ती आणि इतर.... "सायलेन्स इस नॉट दि ऑप्शन....!!!"

मधुरा कुलकर्णी's picture
मधुरा कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Apr 2023 - 7:17 pm

#LatePost
            वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...

             खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं... दॅट्स दि अल्टिमेट एम्...

तर मग....

ती आणि इतर....
          
          अगदी बेंबीच्या देठापासून "आssssssssss......" अशी जोssरात मारलेली किंचाळी आणि झारखंडी बोली भाषेतील विरोध करणारे, विनंती करणारे दयार्द स्वर आणि त्या किंचाळ्यांमुळे अस्वस्थ होणारे अप्पर मिडलक्लास, पांढरपेशी लोकं...  कुप्रवृत्ती असणारा सो कॉल्ड समाज, अन् त्याविरुद्ध लढा न देऊ शकणारे सो कॉल्ड उच्चशिक्षित, परिस्थितीला शरण जाणारे, तिच्यापुढे हात टेकवणारे भ्याड लोक आणि जेंव्हा खरचं लढण्याची वेळ येईल तेंव्हा कोडगेपणाने मागे हटणारे लोक...

          २०१७ साली प्रकाशित झालेला एक ओपन एंदेड चित्रपट सुरू होतो, एका उच्चमध्यमवर्गीय अस्वस्थ परिवरापासून... हा परिवार काही आठवड्यापासून अस्वस्थ आहे..., अस्वस्थ आहे तरुण मुलींच्या ऐकू येणाऱ्या किंचाळ्यांमुळे अन् त्या ऐकू येतायत एका जवळच्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मधून... त्यांना त्या तरूणींनबाबत कणव तर वाटतेय, पण त्यांना भय आहे की जर त्यांनी त्या तरुणींना वाचण्याचा प्रयत्न केला तर होणाऱ्या परिणामांना आपण तयार आहोत का नाही....

          तर... अश्याच एका संध्याकाळी फॅमिली - गेटटुगेदर जमलंय... यजमान दांपत्यासाठी, त्यांच्या एका यशाच्या सेलिब्रेशन साठी... वरकरणी आनंदी , सुखात असलेलं, कशाचीही ददात नसलेलं हे कुटुंब विचित्र दडपणाखाली आहे... न जाणो, त्यांची ही सेलिब्रेशन ची संध्याकाळ खराब होऊ नये या विचारात.... आणि त्यांच्या या आनंदाला गालबोटं लागतं ते सेलिब्रेशन सुरू असताना ऐकू येणाऱ्या किंचाळीमुळे...

          त्या संध्याकाळी त्यांच्या गेटटुगेदर च्या दरम्यान ते पुन्हा साक्षीदार होतायत घडणाऱ्या गुन्ह्यांचे..., आणि त्यांची सुंदर अरेंज केलेली संध्याकाळ परिवर्तित होतेय एका भयंकर अन् बिभित्स दुःस्वपनामध्ये... अन् शेवटी जाणवणारं एक मोरल ऑफ दि स्टोरी....
"....... सायलेन्स इस नॉट दि ऑप्शन...!!!"

          ती किंचाळी कोणाची आहे? का आहे? आणि हा परिवार एवढा का अस्वस्थ आहे हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पुर्ण पहावा लागेलं... या मधला हा सस्पेन्स उघड करण्यात काही मजा नाही...  सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, प्रिया मराठे, भूषण प्रधान, अमृता सुभाष, आविष्कार दव्हरेकर ई. दिग्गज अभिनेत्यांनी साकारलेली ही कलाकृती खरचं अंतर्मुख करते .. ergo... हा चित्रपट खरचं पाहण्यासारखा आहे ...

          पुर्ण चित्रपटात एक गझल आहे... अर्थात् गझल बद्दल बोलणं मला जमणार नाही... त्यासाठी वेगळ्याच विश्वात जगणारे कानसेन लागतात... पण त्या गझल ची शब्दरचना खरचं मनाला भावून जाते...

          लढा... दोन व्यक्तींमधला नाही तर दोन प्रवृत्ती मधला... अश्या दोन प्रवृत्ती ज्या दोन समज्याचं प्रतिनिधित्व करतायत...
एक, ज्यामधे भलेही लोकं कदाचित कमी असतील, तरीही त्यांच्यामध्ये संघटनात्मक ताकत आहे, जी सो कॉल्ड उच्चशिक्षित पांढरपेशा समाजाला वाकवू शकते...
आणि दुसरी, जी संख्येने भलेही जास्त असतील, पण जोपर्यंत स्वतःची कातडी सुरक्षित आहे ना, मग झालं... असा विचार करणारी, किंवा मग त्याच समाजातील काही अपवाद ज्यांना कुप्रवृत्तीचा विरोध तर करायचा आहे.. पण संघटनात्मक एकी नसल्याने अन् होणारे परिणाम स्वीकारण्याची मानसिक तयारी नसणारे लोकं...

          ....खरचं हा दीड तासांचा, विचार करायला लावणारा शेवट असणारा हा चित्रपट खरचं पाहण्यासारखा आहे...
जर Zee5 प्रीमियम सेक्शन मध्ये हा चित्रपट पाहायला मिळेल...

          अगदी कमी कास्टिंग, परिणामकारक शेवट, अभिनेत्यांचे उत्कृष्ठ सादरीकरण, आणि एकचं पण खरोखर उत्तम गझल.... फुल्ल पैसा वसूल टाइप चित्रपट...

सामान्यतः मला जेंव्हा एखादे पुस्तक वा चित्रपट आवडतो किंवा एखादी कलाकृती आवडते तेंव्हा मला त्याचा शेवट आवडतो.. या चित्रपटाला पारंपरिक पद्धतीने हॅप्पी एंडिंग आहे का नाही...शेवट पारंपरिक झाला की नाही हे प्रेक्षकाने ठरवावं पण.... एक जेंनुएन्ली उत्तम चित्रपट पहिल्याचं समाधान मिळतं पण....

-मधुरा कुलकर्णी

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

सुजित जाधव's picture

8 May 2023 - 12:29 pm | सुजित जाधव

छान परिचय..!

कर्नलतपस्वी's picture

8 May 2023 - 1:03 pm | कर्नलतपस्वी

संतुलित भाषेत समीक्षण उत्सुकता वाढवते.

कर्नलतपस्वी's picture

8 May 2023 - 1:10 pm | कर्नलतपस्वी

प्रतिक्रियेचे होणारे गंभीर परिणाम आणी होणारा त्रास यामुळे सर्वसामान्य माणूस या पासून दुर राहातो. त्याची तडफड जरूर होते पण गुंड,पोलीस न्यायालये यांना शिंगावर घेण्याचे धाडस तो करू शकत नाही.