दिवाळी अंक २०२३ - एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे

संतोष तादंळे's picture
संतोष तादंळे in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे
स्वतःशी बोलायचीही भीती वाटते आहे

कोणते चांदणे हरवले या आकाशाचे
निळ्या डोळ्यातले आकाश फाटते आहे

माझ्या तुझ्यात नवीन काहीच नव्हते
हे कोणते अंतर नव्याने भेटते आहे

कालपर्यंत धो धो कोसळले होते सर्वत्र
आज हे पाणी डोळ्यात का साठते आहे

धनदांडग्यांनी लुटले म्हणून निराश नाही
गरीबीला गरिबी का लुटते आहे

दिवसभर ज्याने सर्वाना आधार दिला
या कातरवेळी काळीज तुटते आहे

मी साऱ्याच शब्दाना श्रद्धांजली वाहिली
गोठ्यात ती माय वासराला चाटते आहे

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2023 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान रचना लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

13 Nov 2023 - 9:30 am | प्रचेतस

कविता आवडली, लिहिते राहा.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 1:52 pm | तुषार काळभोर

एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे
स्वतःशी बोलायचीही भीती वाटते आहे
..
असं होतं कधी कधी. अशावेळी बोलणारं कोणी सोबत असेल तर खूप आधार मिळतो.
..

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2023 - 5:38 pm | चौथा कोनाडा

छान रचना.
कविता आवडली.

माझ्या तुझ्यात नवीन काहीच नव्हते
हे कोणते अंतर नव्याने भेटते आहे.

हे मस्तच, खासच !