वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
24 Feb 2023 - 9:01 pm

नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला.

संदर्भ असा -

'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे. त्याचा ट्रेलर इथे आहे :

या ट्रेलरच्या निमित्ताने २०२१/२२ साली घडलेली जर्मनीतली तशीच घटना वर आली.

ही मूळ केस काय आहे हे या मूळ पिटिशन मधून कळेल.

थोडक्यात झाले असे -

१. एका गुजराती जैन जोडप्याला जर्मनीमध्ये मुलगी झाली.
२. बाळ-बाळंतिणीची काळजी घेण्यासाठी बाळाची आजी जर्मनीला गेली.
३. आजीने बाळाला इजा केली, ते मातापित्यांना सांगितलं नाही.
४. बाळाला दवाखान्यात घेऊन गेल्यावर मातापित्यांना याबाबत खुलासा करता आला नाही म्हणून डॉक्टरांनी मूलसंरक्षण एजन्सीला पाचारण केले, पोलिसात प्रकरण गेलं. मातापित्यांवर लैंगिक अत्याचाराचा ठपका ठेवण्यात आला.
५. बाळाची कस्टडी सरकारने घेतली.
६. गुन्हे अन्वेषणातून बाळावर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नाहीत असे सिद्ध झाले.
७. मूल तरीही अजून सरकारच्या ताब्यातच आहे.
८. मूल मातापित्यांना परत मिळावे म्हणून मातापिता खूप झगडत आहेत.

मी या पिटिशनचे आधीचे व्हर्जन वाचले आहे, मला वाटतं की यात अलीकडे थोडे बदल केले गेले आहेत.

माझ्या मते काही तपशील असे घडले असावेत, आताच्या वर्जनमधून गाळले आहेत.

३. आजीने बाळाला मसाज करताना बाळ आजीच्या हातून निसटलं. आजीने ते लपवून ठेवलं.
४. बाळाला झालेली इजा गंभीर स्वरूपाची होती. शिवाय या इजेचे कारण नीट न सांगता आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार कारवाई केली. इजा गंभीर असल्याशिवाय डॉक्टर असे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. बर्लिनमध्ये असंख्य भारतीयांना मुले झाली आहेत. मला ही वांशिक भेदातून मुद्दाम रचलेली योजना अजिबात वाटत नाही.
५. या घटनेच्या आधीही अशीच एक घटना बाळाच्या बाबत घडली होती. तेव्हा बाळाच्या घरी येणार्‍या सरकारी अधिकार्‍यांनी ही घटना किरकोळ स्वरूपाची आहे असा शेरा दिला होता. याच घटनेचा आधार घेऊन मूलसंरक्षण अभिकरणाने माता पित्यांची पूर्ण मानसिक छाननी करावी असे कोर्टात सांगितले.

जर कोर्टात सगळं सुटलं नाही तर बाळाला या मातापित्यांना कायमचे मुकावे लागेल. शिवाय बाळाला एखाद्या जर्मन दाम्पत्याला दत्तकही दिले जाऊ शकते.

माझी मते/अनुभव -

१. भारतीय लोक बाळाच्या बाबतीत आजही टाळू भरणे, धुरी देणे, डोळ्यांत अंजन घालणे, बाळाच्या कानात तेल ओतने, तीट लावणे, मुलाला उलटं पालटं करून आंघोळ घालणे असे अवैज्ञानिक प्रकार का करतात? इथल्या डॉक्टरांनी अनेकवार हे स्पष्ट सांगूनही अनेक शिकली सवरली जोडपीसुद्धा कुटुंबाच्या दबावाखाली येऊन असे अघोरी प्रकार का करतात?
२. माझ्या एका जर्मनीस्थित मित्राने असाच एक व्हिडिओ ग्रुपवर टाकला होता. अगदी वरच्या केसनुसार, त्याच्या नवजात बाळाची आजी बाळाला वरचेवर अलगद पकडून इलेक्ट्रिक शेगडीवर धुरी देत होती. ते पाहून माझ्या डोक्यात तिडिक गेली आणि मी वाईटपणा ओढवून घेतला. जर हा व्हिडिओ जर्मन संस्थांनी पाहिला तर माझ्या मित्रावर गुन्हा दाखल होऊन अतिशय कठोर शिक्षा होऊ शकते.
३. सदर पिटिशन मध्ये भारतीयांना आवाहन आहे. त्यामुळे त्यामध्ये नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. उदा. शाकाहार, जैन संस्कृती वगैरे वगैरे. कायद्यानुसार बाळ सरकारी संस्थेत आहे आणि बाळाची नियमांनुसार काळजी घेतली जात आहे. त्यामध्ये बाळाला पौष्टिक आहार देणे वगैरे गोष्टीसुद्धा आल्या. अर्थातच दिड वर्षाच्या बाळाला संस्कृतीवगैरे काय कळणार? त्याला जसं वाढवू तसे ते वाढेल. पिटिशन मध्ये मात्र यावर उगाच भर दिलेला आढळतो.
४. माझ्या मते, जे काही झालंय ते दुर्दैवी आहे. आई आणि मूलाला असं अजिबात तोडू नये. केवळ याच मानवी मुद्द्यावर सहानुभूती मागावी आणि माझी ती आहे. याहून कोणतीही मोठी मखलाशी गरजेची नाही. परंतू पिटिशनला जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्यात म्हणून असं करणं मी समजू शकतो.
५. आता चित्रपट येऊ घातला आहे त्यामुळे यावर सांस्कृतिक राजकारण केलं जाईलच. उदा. इथलाच एक धागा आठवला. भारतात काय नाही/आहे ते तिकडे नाही असा. त्या धाग्याला हा चित्रपट आणि त्याने उठलेला वाद एक प्रतिसाद ठरेल. बर्‍याच लोकांनी अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत - आपली शाकाहारी बुद्धिमान बाळे बाटवून जर्मन सरकार जर्मन लोकांची अशी धन जाणीवपूर्वक करत आहे!!
६. परंतू या निमित्ताने देखील भारतीय लोक नेहमीच्या त्वेषाने चवताळून उठून शिव्या देण्याऐवजी आत्मपरीक्षण करतील का? आजही अगदी प्रगत देशांत जाऊनही, विज्ञान तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेऊनही आपण धुरी देण्यासारखे अघोरी प्रकार करत असू तर हे खुपेल का? सुवर्णप्राशन विधींसारख्या गोष्टींनी बाळाला हेवी मेटल खाऊ घालणे, बाळाची सुंता करणे(हा एक उच्च प्रतीचा वायझेडपणा), डॉल्बीच्या दणदणाटात बाळाला बिनधास्त घेऊन नाचणे, टाळू भरण्याची काडीचीही गरज नसताना तसे करणे, बाळाच्या जावळाच्या निमित्ताने बाळाचे डोके धार्मिक स्थानी कुठल्याही सोम्यागोम्या न्हाव्याच्या हस्ते वस्तर्‍याने भादरणे असले प्रकार जोवर थांबवत नाहीत तोवर त्यांनी संस्कृतीची भलामण करून परदेशी सरकारांना शिव्या घालण्याचा कृतकपणा करू नये.
७. परदेशस्थ भारतीयांनी शक्यतो तिथल्या कायद्यांना, वैद्यांना धरूनच मुलं सांभाळावीत. स्वतः मूल म्हणून आलेले अनुभव सार्वत्रिकच असतील असे नाही. काहीही ग्रांटेड धरू नये.

वरील बाळ लवकरात लवकर तिच्या आईच्या कुशीत जावो हीच सदिच्छा!

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 Feb 2023 - 9:33 pm | हणमंतअण्णा शंकर...

वरील चित्रपटाविषयीची सध्याची स्थिती या व्हिडिओने लक्षात येईल.

चटर्जींची मुले त्यांना परत मिळाली आहेत असे दिसते.

कंजूस's picture

25 Feb 2023 - 5:59 am | कंजूस

तेल मालीश न करताही मूल वाढू शकतं का हे पाहणे गरजेचे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2023 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टाळू भरणे, धुरी देणे, डोळ्यांत अंजन घालणे, बाळाच्या कानात तेल ओतने, तीट लावणे, मुलाला उलटं पालटं करून आंघोळ घालणे असे अवैज्ञानिक प्रकार असला तरी, आपल्याकडे लहान लेकराला जे स्नान घातलं जातं म्हणजे, आजी दोन्ही पाय पसरवून त्यावर बाळाला पालथं घालून त्याला जे न्हाऊ-माखु घातलं जातं ते परंपरेने आलं आहे, आपल्यापैकी बरेच असेच न्हाऊ-माखू घालूनच लहानाचे मोठे झाले आहेत. कंजूस काका म्हणतात त्या प्रमाणे जो पर्यंत त्याचे फायदे तोटे पुढे येत नाही, त्याबाबत जागृती होत नाही आणि तसे काही कायदे येत नाही तो पर्यंत यावर नियंत्रण येणार नाही, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

शास्त्रीय अशास्त्रीय भाग फार पुढचा.

एखाद्या देशात आपण स्थायिक होतो (कायमचे किंवा तात्पुरते) तेव्हा त्या देशाचे नियम कायदे संकेत पाळणे अनिवार्य असते. ते कायदे शास्त्रीय, अशास्त्रीय आहेत की मानवी, अमानवी आहेत हाही तितकाच वेगळा विषय.

तिथे राहता तर कायदे समजून घ्या. पाळा.

लहान मुलांवर इतके अत्याचार होतात. अनेकदा घरातच आणि नातेवाईकांकडूनच.. ती मुले नीट सांगूही शकत नाहीत. आयुष्यभर मनावर व्रण घेऊन राहतात.

एखादा देश जर त्याबाबत इतका जागरूक असेल आणि नो टोलेरेन्स धोरण अवलंबत असेल आणि शंकेला जराही वाव न ठेवता काळजी घेत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याऐवजी त्याच्याकडून शिकले पाहिजे. असे मत.

धर्मराजमुटके's picture

25 Feb 2023 - 8:43 am | धर्मराजमुटके

आपल्यापैकी बरेच असेच न्हाऊ-माखू घालूनच लहानाचे मोठे झाले आहेत आणि हे प्रकार अवैज्ञानिक असते आणि त्याचे केवळ तोटेच असते तर आतापर्यंत भारतातील सगळ्या पिढ्या नेस्तनाबूत व्हायला हव्या होत्या, किमान रोगट तरी बनायला हव्या होत्या. तस्मात याला अजून तरी काही आधार नाही. असो.
ज्यांना भारतातून बाहेर जायचे आहे त्यांनी भारत फक्त मनात ठेऊन तिथे रहावे. तिथले कायदे कानून पाळावेत हे उत्तम. इतकीच जर भारतीय परंपरांची चाड असेल तर भारतातच रहावे.

मित्रहो's picture

25 Feb 2023 - 5:22 pm | मित्रहो

माझ्या माहितीप्रमाणे Sensory Development साठी मालिश गरजेची असते. ती करण्याची पद्धत असते. शहरात हल्ली ते काम करणाऱ्या स्रिया मिळत नाहीत म्हणून मग भांडे घासणारी सुद्धा हे काम करते. ती भांडे घासल्यासारखेच रगडते त्याने नुकसान होते. मला तर वाटते याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणाऱ्या संस्था हव्यात. माझ्या मुलाला Sensory समस्या होत्या तेंव्हा डॉक्टरांनी मालिश करायला सांगितली होती. नक्की काय करायचे हे त्यांनी माझ्या बायकोला समजावून सांगितले होते. त्यात हाताने हलकेच मालिश करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कापड (मलमल, कॉटन वगैरे) अंगावरुन फिरविणे असे बरेच प्रकार होते. आता पूर्ण आठवत नाही. आणि हो डॉक्टर न्यूरॉलॉजिस्ट होते. सर्वच डॉक्टर हीच ट्रिटमेंट देतील असे नाही.

भारतीय परंपरा हा विषय वेगळा आहे. आपण कदाचित १०० टक्के गृहीत धरत आहोत की भारतीय पद्धतीने न्हाऊ माखू घालणे यामुळे हा प्रकार घडला आहे.

मिलॉर्ड, दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत जे अण्णांनी लेखात मांडले आहेत.

एक. या आधीही (किरकोळ) जखमी होण्याची घटना घडली होती.
दोन. बाळाला झालेली इजा गंभीर स्वरूपाची होती.
तीन. या इजेचे कारण नीट न सांगता आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार कारवाई केली

म्हणजेच स्पष्टीकरण देण्याची पूर्ण संधी दिली गेली होती हे स्पष्ट होते आहे. जर्मनीसारख्या देशात अशी संधीच मिळणार नाही असे वाटत नाही. तरीही त्या जखमेबद्दल जे स्पष्टीकरण दिले गेले ते अर्थातच डॉक्टरांना पटले नाही, म्हणजे ते न जुळणारे किंवा तार्किक नसणार असे म्हणायला जागा आहे. एखादा देश परदेशीय स्थलांतरितांची मुले स्वतःच्या कस्टडीत सरकारी खर्च वाढवून ठेवून घ्यायला कशाला प्रयत्न करतील.

आणखी एक. स्थानिक जर्मन मुले अशाच कारणासाठी कस्टडीत घेतली जात नाहीत का? असणारच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2023 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अध्यक्ष महोदय, मी आपलं एका गोष्टीकड़े लक्ष वेधू इच्छितो. आजी जर्मनीला ज्या विविध कारणासाठी गेली त्यात न्हाऊ माखु घालणेही असावे, पारंपरिक पद्धत आहे त्यात अशा जखमा होत नाहीत, तसे काही वाचनात नाही. हं जे भविष्यकाळात फटके बसतात उदा. नाक बसके असणे वगैरे. पण ते त्यामुळेच की नैसर्गिक याचा विदा नाही पण हं आता जे घडले ते अपघाताने घडले असावे, असे जर असेल ते वेगळे. पण मुख्य विषय न्हाऊ-माखु घालणे आणि ते अवैज्ञानिक आहे की कसे आणि त्यामुळे असेल तर आणि तसे कायदे आपल्याकडे झाल्यास बरीचसही बालकं सरकारकड़ेच वाढतील, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

इजा गंभीर स्वरूपाची असणे आणि लैंगिक अत्याचाराचा संशय डॉक्टर किंवा अधिकाऱ्यांना येणे, हा तपशील लक्षात घ्यावा. नुसती लचक, मुरगळणे नसावे. आणि ज्या कारणाने ते घडले असा दावा पालक करत आहेत ते इजेच्या स्वरुपाशी आणि गांभीर्याशी जुळत नाही असे कायदेशीर ओथोरिटी म्हणत आहे. मामला हलक्यात घेऊन मूल परत देणे योग्य होईल का?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Feb 2023 - 2:18 pm | हणमंतअण्णा शंकर...

१. शास्त्रीयता/अशास्त्रीयता वि पारंपारिक ज्ञान :
टाळू भरणे- माझ्या अल्प वाचनानुसार बाळाच्या मेंदूच्या वाढीला वाव असावा म्हणून बाळाच्या कवटीची हाडे घट्ट जोडलेले नसतात. (इथले डॉक्टर अधिक सांगू शकतील). ती नैसर्गिकतः बाळ जसं जसं मोठं होतं तशी भरत जाते. परंतु आपल्या इथं हे प्रसूतिपश्चात बाळाच्या डोक्यात खोबरेल तेलाने टाळू भरायलाच पाहिजे असा हट्ट असतो.
काजळाविषयी: डोळ्यात सुरमा केवळ बाळालाच घालायचा नाही तर तो सगळ्यांनाच घालायचा आहे. चरकसंहितेत सकाळी नस्य वगैरे करून, सुरमा वगैरे लावून धूमपान करायचे आहे. हे सगळ्यांनी करायचे असे तर स्पष्ट सांगितले आहे. (परंतु आताच्या हिंदुत्त्वाच्या डेफिनेशनमध्ये सुरमा बसत नाही हा भाग अलाहिदा) मला वाटतं हा रेग्युलर करायचा विधी असल्याने आणि बाळाच्या बाबतीत काही विधी हे ठरवून पाळले जात असल्याने बाळाच्या दिनक्रमात येऊन बसला असावा. काजळात घालायला आजकाल नैसर्गिक कापूर मिळत नाही. बाळाचे डोळे काजळाविनाही चांगले राहतात. काजळाने झालाच तर त्रासच होतो.
नजर लागते म्हणून तीट लावणे हे तर अशास्त्रीयच आहे.
धुरी देणे - नॉर्मली एका पात्रात कोळसा घेऊन त्यावर उद/कापूर वगैरे घालून धुरी देतात. मी मात्र या धुरी देण्याचा अट्टाहासापायी बाळाला स्वयपाकाघरातल्या इलेक्ट्रीक शेगडीवर धुरी देण्याचा प्रकार पाहिला आहे. तोही युरोपस्थ भारतीयाच्या घरी. हे जर बालसंरक्षण अभिकरणाने पाहिलं तर पालकांवर गुन्हा दाखल झालाच असता.
पारंपारिक ज्ञानाबद्दल भारतीय मात्र सगळंच पाळत नाहीत असं दिसतं. स्तनदा मातेने उसापासून बनवलेली दारू प्यावी म्हणजे दूध भरपूर येते असंही पारंपारिक ज्ञान सांगतं. मी मात्र पालक उसाची दारू मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत नाही असं दिसतं.
अशा सिलेक्टीव्ह पारंपारिक ज्ञानापायीच चटर्जींची बाळं नॉर्वे सरकारने ताब्यात घेतली होती. त्यामुळे हा ही मुद्दा आहेच.

२. बाळाला इजा ते हातातून निसटल्याने झाली होती झाली होती असं मला ऐकीव ठाऊक आहे. चेंज.ऑर्ग च्या पिटीशनमध्येही हे वाचल्याचं स्मरतं. डॉक्टरांना इजेचे कारण सांगता न आल्याने डॉक्टरांनी कारवाई केली. नंतर रामायण झाल्यावर मग आजीने कन्फेशन दिलंय. झाला प्रकार दुर्दैवीच आहे, त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. बर्लिनमध्येच निर्वासित लहान मुली भीक मागतानाही दिसतात. अगदी भारतात असते तसे काही निर्वासित बायका मेट्रोमध्ये तान्ही बाळं घेऊन भीक मागताना दिसतात. हा ही एकाप्रकारे गुन्हाच आहे. त्या सगळ्यांनाच कस्टडीत टाकलं जातं असंही नाही. नॉर्वेमध्ये अशा गोष्टी दिसत नाहीत.

स्कँडेनॅव्हियन देशांमध्ये मुलांच्या हक्कांविषयी जरा जास्तच जागरूकता आहे. खूप वर्षांपूर्वी पाहिलेला "द हंट" हा Mads Mikkelsen या नटाचा एक अप्रतिम चित्रपट आठवला. चित्रपट सायकोलॉजिकल ड्रामा आहे पण, लहान मुलांशी केलेल्या सहज वर्तनातून एखाद्याचे आयुष्य कसे उध्वस्त होते हे पाहण्यासारखं आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 Feb 2023 - 3:55 pm | हणमंतअण्णा शंकर...

एका बातमीनुसार वरील फॉस्टर सर्विसेसचा खर्च त्या पालकांकडून वसूल केला जात आहे. ती बीलं हजारो युरोंची आहेत.

कित्येक पिढ्या सुरू आहे. अचानक एखादी बाई 'दाई'/'सुईण' होत नसते. ती दुसऱ्या अशा अनुभवी बाईबरोबर जात राहाते (उमेदवारी करते) आणि तंत्र शिकून घेणे. ते शिक्षण पुस्तकं वाचून घेतलेले नसते.

आता प्रदेशात सहा सहा महिने टुरिस्ट विजावर जाऊन पैसे मिळवण्याचा उद्योग काहींना जमला आहे. त्यांना इंग्रजी/इतर परदेशी भाषा बोलणे,विमानप्रवास करणे हे तंत्र जमले आहे.

तर्कवादी's picture

26 Feb 2023 - 8:43 pm | तर्कवादी

नक्की कुठली घटना आहे ? चित्रपटाचे शीर्षक "मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे" असं आहे.. वर जर्मनीचीही चर्चा आहे.नक्की कुठली घटना आहे.
असो.. पण एकुणातच अशी घटना अतिशय दुर्मिळच असावी. यापुर्वी कधी अशी कोणती घटना ऐकण्यात / वाचनात आली नाही. जर्मनीत तर भारतीय मोठ्या संख्येने असणार.

सर टोबी's picture

26 Feb 2023 - 9:23 pm | सर टोबी

नियम काटेकोरपणे पाळावेत याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु एकात्मता आणि वैविध्य - इन्कलुसीव्हीटी अँड डायव्हर्सिटी - च्या जमान्यात तरी काही तारतम्य असावे अशी अपेक्षा अगदीच गैर नसावी. नॉर्वेमध्येच एक आज्जी नातवाला हाताने खाणं भरवतांना एका शेजाऱ्याने पहिले आणि त्याची तक्रार केली असता पोलिसांनी त्या बाळाची कस्टडी काढून घेतल्याची बातमी वाचनात आली होती.

याप्रकारचे, पण जरा वेगळे असे 'खोब्रागडे प्रकरण' काही वर्षांपूर्वी खूप गाजले होते. अशी सावजे हेरण्याचे काम विविध देशातली बेरकी वकील मंडळी करत असतात, आणि त्यातून बक्कळ पैका मिळवत असतात, हे वेळोवेळी उघड झालेले आहे.
खुद्द माझ्यावर, माझी कोणतीही चूक नसता अमेरिकेत येऊ घातलेल्या अश्या एका संकटातून थोडक्यात बचावलो होतो. त्यातली दुखःद बाजू म्हणजे ते संकट एका कचखाऊ, दीडशहाण्या मराठी पुणेकरामुळे ओढवले होते.

सविस्तर लिहिता येइल का?

तुर्रमखान's picture

27 Feb 2023 - 12:26 am | तुर्रमखान

पाशात्यदेशात आणि भारतात प्रचंड कल्चरल फरक आहेत. त्यामुळे तिथे दीर्घकाळ वास्तव्याचा अनुभव नसणार्‍यांना हे कायदे आणि नियम कै च्या कै आहेत असं वाटतं. अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांच्या तोंडाकडे बघण्याची सवय असते. बस असो, दुकान असो किंवा इतर गर्दीची ठिकाणं. ही सवय आपल्या लक्षात देखिल येत नाही. नुसतं अश्या बघण्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत. माझ्या अगदी माहितीतलं एक उदाहरण. एका मित्राचे वडील भारतातून उसगावात गेले होते. जाताना ते लोकांच्या लॉन मध्ये, घरांकडे उत्सुकतेने बघत. दुसर्‍याच आठवड्यात एकाने पोलिसांना फोन केला. आपल्याकडे हे अतिशय नॉर्मल आहे पण तिथे लोकांना रेकीचा संशय आला. हिरव्या देशात बर्‍याच काळ रहाणार्‍यांना हे कारण पटेल पण इतर भारतीय लोकांना पटणार नाही.

बाकी लहान मुलांच्या बाबतीत काही म्हणणं नाही. जिथे जातो तिथले कायदे पाळले पाहिजेत. इअर पिअर्सिंग सुद्धा आक्षेप घेतला जाउ शकतो. पण आता बर्‍याच देशात या रिच्युअल बद्दल माहिती आहे.

चौकस२१२'s picture

27 Feb 2023 - 8:07 am | चौकस२१२

तुर्रमखान सहमत ...
इअर पिअर्सिंग सुद्धा आक्षेप घेतला जाउ शकतो शाळेत ममुलं असताना त्यावर निर्बंध आहेत पुढे फारसे नाहीत ...
Presentation Requirements

1. Wear their uniform with pride and as outlined in the क्ष्क्ष्क्ष्क्ष section while at
school, travelling to and from school and when representing the school or wearing the school
uniform in the community.
2. Look natural, neat, tidy and conservative in presentation. For example:
 Make – up and eye lash extensions are not allowed
 Nails – clear polish only, safe length & no artificial nails
 Piercings – lower ear lobes only (clear earrings, band aids or hair cannot be used to
cover piercings)
 Earrings – one pair of small, fine, plain round silver or gold sleepers or studs (Girls
only)
 Tattoos – not allowed
 Watches – functional rather than decorative
 Other jewellery – not allowed
 Hairstyles – natural colour,
 tied up if it touches the collar using a plain band & school ribbon, at the base
of the neck so that the hat can be worn correctly.
 off the face
 minimum number two (2) blade
 no tracks, undercuts or dramatic differences in length between top and sides
of the hair
 Shaving – students must always be clean-shaven
 sideburns are to be no longer than half-way down the ear.
Exemptions from above may be granted on medical, religious or cultural grounds but must be
supported by appropriate documentation to the Head of Year and then approved by the Year Level
Deputy Principal.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

27 Feb 2023 - 3:37 am | हणमंतअण्णा शंकर...

चटर्जी व. नॉर्वे या चित्रपटात जी केस मांडली गेली आहे त्याविषयी मी अधिक डिग केले असता एक मुद्दा सामोरा आला.
१. नॉर्वेचे बालसंरक्षण अभिकरण कायद्यान्वये कोणत्याही केसमधल्या गोष्टी जाहीर सार्वजनिक करू शकत नाही.
२. आपल्याला जे कळते ते फक्त पालक आणि पालकांची बाजू मांडणारे वकील जे सांगतील तेच, म्हणजे एकच बाजू.

Dagbladet नावाच्या नॉर्वेजियन न्यूजपेपर मध्ये चटर्जींच्या वकीलांनी काही गोष्टी उघड केल्या ज्या चर्टजी जाहीररित्या सांगत नाहीत. अर्थात ते वकील याहून वाईट गोष्टी सांगणार नाहीतच.

१. चटर्जी आपल्या मुलांना बहुतेकदा दहीभातच खाऊ घालत होत्या.
२. थंडीच्या मोसमातही मुलांना अजिबात मोजे घातलेले नसत
३. चटर्जींना स्तनपान कसे करावे हे कळत नव्हते
४. चटर्जी मुलांच्या भावनिक गरजांप्रति सजग नव्हत्या. त्या मुलांशी कोल्ड आणि डिस्टंट वागत
५. अंगणवाडीच्या शिक्षिकेने चटर्जी यांना मुलाला मारताना पाहिले.
६. अंगणवाडीतून आपल्या मुलीला घरी नेताना त्या मुलीशी रफ वागल्या.. इत्यादी..

जर्मनीच्या केसमध्येही मी केसमधले तपशील हळू हळू गळताना आणि निष्पाप पालक विरूद्ध बर्लिन बालसंरक्षण अभिकरण असे बनताना पाहत आहे.

नॉर्वेची बालसंरक्षण संस्था मात्र धुतल्या तांदळासारखी आहे असं नाही. बी बी सी ने दाखवलेले एक विदारक सत्य -

चौकस२१२'s picture

27 Feb 2023 - 7:58 am | चौकस२१२

अण्णा आपल्या म्हण्याशी बर्यापैकी सहमत ..
दोन भिन्न संस्कृती एकमेकांच्या साथीत आल्या कि हे होणारच हे दुर्दैव .... ( मग त्यातून गैरसमज किंवा अन्याय )

मग यात कोण श्रेष्ठ आणि कोण नाही असले फुकाचे वाद घातले जाणार हे दुर्दैव

शास्त्रीय दृष्टीकोन ठेऊन जगावे हे उत्तम त्याने वाईट तरी होणार नाही असे वाटते ...

अर्थात हे कधी कधी अवघड होते खास करून जेथे धर्माचा अति पगडा असतो तिथे
इस्लामोफोबिया चा आरोप होईल हे मान्य करून एक नमूद करावे वाटते ते म्हणजे
वर्षभरातुन एकदम अचानक अतियशय निर्जळी उपवास तो सुद्धा अतिशय गरम प्रदेशात आणि दिवसभर पाणि सुद्धा न पिता करणे शास्त्रीय दृष्ट्या शरीरास कितपत योग्य आहे याची शंका आहे पण काय करणार ... धर्म / परंपरा सांगते म्हणून हे असेच करा असे जिथे सरकारला सुद्धा वाटते तिथे कसे जुळवून घ्यायचे ?
अर्थात अश्या प्रथा इसलामेतर धर्मात पण असतील

कर्नलतपस्वी's picture

27 Feb 2023 - 8:51 am | कर्नलतपस्वी

जैसा देस वैसा भेस अन उरफाटे लुगडं नेस.

कायदे,कल्चरल फरक समजून घेऊन मगच मुलांना वाढवले पाहीजे. भारतातून जाणारे वयोवृद्ध "आम्हाला पण मुलं झालीच ना!" असा अडमुठा विचार परदेशातल्या मुलांना वारंवार बोलून मानसिक दडपण आणतात.