो ... राम दास्स बाबांचा एलएसडीचा अनुभव जगविख्यात आहे. या कधी कैंचीला आश्रमात... :)

भागो's picture

18 Apr 2024 - 7:58 pm | भागो

...सूर्यतिलक =))
दुसरीकडे मी आताच ह्याबद्दल वाचले.
हा काय प्रकार आहे? कुणी उलगडून सांगेल काय?

भारतीय वास्तुशास्त्रात मंदीर उभारणी हे एक वेगळेच मोठे प्रकरण आहे. याबद्दल प्रचेतस किंवा त्यांच्यासारखे जाणकार माहीती देतील.

या मंदीराच्या उभारणीमधे पूर्व दिशेला मुर्ती असलेल्या मंदीरात विशेषतः विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट कालावधीत विशिष्ट वेळेस सूर्यकिरणे मुर्तीच्या मस्तकावर पडतील अशी व्यवस्था असते. असे अनेक ठिकाणी आहे. (उदा कोल्हापूर अंबाबाई मंदिर - किरण महोत्सव)

असेच अयोध्येमधे रामजन्मभुमीवर उभारलेल्या मंदीरात केले असून रामनवमीला किरणे पडतील असे काही केले आहे. यालाच सुर्यतिलक असे म्हटले आहे.

हा जरी वरवर धार्मिक प्रकार असला तरी त्याविशिष्ट टिकाणी त्या दिवशी असलेले सूर्याचे स्थान निश्चित करुन केले जाते. असे करणे हास्यास्पद कृती नाही असे आमचे मत आहे. असो

अयोध्येतील सूर्यतिलक संबंधी अधिक माहिती

https://www.hindustantimes.com/india-news/science-behind-surya-tilak-of-...

भागो's picture

18 Apr 2024 - 8:52 am | भागो

मस्त!
LOL
Its a mad mad entropy. पियो जी भरके .
काठोकाठ एंट्रोपी भरा. फेस भराभर उसळू द्या...
सब कुच्ह उलटा पुलटा.
अजून येऊ द्या

अमर विश्वास's picture

18 Apr 2024 - 9:33 am | अमर विश्वास

ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 10:20 am | अहिरावण

च्यामारी ! ओ गोडबोले तुम्ही एक काम करा

लेखाच्या शेवटी तुम्हाला अपेक्षित असलेले प्रतिसाद क्रमांक टाकून द्या

म्हणजे आम्ही प्रतिसादात फक्त क्रमांक देऊ

जरा उर्जा कमी लागेल हो... काय आहे सध्या उन्हात कमी फिरत असल्याने साठा कमी झाला आहे... पुरवून वापरावा म्हणतो

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2024 - 12:45 pm | प्रसाद गोडबोले

लेखाच्या शेवटी तुम्हाला अपेक्षित असलेले प्रतिसाद क्रमांक टाकून द्या

हा हा हा . मला कसल्याच प्रतिसादाची इच्छा अपेक्षा नाही. ० . मी माझ्या आनंदाकरिता लिहितो अन ज्यांना समजतं तेवढ्यांनाच आग्रहाच्या अक्षतांसोबत लेख वाचायचं निमंत्रण पाठवतो व्हॉट्सॅप्पवर :) बाकी सारं स्वान्तःसुखाय असल्याने मला कसलाच फरक पडत नाही.

कुठे अन कोणाकोणाला समजावत बसता ? सगळ्यांना सगळ कळालंच पाहिजे असा आमचा हट्ट नाही , रादर सगळ्यांना सगळं कळालं नाहीच पाहिजे , ज्ञान हे मर्यादित लोकांकरिताच असले पाहिजे असे आमचे वैयक्तिक मत आहे , कसें ;)

जेकब बॅकेन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञाने - ब्लॅकहोलला इन्ट्रॉपी आहे असे १९७२ मध्ये प्रतिपादन केले होते अन ते पुढे सिध्द केले होते - दस्तुरखुद्द स्टीफन हॉकिंग्स ह्यांनी ! आता कोणाला काय कळणार हे .
तुम्ही लोकांचे प्रतिसाद पहा, कोणाची बौधिक कुव्वत किती अन गट क्रमांक कोणता हे त्यांच्या प्रतिसादातुन झळकत आहे स्पष्टपणे. लोकं त्यांना मिळेलेल्या ऑर्डरनुसार - "संघर्ष करत" बसलेत , करो बापडे ! आम्हाला ॐ शांति: शांति: शांति: ही ऑर्डर आहे, आम्ही तेच करत बाकीच्यांची मजा बघत बसतो.

हां पण आम्हाला एक मात्र कळालं आहे की -

यदविद्याविलासेन प्रपंचोयं प्रतीयते |
तदविद्याविनाशे तु केवलं ब्रह्म जृंभते ||

बाकी उन्हात जास्त फिरु नका , काळजी घ्या .

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 12:50 pm | अहिरावण

>>ज्ञान हे मर्यादित लोकांकरिताच असले पाहिजे असे आमचे वैयक्तिक मत आहे

मनुवादी कुठले !! नरकात जाल !! :)

>>>बाकी उन्हात जास्त फिरु नका , काळजी घ्या .

जशी आज्ञ्रा गुरुदेव !!!

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2024 - 1:04 pm | प्रसाद गोडबोले

नरकात जाल !!

आमच्या मते नरकाची एन्ट्रॉपी ही स्वर्गाच्या एन्ट्रॉपी पेक्षा कमीच असावी. त्यामुळे आम्हाला वैयक्तिकली नरकातच जायला आवडेल ;)

आणि तसेही नित्शे तात्या म्हणुन गेले आहेतच - In heaven, all the interesting people are missing. In hell I shall enjoy the company of popes, kings and princes, but in heaven there are only beggars, monks, hermits and apostles.

=))))

अहिरावण's picture

18 Apr 2024 - 1:07 pm | अहिरावण

=))

मी आधी गेलो तर कॉर्नरची भारी शीट तुमच्यासाठी ठेवेन, तुम्ही आधी गेलात तर माझ्यासाठी ठेवा !!

जय गुरुदेव बोलो ! सीधा नरक चलो !!

कॉमी's picture

18 Apr 2024 - 6:47 pm | कॉमी

>>ज्ञान हे मर्यादित लोकांकरिताच असले पाहिजे असे आमचे वैयक्तिक मत आहे

मनुवादी कुठले !! नरकात जाल.

>>>हेच फक्त unironically :)

उग्रसेन's picture

19 Apr 2024 - 8:48 am | उग्रसेन

कोणाची बौधिक कुव्वत किती अन गट क्रमांक कोणता हे त्यांच्या प्रतिसादातुन झळकत आहे

स्वांतसुखाय लेखन आहे तर स्वत:पुरतेच लिहा बोला.
लोकांच्या बौद्धिक कुवती तपासत बसु नका.

काळजी घ्या. जपा.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2024 - 11:37 am | प्रसाद गोडबोले

प्रगो अध्यात्म आणि विज्ञानाचा परफेक्ट ब्लेंड करतो! जिनियस गोडबोले _/\_

मला पुलंच्या गुरुद्याव मधल्या त्यांच्या परमशिष्याच्या(काय नाव आहे बर त्याचे?) लेक्चरची आठवन झाली.

गवि's picture

18 Apr 2024 - 2:42 pm | गवि

प्रोफेसर कुंभकोणम?

भागो's picture

18 Apr 2024 - 3:07 pm | भागो

हा यस. तोच तो.

Bhakti's picture

18 Apr 2024 - 3:01 pm | Bhakti

माझं दुर्दैव
मी पुलंचं साहित्य खुपचं कमी वाचलय...

चौकस२१२'s picture

18 Apr 2024 - 5:56 pm | चौकस२१२

मग परत एकदा विचार करुन सांग - पृथ्वी सुर्यापासुन मिळालेली किती एनर्जी परावर्तित करते ?
१००% !

कसे? काही ऊर्जा सामावून पण घेत असेल कि पृथ्वी ! जसे कि समुद्राचे पाणी तापते !
असो याचे उत्तर मिपावरील एखादा शास्त्रन्य च देऊ शकेल ( कमीत कमी पी हेच डी तरी लागेल असे वाटते )
सुर्याकडुन आपल्याला लो एन्ट्रॉपी अर्थात वापरता येण्याजोगी एनर्जी मिळत आहे ? इतपर्यंत वाचलं पण पुढे मात्र आपली हि वेगवान विचारांची गाडी सोडली भाऊ
तेव्हा लेखकुंना एकच नम्र विनंती मिपावर "इन्टलेक्च्यल मास्टर्बेशन " पेकशा एकतर सोप्पं करून सांगा किंवा एखाद्या शास्त्र विशयाला वहिलेलया उच्च दरराजाच्या नियत्कालिलकात आपलं प्रमेय छापवून आणा , आणि मग ती बातमी मिपावर परत द्या
तोपर्यन्त या सुऱ्याने देणे आणि पृथ्वीने घेणे हे हे वाचून सूर्यग्रहणात जसे पक्षी , प्राणी भंजाळल्या सारखे वागतात तसे आमह पामरांचे झाले आहे

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2024 - 10:48 pm | प्रसाद गोडबोले

सोप्पे / अवघड ह्या सापेक्ष संकल्पना आहेत. मला जे सोप्पे वाटते ते तुम्हाला अवघड वाटु शकते आणि व्हाईस अ वर्सा.

मला जो व्हिडीओ पाहुन हा लेख लिहायची प्रेरणा झाली त्या व्हिडीओची लिन्क देत आहे :

The Most Misunderstood Concept in Physics
https://youtu.be/DxL2HoqLbyA

इत्यलम !

भागो's picture

19 Apr 2024 - 12:58 am | भागो

काही प्रश्न.
लिंक उघडून विडिओ बघितला.
"पण सुर्याकडुन आपल्याला लो एन्ट्रॉपी अर्थात वापरता येण्याजोगी एनर्जी मिळत आहे ?
बट नाऊ, द क्वेश्चन इज - सुर्याला लो इन्ट्रॉपी कोठुन मिळत आहे / मिळाली आहे ?
ब्लॅकहोल. ब्लॅकहोल इन्फायनाईट ग्रॅव्हीटीमुळे सर्वच मॅटर शोषुन घेतो , अर्थात ब्लॅकहोल सर्वच सिस्टीमची इन्ट्रॉपी कमी करत आहे , अर्थात ब्लॅकहोल हेच सुर्याच्या लो इन्ट्रॉपी चा मुळ स्त्रोत आहे !

सूर्याला एनर्जी कोठुन मिळते ? - लो इन्ट्रॉपी कोठुन मिळते ? तर ब्लॅकहोल ."
हे काही पचनी पडत नाही.
म्हणजे चांगल आहे. ब्लॅकहोल हा पेर्पेच्युअल एनर्जी कॉन्वर्टर आहे. मग तर काळजीचे कारण नाही. आणि सूर्य शेवटी रेड जायंट/व्हाईट ड्वार्फ ( जे काय होईल ते) होणार हे खोटच आहे तर.
विडिओत ब्लॅकहोलच्या तापमान बद्दल काही विधाने आहेत त्याबद्दल
Black holes are freezing cold on the inside, but incredibly hot just outside. The internal temperature of a black hole with the mass of our Sun is around one-millionth of a degree above absolute zero.

भागो's picture

19 Apr 2024 - 2:35 pm | भागो

प्रसाद गोडबोलेजी
मेरा नंबर कब आयेगा? केव्हा पासून वाट बघत उभा आहे. वेळ लागणार असेल तर दोन विटा टाकून द्या . त्यावर उभा राहीन म्हणतो.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2024 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले

अहो , मलाही काही सगळ कळालं आहे असा भाग नाही, मीही समजुन घ्यायचा प्रयत्नच करतोय.

माझे अंडर्स्टँडिंग असे की - ब्लॅक होल हे सर्वच गोष्टी शोषुन घेत आहे त्याच्या अनंत गुरुत्वाकर्षणाने म्हणजे म्हणजे ते हाय एन्ट्रॉपी देखील शोषुन घेत असणार, आणि त्याच्यापुढे तिथं काय होतं आपल्याला माहीत नाही . ती सिंग्युलॅरिटी आहे !
सध्या सुर्यावर जे दोन हायड्रोजन अ‍ॅटम मिळुन हेलियम बनतो आणि प्रचंड उर्जा तयार होते ती - लो एन्ट्रोपी उर्जा - ही कदाचित जेव्हा विश्वाची निर्मिती झाली त्या पहिल्या बिग बँग च्या वेळेस जे काही ब्लॅक होल असेल त्यातुन आली असावी.

मला हा व्हिडीओ पाहताना आपले हिरण्यगर्भ सुक्त आठवले मग लेख लिहिला, हिरण्यगर्भ सुक्तात जे म्हणले आहे तसे - सुरुवातीला फक्त हिरण्यगर्भ होते ज्यातुन विश्वाची निर्मीती झाली. ज्याच्या योगाने स्वर्ग अंतराळ पृथ्वी वगैरे निर्माण झाली , ज्याच्या तेजाने सुर्य समस्त जगताला प्रकाशित करत आहे, अन त्या सुर्याच्या योगाने लाईफ - जीवन अर्थात कॉन्शशनेस उदयास येत आहे, आपल्याला हे सर्व "कळत" आहे, आपण विचार करत आहोत , त्या "क" ह्या प्रथमोद्भव अशा प्रजापती देवाची आम्ही हवि देउन उपासना करतो !

हा सगळा माझा कल्पनाविलास आहे. मी काही फिजिक्स शिकलेलो नाहीये. आमचे फिजिक्स चे शिक्षक फार बोरिंग होते. गणिताचे आणि स्टॅटिस्टिक्स चे सर मात्र अफलातुन शिकवत असल्याने मी त्याचे शिक्षण घेतले. आणि एकदा का तुम्ही गणिताचा अभ्यास करायला लागलात की फिजिक्स ही केवळ एक स्पेशल केस वाटायला लागते, गणित अफाट आहे .
पण त्यातही ग्योडेल ची थेरम वाचुन मन परत तत्वज्ञान अन अध्यात्माकडे वळालं =))))

असो. बोलत राहुच .

एक विज्ञानकथा लिहायला घेतली आहे , आधी ती पुर्ण करतो आता . :)

भागो's picture

19 Apr 2024 - 4:02 pm | भागो

वाढता वाढता वाढे...
वादे वादे वाढते एंट्रोपी
मला एव्हढेच म्हणायचे आहे कि तुम्ही काहीही करा इकडून या किंवा ब्लॅक होलमधून या.
You can not beat 2nd Law. हे काही तसले वाशिंग मशीन नाही. आत या. आपली एंट्रोपी इथे सोडा आणि हॉकिंगच्या सहाय्याने लो एंट्रोपी घेऊन सूर्याकडे जा.
एक शेवटच, big bang is big bang ओन्ली.
त्या साऱ्या कविकल्पना आहेत. ब्लॅक होल मध्ये ब्लॅक होल मध्ये ब्लॅक होल... आणि त्यात आपले विश्व!

सर टोबी's picture

19 Apr 2024 - 4:29 pm | सर टोबी

आम्ही असल्यामुळे आमचा अपमान होणार नसेल तर काही लिहावं म्हणतो.

एंट्रॉपी हि सृष्टीची अशी रचना आहे ज्यामुळे सृष्टीची ऊर्जेची गरज कमीत कमी राहते. निर्जीव शरीर कुजणे, बर्फ वितळणे अशी काही एंट्रॉपीची उदाहरणं सांगता येतील. आता एखादी गोष्ट कमीत कमी ऊर्जेच्या अवस्थेत आल्यानंतर तयार झालेली ऊर्जा कुठल्या तरी कृष्णविवरात शोषलीच पाहिजे असं काही नसावं. जसं प्राणी कुजल्यावर ऊर्जा तयार होते तसं बर्फ वितळण्यासाठी ऊर्जा वापरली देखील जाते.

बाकी सूर्य हाच सृष्टीचा कर्ता आहे आणि हे ज्ञान भारतीय साधकांनाच शतकानु शतके माहिती होतं असा काही दावा असल्यास आमची माघार.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2024 - 5:33 pm | प्रसाद गोडबोले

२ मुद्दे

सर्वप्रथम म्हणजे - मी फक्त गट १ आणि गट २ अशी विभागणी मांडलेली आहे, त्यात कोण उच्च अन कोण नीच असलं काहीही मी कधीही म्हणलेलं नाही, तर अपमान करायचा किंवा कोणी मानुन घ्यायचा संबंधच नाही. उगाच माझ्या विषयी गैरसमज पसरवु नका.

आणि दुसरा मुद्दा म्हणजे - मी कोठेही कसलाही दावा केला नाहीये - मुळातच हिरण्यगर्भ हे सुर्याचे नाव असले तरी हिरण्यगर्भ सुक्तातील हिरण्यगर्भ म्हणजे प्रजापती हा संपुर्ण वेगळा आहे. आणि किमान प्रायमाफेसी तरी असे दिसत आहे की इसवि सन पुर्व १५०० च्याही आधी लिहिलेल्या ह्या सुक्तात तो विश्वाचा कर्ता आहे असे म्हणलेले आहे.
मी फक्त मला जे आठवले ते लिहिलें. गट क्रमांक - १ मधील असल्याने मला हे आठवले , तुम्ही गट क्रमांक - २ मधील असल्याने तुम्हाला हे आठवणार नाही, दुसरं काहीतरी आठवेल . त्यामुळे कोणी उच्च किंव्वा नीच ठरत नाही, तस्मात कोणीही अपमान वगैरे मानुन घेण्याचा प्रश्नच येत नाही.

"I am responsible for what I say, not for what you understand."

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2024 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले

प्रसिध्द शास्त्रज्ञ ओपेनहायमरने जेंव्हा पहिल्यांदा न्युक्लियर बाँब ची टेस्ट घेतलेली तेंव्हा त्या भगवद्गीतेतील हा श्लोक आठवला होता :

"कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः।।11.32।।"

https://youtu.be/lb13ynu3Iac

चित्रगुप्त's picture

19 Apr 2024 - 1:51 am | चित्रगुप्त

मजसारख्या, गहन सायन्स आणि संस्कृत (भाषा आणि विज्ञान) या दोन्हीचे अत्यंत मर्यादित ज्ञान असणाराला या लेखात प्रतिपादित केलेला सिद्धांत (वा जे काही आहे ते) समजणे अशक्यच असले, तरी धागाकर्त्याचा एकंदरित आवाका आणि प्रयत्न विस्मित करण्याजोगा आहे.
-- तथाकथित 'बिग बँग' च्या 'आधी' काय होते, हे 'ब्लॅकहोल' कुठे, किती आकाराचे आहे, वगैरे प्रश्न कधीकाळी पडत असले, तरी आता अश्या प्रश्नातली वैय्यर्थताही लक्षात आली आहे.
तुमचे लेखन जबरदस्त असते, याचे मुख्य कारण ते 'स्वांतसुखाय' वृत्तीने केलेले असते हेच. असेच लिहीत रहा. फार थोड्यांना ते कळत असले तरिही.

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2024 - 11:49 am | प्रसाद गोडबोले

नमस्कार चित्रगुप्त काका, तुमचा प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो .

वैय्यर्थता

आमच्या शाळेचे घोषवाक्य होते की -
अजरामरवत् प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत्।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥

विद्यार्जन आणि अर्थाजन करताना मी अजर अमर आहे असा विचार करावा अन धर्माचे आचरण करत असताना जणुकाही मृत्युने शेंडी हातात धरली आहे असा विचार करावा, अर्थात अगदी काटेकोरपणे शास्त्रांनी जे सांगितले आहे त्याचे आचरण करावे.

लहानपणी काहीतरी हे असं ऐकलेलं मनात खोलवर गेलंय बस , मी बस त्याचे जमेल तितके आचरण करायचा प्रयत्न करत असतो बस्स :)

आणि शुध्द विज्ञान , अमुर्त गणित हे कलेसारखे आहे, त्याचा मुळातच उद्देश स्वांतःसुखाय असाच आहे. माझ्या माहीतीनुसार मायकल अँजेलो मरत असताना त्याचे शेवटचे शब्द होते - Ancora imparo ! मी अजुनही शिकत आहे !

आपणही शिकत राहु , मजा येतीय ह्याच्यात :)

सुबोध खरे's picture

19 Apr 2024 - 10:46 am | सुबोध खरे

मी एक ब्लॅक होल विकत आणणार होतो पण ठेवणार कुठे हा प्रश्न पडला?

आणि ब्लॅक होलने पृथ्वी आणि सूर्य गिळला तर उगाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तो विचार रहित केला

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2024 - 11:59 am | प्रसाद गोडबोले

पण ठेवणार कुठे हा प्रश्न पडला?

सोप्पं उत्तर आहे - स्विझर्लंडमध्ये !

सर्न - The Large Hadron Collider | CERN च्या प्रयोगात क्वांटम लेव्हल ला ब्लॅकहोल तयार होऊ शकतात म्हणजे तशी शक्यता व्यक्त केलेली आहे.

त्याप्रोजेक्टचं बजेट साडेसात बिलियन युरो इतकं होतं , घेताय का विकत बोला . फिक्स्ड प्राईझ . एक बार बेचा हुवा माल वापस नई लिया जायेगा =)))).

बाकी कायदा सुव्यवस्थेचा विचार करु नका , हे १००-२०० रुपायची चिरिमिरी देऊन आजही सोडतात आर.टी.ओ. पोलीस . आप चिंता मत किजीये , हम करते है प्रबंध !

c