" जू "

देवू's picture
देवू in जनातलं, मनातलं
6 Mar 2023 - 1:52 am

प्रसंग १

सोसायटीतील एका वयस्कर सदस्याचे निधन झाले होते.
पुरुष मंडळी अंत्यसंस्काराची तयारी करत असताना महिलांनी
त्याच्या पत्नीला बाहेर आणले. तिची वेणी घातली, त्यात गजरा माळवला, हातात हिरवा चुडा भरून, कुंकू लावले. पतीच्या पार्थिवाच्या पाया पडल्यावर तिला पाटावर बसवले. बायकांमध्ये कुजबूज सुरु झाली. कोणीतरी शेजारील सोसायटीतील " नानींचे " नाव सुचवले. नानी आपले स्थूल शरीर सांभाळत गर्दीतून वाट काढत येत होत्या. त्यांना वाट करून दिली जात होती. नानींना आधार द्यायला दोघी तिघी पुढे सरसावल्या. त्यांना पुढे घेऊन येताना त्यातील एकजण नानींच्या कानात काहीतरी कुजबुजली . नानींनी मान डोलावली. अंतिम विधीचा " मान " त्यांना मिळाला होता. नांनींनी प्रथम त्या बाईच्या केसातील गजरा काढून वेणी सैल केली, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या आणि शेवटी तिचे कुंकू पुसले.

प्रसंग. २

होळीची तयारी पूर्ण झाली होती. सोसायटीतील महिला नटूनथटून नैवद्याची ताटे घेऊन होळीभोवती उभ्या होत्या. इतक्यात नानी नैवद्याचे ताट घेऊन होळीच्या जवळ गेल्या. सोसायटीतील मुलांनी एकच गलका केला, " नानी मागे व्हा, १० मिनिटे बाकी आहेत मुहूर्ताला. " फक्त निरंजन पेटवून ताट तयार ठेवते " असे म्हणून नानींनी काडेपेटीतून काडी काढून निरंजन पेटवले आणि जळती काडी टिचकीने उडवली. काडी थेट होळीच्या पेंढ्यात पडली आणि काही समजायच्या आत पेंढ्याने पेट घेतला. सोसायटीतील बायकांमध्ये कुजबूज सुरु झाली. होळी मुहूर्तावर न लागण्यापेक्षा एका विधवेकडून होळी पेटवली गेल्याने नैवद्य न दाखवता त्या माघारी गेल्या.

प्रसंग. ३

हळदी कुंकवाला आईने सोसायटीतील मैत्रिणींना बोलावल्याने सगळ्या आमच्या घरी हजर होत्या. सर्वात शेवटी नानी आल्या. आईने नानींना मैत्रिणींबरोबर सतरंजीवर बसायला सांगितले. मैत्रिणींमध्ये चुळबुळ सुरु झाली. ते नानींच्या लक्षात आले, " गुढग्यांमुळे मला खाली बसायला त्रास होतो, मी खुर्चीत बसते " असे म्हणून त्या कोपऱ्यातील खुर्चीवर बसल्या. खरं म्हणजे मी ह्या कार्यक्रमाला येणारच नव्हते, परंतु हिने ( आईने ) खूप आग्रह केल्याने माझा नाईलाज झाला.

आई हळदी कुंकवाचे ताट घेऊन नानींकडे गेली. " अगं हळदी कुंकावाचा मान हा सवाष्णीचा, माझा नाही " असं म्हणून त्यांनी हळदीकुंकू लावून घेण्यास नकार दिला. अहो तुम्ही सवाष्णीच आहात, तुमचे पती युद्धात शहीद झाले, ते अमर झाले. अशा अमर पतीची पत्नी कायम सवाष्णीच असते , हो कि नाही? असे आईने मैत्रिणींकडे बघून विचारले. हे सर्व कथा कादंबऱ्यांमध्ये वाचायला ठीक आहे पण ... असे एका मैत्रिणीने विरोध दर्शविला. आणि थोड्याच वेळात सगळ्या मैत्रिणींनी तिला सहमती दर्शवली. नानींनाही ते मान्य होते

समाजलेख

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

6 Mar 2023 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले

आखीर कहना क्या चाहते हो ?

कर्नलतपस्वी's picture

6 Mar 2023 - 4:03 pm | कर्नलतपस्वी

जू म्हणजे बैलांच्या मानेवर ठेवलेले जोखड. त्याप्रमाणेच काही चालीरीती समाजावर जोखडच असतात. समाज कितीही पुढारला तरी हे जोखड झुगारून देता येत नाही.

नवरा मेल्यावर बायकोचे मंगळसुत्र हिसकावून तोडणे,कुंकू पुसणे ते सुद्धा विधवेच्या हाताने ही प्रथा कालबाह्य झाली आहे ती झुगारून द्यायला पाहिजे.आजच्या काळात बायका बर्‍याच गोष्टीत आत्मनिर्भर झाल्या आहेत.

बहिणाबाई चौधरी यांच्या पतीचे निधन झाल्यावर लिहीलेली कविता खुप काही सांगुन जाते.
-
अरे रडता रडता
-
देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव

कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत

नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव

बाकी लेख लिहीता लिहीता शेवट गडबडला. पहिले दोन प्रसंग वाचल्यावर लक्षात आले लेख समाजातील कुप्रथांवर आहे पण शेवट करताना लेखक कन्फ्यूज झाला असावा.

प्रसाद गोडबोले's picture

6 Mar 2023 - 6:36 pm | प्रसाद गोडबोले

ही प्रथा कालबाह्य झाली आहे ती झुगारून द्यायला पाहिजे.

मी काय म्हणतो , संपुर्ण विवाहसंस्थाच झुगारुन टाकुयात ना ! ना रहेगा बांस ना रहेगी बांसुरी ! लग्नच नाही तर विधवा होण्याचा प्रश्णच नाही !

=))))

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2023 - 9:11 am | कर्नलतपस्वी

मी काय म्हणतो , संपुर्ण विवाहसंस्थाच झुगारुन टाकुयात ना ! ना रहेगा बांस ना रहेगी बांसुरी ! लग्नच नाही तर विधवा होण्याचा प्रश्णच नाही !

नाही मारकस भौ, बधंन नसेल तर परिणामांची जबाबदारी कोण घेणार! हे जग सुर्यपुत्रांनी भरून जाईल. तेवढेच मग दुर्योधन आणी सगळीकडे यादवी माजेल. विवाहसंस्था विचार मंथन आणी अनुभवातून उदयास आलेली संस्था. ही संस्था नसणे समाज स्व्स्थ्याला हानीकारक ठरेल.

रोमन साम्राज्य मधे इन्सेस्ट संबंध होते पण त्याचे वैद्यकीय परीणाम कळाल्या नंतर ती पद्धत निषिद्ध ठरली असावी.

मिपावर यापूर्वी या विषयावर काथ्याकूट झाले आहे. लिंक खाली दिली आहे.

https://www.misalpav.com/node/3866/

विवाहसंस्थेत असलेल्या कुप्रथा काढून टाकून तीला प्रमोट केले पाहिजे. लिव्हिंग इन समाज घातक आहे असे मला वाटते. कुठेतरी आकाऊट्यब्लिटी हवीच.

प्रसाद गोडबोले's picture

7 Mar 2023 - 10:25 am | प्रसाद गोडबोले

विवाहसंस्थेत असलेल्या कुप्रथा काढून टाकून तीला प्रमोट केले पाहिजे.

सम्पुर्ण विवाहसंस्थाच जु आहे हो. सनातनी ब्राह्मणी मनुवादी कारस्थान .

तुम्ही महाभारत नीट वाचलेत तर तुम्हाला त्यात आढळुन येईल - श्वेतकेतु आणु उद्दालक संवाद ! त्यावरु अगदी स्पष्ट आहे की विवाहसंस्था ही उच्चवर्णीय पुरुषांनी स्त्रीयांना गुलाम करुन ठेवण्यासाठी बनवलेली व्यवस्था आहे , दुसरे काही नाही. संस्कृतमध्ये स्त्रीला 'क्षेत्र' अर्थात जमीन असा शब्द वापरलेला आहे. अर्थात वंशवृध्दी करिता पोरं काढायची सोय ! आणि त्या पोरांची मालकी कोणाची ह्यावरुन राडे होऊ नयेत म्हणुन काढलेली व्यवस्था म्हणजे लग्न! कुंकु बांगड्या सवाष्ण म्हणजे "ही क्षेत्र , ही जमीन आधी कोणीतरी क्लेम केलेली आहे" हे दर्शवण्याचे प्रतीक होय .

ही प्रतीके नष्ट करुन काहीही होणार नाही , संपुर्ण व्यवस्थेलाच सुरुंग लावला पाहिजे !
#लाल_सलाम कॉम्रेड

भागो's picture

7 Mar 2023 - 11:00 am | भागो

हा घ्या माझा सलाम!
पण एक सांगा तुम्ही इथे मेंबर कसे?

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2023 - 12:43 pm | कर्नलतपस्वी

संस्कृतमध्ये स्त्रीला 'क्षेत्र' अर्थात जमीन असा शब्द वापरलेला आहे.

ज्या कोणी हा अर्थ काढला कदाचित त्याचे ज्ञान सीमीत असावे किंवा जाणीवपूर्वक असा संकुचित अर्थ काढला असावा.

भगवद्गीतेत क्षेत्र क्षेत्रज्ञ विभुती योग या अध्यायात यावर विस्तृत विवेचन केले आहे. माऊलींनी सुद्धा साध्या सोप्या प्राकृत भाषेत समजावून सांगीतले आहे.

संपुर्ण व्यवस्थेलाच सुरुंग लावला पाहिजे !

या संस्थेवर विश्वास ठेवणारे जास्त, महत्व जाणून कुप्रथा निर्मुलन करून संस्थेची मानव कल्यणा साठी उपयुक्तता वाढवणारे सुद्धा बरेच आहेत. त्यामुळे सुरूगं लागणे शक्य नाही.

बाकी मतभिन्नता असल्यामुळे वाद वाढवण्यात काही फलश्रुती नाही तेव्हा माझ्यापुरता हा विषय मी इथेच सोडून देत आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Mar 2023 - 7:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

जू नको म्हणजे जुन्या पुराण्या प्रथा नको असा लेखाचा अर्थ आहे माझ्यामते. पण चर्चा लग्न आणि लिव्ह ईन वर गेली आहे.

मी लिव्ह ईनच्या विरोधात नाही. पण मग त्याची फक्त वैयक्तिक किवा शारीरीक बाजु न बघता जी कायदेविषयक, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक्,मानसिक वगैरे परीमाणे आणि परीणाम आहेत त्यावरही चर्चा होउद्या. म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल.

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2023 - 7:32 pm | कर्नलतपस्वी

कारण काही जुन्या प्रथा ज्या विवाहसंस्थेशी सबंधित आहेत त्यावरच चर्चा होतेय.

राजेंद्र भौ,कसौटी (१९७४) सिनेमाचे गाणे आठवले.

आये हिया हुंया हिया हुंया हिया हुंया हँ
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हे
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हे
एक मेमशाब हे
शाथ में शाब भी हे
एक मेमशाब हे, शाथ में शाब भी हे
मेमशाब शुन्दर-शुन्दर हे
शाब भी खूबशूरत हे
दोनों पाश-पाश हे, बातें खाश-खाश हे
दुनिया चाहे कुछ भी बोले, बोले
हम कुश नहीं बोलेगा
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हे
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हे
हमरा एक पड़ोशी हे, हं हं हं हं

मेरी बुढ़िया नानी थी
मेरी बुढ़िया नानी थी
लेकिन वो बड़ी शयानी थी
गोदी में मुझे बिठाती थी
और शच्ची बात सुनाती थी
हे जब साल शतरवां लागेगा
दिल धरक धरक तो करेगा
किशी शुंदरी से नैनवा लड़ेगा
दिल खुशुर फुशुर भी करेगा
जब आग शे घी मिलेगा
जब आग शे घी मिलेगा
फिर तो वो भी घी पिघलेगा

पिघलेगा जी पिघलेगा
हाँ पिघलेगा जी पिघलेगा
ना आग शे ना घी शे हमको क्या किशी शे शु
नानी चाहे कुछ भी बोले, बोले
हम तो कुश नहीं बोलेगा शु
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हे
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हे
हम बोलेगा तो शु

मी लिव्ह ईनच्या विरोधात नाही. पण मग त्याची फक्त वैयक्तिक किवा शारीरीक बाजु न बघता जी कायदेविषयक, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक्,मानसिक

भौ, सारा दिलदा मामला है और दिलपर किसका जोर है. दिल को किसी चौखट मे बांधना मुश्किल है.

अमर विश्वास's picture

6 Mar 2023 - 4:17 pm | अमर विश्वास

मुळ लेखापेक्षा कर्नल साहेबांची प्रतिक्रिया जास्त बोलकी आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Mar 2023 - 4:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

मंडळींकडुन कळला

सोसायटीत एका डॉक्टरीण बाईकडे हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता. तिच्या विधवा सासुने सुद्धा आपल्या (बहुतांश )विधवा मैत्रिणींना बोलावले होते, त्या सर्व आज्या एका बाजुला केवळ गंमत बघत बसल्या होत्या. तेव्हढ्यात त्यातील एका आजीची सून आली. डॉक्टरणीने तिला आग्रहाने बोलावले असल्याने वेळात वेळ काढुन आली होती.
ती येताच तिची सासू फुसफुसली"तू कशी आलीस? आज तर तुझी अडचण आहे ना?" सून वरताण. ती म्हणाली "विधवा आलेल्या चालतात का मग?" वातावरण तंग झाले.

त्यावर डॉक्टरणीने ठाम भूमिका घेतली आणि म्हणाली "मला काही प्रॉब्लेम नाही, मी तुला कुंकु लावते. तू ये बिन्धास्त" आणि प्रसंग निभावला.

प्रसाद गोडबोले's picture

6 Mar 2023 - 6:44 pm | प्रसाद गोडबोले

हे असले प्रसंग ऐकुन मला फार हसु येतें .

हे म्हणजे ती कोणीतरी बाई ते शनि शिंगणापुर येथे बायकांना पारावर चढुन शनिची पुजा करता यावी ह्यासाठी आंदोलन करत होते =))))
किंव्वा
ते अंधश्रध्दा निर्मुलन समीती वाले "शनिशिंगणापुर येथे चोरी होत नाही" ही अंधश्रध्दा निर्मुलन करण्यासाठी तिथे जाऊन चोरी करुन दाखवायला प्रवृत्त झालेले ,=))))

हे हळदीकुंकु म्हणजे अगदी त्या सारखं झालं =))))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2023 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालबाह्य जू फेकून दिले पाहिजेत.

-दिलीप बिरुटे

भागो's picture

7 Mar 2023 - 7:19 pm | भागो

कालबाह्य???
म्हणजे कधीतरी ती "काल-आत" होती का?