भारताबाहेरील राजकारणातील मराठी लोक

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
28 Jan 2023 - 8:08 pm
गाभा: 

भारताबाहेरील काहि मराठी राजकारणी ( स्थानिक आणि काही राष्ट्रीय संसदेतील )

१) योगेंद्र पुराणिक जपान https://www.youtube.com/watch?v=hAeQPRh2a84&t=6s
२) श्री ( शामल ) ठाणेदार अमेरिका https://www.youtube.com/watch?v=Gue7qYN6dtg
३) स्वाती दांडेकर अमेरिका https://www.youtube.com/watch?v=w7-tp_ePngg
४) लिओ वराडकर आयर्लंड https://www.youtube.com/watch?v=N2WoNik_Kh4

यातील १,२,आणि ३ यांनी उत्तम मराठी येते

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Jan 2023 - 8:16 pm | चंद्रसूर्यकुमार

बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबईत जागतिक मराठी परिषद भरली होती त्यात मॉरीशसच्या मंत्री शिला बापू आल्या होत्या. त्यांनी त्यावेळेस तोडक्या मोडक्या मराठीत भाषणही केले होते.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2023 - 11:25 pm | श्रीगुरुजी

डेलावेअर मधून अनेक वर्षे कुमार बर्वे निवडून येत होते. अर्थात ते फक्त नावानेच मराठी. जन्म अमेरिकेत आणि पत्नी अमेरिकन. त्यामुळे मराठी भाषा, महाराष्ट्र, भारत यांच्याशी संबंध नसावा.

प्रेस्टन कुलकर्णी हे जन्माने अमेरिकन आहेत . अनेकदा टेक्सस मधील २२ व्या जिल्ह्यांतून हरत आले आहेत पण विविध महत्वाच्या पदांवर आणि इतर सिनेटर वगैरे मंडळींचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Jan 2023 - 12:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्यांचे वडिल हैद्राबादचे होते व लेखक होते. मुळचे ते तेलुगु असल्याचे वाचले होते. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता असेही वाचले होते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

30 Jan 2023 - 6:09 pm | हणमंतअण्णा शंकर...

दुसरी किंवा तिसरी पिढी राजकारणात खूप उंचीवर जाऊ शकते.

आयर्लंड झाले. आता पाळी इतर युरोपियन देशांची.

चौकस२१२'s picture

1 Feb 2023 - 8:00 am | चौकस२१२

दुसरी किंवा तिसरी पिढी राजकारणात खूप उंचीवर जाऊ शकते.
हो नक्कीच आणि राजकारणशिवाय इतर क्षेत्रात हि उदाहरण मीडिया ... आरती बेटीगिरी ( मराठी + कन्नड https://www.lowyinstitute.org/people/contributor/bio/aarti-betigeri)

परंतु योगेंद्र पुराणिक / श्री ठाणेदार अमेरिका स्वाती दांडेकर अमेरिका
हे तिघे पहिल्या पिढीचे स्थलांतरित आहेत त्यामुळे जास्त अवघड आणि म्हणून जास्त कौतुकाचे वाटते एवढेच

पेशवा राजे's picture

4 Feb 2023 - 4:07 am | पेशवा राजे

आमच्या क्षमा सावंत ताई पण खूप होतकरू आहेत इकडे सिएटल मध्ये
https://en.m.wikipedia.org/wiki/Kshama_Sawant

अनन्त अवधुत's picture

19 Feb 2023 - 4:01 pm | अनन्त अवधुत

सिअ‍ॅट्ल नगरपालिकेने मंजूर केलेला भारताच्या निषेधाचा ठराव यांनीच आणला होता. भारताने सीएए कायदा मंजूर केलेला म्हणून तो ठराव आणला होता.
राजकियदृष्ट्या त्या अति डाव्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात. त्या कायमच भारत आणि हिंदु विरोधी असतात.
कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचे प्रत्यंतर तिथला भारतीय आणि हिंदु समाज त्यांच्यामुळे कायम घेत असतो.
त्या तिथे होतकरु असल्या तरी त्यात आपले भारतीय म्हणून नुकसान आहे.

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ १००%

Trump's picture

22 Feb 2023 - 10:59 pm | Trump

धन्यवाद.
डेमोक्रेटीक पक्षाच्या श्री प्रमिला जयपाल अश्याच आहेत.
https://indianexpress.com/article/explained/explained-who-is-us-congress...

सुबोध खरे's picture

23 Feb 2023 - 10:36 am | सुबोध खरे

उच्च स्थानावर असलेल्या केवळ कुणाचे आडनाव मराठी आहे म्हणून किंवा ते मराठी बोलतात म्हणून खूष व्हायचे काय कारण आहे?

भारतात मराठी असणारे आणि मराठी बोलणारे असून दळभद्री विचारांचे लोक कमी आहेत का?

असून अडचण आणि नसून खोळंबा सारखे हे लोक आहेत.

त्यांचा भारताला/ भारतीय जनतेला काहीही उपयोग नाही

उच्च स्थानावर असलेल्या केवळ कुणाचे आडनाव मराठी आहे म्हणून किंवा ते मराठी बोलतात म्हणून खूष व्हायचे काय कारण आहे?

माझा हा धागा काधण्यामागचा हेतू केवळ एक नोंद आणि आपल्या भाषिक माणसाने एका वेगळ्या समाजात जाऊन काहीतरी साध्य केले हे नमूद करणे एवढाच होता .. त्यात कौतुक करण्यासारखे काही नाही... असे का वाटते तुम्हस कोण जाणे ?
विशेष करून यातील पुराणिक आणि ठाणेदार ह्यांचा भारताशी आणि मराठी भाषेही संबंध दिसतो .. त्यांच्या मुलाखती नक्की बघाव्या

हा प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता.

हा अशा लोकांसाठी आहे जे केवळ भारतीय वंशाचे लोक उच्च पदी पोचले कि त्यांच्याबद्दल गहिवरून बोलतात त्यांच्यासाठी होता.

आपल्याला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता.

असे झाले असल्यास क्षमस्व

चौकस२१२'s picture

24 Feb 2023 - 4:56 am | चौकस२१२

भावना पोचल्या .. नो वरिज !