एक धुंद गुलाबी सकाळ -२!

Bhakti's picture
Bhakti in भटकंती
12 Feb 2023 - 6:41 pm

मायंबा दरा
अर्जुनाने देवास पुसले, हा योग कैसा?

योगसाधनेसाठी उत्तम ,निरापद स्थान‌ शोधणे आवश्यक आहे.

ते कैसे असावे?

तर जेथ वैराग्य दुणावेल.जे संतांनी वसविलेले असेल .जेथे परब्रह्माचा साक्षात्कार अगदी सहज घडू शकेल.जेथ साधक राहत असेल.जे दूर,एकान्तामध्ये असेल.मंद छाया,मंद प्रकाश आणि मंद पवनाचे झोंके......त्या ठिकाणी एकान्ती आसन लावावे.

गो.नी.दा. लिखित मोगरा फुलला मधील माधवाने योग स्थानाचे सांगितलेले गुण माऊली आपले गुरू निवृत्तीनाथ यांच्या आशीर्वादाने मराठी भाषेत सांगतात.

हे रात्री पानं वाचून नाथ पंथाविषयी योगज्ञान विषयी आस्था आणखिन जागली.दुसर्या दिवशी जवळच मायंबा दरा जेथे मच्छिंद्रनाथांनी काही काळ योग साधनेचे अनुष्ठान केले जेथे तिथे छोट्याशा डोंगर चढाईला जायचे होते.तेव्हा खुपचं उत्सुकता होती.

Q
५.३० ला एकत्र जमायचे होतं आज जरा भारतीय वेळेनुसार ५.३० म्हणजे ६.१५ ला तिथे पोहोचलो.त्यामुळे कोणता रस्ता कोणते वळणं जरा धांदल उडाली.शेवटी इच्छित स्थळी पोहोचलो.

वार्म अपसाठी एका सपाट भागावर आलो.चहूबाजुंनी उंच डोंगर आणि समोर इतके सुंदर भव्य वडाचे दुमदार झाड उभे होते.योग स्थानाचे सर्व गुण ह्या झाडाजवळ होते.

A

W
पुढे जरा दगडातून पुढच्या उंच डोंगरावर १५ मिनिटांत पोहचलो.पुन्हा पठार भाग जरा रेंगाळलो.परत दुसऱ्या उंच डोंगरावर १५ मिनू चढाई केली.आता पवनचक्क्या भिरभिरत होत्या .त्यांचे आवाज घुमत होते.अर्ध्या भागात स्वच्छ लख्ख सूर्य प्रकाश तर अर्ध्या भागात बाजूच्या डोंगरांची सावली असे मोहक दृश्य होतं.

E

T

मागे फिरताना आता पायथ्याची हिरवी शेतं,शेततळी त्या पलीकडे दूर शहरातील घरांची पुसट रांग दिसत होती.

जातांना वाळलेल्या गवताच्या पेंढ्या रचलेल्या दिसल्या,"ये हमें क्या हुआ कोई समजावो ना,गुंजीसी ही सारी हवा" ते ऐश्वर्याचं गाणं आठवलं आणि तसा व्हिडिओ काढायला गेले,तर सगळ्या गवताच्या काड्याच टोचायला लागल्या.त्यामुळे कसा बसा व्हिडिओ आवरला, धन्य आहे बाई ऐश्वर्या :)

उतरताना भारी गम्मत होती.गवतामुळे वाट घसरट व्हायची आणि जिद्दीने लक्षपूर्वक उतरायला हाच ध्यास होता.येतांना फुलांचे फोटो घेत आले.

Y

F

A

C

परतीच्या वाटेवर शेवंतीच्या फुलांची बाग बहरलेली दिसली.आपसुक मन तिकडे वळाले.

U

मी आपली फोटो काढण्यात गुंग आमचे हे शेतकऱ्याला भेटून पालक ,अळू ,करडई घेऊन आले(माझ्यापेक्षा नवराच जास्त सांसारिक आहे ,हे पुन्हा सिद्ध झाले.)

शेतकरी काकू आल्या शेवंतीच्या बागेतून बीटाची टोपली भरून घेऊन आल्या.मग काय बीटपण घरी आले.

असा योगाज्ञानापासून सुरू झालेला प्रवास प्रंपच द्वारी पोहचला.
-भक्ती

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

12 Feb 2023 - 8:00 pm | कुमार१

सुंदर प्रवास !

कर्नलतपस्वी's picture

12 Feb 2023 - 8:42 pm | कर्नलतपस्वी

पुणे सातारा रोडवर पवनचक्क्या रांगेत लावल्या आहेत. तिकडेच कुठे ही जागा असावी असे वाटते.

श्वेता व्यास's picture

13 Feb 2023 - 11:16 am | श्वेता व्यास

वा, प्रसन्न सकाळ! फोटो आवडले.

एका वेगळ्याच ठिकाणची माहिती मिळाली.
पुण्यावरुन नगरला जाताना डावीकडे एका डोंगरावर पवनचक्क्या दिसतात तिथेच आहे का हे ठिकाण?

नगर-बुर्हानगर-कापूरवाडी-मायंबा मंदिर (आडगाव घाट जवळ)
पुढे आगडगाव, त्याठिकाणची माहिती मागे एका भटकंतीमध्ये दिली आहे.पुढे पाथर्डीला मच्छिंद्रनाथांची समाधी आहे ते एक मायंबा आहे.हे आपलं जवळ शांत ठिकाण आहे.सह्याद्रीच्या‌ उपरांगा गर्भगिरी!
W

तुषार काळभोर's picture

13 Feb 2023 - 11:37 am | तुषार काळभोर

आधी प्रपंच करावा नेटका!

Bhakti's picture

13 Feb 2023 - 11:53 am | Bhakti

:) :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Feb 2023 - 11:42 am | राजेंद्र मेहेंदळे

पण माझा गणेशा झालाय :(

चांदणे संदीप's picture

13 Feb 2023 - 12:05 pm | चांदणे संदीप

पवनचक्क्या जिथे असतात तिथे फिरायला खूप मजा येते. हे ठिकाणही भारी.
फुलांचे सर्वच फोटो सुरेख आलेत.

सं - दी - प

चलो पवनचक्की!!

चलो पवनचक्की!!

चांदणे संदीप's picture

13 Feb 2023 - 6:11 pm | चांदणे संदीप

हम तो तैय्यार बैठे हय. आपक्याच वाटा आन पाय इधर्कु वळते नै है.
आगले मोशी कट्टेके वास्ते रूमाल डालेलाच हय. कव्वा वेळ वकुत मिळता है सबकु वो सबका एक मालिकच ज्याने.

सं - दी - प

कधी आहे मोशि कट्टा?

टर्मीनेटर's picture

15 Feb 2023 - 10:56 pm | टर्मीनेटर

फक्त (बस) दिवस (दिन) आणि (और) वेळ (वक्त) निश्चित नाहीये (तय नही हैं)... पण (पर) कट्टा करायचा आहे (करना हैं) हे निश्चित (यह सुनिश्चित)!
मोशी कट्टा लवकरात लवकर होवो.... ( स्वगत- बची जिंदगी, तो मोशी में मिलेंगे 😀)

टर्मीनेटर's picture

15 Feb 2023 - 10:40 pm | टर्मीनेटर

बस क्या बावा... अपन तो दो सालसे तैयार बैठेले है मोशी कट्टे के वास्ते! बाकी लोगा तैयार नही हो रहेले (वो पैजारबुवा को विपश्यना करनेकी रेहती... प्रशांतसेठ को साईकल चलानी रेहती) तो हम क्या करें?

असा मी असामी's picture

17 Feb 2023 - 11:40 pm | असा मी असामी

अपना ये पेहला कट्टा होगा, जल्दि करो. कोइ मदत चाहिये तो ये हमाल है , बता दो
मोशी जवळ कोण आहे, भेटु . काय म्हनताय

भागो's picture

13 Feb 2023 - 1:31 pm | भागो

लकी यू!
पायात जोर आहे आणि हृदयात उर्मी आहे तो पर्यंत घ्या यथेच्छ भटकून!

गणेशा's picture

13 Feb 2023 - 1:45 pm | गणेशा

छानच

सर्वांना धन्यवाद _/\_

गोरगावलेकर's picture

14 Feb 2023 - 11:35 am | गोरगावलेकर

फोटो छानच

सस्नेह's picture

14 Feb 2023 - 9:07 pm | सस्नेह

छान !

स्मिताके's picture

14 Feb 2023 - 9:18 pm | स्मिताके

भटकंतीसाठी छान ठिकाणं निवडली आहेत. फोटो बघूनसुध्दा निवांत आणि प्रसन्न वाटलं.

टर्मीनेटर's picture

15 Feb 2023 - 10:36 pm | टर्मीनेटर

झकास! सुंदर फोटोज 👍

व्रुद्धेश्वर पासुन रस्ता आहे का?
आणी हे कनिफनाथ पासुन जवळ आहे का?

कानिफनाथ ्. पासून जवळ आहे.वृद्धेश्वर दूर आहे बहुतेक.

व्रुद्धेश्वर पासुन रस्ता आहे का?
आणी हे कनिफनाथ पासुन जवळ आहे का?

Nitin Palkar's picture

22 Aug 2023 - 8:07 pm | Nitin Palkar

छान वर्णन! सुरेख प्र चि !!