महाराष्ट्राचा राजकीय कीडा ग्रेट ब्रिटन ला ...!

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
21 Oct 2022 - 7:56 am

ग्रेट ब्रिटन मध्ये सत्ताधारी पक्षात परत उलथापालथ झाली आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला .. हे ऐकले असेलच
(हे पक्षांतर्गत आहे जसे नुकतेचं शिवसेनेत घडले तसे काहीसे )

अर्थात हा गोंधळ ग्रेट ब्रिटन सारखया परिपकव लोकशाही ला चांगला दिसत नाही हे खरे

महाराष्ट्राचा राजकीय कीडा ग्रेट ब्रिटन ला परत चावलेला दिसतोय ..

पण तेथील "अश्या परिस्थिती पक्षांतर्गत नवीन नेता निवडण्याची जी सरळ सोट पद्धत अस्तित्वात आहे" ती जर भारतीय राजकारणात आली तर उपयोगच होईल, असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते .( जगातील सर्वात मोठ्या लोकशाही चा मान ठेवून )

त्यासाठी भारतीय जनतेने कौटिम्बिक पक्ष निवडून देन्यपेक्षा कोणत्यातरी ततवाला धरून चालणाऱ्या पक्षहला निवडून द्यायला पाहिजे
या दृष्टीने मनोमनी अशी प्रार्थना करतो कि
१) काँग्रेस मधील घराणेशाही नष्ट व्हावी आणि काँग्रेस परत बलवान व्हावा
२) भाजपतील वाढती घराणेशाची ( स्थानिक पातळीवरील ) कमी व्हावी