श्री गणेश लेखमाला २०२३

1

प्रॉफेट : खलील जिब्रान : पुस्तक परिचय

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
30 May 2023 - 11:43 pm

प्रॉफेटः खलील जिब्रान..

प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो.
प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत.
( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे)
खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला. त्याने त्याची कारकीर्द चित्रकार म्हणून सुरु केली पण सोबत अनेक पुस्तकेही लिहीली.
लिहिण्याची भाषा ही एकदम प्रवाही अगदी कविता वाटावी अशी. छोटी छोटी परंतू मार्मीक वाक्ये ही त्याची खास शैली. त्याच्य अलिखाणावर बहाई पंथाचा पगडा जणवत रहातो.प्रॉफेट हे त्याचे सर्वात जास्त गाजलेले पुस्तक. त्याच्या लिखाणावर त्याच्या स्वतःच्या मॅरोनाईट ख्रिश्चन धर्माबरोबरच बहाई पंथाचा आणि इस्लामचाही पगडा जाणवत रहातो.
अल मुस्तफा या प्रेशिताची कथा. त्यानी लोकांना सांगितलेल्या गोष्टींची कथा.
गोष्टीची सुरवात होते ती प्रेषित अल मुस्तफा १२ वर्षे ऑर्फालीस शहरात राहिले आणि आता ते शहर सोडून जाणार आहेत.
टेकडीवरून उतरताना त्याना ऑर्फालीस बंदरात उभी असलेली जहाजे दिसतात.
टेकडीवरुन उतरताच ऑर्फालीसवासी अलमुस्तफाना वेढा घालतात. लोकांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत. लोक वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न विचारतात.आणि ते त्याला उत्तरे देतात.
हे प्रश्न आणि त्यांचे विषय खरेतर त्या काळाला सुसंगत तरीही त्यांची उत्तरे ही कालज्यी असावीत अशीआहेत. कोणत्याही काळात ती तशीच लागू पडतात.
लोक काहिही प्रश्न विचारतात. ते प्रश्न ही त्या पुस्तकातली एक एक प्रकरणे आहेत.यात प्रेम , लग्न जीवन , संसार, मुले , न्याय , चोरी , अन्न , मैत्री , दु:ख , शिक्षण , धर्म सौंदर्य, कायदा ,स्वातंत्र्य , जन्म आणि मृत्यू , प्रार्थना अशा अनेक विषयावर हे प्रश्न आहेत.

त्यांची उत्तरे नुसती वाचण्याजोगी आहेत असे कसे म्हणू. ती उत्तरे आपल्याला अंतर्मूख करतात.
जिब्रान लिहितो.
कडेवर मूल असलेल्या एका महिलेने विचारले की" मला मुले या विषयावर विचारायचे आहे. त्या बाबत मार्गदर्शन करा"
उत्तर येते . मुले ही तुमच्या पासून या जगात आली याचा अर्थ ती तुमच्या मालकीची आहेत असे समजू नका. मुले म्हणजे धनुष्यातून सोडलेला बाण. तो सोडणे तुमच्या हातात आहे. पण एकदा सोडल्यावर बाण ज्याप्रमाणे परत मागे घेऊ शकत नाही. तसेच मुलांचे आहे.
तुम्ही मुलांना तुमची स्वप्ने दाखवू शकता तुम्ही ती त्यांना देऊ शकत नाही

एक न्यायाधीश विचारतो : मला न्याय आणि अन्याय या बद्दल सांगा.
उत्तर येते : न्याय आणि अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो एकाला न्याय वाटेल तोच दुसर्‍याला अन्याय वाटू शकतो.
चोरीसाठी चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली तो ही जबाबदार आहे. त्याने आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यात हलगर्जीपणा का दाखवला.
तुमच्याकडे कोणी माझी बायको पळून गेली अशी तक्रार करत आला तर त्याला विचारा " बाबारे असे नक्की का झाले असेल याचा विचार केला आहेस?"

तेथे उभा असलेला एक वकील विचारतो : मला कायद्या बद्दल ज्ञान सांगावे.
जिब्रान लिहितो. की कायदा म्हणजे तुमच्या साठी एक खेळणे आहे. लहान मुलाला खेळणे दिल्या नंतर ते मोडण्यामधेच जास्त गंमत वाटते. तसेच तुमचे. तुम्ही कायदे करता आणि नंतर त्यांची मोडतोड करण्यात तुम्हाला मजा येते.

एक नवरा-बायको विचारतात की आम्हाला लग्न /संसार याबद्दल सांगा.
उत्तर मिळते की नवरा आणि बायको हे सांसाररूपी मंदीराचे दोन खाम्ब आहेत. मंदीर जर भक्कम बनवायचे असेल तर दोन खांबात छत पेलण्यासठी काही अंतर ठेवायला हवे. नवरा बायको मधे संवादाची देवाणघेवाण होईल / वारे वाहू शकतील इतके अंतर असू दे.
काही वाक्ये मराठी पेक्षाही खलील जिब्रानच्या इंग्रजीतच वाचायला छान वाटतात. Fill each others cup. Drink the same Tea, but not from the same cup.
( तुमच्या विचारांत थोडी तरी भिन्नता असू दे जगताना एकमत होऊ दे. पण बायकोने नवर्‍याच्या विचारांना हो ला हो म्हणण्यापेक्षा दोघांत थोडी मतभिन्नता असू दे. संवादाचे वारे एकमेकांत वाहू द्या. तीला स्वतःचे विचार बाळगू द्या. ) खलील जिब्रान ने हे विचार लिहीले ते साल होते १९२३.

तेथे उभी असलेली एक स्त्री विचारते की मला अन्न या बद्दल सांगा. शाकाहार बरा की मांसाहार.
प्रेषित उत्तरतात की मांसाहार करा की शाकाहार , काहिही केले तरी हिंसा ही होणारच.
जगण्यासाठी अन्न हे गरजेचे आहे. हिंसा पूर्णपणे टाळणे अशक्य आहे. तुम्ही एक करु शकता की अन्न म्हणून ज्या जीवाची हत्या कराल त्या जीवाची माफी मागा. अणि म्हणा जी बाबारे माझ्या शरीरात तु अंश रुपाने तूच नांदणार आहेस.

एक प्रेमी जोडपे विचारते आम्हाला मैत्री बद्दल सांगा
खलील लिहितो
तुमचा मित्र म्हणजे तुमच्या गरजाना मिळालेले उत्तर आहे. तुमचा मित्र म्हणजे तुम्ही ज्यामधे प्रेम पेरता से शेत आहे
खरेतर हे पुस्तक इंग्रजीत वाचायला मजा येते ती त्यातल्या भाषेमुळे. थोडीशी काव्यमय आणि एक प्रकारचा नाद असलेली भाषा. कदाचित खलील जिब्रान ने त्याची सगळी पुस्तके अगोदर लेबनीज अरबी भाषेत मधे लिहीली आणि नंतर इंग्रजीत प्रकाशीत केली म्हणून असेल कदाचित.
इथे पुस्तकातली भाषा द्यायचा मोह टाळता येत नाही. या भाषेची नादमयता आपल्याला वाचतानाही जाणवते.

Your friend is your needs answered. He is your field which you sow with love and reap with thanksgiving. And he is your board and your fireside. For you come to him with your hunger, and you seek him for peace. When your friend speaks his mind you fear not the “nay” in your own mind, nor do you withhold the “ay.”

प्रॉफेट हे पुस्तक आपण एकदा वाचून थांबत नाही. ते वाचताना एकाएका वाक्याचे अनेक अर्थ लागत जातात. ती मनात घर करतात.

प्रॉफेटः खलील जिब्रान.

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

31 May 2023 - 2:36 am | चित्रगुप्त

खलील जिब्रानच्या साहित्याचा थोडक्यात करून दिलेला परिचय आवडला. अनेक आभार विजुभाऊ.
श्री. अनंत काणेकर (१९०५-८०) यांनी खलील जिब्रान यांच्या काही कथांचे केलेले अनुवाद १९६७-६८ च्या सुमारास मी वाचले, तेंव्हा अगदी भारून गेलो होतो. गंमत म्हणजे काणेकरांनी (बहुतेक- चूभूद्याघ्या) 'खलिल गिब्रान' अशा टोपण नावाने जिब्रान च्या शैलीतच काही कथा लिहून प्रसुद्ध केल्या होत्या असे आठवते आहे.
या लेखाच्या निमित्ताने एवढ्या वर्षांनी पुन्हा जिब्रानची आठवण येऊन जालावर शोध घेता त्याची चित्रे बघायला मिळाली, आणि १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला होता वगैरे माहिती मिळाली. त्याची काही चित्रे-
...
...
...
यातले अगदी शेवटले चित्र हे खलिल जिब्रान याचे १८९८-९९ मधील व्यक्तिचित्र आहे.
चित्रकारः Lilla Cabot Perry (American, 1848 - 1933)

कर्नलतपस्वी's picture

31 May 2023 - 6:37 am | कर्नलतपस्वी

विजुभाऊ +चित्रगुप्त =खलिल जिब्रान.

फक्त नावच माहीती. पण सुदर परिचय म्हणेन. मिळाल्यास जरूर वाचेन.

काही पुस्तके सर्व कालीक असतात जसे पंचतंत्र तसेच वाटते.

सपनों का विश्वास करो, क्योंकि उनमें शाश्वतता का दरवाज़ा छिपा हुआ है।
मृत्यु से डरना उस गड़रिए से डरने की तरह है, जो कि जब राजा के सामने खड़ा होता है, जिसके हाथ सम्मान में उसकी ओर बढ़ते हैं।

-अनुवादित
-ख जि

Bhakti's picture

31 May 2023 - 8:04 am | Bhakti

हेच म्हणते!
त्याचप्रमाणे सिक्रेट हेही इंग्रजी पुस्तक अशाच लाईफ फिलोसोफीसाठी प्रसिद्ध आहे.

कर्नलतपस्वी's picture

31 May 2023 - 10:53 am | कर्नलतपस्वी

याच पुस्तकातील एक अनुवादित कवीता अंतरजालावर सापडली.
कदाचीत कविवर्य सांगू इच्छीतात. प्रेम म्हणजे समर्पण. कदाचित प्रेम करताना कान,नाक,डोळे व बुद्धी जागृत ठेवून प्रेम करा.

जरा जपून जपून चाल पुढे धोका आहे.

याचे मुळ इंग्रजी भाषेतील शब्द आहेत का, असल्यास डकवाल का?

प्रेम

प्रेम का संकेत मिलते ही अनुगामी बन जाओ उसका
हालाँकि उसके रास्ते कठिन और दुर्गम हैं
और जब उसकी बाँहें घेरें तुम्हें,
समर्पण कर दो
हालाँकि उसके पंखों में छिपे तलवार,
तुम्हें लहूलुहान कर सकते हैं,
फिर भी
और जब वह शब्दों में प्रकट हो
उसमें विश्वास रखो
हालाँकि उसके शब्द तुम्हारे सपनों को
तार-तार कर सकते हैं

जैसे उत्तरी बर्फीली हवा उपवन को
बरबाद कर देती है।
क्योंकि प्रेम यदि तुम्हें सम्राट बना सकता है
तो तुम्हारा बलिदान भी ले सकता है।

प्रेम कभी देता है विस्तार
तो कभी काट देता है पर।
जैसे वह, तुम्हारे शिखर तक उठता है
और धूप में काँपती कोमलतम शाखा
तक को बचाता है
वैसे ही, वह तुम्हारी गहराई तक उतरता है
और जमीन से तुम्हारी जड़ों को हिला देता है

अनाज के पूला की तरह,
वह तुम्हें इकट्ठा करता है अपने लिए
वह तुम्हें यंत्र में डालता है ताकि
तुम अपने आवरण के बाहर आ जाओ।

टर्मीनेटर's picture

31 May 2023 - 11:59 am | टर्मीनेटर

हि घ्या... लैच मोठी आहे 😀

When love beckons to you, follow him,
Though his ways are hard and steep.
And when his wings enfold you yield to
him,
Though the sword hidden among his
pinions may wound you.
And when he speaks to you believe in
him,
Though his voice may shatter your dreams
as the north wind lays waste the garden.

For even as love crowns you so shall he
crucify you. Even as he is for your growth
so is he for your pruning.
Even as he ascends to your height and
caresses your tenderest branches that quiver
in the sun,
So shall he descend to your roots and
shake them in their clinging to the earth.

Like sheaves of corn he gathers you unto
himself.
He threshes you to make you naked.
He sifts you to free you from your husks.
He grinds you to whiteness.
He kneads you until you are pliant;
And then he assigns you to his sacred
fire, that you may become sacred bread for
God’s sacred feast.

All these things shall love do unto you
that you may know the secrets of your
heart, and in that knowledge become a
fragment of Life’s heart.

But if in your fear you would seek only
love’s peace and love’s pleasure,
Then it is better for you that you cover
your nakedness and pass out of love’s
threshing-floor,
Into the seasonless world where you
shall laugh, but not all of your laughter,
and weep, but not all of your tears.

Love gives naught but itself and takes
naught but from itself.
Love possesses not nor would it be
possessed;
For love is sufficient unto love.

When you love you should not say,
“God is in my heart,” but rather, “I am
in the heart of God.”
And think not you can direct the course
of love, for love, if it finds you worthy,
directs your course.

Love has no other desire but to fulfil
itself.
But if you love and must needs have
desires, let these be your desires:
To melt and be like a running brook
that sings its melody to the night.
To know the pain of too much tenderness.
To be wounded by your own under-
standing of love;
And to bleed willingly and joyfully.
To wake at dawn with a winged heart
and give thanks for another day of loving;
To rest at the noon hour and meditate
love’s ecstasy;
To return home at eventide with grati-
tude;
And then to sleep with a prayer for the
beloved in your heart and a song of praise
upon your lips.

- Khalil Gibran

कर्नलतपस्वी's picture

31 May 2023 - 12:37 pm | कर्नलतपस्वी

टर्मिनेटर भौ. माझ्या समजदाणी
नुसार अनुवादित कवीते मधे एक लव्ह जिहाद सारखी चेतावणी आहे. कवी, प्रेम या अत्युच्च समर्पणाच्या वेळी सुद्धा सजग आहे असे वाटते.

वरिजनल मिळाली पडताळून बघतो. मग पुन्हा प्रतीसादतो.

टर्मीनेटर's picture

31 May 2023 - 11:56 am | टर्मीनेटर

परिचय आवडला हो विजुभाऊ 👍

खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी)
खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद स्मिता लिमये), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
खलील जिब्रान संच (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी) . या पुस्तकात जिब्रानच्या २० कथा समाविष्ट आहेत.
खलील जिब्रान - रैहाना (बालसाहित्य, अनुवादक - श्रीपाद जोशी)
जिब्रान खलील जिब्रान : जीवन आणि साहित्य (लेखक - श्रीपाद जोशी
जिब्रानच्या नीतिकथा (अनुवादक - श्रीपाद जोशी)
देवदूत (त्र्यं.वि. सरदेशमुख
प्रेषित (अनुवादक - श्रीपाद जोशी)
दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे.
द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
बंडखोर आत्मे (अनुवादक - श्रीपाद जोशी)
दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद काका कालेलकर). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत.
रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा अनंत काणेकर यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९)
वॉंडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद काका कालेलकर)
वेडा (अनुवादक - श्रीपाद जोशी)
सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद काका कालेलकर)
सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - श्रीपाद जोशी.

.....

कंजूस's picture

1 Jun 2023 - 5:59 am | कंजूस

संकलन झकास आहे.

प्रॉफेट चा मराठी मधे अनुवाद झालेला आहे हे माहीत नव्हते.
मी बा भ बोरकरांनी कोकणी भाषेत केलेले रुपांतर वाचले होते.
खलील जिब्रान ने म्हणे त्याचे लेखन अगोदर फ्रेंच लिहीले होते आणि त्या नंतर ते इंग्रजीत रुपांतरीत केले त्यामुळे त्यातली भाषा थोडी कवितेकडे झुकते

अथांग आकाश's picture

1 Jun 2023 - 10:24 am | अथांग आकाश

छान पुस्तक परिचय!
शाकाहार बरा की मांसाहार विषयक त्यांचे विचार आवडले!!
.

चौथा कोनाडा's picture

1 Jun 2023 - 7:47 pm | चौथा कोनाडा

सुंदर परिचय. उधृत केलेले उतारे, तत्वज्ञान अतिशय रोचक आणि महत्त्वाचे आहे.
किंचित आधी वाचले आहे.. इथे छान माहिती मिळाली.
चित्रगुप्त, कर्नल, भक्ति, टर्मी यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
वाचण्याच्या यादीत पुस्तके समाविष्ट केली आहेत.
धन्यवाद विजू भाऊ

चित्रगुप्त's picture

1 Jun 2023 - 8:41 pm | चित्रगुप्त

.
Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972

.
.

Beloved Prophet: The Love Letters of Kahlil Gibran and Mary Haskell, and Her Private Journal Hardcover – Illustrated, February 12, 1972
जिब्रानला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या 'मेरी हॅस्केल' हिने उद्युक्त केले आणि संपूर्ण आर्थिक मदत केली होती.
या दोघातील मधुर नात्यावर एक लेखः
https://www.themarginalian.org/2017/01/20/kahlil-gibran-mary-haskell-lov....

विजुभाऊ's picture

2 Jun 2023 - 6:37 am | विजुभाऊ

अरे वा. हे वाचायलाच हवे.

काहीच ठाऊक नसते. हे पुस्तक आता वाचावे लागणार. माझ्या एका मित्राने मुलाचे नाव जिब्रान ठेवले आहे.

चांगल्या पुस्तकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद.