मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मक्याचे लॉलीपॉप

Bhakti · · पाककृती
खमंग थालिपीठ पाहून मलाही वेगळे थालिपीठ बनवायची इच्छा झाली.लुसलुशीत दाणे असलेले मक्याचे कणीस दुर्लक्षामुळे कोरडे व्हायला लागले होते.मक्याचे पीठ त्याच्या कार्ब ,फायबर मुळे अनेक पाककृतीमध्ये वापरले जाते.थालिपीठ तर बनवायचे होते पण लेक कालपासूनच म्हणत होती वेगळ खायचं आहे.तेव्हा लॉलीपॉप हा प्रकार कधीच केला नाही तो करावा म्हटलं. साहित्य: g दोन वाट्या उकडलेले मक्याचे दाणे एक वाटी उकडलेले मटार दोन उकडलेले बटाटे मिरची,लसूण,आलं,जिरे,कोथिंबीर वाटण दोन चमचे तिखट,चाट मसाला,गरम मसाला चवीपुरते मीठ दोन चमचे स्टार्च पावडर दोन चमचे मैदा ब्रेड क्रंब तळण्यासाठी तेल आईस्क्रीमच्या काड्या तर या कणसाचे दोन तुकडे करून उकडून घेतानाच बटाटे,मटार मिठाच्या पाण्यात कुकरमध्ये उकडून घ्यावे. आता मटार ,मक्याचे दाणे जिर्याच्या,मिरची वाटण फोडणीत परतून घ्यायचे.त्यात मीठ ,कोथिंबीर ही टाकावी. g आता हे सारण मिक्सरमधून एकजीव करायचे,छान वाटून बनवायची. थोड वाटलेलं सारण संध्याकाळी थालीपिठासाठी बाजूला ठेवायचे. हे वाटलेलं मक्याच सारण कुस्करलेल्या बटाट्यात एकत्र करून घ्यायचे.त्यात चाट मसाला टाकायचा. आता ह्याचे छोटे गोळे करून आईस्क्रीमच्या काड्याना लॉलीपॉप सारखे टोचायचे. आधी गोल गोल गोले केले,ते नीट तळ्ता येइना.तेव्हा लॉलीपॉप उभट गोले केले.ते नीट झाले. हे लॉलीपॉप मैदा ,स्टार्च ,मीठ ,गरम मसाल्याच्या घोळात घोळून घ्यायचे. a s मंद आचेवर तळून घ्यायचे. कोशिंबीर तयार होती ,त्याच्याबरोबर गट्टम झाले हे मक्याचे लॉलीपॉप.. g आता थालिपीठ संध्याकाळी  -भक्ती

वाचन 7881 प्रतिक्रिया 0