धूप के लिए शुक्रिया का गीत (मराठी रूपांतर)

Primary tabs

आलो आलो's picture
आलो आलो in जे न देखे रवी...
27 Feb 2023 - 7:39 pm

माझे कुटुंब खूप मोठे आहे
आंब्याची सहा झाडे आहेत
दोन जांभळाची
एक लीचीचे झाड आहे
आणि चार कदंब वृक्ष
माझ्या कुटुंबात माझी आई आहे
बाबा आहे
आजोबा आहेत
कुटुंबात दोन म्हशी आहेत
आणि एक गाय
एक काळा कुत्रा देखील आहे
आम्ही तीन बहिणी आहोत
भाऊ अजून झाला नाही
(चुनी कुमारी, इयत्ता सातवी)
[मिथिलेश कुमार राय यांची ही कविता अंतिका प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'धूप के लिए शुक्रिया का गीत' या संग्रहातील आहे.
मराठीकरण करण्याचा पहिलाच प्रयत्न काही चुकल्यास क्षमस्व !

कविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

7 Mar 2023 - 3:21 am | रंगीला रतन

कैच्याकै :=)

आलो आलो's picture

7 Mar 2023 - 8:53 am | आलो आलो

जिथे शेजारी कोण राहतो ते आपल्याला माहिती नाही तिथे अजूनही ग्रामीण भागात आपल्या कुटुंबात झाडे पाने फुले आपले पाळीव प्राणी यांचा सुद्धा समावेश अजूनही केला जातो .... हे नुसते "वसुधैव कुटुंबकम" बोलायची नव्हे तर वागण्या-बोलण्यात आचरणात हवी.
असो ....

काहीतरी टोकदार आणि धारदार सांगायचे आहे कवीला असं जाणवतं. ही कविता दर्शनी जशी आहे तशी घेणे अपेक्षित नक्कीच नसावे.

दम आहे नक्कीच.

समृद्धी, सुबत्ता आलेली असूनही मुलगा होण्यासाठी प्रयत्न, कारण अंतिम ध्येय किंवा पूर्तीची कल्पना म्हणजे मुलगा होणे. तीन बहिणी झाल्या आहेत. बाकी गाई गुरे झाडे, नात्याची माणसे, घर भरलेले पण तरी कुठेतरी ती एक घटना अजून घडली नाहीये याची खास नोंद सातवीत शिकणाऱ्या मुलीच्या शब्दातील वर्णनातही निसटून जात नाही हे महत्त्वाचे.

आजही समाजात 'मुलगा झाला' कुटुंब पूर्ण झाले असे मानले जाते , थोडक्यात इहलोकातून जाण्यास जे काही आडकाठे आहेत त्यापैकी एक 'भाई अभी नहीं हुआ है'

आलो आलो ,
धन्यवाद कविता मराठीत आणल्याबद्दल!
ह्याचेच एक शशक करून तिकडे प्रसिद्ध करा. म्हणजे हजारो लोकांपर्यंत पोचेल.

Bhakti's picture

10 Mar 2023 - 10:55 am | Bhakti

अगदी.. कवितेत हे आहे ते आहे म्हणता म्हणता अचानक हे नाही ती मुलगी सांगतेय ,हे सगळं असताना मुलगा नाही घरचे म्हणत असतील ते बहुतेक फार गरजेचे आहे,असं लहानगीला वाटलं असेल.

किती समृद्धी आहे तिच्या कुटुंबाकडे (तिच्या समजेनुसार) ....पण तरीही खंत आहे घरात.
मनोविज्ञान सांगत 'लहान मुलांचं विश्व, घराच्या नि घरच्यांच्या आसपास असतं, तोवर त्यांच्या विचारांवर सुद्धा त्यांचाच परिणाम होत असतो '
घरी दारी हेच बोल ऐकू येत असावे .... एक मुलगा झाला तर बरे होईल.... वाईट आहे हो हे ...अजूनही आपल्या समाजात दुसऱ्या मुलीनंतर प्रत्येक दुसरा जन हेच बोल ऐकवतो. (स्वानुभव)
कल्पना चावला / मेरी कोम / किंवा अजून कितीतरीचें कर्तृत्व कमीच पडतेय मुलगा हवाच या संकल्पनेला...

आलो आलो's picture

10 Mar 2023 - 2:14 pm | आलो आलो

प्रोत्साहन आणि शशक कल्पनेबद्दल अनेक अनेक धन्यवाद !

कानडाऊ योगेशु's picture

10 Mar 2023 - 10:08 am | कानडाऊ योगेशु

मूळ हिंदी कविताही सोबत दिली असती तर अनुवाद कसा झाला आहे हे कळले असते.

'भाई अभी नहीं हुआ है'

मेरा परिवार बहुत बड़ा है
छह आम के पेड़ हैं
दो जामुन के
एक लीची का वृक्ष है
और चार कदम्ब के
मेरे परिवार में माँ है
पप्पा हैं
नाना हैं
परिवार में दो भैंस हैं
और एक गाय
एक काले रंग का कुत्ता भी है
हम तीन बहनें हैं
भाई अभी नहीं हुआ है
(चुन्नी कुमारी, कक्षा सातवीं)
मिथिलेश कुमार राय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2023 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

आलो आलो's picture

10 Mar 2023 - 2:06 pm | आलो आलो

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद सर !


एका परदेशी स्थायिक मित्राने शेअर केलाय... :)
भारतात मुलगी होणे म्हणजे काय अवघडच वाटत.बाकी काही नाही एक बाई म्हणून भारतात मुलींना जन्म दिल्यावर सुरक्षितता हा प्रश्न जास्त विचारात पाडतो..तेव्हा मुलींना सक्षम करणेही महत्त्वाचे आहे.

आलो आलो's picture

13 Mar 2023 - 1:22 pm | आलो आलो

विनोदी ढंगाने केलेले, वस्तुस्थितीचे, मार्मिकरित्या सादरीकरण .

चांदणे संदीप's picture

14 Mar 2023 - 7:11 pm | चांदणे संदीप

एका चांगल्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मूळ कविता उत्तम आणि अनुवादही चांगला केलेला आहे.

सं - दी - प

संपूर्ण कविता संग्रह खरंच चांगला आहे !

https://amzn.eu/d/8yIvtfT

आंबट गोड's picture

15 Mar 2023 - 6:28 pm | आंबट गोड

पण..
नाना है जरा ऑड वाटत नाही का?
दादा है पाहिजे होतं...!!!
विशेषतः कवितेचा मूड लक्षात घेता....

आलो आलो's picture

15 Mar 2023 - 8:12 pm | आलो आलो

जाऊन द्याना बाळासाहेब

छान कविता.
अजूनही वेळ गेलेली नसावी. कदाचित चुनीला कुणी सांगत नसावे पण तिची कविता लिहून होईपर्यंत पुढच्या भावा / बहिणीसाठीची पुर्वतयारी झालेली असू शकते. प्रयत्न कर, फळाची चिंता करु नकोस अशी आपल्याला शिकवण आहे ना :)
इथे पहिल्या मुलीचे बाळंतपण आणि आईचे पाचवे / सहावे बाळंतपण एकाच वेळी पाहिलेली मंडळी अस्तीत्वात असतील.