माझे शाळा अनुभव

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
10 Nov 2022 - 11:02 pm

माझे शाळेचे अनुभव खुप छान होते. शाळेच्या मुख्य मैदानात एखादा कार्यक्रम असायचा. कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणून बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून, कूलूप लावून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरूवातीलाच गेट जवळ पळत सुटायचा. पाचवी चे मूलं बारीक नी सडपातळ असल्याने गेट खालून निघून जायचे. पण मोठ्या मुलांना गेट वर चढून मग पलीकडे ऊडी मारावी लागायची. एकाच वेळी दहा लोक पलिकडे ऊडी मारायचे त्यांच्या मागे आणखी दहा वर चढत असायचे. बर्लीन ची भिंत ओलांडावी असे वातावरण असायचे. शंभर दिडशे मुलं एकदम गेट वर तुटून पडल्यामुळे यंत्रणा कोलमडायची. प्रचंड धुळ ऊडायची. गेट वरून पलीकडे ऊडी मारनार्यांकडे स्टेज वरील पाहुणे नाकाला रूमाल लावून पहात असायचे. दोन चार मास्तर लाठ्या काठ्या घेऊन त्या गर्दीत घुसायचे. खुप उडत असलेल्या धुळीत अंधाधूंद लाठीमार करायचे. पांढरे कपडे घातलेले मास्तर धुळीने काळे व्हायचे, गर्दीतून खोकलत बाहेर पडायचे. जे गेट क्राॅस करण्यात अयशस्वी झाले त्यांच्या वर प्रचंड लाठीचार्ज करून कार्यक्रमस्थळी बळजबरीने चांगले विचार एकवण्यासाठी बसवले जायचे. पाठ चोळत पुन्हा युध्दभूमीवर परतनारे मिळेल ती जागा पकडून बसायचे.
प्रमुख पाहुण्यांचं नेहमी एकच भाषण असायचं “हे जे गेट कुदुन पळाले ना. हे आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीत, यशस्वी हे समोर बसलेलेच होतील.” (जे गेट कूदण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत ते जीवनात काय डोंबलं यशस्वी होनार होते?)
ह्या सर्वात गेट कूदून पळनार्यांची काहीही चूकी नसायची. कारण ३ वाजता सुरू झालेला कार्यकर्म पाच वाजताच संपेल ह्याची काहीही शाश्वती नसायची. घ्यायला आलेल्या रिक्षा पाच वाजताच निघून जायच्या. प्रमूख पाहूना एकदा सूसाट सूटला तर तो सहापर्यंत देखील भाषणंच करत असायचा. विद्यार्र्थ्यांच्या गैरसोयीशी त्याला काही देणंघेणं नसायचं. रिक्षा गेली तर घरापर्यंत पायपीट करावी लागेल हे ओळखून मूलं जीवावर ऊदार होऊन गेट कूदायचे. चांगले विचार ऐकण्यापेक्षा पायपीट न होणे महत्वाचे आहे हा प्रॅक्टीकल विचार त्या मागे असायचा.

मी कधी हे करायचो नाही. कारण आम्ही हिस्ट्री शिटर होतो. दर पंधरा दिवस- महानाभरांत पोलिस स्टेशनला ( मुख्याध्यापक कॅबीन) भेट असायचीच. त्यामुळे जवळपास सर्व शिक्षक नावानीशी ओळखायचे. गेट कूदताना एखाद्या ओळखीच्या मास्तरने पाहीलं तर दुसर्या दिवशी प्रचंड धुलाई व्हायची. तसंच आमची वर्गशिक्षीका पाचशे मूलांच्या गर्दीत मी नाही हे परफेक्ट ओळखून दुसर्या दिवशी रपारप पाठीत फटके मारायची. शिक्षा डिस्ट्रीब्यूट व्हावी म्हणून गेट कूदताना एखादा वर्गमित्र दिसला असेल तर प्रामाणीकपणे त्याचं नाव सांगीतलं जायचं.
- अमरेंद्र बाहुबली.

इतिहास

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

12 Nov 2022 - 8:27 pm | सस्नेह

मजेशीर आठवणी !
हहपुवा :)

Trump's picture

12 Nov 2022 - 11:58 pm | Trump

कूदून = ओलांडुन.

कूदून हिंदी शब्द आहे.

कंजूस's picture

13 Nov 2022 - 5:52 am | कंजूस

अनुदानाच्या शाळेत अशी शैक्षणिक भाषणे ठेवावी लागतात. आपलं हीत कशात आहे हे ओळखणारी मुले गेट कुदतात.
मुलींचं काय होतं?

कूदून हा शब्द नागपूरची मराठी भाषा सहजपणे वापरु देते, पुणेरी बोली मधे हा शब्द गटात न बसणारा आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Nov 2022 - 9:26 am | ॲबसेंट माइंडेड ...

मजेशीर लेख.

Bhakti's picture

13 Nov 2022 - 11:34 am | Bhakti

हा हा! भारी!
अबा तूही आठवणी लिहिण्याच्या मंडळात सहभागी झालाय याबद्दल तुझं अभिनंदन करून पुढील लेखाची प्रतिक्षा करते :)

श्वेता व्यास's picture

14 Nov 2022 - 12:28 pm | श्वेता व्यास

गमतीशीर आठवणी आहेत. 'कूदून' हा नवीन शब्द समजला.

विवेकपटाईत's picture

14 Nov 2022 - 12:31 pm | विवेकपटाईत

वाचताना मजा आली. दिल्लीच्या नूतन मराठी शाळेत (शाळेत५ वी पर्यन्त मराठी विषय होता, पास होणे न होण्याने काही ही फरक पडत नव्हता ). हरणे मास्टर बहुधा वर्गात झोपायचे. मराठी शिकण्यात कुणालाच रस नसण्याने आम्ही मुले वर्गातच कंचे खेळत असू. आमचा नया बाजारचा ग्रुप शाळेची सुट्टी कधीच करत नसे आणि अभ्यास ही नाही. रोजची मारामारी ही ठरलेली. दीड वर्ष लहान भाऊ ' पुत्र व्हावा ऐसा गुंडा ... अशी ख्याति. भांडण झाल्यावर तो आणि त्याचे दोस्त दुसर्‍यांना मारायचे आणि मी अहिंसेवर विश्वास ठेवणारा नाजुक प्राणी मार खाण्याचे काम करायचो. मार खल्यावर लहान भाऊ मला उपदेशाचे डोज पाजायचा.