"वाचूनही कविता नच कळली
असे न माझे व्हावे
कोश कोणते यास्तव घरी मी
आणुनी ठेवावे?"
विचारले ऐसे मी कविला -
हसुनी खिन्न तो वदला,
"कविता माझी आजवरी का
कळली कोणाला?"
"शब्दांची आतशबाजी अन्
मोडजोड मी करितो -
जरा रेटुनी अर्थ त्यातूनी
शोधावा तो मिळतो.
जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित
ते ते मजला गमते
दुर्बोधाच्या गर्द सावलीत
कविता माझी रमते.
शब्द बुडबुडे केवळ असती
अर्थही अवघा भास
सत्य चिरंतन ऐस जाणुनी
शिणवू नको मेंदूस.
अर्थ जसा गवसेल तसा तो
ठोकुनी दे ना तूही
शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची
फिरवशील ना द्वाही?"
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 6:47 pm | कर्नलतपस्वी
जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित
ते ते मजला गमते
दुर्बोधाच्या गर्द सावलीत
कविता माझी रमते.
कविवर्य ग्रेस आठवले.
आपल्याला शब्दांशी चांगले खेळता येते.
सुदंर रचना.
6 Nov 2022 - 10:06 am | गणेशा
अप्रतिम
6 Nov 2022 - 3:53 pm | चौथा कोनाडा
दुर्बोधाची गर्द सावली ..
- छान. आवडल्या या ओळी.
अर्थ जसा गवसेल तसा तो
ठोकुनी दे ना तूही
शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची
फिरवशील ना द्वाही?"
हे आवाहन लक्षवेधीच ... नक्कीच अनंतयात्री
एकंदरीत छान कविता!
6 Nov 2022 - 4:01 pm | Bhakti
जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित
ते ते मजला गमते
सगळी कविताच क्लास आहे!
7 Nov 2022 - 12:36 pm | प्राची अश्विनी
क्या बात!
8 Nov 2022 - 7:48 pm | स्मिताके
छान कविता.
"शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची
फिरवशील ना द्वाही?"
हे मस्तच!
8 Nov 2022 - 8:19 pm | योगन
मस्तच.
8 Nov 2022 - 9:29 pm | सरिता बांदेकर
मस्त
10 Nov 2022 - 3:26 pm | रंगीला रतन
आवडली!!!
दुर्बोधाच्या गर्द सावलीत
कविता माझी रमते.
हे खास.