वार्तालाप: सकारात्मक विचारांसाठी मनाचे श्लोक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
13 Mar 2023 - 4:16 pm
गाभा: 

मनात विचार उत्पन्न होतात, विचारांनी स्मृति तैयार होतात आणि स्मृतिच्या निर्देशानुसार आपण कृती करतो. मनात सकारात्मक विचार उत्पन्न होतील तर कृती ही सकारात्मक होणार. मनात नकारात्मक विचार उत्पन्न झाले की आपण नकारात्मक कृती उदा. तळीरामाणे दारू पिणे, शिव्या देणे किंवा हत्या इत्यादि घृणीत कृती ही आपण करू शकतो. मन तर अभौतिक आहे, त्यात विवेक पूर्ण सकारात्मक विचार कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे?

समर्थ रामदास स्वामी म्हणतात:

मन दिसते मां धरावे. ज्याचे त्याने आवरावे.
आवरून विवेके भरावे. अर्थांतरी (द. 18.10.17)

आपल्या मनाला भटकण्यापासून वाचविण्याचे कार्य आपल्यालाच करावे लागते. मनात विवेकपूर्ण विचार भरून मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपण संसार आणि परमार्थात सफल होऊ शकतो. पण समर्थ फक्त उपदेश करणारे नव्हते. त्यासाठी समर्थांनी 205 श्लोकांत मनाला उद्देश्यून मनोबोधाची निर्मिती केली. मनाच्या श्लोकांच्या सुरवातीलाच समर्थ म्हणतात जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें. जनीं वंद्य ते सर्व भावें करावें अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादींचा वाईटांचा त्याग करणे. वंद्य धरण्यासाठी समर्थ म्हणतात, सज्जनांची संगती धरावी, पापबुद्धी नको रे, विषयांची कल्पना नको रे, मना वासना दुष्ट कामा नको रे, दुसर्‍यांचे द्रव्य नको रे, अति स्वार्थ बुद्धी सोडणे, अहंकार सोडणे, दुसर्‍यांचे नीच बोलणे ऐकून ही सर्वांशी नम्र बोलणे, शोक-चिंता न करणे, इत्यादि इत्यादि. मनाच्या श्लोकांचे नियमित वाचन/ पाठांतर केल्याने मनात विवेकपूर्ण उत्तम विचार सहज भरतील आणि उत्तम स्मृति निर्माण होतील. उत्तम स्मृति उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देतील. संसारात आणि परमार्थात सफल होण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

14 Mar 2023 - 5:49 pm | कर्नलतपस्वी

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा

कारण....

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल

सुधीर मोघे यांनी केलेले मनाचे अप्रतिम वर्णन.

विवेकपटाईत's picture

20 Mar 2023 - 11:16 am | विवेकपटाईत

आभार. कविता ही आवडली.