मायंबा दरा
अर्जुनाने देवास पुसले, हा योग कैसा?
योगसाधनेसाठी उत्तम ,निरापद स्थान शोधणे आवश्यक आहे.
ते कैसे असावे?
तर जेथ वैराग्य दुणावेल.जे संतांनी वसविलेले असेल .जेथे परब्रह्माचा साक्षात्कार अगदी सहज घडू शकेल.जेथ साधक राहत असेल.जे दूर,एकान्तामध्ये असेल.मंद छाया,मंद प्रकाश आणि मंद पवनाचे झोंके......त्या ठिकाणी एकान्ती आसन लावावे.
गो.नी.दा. लिखित मोगरा फुलला मधील माधवाने योग स्थानाचे सांगितलेले गुण माऊली आपले गुरू निवृत्तीनाथ यांच्या आशीर्वादाने मराठी भाषेत सांगतात.
हे रात्री पानं वाचून नाथ पंथाविषयी योगज्ञान विषयी आस्था आणखिन जागली.दुसर्या दिवशी जवळच मायंबा दरा जेथे मच्छिंद्रनाथांनी काही काळ योग साधनेचे अनुष्ठान केले जेथे तिथे छोट्याशा डोंगर चढाईला जायचे होते.तेव्हा खुपचं उत्सुकता होती.
५.३० ला एकत्र जमायचे होतं आज जरा भारतीय वेळेनुसार ५.३० म्हणजे ६.१५ ला तिथे पोहोचलो.त्यामुळे कोणता रस्ता कोणते वळणं जरा धांदल उडाली.शेवटी इच्छित स्थळी पोहोचलो.
वार्म अपसाठी एका सपाट भागावर आलो.चहूबाजुंनी उंच डोंगर आणि समोर इतके सुंदर भव्य वडाचे दुमदार झाड उभे होते.योग स्थानाचे सर्व गुण ह्या झाडाजवळ होते.
पुढे जरा दगडातून पुढच्या उंच डोंगरावर १५ मिनिटांत पोहचलो.पुन्हा पठार भाग जरा रेंगाळलो.परत दुसऱ्या उंच डोंगरावर १५ मिनू चढाई केली.आता पवनचक्क्या भिरभिरत होत्या .त्यांचे आवाज घुमत होते.अर्ध्या भागात स्वच्छ लख्ख सूर्य प्रकाश तर अर्ध्या भागात बाजूच्या डोंगरांची सावली असे मोहक दृश्य होतं.
मागे फिरताना आता पायथ्याची हिरवी शेतं,शेततळी त्या पलीकडे दूर शहरातील घरांची पुसट रांग दिसत होती.
जातांना वाळलेल्या गवताच्या पेंढ्या रचलेल्या दिसल्या,"ये हमें क्या हुआ कोई समजावो ना,गुंजीसी ही सारी हवा" ते ऐश्वर्याचं गाणं आठवलं आणि तसा व्हिडिओ काढायला गेले,तर सगळ्या गवताच्या काड्याच टोचायला लागल्या.त्यामुळे कसा बसा व्हिडिओ आवरला, धन्य आहे बाई ऐश्वर्या :)
उतरताना भारी गम्मत होती.गवतामुळे वाट घसरट व्हायची आणि जिद्दीने लक्षपूर्वक उतरायला हाच ध्यास होता.येतांना फुलांचे फोटो घेत आले.
परतीच्या वाटेवर शेवंतीच्या फुलांची बाग बहरलेली दिसली.आपसुक मन तिकडे वळाले.
मी आपली फोटो काढण्यात गुंग आमचे हे शेतकऱ्याला भेटून पालक ,अळू ,करडई घेऊन आले(माझ्यापेक्षा नवराच जास्त सांसारिक आहे ,हे पुन्हा सिद्ध झाले.)
शेतकरी काकू आल्या शेवंतीच्या बागेतून बीटाची टोपली भरून घेऊन आल्या.मग काय बीटपण घरी आले.
असा योगाज्ञानापासून सुरू झालेला प्रवास प्रंपच द्वारी पोहचला.
-भक्ती
वाचने
9116
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर प्रवास !
छान फोटो आहेत
वा, प्रसन्न सकाळ! फोटो आवडले.
एका वेगळ्याच ठिकाणची माहिती
नगर-बुर्हानगर-कापूरवाडी
In reply to एका वेगळ्याच ठिकाणची माहिती by प्रचेतस
समर्थांनी म्हटलेलंच आहे ...
:) :)
In reply to समर्थांनी म्हटलेलंच आहे ... by तुषार काळभोर
छान!!
मस्त
पवनचक्क्या जिथे असतात तिथे फिरायला खूप मजा येते.
In reply to मस्त by चांदणे संदीप
पवनचक्क्या जिथे असतात तिथे फिरायला खूप मजा येते.
In reply to मस्त by चांदणे संदीप
हिंदकेसरी
In reply to पवनचक्क्या जिथे असतात तिथे फिरायला खूप मजा येते. by तुषार काळभोर
आगले मोशी कट्टेके वास्ते रूमाल डालेलाच हय
In reply to हिंदकेसरी by चांदणे संदीप
फक्त (बस) दिवस (दिन) आणि (और)
In reply to आगले मोशी कट्टेके वास्ते रूमाल डालेलाच हय by असा मी असामी
बस क्या बावा... अपन तो दो
In reply to हिंदकेसरी by चांदणे संदीप
चलो जल्दि करो
In reply to बस क्या बावा... अपन तो दो by टर्मीनेटर
लकी यू!
छानच
सर्वांना धन्यवाद _/\_
अजून एका नवीन ठिकाणाची ओळख आवडली.
छान !
मस्त!
झकास! सुंदर फोटोज
व्रुद्धेश्वर पासुन रस्ता आहे
कानिफनाथ ्. पासून जवळ आहे
In reply to व्रुद्धेश्वर पासुन रस्ता आहे by स्वराजित
व्रुद्धेश्वर पासुन रस्ता आहे
छान वर्णन!