कुठून आणू रोज पाऊस?
कुठून आणू आभाळ उसनं?
खूप जीवघेणं आहे हे
मी भिजताना तू सोबत नसणं.
भरलेल्या डोळ्यांसमोर
आभाळ असं काही बरसतं..
मी वाहून जाते संपूर्ण,
मग कुठे ओसरतं...
कसं जमतं तुला
असं थेंबासारखं
तुटन...
मला असं भिजवून
स्वतः कोरडं राहणं....
अलीकडे येतात ढग आठवणींचे
पण मी मात्र जाणूनबुजून बंद करते खिडक्या-दारं आतून...
कारण माहितीये वादळवार
नाही येत सांगून.
मग सावरते स्वतःलाच उद्ध्वस्त होण्यापासून..
कारण मी परवाच घर बांधलंय
जिथे सर्व काही आहे तुला सोडून..
पण विसरले नाहीये मी अजूनही ते पावसाळे.
पाणी अंगावर येतंय हे पाहून
तुझे सावध होणे....
मी तेव्हाच समजून घ्यायला हवं होतं....
इतक्यात पाऊस थांबला
का माहीत नाही....
अलीकडे पावसाचं काहीच वाटत नाही .....
कारण दडवून ठेवलाय मी माझ्या हृदयात एक पाऊस तुझी आठवण म्हणून....
जो भिजवतो कधी कधी मला एकटीलाच......
फार अवघड असतं
असं पापणीच्या कडांवरून पाणी ओघळू न देणं....
पण तूच सांग, कुठून आणू रोज पाऊस?
अन् कुठून आणू आभाळ उसनं.....
अनिता देशपांडे, पुणे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
सुरेख!
खूप छान कविता.
In reply to सुरेख! by प्राची अश्विनी
पाऊस ही कविता खूप छान आहे.
छान...!
अगदी खरंय...!
@ प्रशांतसेठ. कवितेत लेखिकेचं नाव टाकायचं राहीलंय. साहित्य संपादक नोंद घ्यावी.
-दिलीप बिरुटे
कुठून आणू आभाळ उसनं.....
हे आवडले
अलीकडे येतात ढग आठवणींचे
अलीकडे येतात ढग आठवणींचेपण मी मात्र जाणूनबुजून बंद करते खिडक्या-दारं आतून...
कारण माहितीये वादळवार
नाही येत सांगून.
मग सावरते स्वतःलाच उद्ध्वस्त होण्यापासून..
कारण मी परवाच घर बांधलंय
जिथे सर्व काही आहे तुला सोडून..
पण विसरले नाहीये मी अजूनही ते पावसाळे.
या ओळींसठी सलाम _/\_
सुरेख
काहीच नशीबवान असतात
जे एकाच छत्रीत भिजतात
काही बिचारे,
आठवणी उशाला घेऊन.....
फक्त उसासे सोडतात.
😀
सुरेख कविता!!!
सुरेख कविता!!!

खूपच तरल
व भावूक करणारी कविता . आवडली.
कविता आवडली
एकदम तरल,
मस्त,
लिहित रहा
पैजारबुवा,