गाभा:
माझ्या आयुष्यातील छोटासा भाग चाळीत गेला आहे, त्यामुळेच चाळी बद्धलची आत्मियता अजुनही मनात कुठेतरी घर करुन आहे. गिरगाव मध्ये गेलो तर तिथल्या एका चाळीत आजही जाणे होते.चाळीचा अनुभव, तिथली माणुसकी, तिथला लोकांचा असलेला मनमोकळेपणा हे एक वेगळच जगं आहे. चाळ हा असा अनुभव आहे जो शब्दात देखील व्यक्त करणे मला कठीण आहे.मला चाळ संस्कृतीचा बालपणी आनंद मिळाला याचा मला अधिकचा विशेष आनंद आहे. गच्चीत जाऊन आराम खुर्चीत बसुन निरभ्र आकाश बघण्याचा जो आनंद मला तिथे मिळाला होता, तसाच तो आनंद मला परत कधीच मिळाला नाही...
जशी सवड मिळेल तशी या भागात भर घालत राहीन, आपणही आपली भर जरुर टाका. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
प्रतिक्रिया
10 Mar 2023 - 10:25 pm | चौथा कोनाडा
सुंदर माहितीपट ! धन्यू फॉर शेअरींग !
सुदैवाने एक - दोन वर्षे चाळीत रहाण्याचा योग आला. तिथं असनार्या हक्काची येणार्या आपुलकीची तुलना कशाशी ही होऊ शकत नाही.
आता सुद्धा फ्लॅटमध्ये राहतोय आणि शेजारी चाळकर्यांसारखेच आहेत. इथेही आदबशीर आपुलकीचा अनुभव येतोय !
कालाय तस्मै नमः
11 Mar 2023 - 10:56 am | चंद्रसूर्यकुमार
दुसर्या महायुध्दात अतोनात रस असल्याने त्याविषयीच्या डॉक्युमेन्टरी मी नेहमी बघत असतो. सध्या सोव्हिएट स्टॉर्म ही डॉक्युमेन्टरी बघत आहे. ही डॉक्युमेन्टरी रशियन टीव्हीसाठी २०११ मध्ये बनविण्यात आली होती. मुळात रशियन भाषेत असलेली ही डॉक्युमेन्टरी इंग्लिशमध्ये डब केली आहे. लेनिनग्राडचा वेढा, स्टालिनग्राड आणि मॉस्कोची लढाई, कुर्स्कची लढाई वगैरे भाग अगदी झपाटल्यासारखे बघितले. एकूण १८ भागात असलेल्या या डॉक्युमेन्टरीचा सध्या ११ वा भाग बघत आहे. पहिला भाग खाली एम्बेड करत आहे.
या विषयावरील सगळ्यात पहिला व्हिडिओ बघितला होता १९४३ मध्ये बनविलेली प्रोपागांडा फिल्म- Why we fight: The Battle of Russia. लेनिनग्राडच्या वेढ्याविषयी पूर्वी वाचले होते पण नुसती पुस्तके वाचून तो किती भयानक प्रकार होता याची कल्पना येत नाही. ती कल्पना व्हिडिओ बघून येते.
12 Mar 2023 - 12:16 pm | मदनबाण
बर्याच काळाने एक सुंदर वेब सिरीज अगदी मन लावुन पाहिली.या वेब सिरीज मधले एकही पात्र उगाचच तिथे आहे असे एकदाही जाणवले नाही. या वेब सिरीज मधील अनेक सीन्स युट्युबवर देखील हीट ठरले आहेत. ही वेब सिरीज पाहताना मी क्षणभर पार भुतकाळात गेलो होतो... मानसिंग पवार, रवी पटवर्धन, माया गुजर अशी काही नावे देखील स्मृतीत आहेत हे लक्षात आले. सरपंच आणि सगळी माणसं गप्पा-टप्पा करत आहेत आणि नंतर माया गुजर उखाणा घेत असं आधुंक आठवल पण ती मराठी मालिका कोणती ते च्यामारी काही आठवेना, आमची माती आमची माणसं असं देखील आठवलं पण नक्की ती मालिका कोणती ते अजुनही आठवत नाहीये. [ कोणाला आठवले तर नक्की सांगा. ]
तर फुलेरा गावातील लोकांची आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणार्या घटनांवर आधारीत ही वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय झाली आणि मी त्यांचे दोन्ही सिझन अगदी मन लावून पाहिले. प्रधानजी ची भूमिका रघुवीर यादव यांनी साकारली आहे, त्यांना पाहिले की नेहमीच भुतकाळातील मुंगेरीलाल के हसीन सपने आठवते.
आता ३र्या सिझनची वाट पाहतोय...
जाता जाता :- देख रहा ना बिनोद, अंग्रेजी बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VED
12 Mar 2023 - 3:54 pm | नपा
आमची माती आमची माणसे या मालिकेतील गप्पागोष्टी या सदरात:
'... मानसिंग पवार, रवी पटवर्धन, माया गुजर अशी काही नावे देखील स्मृतीत आहेत हे लक्षात आले. सरपंच आणि सगळी माणसं गप्पा-टप्पा करत आहेत आणि नंतर माया गुजर उखाणा घेत असं आधुंक आठवल पण ती मराठी मालिका कोणती ते च्यामारी काही आठवेना, आमची माती आमची माणसं असं देखील आठवलं पण नक्की ती मालिका कोणती ते अजुनही आठवत नाहीये..."
12 Mar 2023 - 6:14 pm | मदनबाण
@नपा
विशेष आभार _/\_
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VED
12 Mar 2023 - 5:04 pm | चित्रगुप्त
नितीन चंद्रकांत देसाई यांची दोन भागातील मुलाखत (रंगा येई वो)
12 Mar 2023 - 6:24 pm | मदनबाण
@ चंद्रसूर्यकुमार
Why we fight अर्धी पाहली आहे, वेळ मिळताच बाकीचा भाग देखील पाहेन.
@चित्रगुप्त
तुम्ही दिलेल्या मुलाखती नक्की पाहिन, या निमित्त्याने मी दोन भन्नाट मुलाखती पाहिल्या होत्या त्या इथे देऊन जातो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Besuri Me | Extended Version | :- VED
12 Mar 2023 - 11:15 pm | अक्षय देपोलकर
2008 च्या मंदी वेळी आणि त्याच्या आधी झालेल्या घटना असलेला चित्रपट..
प्राईमवर आहे, आर्थिक आणि शेअर मार्केट मध्ये रस असलेल्यांनी जरूर बघावा
13 Mar 2023 - 6:04 am | चौकस२१२
चाळी वरून आठवले "चाळ नावाची वाचाळ वस्ती" चे भाग कुठे आहेत का ? चंदू पारखी , उषा नाडकर्णी वैगरे कलाकार होते
सद्या बघण्यासारखी माईक म्हणजे "पोस्ट ऑफिस उघडे आहे "
त्यातील नातंच संच हा महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील आहे , मला तरी महा हास्य जत्रा फारच बसखल वाटते म्हणून हि नाव मालिका बघू नये असे सुरवातीला वाटले परंतु प्रत्यक्ष बघून आवडली, जरी मकरंद अनासपुरेंच्या त्यांच इतर कामातून काही लकबी वारंवार कंटाळवाण्या होत असतात पण यातील गुळस्कर हि व्यक्तिरेखा र्त्यांनी अप्रतिम उभी केली आहे बाकी हि ठीक, लेखकाने छान लिहुले आहे , सगळेच इरसाल .. नास्ता नक्की बघा
14 Mar 2023 - 1:17 am | NiluMP
Black Mirror on Netflix : Future Technology and it adv and dis advantage.
14 Mar 2023 - 1:40 am | NiluMP
Netflix : Indian Predator: Murder In A Courtroom
14 Mar 2023 - 8:44 am | कुमार१
गोल्ड
मूळ मल्याळम. हिंदी आवृत्ती प्राईमवर पाहिली.
हलका फुलका छान वाटला. माणसाची सोन्याची हाव आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या गमतीजमती आवडल्या.
प्रमुख भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन. उत्तम !
19 Mar 2023 - 7:18 pm | कुमार१
जातिव्यवस्थेवरील भेदक भाष्य. शेवटपर्यंत वास्तवदर्शी.
नवे कलाकार असूनही अतिशय उत्कृष्ट कामगिरी
लहान मुलांच्या भूमिकाही उत्तम.
19 Mar 2023 - 7:19 pm | कुमार१
https://www.youtube.com/watch?app=desktop&v=y4CBUDfmB5A