एन्ट्रॉपी, पैसा आणि हिरण्यगर्भ.
सूर्याकडुन आपल्याला नक्की काय मिळतं?
प्रकाश. उष्णता ?
पण म्हणजे नक्की काय ?
एनर्जी.
मग समजा सुर्यावरुन पृथ्वीवर जितकी एनर्जी आली त्या एनर्जीमधील किती एनर्जी पृथ्वी अवकाशात परत सोडते, रेडीयेट करते ?
५०% ? ९०%? ९९%?
बरं . थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम काय ?
"एनर्जी कॅन नायदर बी क्रियेटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. "
मग परत एकदा विचार करुन सांग - पृथ्वी सुर्यापासुन मिळालेली किती एनर्जी परावर्तित करते ?
१००% !
ग्रेट. मग सुर्यापासुन आपल्याला नक्की काय मिळतं ?
ओह डॅम्न !!!!
हिंट : थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम !
व्हॉला ! सुर्याकडुन आपल्याला जास्त युजेबल , काम करण्यासाठी वापरता येइल अशी एनर्जी मिळत आहे आणि आपण ती काम करता येणार नाही अशा एनर्जी मध्ये रुपांतरीत करुन परावर्तीत करीत आहोत ! १००% !
हेच वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर ?
एन्ट्रॉपी ! सुर्याकडुन आपल्याला लो एन्ट्रॉपी अर्थात वापरता येण्याजोगी एनर्जी मिळत आहे ?
बट नाऊ, द क्वेश्चन इज - सुर्याला लो इन्ट्रॉपी कोठुन मिळत आहे / मिळाली आहे ?
ब्लॅकहोल. ब्लॅकहोल इन्फायनाईट ग्रॅव्हीटीमुळे सर्वच मॅटर शोषुन घेतो , अर्थात ब्लॅकहोल सर्वच सिस्टीमची इन्ट्रॉपी कमी करत आहे , अर्थात ब्लॅकहोल हेच सुर्याच्या लो इन्ट्रॉपी चा मुळ स्त्रोत आहे !
पर्फेक्ट !
_______________
हे सगळं निरर्थक इन्टलेक्च्यल मास्टर्बेशन आहे, ह्याचा दैनंदीन जीवनात काडीमात्र उपयोग नाही.
बरं. दैनंदिन जीवनात आपण जे काही उपद्व्याप करतो , धंदे व्यवसाय करतो ते कशासाठी करतो?
ओफ्कोर्स पैशासाठी.
आपल्याला पैसा कोण देतं ?
कंपनी देते .
कंपनीला ?
बँक देते .
बॅन्केला ?
रीझर्व बॅन्क .
रीझर्व बॅन्क मनात आणेल तसे नोटा छापुन वाटु शकत नाही नाहीतर करन्सी डीव्हॅल्युएशन होऊन इन्फ्लेशन वाढेल अन सगळाच डोलारा कोलमडेल . मग रीझर्व बॅन्कला पैसा कोठुन मिळत आहे ? पैसा छापायची क्षमता कोठुन मिळत आहे ?
सोव्हरीन बॉन्डस ? फोरेन रीझर्व्हरस ? ग्रोस डोमेस्टीक प्रॉडक्शन . आंतरर्राष्ट्रीय व्यापारातील आपल्या उलाढालीतुन . डॉलर सोबत असलेल्या एक्स्जेंज रेटमधुन !
बरं मग डॉलर ला ताकत कोठुन मिळत आहे ?
सोन्यातुन ! जेवढ्या प्रमाणात सोने असेल तेवढेच डॉलर अमेरिका छापेल ना ! The Bretton Woods system .
पण ती तर निक्सन ने ७१ मध्येच बंद केली ना ! अर्थात अमेरिका मनात आणेल तितके डॉलर छापु शकते , छापत आहे .
व्हॉट द फक ?
येस . अमेरिकेचे नॅशनल डेट ३० ट्रीलीयन च्या घरात गेले आहे , त्यांच्या जी.डी.पी पेक्षाही जास्त ! पण त्यांना काय, ते कधीही परत फेडु शकतात , काय तर नोटाच छायच्या आहेत . घे कागद अन छाप नोटा.
भें*द, ह्या फेडरल रीझर्व बँकेच्या आ*%^ %^$ !
हे त्याहीहुन जुने आहे. फेडरल रीझर्व १९०० नंतर आले ना कधीतरी ? हे त्याच्याही आधीचे आहे - इट्स अलेझांडर हॅमिल्टन १७९१. त्याने सेंट्रल बँकेचा पाया घातला ! लक्षात येतंय का , त्याने काय तयार करुन ठेवलं आहे ? अखंड डॉलरचा/ पैशाचा/ धनाचा अदृष्य अनाकलनीय अखंड स्त्रोत ! अ फायनाशियल ब्लॅकहोल !
डॅम्न.
आता नीट विचार करुन सांग - पैसा , धन म्हणजे नक्की काय ?
आजची अन भविष्याची सोय ?
सोय म्हणजे नक्की कसली सोय ?
पोटाची अन सोटाची . ख्या ख्या ख्या .
सेक्स चं नंतर बोलु पण आत्ता सांग - सो पैसा म्हणजे भविष्यातील अन्न ?
येस. पुर्वी सगळेच हंटर गॅदरर होते , पण जेव्हा आपण माणसं शेती करायला लागलो , तेव्हा भविष्यात अन्न्नाची साठवणुकीची सोय झाली आणि त्याचा रीतसर व्यापार करता यावा म्हणुन आधी सोनं , नंतर रुपये, नंतर कागदी नोटा अर्थात पैसा.
पर्फेक्ट आता सांग अन्न कसं तयार होतं ?
अर्थातच शेतीतुन .
आणि शेती कशामुळे शक्य होते ?
हे काय , जमीन , पाणी , हवा ...
आणि ?
आईच्या गावात ! सूर्य !!
आलं आलं लक्षात . पुढचा प्रश्न कळाला - सूर्याला एनर्जी कोठुन मिळते ? - लो इन्ट्रॉपी कोठुन मिळते ? तर ब्लॅकहोल .
व्हॉला !
______________
आता ऑन अ खंप्लीटली डिफरंट नोट :
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्॥ स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥ १ ॥ In the beginning there was the One in it’s splendor, as the Golden Womb, manifested as the sole Lord of land, skies, water, space and that beneath and that deity upheld the earth and the heavens. This is the deity we shall worship with our offerings.
यं करन्दसी अवसा तस्तभाने अभ्यैक्षेतां मनसारेजमाने यत्राधि सूर उदितो विभाति कस्मै देवायहविषा विधेम ॥६॥ It is that to whom heaven and earth, look up, blessed with the ability to think, while over them the sun, rising, brightly shines. This is the deity we shall worship with our offerings.बास का ? म्हणजे आता हिरण्यगर्भ म्हणजे ब्लॅकहोल का ? चला पुष्पक विमान काढा बाहेर. पान बिडी मारुन येऊ. ख्या ख्या ख्या. हा हा हा . ज्याला जे समजायचं ते समजु द्या ! आम्हाला कोणाला काहीही पटवुन द्यायचे नाही. हे सारं स्वांन्तःसुखाय आहे. हे सारं आम्हाला कळलं आहे असा आमचा दावा नाही आणि ज्याला आम्ही देव मानतो त्यालाही ठाम खात्रीलायक रित्या कळले असेलच असेही आमचा खात्रीलायक दावा नाही. हे घ्या कलकत्ता साधा विथ चटणी पान. =))
को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः | अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the gods themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen?
इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न | यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥ Whence all creation had its origin, the creator, whether he fashioned it or whether he did not, the creator, who surveys it all from highest heaven, he knows — or maybe even he does not know.ख्या ख्या ख्या. ॐ शांति: शांति: शांति: || _______________________________________
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ख्या ख्या ख्या.
हा हा हा. मजा आली. सुरचित
जीवन
जीवन म्हणजे काय ? लिहुन ठेवलं
आणि हो. अलबत.. जीवन म्हणजे
पर्फेक्ट !
जीवना पेक्षा हे जीवनाचे
विश्वाची एन्ट्रॉपी वाढवण्यात
ख्या ख्या ख्या.
ते लै पोचलेलं बेणं आहे. शे
हा हा...
हा हा
तर हो ... राम दास्स बाबांचा
...सूर्यतिलक =))
भारतीय वास्तुशास्त्रात मंदीर
अयोध्येतील सूर्यतिलक संबंधी
ख्या ख्या ख्या.
ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको
च्यामारी ! ओ गोडबोले तुम्ही
हा हा हा
>>ज्ञान हे मर्यादित
नरकात जाल !!
=))
>>ज्ञान हे मर्यादित
आवरा...
२
प्रगो अध्यात्म आणि विज्ञानाचा
मला पुलंच्या गुरुद्याव
प्रोफेसर कुंभकोणम?
हा यस. तोच तो.
माझं दुर्दैव
सूर्य झाकोळला .....
सोप्पे / अवघड
काही प्रश्न.
प्रसाद गोडबोलेजी
अहो , मलाही काही सगळ कळालं
वाढता वाढता वाढे...
गट क्रमांक दोन मधले
२ मुद्दे
अवांतर
गहन विषयाचे उत्तम विवेचन
वैय्यर्थता
मी एक ब्लॅक होल विकत आणणार
पण ठेवणार कुठे हा प्रश्न पडला