Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे

लेखक संतोष तादंळे यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
1

एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे स्वतःशी बोलायचीही भीती वाटते आहे

कोणते चांदणे हरवले या आकाशाचे निळ्या डोळ्यातले आकाश फाटते आहे माझ्या तुझ्यात नवीन काहीच नव्हते हे कोणते अंतर नव्याने भेटते आहे कालपर्यंत धो धो कोसळले होते सर्वत्र आज हे पाणी डोळ्यात का साठते आहे धनदांडग्यांनी लुटले म्हणून निराश नाही गरीबीला गरिबी का लुटते आहे दिवसभर ज्याने सर्वाना आधार दिला या कातरवेळी काळीज तुटते आहे मी साऱ्याच शब्दाना श्रद्धांजली वाहिली गोठ्यात ती माय वासराला चाटते आहे


वाचने 2228
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान रचना लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे स्वतःशी बोलायचीही भीती वाटते आहे .. असं होतं कधी कधी. अशावेळी बोलणारं कोणी सोबत असेल तर खूप आधार मिळतो. ..

छान रचना. कविता आवडली.
माझ्या तुझ्यात नवीन काहीच नव्हते हे कोणते अंतर नव्याने भेटते आहे.
हे मस्तच, खासच !