हा हा माझ्या मागील सीबीएससीच्या लेखाचा उपसंहार आहे - भाग 2
जुन्या लेखाची लिंक
https://www.misalpav.com/node/48450
मागे मी लिहिले होते की सीबीएससी चे नक्कीच काही फायदे आहेत. आता कन्या सीबीएससी झाल्यामुळे - आणि ती फारसा अभ्यास करीत नसल्याने मला त्यातील काही फायदे अधिकचे दिसले . यात कुठल्याही बोर्डाची भलावण वगैरे नाही पण फायदे असतील तर ते कळणे हे आहे आणि त्याचबरोबर ज्यांची मुले जाणार आहेत किंवा ते विचार करतात त्यांना काही माहिती मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा ही इच्छा.
पुढील १०-१२ वर्षात अर्थात यात काही गोष्टी बदलतील
तर जेव्हा कन्या सीबीएससी झाली म्हणजे शेवटची परीक्षा दिली आणि रिझल्ट लागला तेव्हा काही फायदे लक्षात आले
शेवटच्या परीक्षेला फक्त दोन भाषा आणि त्यात हि हिंदी मराठी नाही!
सहावी पासुंन मुलीला मराठी सोडता , आणि आठवीपासून मराठी . सीबीसीची फायनल परीक्षा ही फक्त दोन भाषांची होती - इंग्लिश प्रथम भाषा आहे आणि मुलीने फ्रेंच घेतले होते.
तिला सहावी पासून फ्रेंच होते त्यावेळी तीन भाषा होत्या - मराठीच्या ऐवजी फ्रेंच घेतले होते . आठवी नंतर हिंदी किंवा फ्रेंच हा पर्याय . एक मोठा फायदा झाला की मराठी आणि हिंदी सारख्या निरुपयोगी भाषा सोडून थोडीफार उपयोगी होईल खास करून उच्च / विदेशी शिक्षणासाठी वगैरे अशी फ्रेंच भाषा घेऊन परीक्षा देता आली
( आताच्या बॅच ला हि सुविधा नाही असे ऐकले आहे - खात्री करून घ्यावी )
फक्त ५ विषय -
त्याच्याच बरोबर शेवटच्या वेळी सीबीएससी ला फक्त पाच विषय असतात मुख्य भाषा इंग्लिश दुसरी भाषा एक गणिताचा पेपर एकच शास्त्रांचा पेपर आणि एकच समाजशास्त्र इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र यांचा पेपर आणि आपण एसएससी महाराष्ट्र बोर्ड पाहिले तर समाजशास्त्र शास्त्र आणि गणित यांचे दोन पेपर असतात त्यामुळे हा ॲडिशनल वैताग आहे
दोन पेपर मध्ये व्यवस्थित सुट्टी
परीक्षा झाली त्यावेळेला दोन पेपर मध्ये व्यवस्थित गॅप होता ते काही वेळेला पाच आणि काही वेळात आठवण दिवसांचा गॅप मिळाला त्यामुळे झाले काही की तयारी करायला सर्वांना व्यवस्थित वेळ मिळाला इम्पॅक्ट जर तुमची तयारी झाली नसेल एक थोडेसे मार्क पाहिजे असतील तर या दिवसात सुद्धा तयारी करता आली असती एस एस सी चा टाईम टेबल पाहिलं तर त्यामध्ये फार कमी गॅप होती पेपर जास्त आणि गॅप कमी हा वैताग होता.
सीबीएससी ला किमान ४ ते कमाल १० दिवसांची गॅप होती
अंतर्गत २० मार्क
एसएससी ला नक्की माहित नाही किंवा इतर बोर्डांचे पण पण सीबीएससी मध्ये 80 मार्काचा पेपर असतो 20 मार्क शाळा देते. तुम्ही चांगले वर्तन ठेवले, अभ्यास केला, थोडाफार वह्या पूर्ण ठेवल्या फार शाळेत उचापती केल्या नाहीत - तर विसात वीस मार्क दिले जातात. अगदी १५ दिले तरी बाकीच्या पेपर मध्ये पास व्हायचे असेल तर 80 मध्ये २० मिळवण्याची जबाबदारी राहते त्यामुळे तिकडे पण फायदा आहेत
बऱ्याच मुलांना वीस मार्क दिले जातात त्यामुळे त्यांना साधारण मार्क काढायचे आहेत त्यांना फार लोड येत नाही
सोपे गणिताचा पेपर
हे परत एच एस सी ला आहे का माहित नाही पण अनेक विद्यार्थ्यांना गणित कठीण जाते आणि सायन्स आर्किटेक्चर वगैरे जायचे नसेल तर गणिताचा उपयोग नसतो. सीबीएससी एक तुलनेने सोपे असलेला लोअर मॅथ्स चा पर्याय देते .
कन्येचा कला शास्त्र , इंजिनिअरिंग कडे नाही आणि तिला गणित कठीण जाते हे हे कळले तेव्हा आम्ही बेसिक मॅथ्स घ्यायचे ठरवले तिच्या शाळेत तरी याचा वेगळा वर्ग नव्हता किंवा वेगळी ट्युशन नव्हती तसेच क्लासही नॉर्मल मॅथ्स चा होत होता तर त्यामुळे अभ्यास नॉर्मल मॅथ्स आणि पेपर लोवर मॅथ्सचा याचा तिला पेपर सोपे जाण्यात फायदा झाला.
झटपट रिझल्ट आणि त्याची फार हवा नाही
यावर्षी रिझल्ट १२ मे ला लागला आणि आम्हाला तरी फार हवा नव्हती. काही दिवस आधी काही साईट वर माहिती येत होती पण त्या अफवा वाटल्या .
१२ मे ला सीबीएससी च्या बारावी चा रिझल्ट आला आणि ऑनलाईन झटपट एक दोन तासात दहावीचा आला . एसएससी सारखे तारखेचा अंदाज , त्याला बराच वेळ , काही वेळा थोडा पुढे ढकलणे असे झाले नाही.
आयसीएसई हा बहुदा अधिक लोकप्रिय बोर्ड आहे - त्याचे फायदे कोणी लिहिले तर बरे होईल
अतिशय थोडे जे निकाल ऐकले त्यात आयसीएसई ला अधिक मार्क मिळाले असे वाटले
जाता जाता
नवी मुंबईत फार आर्ट्स ची ची चांगली कॉलेज नसल्याने आम्ही एक सीबीएससी शाळेला संलग्न असलेल्या सीबीएससी आर्ट्स कॉलेज मध्ये मुलीला टाकले .ह्यांची बारावी सीबीएससी बोर्ड ची. फार पर्याय नव्हते
मला आयसीएसई / सीबीएससी च्या अकरावी बारावी बद्दल फार माहीत नव्हते
तिकडे पण दिसले कि सीबीएससी अकरावी बारावी ला महाराष्ट्र बोर्ड विषय कमी आहेत - महाराष्ट्र बोर्ड ला ७ विषय त्यात २ भाषा तर सीबीएससी ला ५ विषय त्यात एकच इंग्लिश भाषा
कोणाचे कोणी जर सीबीएससी मधून आर्ट्स केले असेल तर ते किती सोपे / कठीण आहे - त्यात फार लोड न घेता भरपूर मार्क मिळतात का / कसे मिळवावे याच्या माहितीच्या प्रतीक्षेत आहे
अजून एक - आय जी सी एस इ या इंटरनॅशल बोर्ड चा एक प्रॉब्लेम कळलं आहे - त्यांना गणितासाठी scintific calculator चालतो - आणि अकरावी बारावी लोकल बोर्ड, इंजिनिअरिंग - आर्किटेक्चर - इतर प्रवेश परीक्षेत चालत नसल्याने त्याचा त्रास होतो . काही जणांना यासाठी क्लास लावावे लागले आहेत
प्रतिक्रिया
16 May 2023 - 12:56 pm | श्रीगुरुजी
मराठी या निरूपयोगी भाषेत हे लेखन करण्याऐवजी इंग्लिश किंवा फ्रेंच या उपयुक्त भाषेत लिहायला हवे होते.
असो. मराठी भाषा ही निरूपयोगी आहे हे सांगण्यापुरता तरी मराठी भाषेचा वापर झाला, हेही नसे थोडके.
16 May 2023 - 1:16 pm | Trump
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
16 May 2023 - 2:01 pm | कानडाऊ योगेशु
मला वाटते व्यावसायिक दृष्ट्या निरूपयोगी ह्या अर्थाने लेखकाला मराठी ला निरुपयोगी म्हणायचे असावे.
लेखकाने अगदीच स्पष्ट लिहिल्याने मी ही क्षणभर स्तब्ध झालो होतो.
16 May 2023 - 2:14 pm | श्रीगुरुजी
व्यावसायिक दृष्ट्या मराठी वाटते तितकी निरूपयोगी नाही. यावर्षी आयपीएल प्रक्षेपण सुद्धा मराठीत आहे व दोन षटकातील बऱ्याच जाहिराती सुद्धा मराठीत असतात. बऱ्याच समाजमाध्यमांनी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कॉलसेंटरवर मराठी भाषेत उत्तर देणारे आहेत (त्यासाठी मराठीत बोला असे तुम्हाला सांगावे लागते). अगदी इंग्लिश इतकी मराठी भाषा जगमान्य नसली तरी अगदीच निरूपयोगी नाही.
शेवटी कोणतीही भाषा उपयोगी किंवा निरूपयोगी करणे हे त्या भाषिकांवरच अवलंबून आहे. आपली भाषा जिवंत रहावी असे वाटत असेल तर आपणच आपल्या भाषेचा शक्य तेथे वापर करायला हवा व इतरांनी सुद्धा आपली भाषा वापरण्याचा आग्रह धरला पाहिजे. एटीएम, फेसबुक, गुगल, कायप्पा, ट्विटर अश्या अनेक ठिकाणी मी मराठीच वापरतो. कॉलसेंटरवरून संपर्क करणाऱ्यांना मराठीत बोलायला सांगतो. माझ्यापरीने मी माझी भाषा जिवंत ठेवण्याचा व जास्तीत जास्त उपयुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जर मराठी निरूपयोगीच आहे अशी ठाम समजूत झाली असेल तर तात्काळ ही भाषा वापरणे थांबवून उपयुक्त भाषांचा वापर सुरू करायला हवा.
16 May 2023 - 1:06 pm | गवि
कमी अभ्यासक्रम, सोपे गणित, कमी पेपर्स, सुलभता हे सर्व दहावीचे मार्क मिळवण्यापुरते फायद्याचे असू शकेल. पण मुलांना पुढे चाढत्यावाढत्या भांजणीने जो अभ्यास करावा लागतो त्याच्या दृष्टीने दीर्घकालीन फायदा आहे का?
पास होणे आणि ८५-९० मार्क आणणे तर कमीजास्त प्रमाणात सर्वच बोर्डांत बऱ्यापैकी शक्य कोटीत आले आहे असे वैयक्तिक निरीक्षण. आमच्या १९९०-९१ काळात दहावी कोणत्याही बोर्डात ऐंशी टक्के मिळवले म्हणजे यशाची हंडी फोडली असे मानले जायचे. ८५ ला तर मेरिट लिस्टमध्येही शेवटी शेवटी का होईना, नंबर लागू शकत असे. ९०-९५ टक्के म्हणजे तेव्हा जगातभारी.. आता अगदी सहज दिसतात ९५ वाले आसपास. बरे किंवा वाईट ते माहीत नाही. पण अभ्यासक्रम सोपे , सुटसुटीत करत नेणे हे कितपत दीर्घकालीन फायद्याचे हे नक्की कळत नाहीये.
लेख महत्त्वाच्या विषयाला हात घालणारा. धन्यवाद.
16 May 2023 - 2:07 pm | कानडाऊ योगेशु
लेखक म्हणतो त्याप्रमाणे अभ्यासाचा जास्त लोड नाही. पण ह्याचा एक तोटा असा आहे कि वैद्यकिय, अभियांत्रिकी तसेच पुढच्या टप्प्यात देता येणार्या स्पर्धात्मक परीक्षांची पायाभरणी सी.बी.एस.सी मध्ये होत नाही असे आढळून आले आहे. एका परिचिताच्या मुलाने आय.आय.टी तसेच वैद्यकिय परीक्षात यश मिळवले त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलो असता त्याने सांगितले कि सगळ्या अभ्यासासाठी शाळेवर अजिबात अवलंबुन राहिलो नाही तसेच राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके हि संदर्भासाठी वापरली. एकुण तुम्हाला तुमच्या पाल्याकडुन जास्त शैक्षणिक अपेक्षा नसतील तर सी.बी.एस.ई चांगला पर्याय आहे.
डमी स्कूल वगैरे साठी सी.बी.एस.सी चांगला पर्याय आहे.
16 May 2023 - 5:58 pm | हेमंत सुरेश वाघे
वैद्यकिय, अभियांत्रिकी तसेच पुढच्या टप्प्यात देता येणार्या स्पर्धात्मक परीक्षांची पायाभरणी सी.बी.एस.सी मध्ये होत नाही असे आढळून आले आहे.
हे कोठे वाचले ?
काही आकडेवारी ?
काही रिसर्च ?
उलटे आयआयटी साठी बेस सिलॅबस असतो तो सिबीएससी चा असतो ना ? त्यामुळे आय आय टी मध्ये सीबीएस सी ला unfair advantage मिळते असे ऐकून होतो . बहुतेक नीट मध्ये पण .
खरे तर जवळ आहे जे पहिले पण सी बी एस सी च्या मुलांचा शास्त्र विषयात स्पर्धा परीक्षेत चांगला परफॉर्मन्स हे एक कारण होते
काही पेपर मध्ये यावर रिपोर्ट वाचल्याचे आठवते .
नीट मध्ये माहिती नाही मिक्स रिपोर्ट आहेत
अजून एक महाराष्ट्र आणि इतर स्टेट मध्ये दहावी पर्यंत ICSE / CBSE आणि मग लोकल बोर्ड हा कॉमन प्रकार आहे
त्यामुळे महाराष्ट्र बोर्ड मधनं बारावी केलेले आयआयटी / टॉप इंजिनिअरिंग कॉलेज / नीट मध्ये सिलेक्ट झाले असतील तरी त्यात परत दहावी पर्यंत ICSE / CBSE केलेले किती हा पण इंटरेस्टिंग डेटा असेल .
नीट मधील बातम्या चत्कारिक आहेत - तरी हि CBSE हा single largest dominating बोर्ड असावा असे वाटते
काही बातम्या
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/75-of-iit-crackers-are-f...
https://www.indiatimes.com/news/india/cbse-students-advantage-admission-...
https://timesofindia.indiatimes.com/education/state-boards-neet-aspirant...
मी मिळाला तर अजून डेटा देईन - आपण हि काही वेगळी आकडेवारी असेल तर द्या
१९९१ ला मुंबईत ICSE शाळा कमी होत्या / CBSE फार फार कमी पण इंजिनिअरिंग ला त्या प्रमाणत अधिक मुले दिसली . MBA ला थोडी अधिक
17 May 2023 - 11:26 am | हेमंत सुरेश वाघे
कानडाऊ योगेशु CBSE ची मुले underperform करतात याचा काही डेटा मिळेल का ?
21 May 2023 - 12:00 pm | हेमंत सुरेश वाघे
वैद्यकिय, अभियांत्रिकी तसेच पुढच्या टप्प्यात देता येणार्या स्पर्धात्मक परीक्षांची पायाभरणी सी.बी.एस.सी मध्ये होत नाही असे आढळून आले आहे. - असे तुम्ही म्हणतात
केंद्रीय परीक्षा खास करून आयआयटी मध्ये सी बी एस इ ची मुले सर्व बोर्डा पेक्षा जास्त आहेत
वर बातम्या दिल्या आहेत
तर आपले विधान कोणत्या आकडेवारीवर होते हे सांगाल का ?
परत परत विचारत आहे
16 May 2023 - 2:40 pm | कपिलमुनी
नक्की कुठल्या बोर्ड बद्दल लिहिलं आहे ?
मागच्या भागात सीबीएसई ला एडमिशन झाले या भागात सिबीएससी मधून १२ वी झाली..
16 May 2023 - 6:19 pm | हेमंत सुरेश वाघे
सीबीएसई बद्दल लिहिलं आहे
मुलगी सीबीएसई दहावी झाली
आता फार कॉलेज चा पर्याय नसल्याने अकरावी ला सीबीएसई मध्ये घातले आहे .
17 May 2023 - 6:39 am | चौकस२१२
आता फार कॉलेज चा पर्याय नसल्याने ?
म्हणजे काय? समजा तुम्ही मुबंईत आचहात तर सीबीएससी १० वि मुळे रुपारेल सारखया ठिकाणी ११ वि ला जाताच येत नाही ?
17 May 2023 - 8:23 am | हेमंत सुरेश वाघे
सर मी नवी मुंबईत आहे
अर्थात मुंबईतील कॉलेज मध्ये जाण्याचा पर्याय होता
आता असे आहे कि
मुलगी अभ्यासू नव्हती तरी अपेक्षे पेक्षा फार मार्क आले
पण
आता मार्कांची लेव्हल वाढली आहे
त्यामुळे संत झेव्हिअर सारख्या कॉलेज मध्ये ९४ -९५ टक्के मार्क्स आर्ट्स ला लागतात
अजून जी चांगली कॉलेज मुंबई मध्ये आहेत - शहरातील २ मोठी केसी आणि जय हिंद , रुपारेल , रुईया , मिठीबाई इकडे हि बराच चांगला कट ऑफ आहे
रुपारेल , मिठीबाई , वझे फारच दूर आहेत
आणि
मुलीला प्रवासाची सवय नाही
आणि तिला कला ( चित्रकला / अनिमेशन / डिझाईन / डिजिटल आर्ट ) मध्ये जायचे आहे - त्याचे क्लास रिझल्ट आधीच सुरु झाले . या प्रवेश परीक्षा पण आता extremly competitive झाल्या आहेत
त्यामुळे त्याच्या तयारीला वेळ द्यावा लागेल, अनेक जण याची पण तगडी तयारी करत आहेत
आणि मुलगी
आजिबात अभ्यासू नाही
तिला अभ्यासाची आवड नाही
बहुतेक आर्ट कोर्स साठी कोणत्याही बारावी मध्ये ५०-६० टक्के मार्क लागतात आणि त्यावर प्रवेश परीक्षा असते
तर खूप मार्क का मिळवायचे ?
जायला यायला वेळ का घालवायचा ?
जे विषय शिकायचे नाहीत त्याचा लोड का घ्यायचा
म्हणून जवळचे कॉलेज बघत होतो
त्यात महाराष्ट्र बोर्ड कॉलेज चा फार कमी पर्याय होता . त्या साठी सरकारी फॉर्म , त्याची वाट बघा हे करावे लागले असते
मला मुलगी सेंट झेव्हिअर मध्ये गेली तर आवडली असती. चकाचक पॉलिश्ड कॉलेज . कधी काळी फॉर्म भरून मी तो चकाचक पणा पाहून गेलो नव्हतो . पण आता तिकडे दहावीत ९४-९५ टक्के मार्क लागतात . ते नाहीत . आणि जवळपास अडीच तीन तास लागतील . आणि आता ट्रेन पण किचाड झाली आहे .
18 May 2023 - 5:51 am | चौकस२१२
आर्ट म्हणजे १) चित्रकला/ इंटिरियर / इंडिस्ट्रीअल डिजाईन हे का कि आर्ट म्हणजे २) भाषा / इतिहास वगैरे
यातील १) असेल तर मग त्यात पुण्यात पण संस्था आहेत
२) असेल तर नवी मुंबई च्या जवळपास असणारच कि काही तरी
18 May 2023 - 12:41 pm | हेमंत सुरेश वाघे
वरील फिल्ड म्हणजे फाईन आर्ट
त्यात अनिमेशन / visual communication / ग्राफिक आर्ट नाहीतर चित्रकला यात इंटरेस्ट नाही
फॅशन / इंटिरियर / इंडिस्ट्रीअल डिजाईन यात नाही
इंडिस्ट्रीअल डिजाईन मध्ये मास्टर मोठ्या प्रमाणात इंजिनिअर / architect जातात त्यामुळे ती वृत्ती लागत असावी
मुंबईत दोन फार चांगली सरकारी आर्ट कॉलेज आणि डिझाईन चा तगडा कोर्स IIT ला आहे ( कमी सीट , फार स्पर्धा )
नाहीतर अहमदाबाद ला NID - अनेकांच्या मते सगळ्यात चांगले
बाकी इतर कॉलेज आहेत - तुम्ही सांगता तसे पुण्यात पण
20 May 2023 - 12:19 am | हेमंत सुरेश वाघे
हे आर्ट ( चित्रकला / डिझाईन ) चे कोर्स बारावी नन्तर आहेत
बारावी आर्ट्स / कॉमर्स / सायन्स काहीही
बारावी मध्ये ५० टक्के मार्क ( बहुतेक)
प्रवेश परीक्षा - अनेक कोर्स ची highly competitive - मुले बरीच तयारी करतात
त्यामुळे बारावी चे महत्व बेसिक क्वालिफायर आणि आणि एक ५० टक्के मिळवणे इतकेच
त्यामुळे जमेल ते सोप्यात सोपे कॉम्बिनेशन घेऊन प्रवेश परीक्षे चा अभ्यास करावा असे वाटते
16 May 2023 - 6:42 pm | चौकस२१२
एवढे वेगवेगळे बोर्ड असतील तर मग पदवीच्या प्रवेशाला सगळ्यांना एकाच पद्धीतीने कसे मोजले जाते?
कारण पुढे जे विदयापीठ आहे त्याची पदवी तर सगळ्यांना सारखीच ना ?
17 May 2023 - 12:00 am | हेमंत सुरेश वाघे
बहुतेक ज्या कोर्स ला खूप मागणी आहे त्याला प्रवेश परीक्षा आहे
काही आठवते ते ( अजून बरेच असावे)
IIT, NIT other Engineering
Medicine
Architecture
Pharmacy
Some research institute
Hotel Management
Design
Art
Armed Forces
Merchant Navy
Law
17 May 2023 - 6:37 am | चौकस२१२
हो बरोअबर पण मग त्याआधी १२ वि कोणत्या बोर्डातून केली त्याने तसा काय फरक पडतो ते कधीच मला कळले नाही
आणि दुसरे असे कि जर १० वि नंतर ११ त चांगल्या महाविद्यालयात जायचं अ सेल तर मग वेगवेगल्या बोर्डाचं १० वीचे समानी करण कसे केले जाते ?
आणि आजकाल असेही म्हणे आह एकी ११ वि ते पदवी असे देणारी "डिमड का काय ते युनिव्हर्सिटी म्हणे? म्हणजे १२ वि चे दडपणच नाही !
आणि दुसरे नेहमी न कळलेले म्हणजे "इंटरनॅशनला स्कूल" .. मागे एकदा दिलीत पॉश शाळेत विचारले कि काय हो "इंटरनॅशनल म्हणजे नक्की काय?"
असे का कि विद्यार्थाने तिथे ७ वि पर्यंत शिक्षण घेतले आणि समजा कुटुंबाने पुढे इंग्लड किंवा कॅनडा मध्ये ८ विला स्तलांतरित व्हायचे ठरवले तर विद्यर्थ्याला काही विशेष सवलत मिळते? त्याना काहीही सांगता आलं नाहि.. आणि अशी सवलत काही नसावी कितीतरी स्तहलन्तरित या देशात जातात आणि त्यन्चि मुले सर्वसाधान्र राज्य बोर्डाच्या शिक्षणक्रमातून आलेली असतात ..आणि त्याचे वय पाहून साधारण पणे योग्य त्या इयत्तेत प्रवेश सहज दिला जातो
एक इंटरनॅशनल चा आणि दुसरा राज्य बोर्डाचा अस्ला तरी यात काही फरक पडत नाही ( काही देशात पडत असेल तर माझे विधान अर्धा सत्य ) मग उगाच हे इंटरनॅशनल शाळा हि काय भानगड ?
तिथे प्राचीन युरपिय इतिहास असे काही विषय असतात का? कि जे शिकून भारतात राहणाऱ्यांना फारसा काही उपयोग नाही आणि समजा इंग्रजी उच्च असेल तर जरी वयवहारात त्याचा फायदा होत असेल तरी पदवी ला प्रवेश मिळ्ण्याशी काय संबंध?
डिमड युनिव्हर्सिटी हि हि एक काही पळवाट आहे का? फक्त युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन परवानगी देते ना ?
मग असा शिक्षणाच्या आईचा घो का केलाय सगळ्यांनी ?
17 May 2023 - 12:36 pm | हेमंत सुरेश वाघे
सर ११ वि ते पदवी असे देणारी "डिमड का काय ते युनिव्हर्सिटी म्हणे?
११ वि ते पदवी ? हे मला पण नवीन आहे .
काही कोर्स च्या लिंक देता का ? कोणते कोर्स असतात
तसेच UGC ची परवानगी असलेले कोर्स असतात का ?
त्यांची प्लेसमेंट कशी होते ?
तसेच पुढे शिकायचे तर काय ?
कारण जर हा चांगला पर्याय असेल तर बघायला हरकत नाही
17 May 2023 - 3:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Deemed university
-दिलीप बिरुटे
18 May 2023 - 5:29 am | चौकस२१२
वाचले , धन्यवाद पण मग युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन ला अर्थ काय? दोन दोन पद्धती कशाला?
अजून एक उदाहरण देतो , नॅशनल स्कूल ऑफ डिजाईन सुरु झाले, तेथील शिक्षण क्रमाला डिप्लोमा ( पदविका) का म्हणले कोण जाणे? जगभर इंण्डस्ट्रियल डिजाईन ची पदवीच दिली जाते .. सरकारचे चे कौतिक कि दूरदृष्टीचा विचार करून संस्था सुरु केली खरं आणि तेवहा इंण्डस्ट्रियल डिजाईनर ना भारतात एवढी मागणी नवहती ,,
१०+३ = डिप्लोमा ( पदविका) अभियांत्रिकी
१०+२ + ४ = पदवी अभियांत्रिकी
१०+२+ ३/४ = डिप्लोमा ( पदविका) इंण्डस्ट्रियल डिजाईन ..
म्हणजे ज्यांनी सुरवातीला ती :पदवीक" घेतली त्यांची पोपट ...तयावेळेस अभियांत्रिकी पदवी ज्यांनी घेतली त्यांचं बरोअबर बसण्याची पात्रता असूनही त्यांना "अहो तुमच्या कडे डिग्री नाही" हा शिक्का सहन करावं लागला असणार
19 May 2023 - 11:41 pm | हेमंत सुरेश वाघे
ते फार पूर्वी असावे
आता काय होते फार पूर्वी याला अर्थ नाही
आता एनआय डी / आय आय टी डिझाईन मध्ये डिग्री देतात - बी डेस ( बॅचलर ऑफ डिझाईन )
सर जे जे स्कुल मध्ये बारावी नंतर ४ वर्षांची डिग्री आहे
पुण्यात हि अभिनव ला डिग्री दिसते
बाकी इतर आर्ट स्कुल चे माहीत नाही
खाजगी संस्था / कॉलेज असतील तर सेवा गोष्टी तपासून घ्याव्यात आणि शंका निरसन करावे
तसेच सध्या हॉटेल मॅनेजमेंट आणि महाराष्ट्रात सर्व आर्किटेक्चर कॉलेज मध्ये डिग्री देतात
18 May 2023 - 5:40 am | चौकस२१२
हो अर्थात हि पदवी युजीसी मान्य आहे की नाही आणि संस्था कशी आहे हे महत्वाचे
यातील फायदा अर्थात १२ वि चे दडपण नाही
पण तोटा म्हणजे तुम्ही फक्त त्या संस्थेतच तीच पदवी घेणार,, १२ जरी असली तरी त्यावर " दडपण नसल्याने " जर फार चांगले काम केले नाही तर आणि काही कारणाने ती संस्था / गाव सोडावे लागले तर? .. तेल हि गेलं आणि तूप हि गेलं...
असो तुम्ही प्रत्यक्ष विचारा.. माझी पटकन ऐकलेली महती कदाचित थोडी चुकीची आशु शकते
गाभा हाच कि ११ वि ते पदवी सब सेट !
आणी अर्तह्त एकुण शुल्क ?
20 May 2023 - 12:23 am | हेमंत सुरेश वाघे
मला तरी हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवावा असे वाटते
तसे पण कला / डिझाईन मध्ये असले कोर्स आहेत का माहित नाही
तसे पण मुलगी अकरावी करीत आहे
पण जे पालक असले कोर्स बघतात त्यांनी सखोल चौकशी करावी
कि
प्लेसमेंट - खरोखरीचे
डिग्री ची मान्यता
वगैरे
कॉलेज चे ब्रोशर आणि साईट अनेकदा चकचकीत असते पण ती जाहिरात असते , सत्य नाही
17 May 2023 - 12:39 pm | हेमंत सुरेश वाघे
सर शोधले तर MIT पुणे येथील कोर्स मिळाले
हा वेगळाच प्रकार दिसतो
बघायला पाहिजे
18 May 2023 - 5:34 am | चौकस२१२
मुंबए ला नरसी मोनजी पार्ले संस्था आहे तिथे पण आहे बहुतेक
12 Feb 2024 - 11:57 am | हेमंत सुरेश वाघे
कोणतीही आनंदी गोष्ट मायबाप सरकार फार काळ चालू देत नाही.
सी बी एस ई च्या अभ्यासक्रमात बदल होत आहे - यावर पालकांनी लक्ष द्यावे
आता दहावीत फक्त २ भाषा घेणे आणि त्यात पण मराठी , हिंदी सारख्या निरुपयोगी आणि संस्कृत सारखी अति निरुपयोगी भाषा शिकणे हे करता येणार नाही.
तसेच बारावी सीबीएसई ला फक्त एक इंग्लिश भाषा शिकणे असली मजा करता येणार नाही .
आयसीएसई चे काय नियम आहेत - बदलणार आहेत ते चेक करावे
लोकसत्ता मध्ये यावर बातमी आली आहे
https://www.loksatta.com/explained/loksatta-analysis-changes-in-cbse-edu...
विश्लेषण: सीबीएसईच्या शैक्षणिक आराखडयातील बदल काय?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या शैक्षणिक आराखडयात नव्या धोरणानुसार बदल करण्याचे नियोजन केले आहे.
Written by चिन्मय पाटणकर
February 12, 2024 03:18 IST
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या शैक्षणिक आराखडयात नव्या धोरणानुसार बदल करण्याचे नियोजन केले आहे. यातून दहावी/ बारावीचा अभ्यास वाढेल का?
सीबीएसईत श्रेयांक पद्धत कशासाठी?
व्यावसायिक आणि सर्वसाधारण शिक्षणामध्ये समकक्षता आणणे, दोन शिक्षण पद्धतींमध्ये समन्वय आणणे हा श्रेयांक (अकॅडमिक क्रेडिट) पद्धतीचा उद्देश आहे. या पद्धतीची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये करण्यात आली होती. या श्रेयांक पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गेल्यावर्षी राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर केला. व्यावसायिक शिक्षणाचा समावेश शालेय आणि उच्च शिक्षणात करण्यासाठी राष्ट्रीय श्रेयांक आराखडा उपयुक्त आहे. या आराखडयानुसार नववीतून दहावीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांला काही ठरावीक श्रेयांक प्राप्त करावे लागतील. तसेच पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीही विद्यार्थ्यांला पुरेसे श्रेयांक मिळवावे लागतील. विद्यार्थ्यांने मिळवलेले श्रेयांक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये डिजिटल पद्धतीने साठवले जातील. तसेच ते ‘डिजिलॉकर’ खात्याद्वारे वापरता येतील. श्रेयांक पद्धतीची अंमलबजावणी संलग्नित शाळांमध्ये करणे, तसेच सध्याचा आराखडा राष्ट्रीय श्रेयांक आराखडयानुसार करणे यासाठी सीबीएसईने २०२२मध्ये उपसमितीची स्थापना केली होती.
उपसमितीने काय बदल सुचवले?
सध्याच्या शालेय शिक्षण, अभ्यासक्रमात श्रेयांक पद्धत नाही. मात्र सीबीएसईच्या नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष १२०० तासांचे आणि ४० श्रेयांकांचे करण्यात येणार आहे. हे १२०० तास म्हणजे विद्यार्थ्यांने अपेक्षित निष्पत्ती साध्य करण्यासाठी दिलेला वेळ आहे. म्हणजेच एखाद्या विषयासाठी वर्षभरात काही ठरावीक तास दिले जातील. या १२०० शिक्षणाच्या तासांमध्ये शाळेतील शिक्षण आणि शाळेबाहेरील अनुभव शिक्षणाचा समावेश असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय शिकवण्याचे तास आणि श्रेयांक निश्चित केले जातील. या अनुषंगाने समितीने सध्याच्या विषयांसह बहुविद्याशाखीय आणि व्यावसायिक विषय समाविष्ट करण्यावर भर दिला आहे. अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना १० विषय पूर्ण करावे लागतील. त्यात तीन भाषा आणि अन्य सात विषय असतील. सध्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच विषय घ्यावे लागतात. त्यातील तीन मुख्य विषय आणि दोन भाषा असतात. आता सक्तीच्या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय भाषांपैकी असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा भाषा विद्यार्थी निवडू शकतात. त्याशिवाय गणित, समाजशास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण असे सात विषय असतील. अकरावी आणि बारावीसाठी विद्यार्थ्यांला सहा विषय शिकावे लागतील. त्यात दोन भाषा आणि चार विषयांसह एक पर्यायी विषय असेल. दोन भाषांपैकी एक भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. सध्याच्या ‘सीबीएसई’ पद्धतीमध्ये बारावीला एक भाषा आणि चार विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते.
प्रस्तावित पद्धतीत परीक्षा कशा होतील?
विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेले गुण आणि प्राप्त केलेले श्रेयांक स्वतंत्र असतील. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईकडून तीन भाषा, गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि पर्यावरण शिक्षण या विषयांची परीक्षा घेतली जाईल. तर कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण यासाठी सीबीएसईची परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन असे मिश्रण असेल. मात्र पुढील वर्गात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व दहा विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. बारावीसाठी सर्व विषयांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार भाषा विषयांचा पहिला गट असेल. दुसऱ्या गटात कला शिक्षण, समाजशास्त्र आणि व्यावसायिक शिक्षण आहे. तिसऱ्या गटात समाजशास्त्र आणि चौथ्या विषयात गणित, विज्ञानाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना किमान दोन भाषा, चार मुख्य विषय, एक पर्यायी विषय निवडावा लागेल. भाषा, गट तीन आणि चारसाठी बाह्य परीक्षा असेल. विद्यार्थ्यांने गट दोनमधील विषय निवडल्यास अंतर्गत मूल्यमापन आणि परीक्षा अशा मिश्र पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
सध्याच्या पद्धतीचे काय होणार?
सध्या सीबीएसई संलग्नित शाळांतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळम्वलेल्या गुणांच्या आधारे केले जाते. श्रेयांक पद्धतीमुळे ही पद्धत बदलणार नाही. प्रत्येक विषयासाठी विद्यार्थ्यांना ए१ ते ई अशी श्रेणी दिली जाईल. विद्यार्थ्यांची क्रमवारी करून श्रेणी दिली जाईल.
chinmay.patankar@expressindia.com
12 Feb 2024 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली
आता दहावीत फक्त २ भाषा घेणे आणि त्यात पण मराठी , हिंदी सारख्या निरुपयोगी आणि संस्कृत सारखी अति निरुपयोगी भाषा शिकणे हे करता येणार नाही.
हिंदी ही निरूपयोगी भाषाय हे मान्य पण मराठी निरूपयोगी कशी?? भारतातील औद्योगीकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्याची ती राज्यभाषा आहे. ह्या सीबीएसई विद्यार्थ्यांना ती नक्कीच यायला हवी कारण ते महाराष्ट्रात शिकतात. तसेच सर्वात जास्त संध्याही महाराष्ट्रातच आहे स्थानीकांशी संवाद साधायला मराठी हा सीबीएसई विद्यार्थ्यांना ऊपयोगी पडेल. त्यामुळे मराठी अनिवार्य केली गेली असेल तर हा अत्यंत चांगला निर्णय आहे.12 Feb 2024 - 1:19 pm | अहिरावण
>>>आता दहावीत फक्त २ भाषा घेणे आणि त्यात पण मराठी , हिंदी सारख्या निरुपयोगी आणि संस्कृत सारखी अति निरुपयोगी भाषा शिकणे हे करता येणार नाही.
खिक्क !!!
लेखक डोक्यावर पडला आहे.
भांंडण करतांना (गल्लीत, दिल्लीत, मिटींग, वा कुठेही) मराठीत आवाज चढवून बोलणे बहुधा लेखक काण्वेंटात शिकल्यामुळे बुळबुळीत आणि मुळमुळीत मेट्रो पर्सन झालेला दिसतोय.
भारतात (विशेषत) उत्तर भारतात सहज संवाद कुणाशीही हिंदीतुन करता येतो. अर्थात संवादाची गरज असेल त्यांना. ज्यांना आपल्या आईबापांशी पण संवाद साधावासा वाटत नाही त्या करंट्यांना हे लागू नाही.
संस्कृत ब्राह्मणांची म्हणून अनेक जण नाके मुरडतात, त्यांच्या दळभद्रीपणाबद्दल न बोलणे चांगले.
आता ज्यांना केवळ पांडुरोगी कातड्याची गुलामी करायची आहे ते असली भुक्कड आणि दलिंदर विचारसरणी घेऊन जगतात आणि मरुन जातात.
27 Feb 2024 - 10:43 pm | हेमंत सुरेश वाघे
नौकरी डॉट कॉम वर मराठी / हिंदी / संस्कृत यामध्ये प्राविण्य पाहिजे तरच नोकरी मिळेल असल्या १००-२०० नोकरी असतील का ? मला नाही मिळाले
चुकीचे हिंदी महाराष्ट्रात सरसकट बोलतात - कोणाला कामावरून काढले आहे का ? तसे पण मराठी माध्यमात संस्कृत घेणारे पाचवी ते सातवी हिंदी शिकतात - तर असे तीन वर्ष शिकून किती महान हिंदी आणि संस्कृत येत असेल ? तरी कोणाला जॉब मिळाला आहे का हिन्दी च्या विशेष प्राविण्यावर ?
किंवा हिंदी खराब आहे म्हणून नोकरीवरून काढले आहे का ?
बाकी अनेक मराठी माध्यमाची मुले फक्त पाचवी ते सातवी अशी ३ वर्षे हिंदी शिकली त्यांचे काय बिघडले नाही
मराठीचे पण तेच - अतिशय खराब मराठी असणारे अमराठी आणि मराठी हि मुले बरेच माहितीची होती . आता त्यातील अनेक उत्तम करीत आहेत, मराठी साहित्य न वाचल्याने त्यांच्या आयुष्यात काही फरक पडला नाही . खराब मराठी वरून कोणाला कामावरून काढले , प्रमोशन मध्ये अडथळा आला असे काही झाले नाही .
अहिरावण सर मराठीत आवाज चढवून बोलणे यासाठी ज्या शिव्या लागतात त्या आपल्याला शाळेत अधिकृत अभ्यासक्रमात शिकवल्या का ? कोणत्या पुस्तकात ?
कारण शिव्या मला माझ्या एक सिनिअर मित्राने शिकवल्या. आणि आठवीत त्याला इकी शिवी बनवून दिली त्या नंतर आता शिकवण्यासारखे काही राहिले नाही म्हणून त्याने काही शिकवले नाही . आठवी नंतर शिकलेले मराठीचा काय उपयोग ते मला तरी कळले नाही
बाकी माझ्या हिंदी शिव्यांचे कौतुक पंजाबी मित्रांनी केले होते! आणि इंजिनिअरिंग मध्ये मला तोड शिव्या देणारा मराठी मित्र अति हाय फाय शाळेतला मराठी खराब असणारा होता .
संस्कृत चा तर काडीचा उपयोग पुढे आयुष्यात झाला नाही.
माझे म्हणणे प्रॅक्टिकल आहे - संस्कृत , मराठी , हिंदी या फारशा उपयोगी भाषा नाहीत आणि विशेष प्राविण्य नसले तरी काही बिघडत नाही .
सर्वांना ह्यापी मराठी लेन्गवेज डे !
28 Feb 2024 - 12:25 am | सुक्या
खरे आहे. तसे बघितले तर अन्न, निवारा व वातावरणाप्रमाणे वस्र इतकेच मानवाला उपयोगी आहे. बाकी संस्कृत , मराठी , हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे यात विशेष प्राविण्य नसले तरी काही बिघडत नाही.
28 Feb 2024 - 10:51 am | अहिरावण
बाकी सगळं जाऊ द्या !
तुमची मळमळ ओकायला मराठीच कामास आली ना?
मराठीचा काहीही उप्योग नाही हे तुम्ही इंग्रजीतून वा फ्रेंच वा कोणत्याही अभारतीय भाषेतून सांगू शकले असते. पण आधारास मराठीच आली.
असु द्या ! तुमच्या भावना पोहोचल्या. तुमच्या प्रतिसादाच्या चिथड्या आरामात उडवता आल्या असत्या, पण आम्ही त्या मराठीत उडवल्या असत्या आणि तुम्हाला त्या कळाल्या नसत्या त्यामुळे सोडून देतो.
28 Feb 2024 - 12:34 pm | हेमंत सुरेश वाघे
सर आपण काय काम करता ?
आपल्या कामात आपल्याला मराठी शिकल्याचा / मराठी मधून शिकल्याचा काय फायदा झाला ?
आणि ते काम मराठी न येणाऱ्याला फार कठीण आहे का ? असे कोणते काम ? बरे ते इतके महत्वाचे आहे का ?
28 Feb 2024 - 1:00 pm | अहिरावण
>>सर आपण काय काम करता ?
मराठीत लिहिलेले वाचतो
>>आपल्या कामात आपल्याला मराठी शिकल्याचा / मराठी मधून शिकल्याचा काय फायदा झाला ?
वाचता येते
>>आणि ते काम मराठी न येणाऱ्याला फार कठीण आहे का ?
मराठी न वाचता येणा-याला हे काम नाही जमणार
>> असे कोणते काम ?
पहिल्या प्रश्नाचे उत्तर
>>>बरे ते इतके महत्वाचे आहे का ?
होय
28 Feb 2024 - 4:02 pm | हेमंत सुरेश वाघे
खरे नाव लावत नाही , काम बहुतेक सांगण्यासारखे नसेल
जाऊ द्या बहुतेक उगाच सल्ले देणारे असेच असतात
म्हणजे मराठी शाळेतील मुले कोठेही कमी पडत नाही म्हणणार्या ना आय आय एम सारख्या कॉलेज मध्ये बॅच मध्ये एकपण मराठी माध्यमाचा मुलगा नसतो सांगितले कि नवीन फॅक्ट सांगतात
आता सगळे सोपे वाटत असेल / सगळे जमत असेल तर अजून इतकी मुले शिकत आहेत त्यातले कोणीतरी गेले पाहिजे ना ?
जाऊ दे आता असल्या लोकांकडे फार लोक लक्ष देत नाहीत , अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वी आसपास अनेकांची मुले शाळेत जाणार होती तेंव्हा मुंबईत तरी एकच प्रश्न होता कि आयसीएसइ ए कि सीबीएसइ कि आयबी - स्टेट बोर्ड चा विचार मुंबईत आसपास कोणी करत नव्हते - त्यामुळे मराठी माध्यम - मराठी असला विचार कोणी करत नव्हते
त्यामुळे कोणी बोर्ड बद्दल विचार करत असेल त्यासाठी हि माहिती - कि सरकार नियम बदलत आहेत
पालक अधिक शहाणे असतात -
एक गंमत सांगतो - मी मुंबईत गोरेगाव मध्ये होतो - १९८९ चा दहावी
एकदा शाळेच्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये मराठी माध्यमाची भलावण चालू होतो तेंव्हा मी आपल्यापैकी किती मुलामुलींनी आपली मुले मराठी माध्यमात घातली आहेत असे विचारले - ग्रुप काही काळ शांत झाला
असे कळले एकच मुलाची मुलगी मराठी माध्यमात होती - त्याने आर्थिक कारणाने असे केले होते
28 Feb 2024 - 7:06 pm | अहिरावण
>>>खरे नाव लावत नाही , काम बहुतेक सांगण्यासारखे नसेल
अगदी बरोबर. एकदम भिकारचोट काम.
आम्ही जाहीरच केले आहे आमच्या खरडवहीत. कदाचित वाचले नसावे. वाचा खाली देत आहे
मिपावर पडिक राहायचे हा एकमेव धंदा. तसेही मिपावर अबेक जण खरे नाव लावत नाही.
बाकी मुद्दा भाषेवरुन शाळेत नेलात... लै हुश्शार ब्वा !!
3 Mar 2024 - 12:45 pm | चित्रगुप्त
हल्लीच्या पालकांना मुलांच्या शिक्षणाचे भारीच टेन्शन असते, एवढेच समजले.
या लेखात चित्रकलेचा उल्लेख आहे, त्यावरून मकबूल फिदा हुसेन आठवला. कोणतेही शिक्षण न घेता सर्वात प्रसिद्ध झालेला भारतीय चित्रकार.