दिवाळी अंक २०२२ - पाऊस

Primary tabs

प्रशांत's picture
प्रशांत in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:58 pm

कुठून आणू रोज पाऊस?
कुठून आणू आभाळ उसनं?
खूप जीवघेणं आहे हे
मी भिजताना तू सोबत नसणं.
भरलेल्या डोळ्यांसमोर
आभाळ असं काही बरसतं..
मी वाहून जाते संपूर्ण,
मग कुठे ओसरतं...
कसं जमतं तुला
असं थेंबासारखं
तुटन...
मला असं भिजवून
स्वतः कोरडं राहणं....

अलीकडे येतात ढग आठवणींचे
पण मी मात्र जाणूनबुजून बंद करते खिडक्या-दारं आतून...
कारण माहितीये वादळवार
नाही येत सांगून.
मग सावरते स्वतःलाच उद्ध्वस्त होण्यापासून..
कारण मी परवाच घर बांधलंय
जिथे सर्व काही आहे तुला सोडून..
पण विसरले नाहीये मी अजूनही ते पावसाळे.

पाणी अंगावर येतंय हे पाहून
तुझे सावध होणे....
मी तेव्हाच समजून घ्यायला हवं होतं....

इतक्यात पाऊस थांबला
का माहीत नाही....
अलीकडे पावसाचं काहीच वाटत नाही .....
कारण दडवून ठेवलाय मी माझ्या हृदयात एक पाऊस तुझी आठवण म्हणून....
जो भिजवतो कधी कधी मला एकटीलाच......
फार अवघड असतं
असं पापणीच्या कडांवरून पाणी ओघळू न देणं....
पण तूच सांग, कुठून आणू रोज पाऊस?
अन् कुठून आणू आभाळ उसनं.....

अनिता देशपांडे, पुणे.

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2022 - 12:35 pm | प्राची अश्विनी

सुरेख!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2022 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं पापणीच्या कडांवरून पाणी ओघळू न देणं....
पण तूच सांग, कुठून आणू रोज पाऊस?

अगदी खरंय...!

@ प्रशांतसेठ. कवितेत लेखिकेचं नाव टाकायचं राहीलंय. साहित्य संपादक नोंद घ्यावी.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 5:53 pm | मुक्त विहारि

हे आवडले

रंगीला रतन's picture

10 Nov 2022 - 3:34 pm | रंगीला रतन

अलीकडे येतात ढग आठवणींचे
पण मी मात्र जाणूनबुजून बंद करते खिडक्या-दारं आतून...
कारण माहितीये वादळवार
नाही येत सांगून.
मग सावरते स्वतःलाच उद्ध्वस्त होण्यापासून..
कारण मी परवाच घर बांधलंय
जिथे सर्व काही आहे तुला सोडून..
पण विसरले नाहीये मी अजूनही ते पावसाळे.

या ओळींसठी सलाम _/\_

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 5:58 pm | कर्नलतपस्वी

काहीच नशीबवान असतात
जे एकाच छत्रीत भिजतात
काही बिचारे,
आठवणी उशाला घेऊन.....
फक्त उसासे सोडतात.
😀