मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
21 Aug 2022 - 7:27 pm

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२
मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी.

ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला.

मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते.

मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे. डाळींबांच्या बागा, पेरू, द्राक्षांच्या बागा, ऊस व भाजीपाला यांची हिरवी शेते यामुळे पावसाळ्यात हा प्रदेश नयनरम्य दिसत होता.

मोहाडी गावातील खालील ठिकाणे पाहिली.

अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (जुनी बांधणीचे दुमजली लाकडी बांधकामातील मंदीर. रंगकाम सुरेख)

Board

गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर

मोहाडेश्वर मंदीर

अहिल्यादेवी बारव. पाण्याची बारव. बारकाईने पाहिल्यास शेंदूर लावलेल्या सात असरा (देवी) दिसतील. या असरा जेथे वस्ती करतात तेथे पाणी असतेच असते, कमी होत नाही असा समज आहे. निसर्गरम्य परिसर होता.

मोहाडमल्ल देवस्थान. मोहाडमल्ल देवस्थान. यांच्या नावाने आषाढ महिन्यात सोंगे (बोहाडा) निघतात.

सोमवंशी वाडा

त्यानंतर सह्याद्री फार्म कारखाना येथे गेलो. जेवणाची वेळ झाल्याने प्रथम कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये जेवण केले.
सह्याद्री फार्म हा शेतीमाल प्रोसेस करणारा कारखाना आहे. येथे फळे व भाज्या पॅकींग, कोल्ड स्टोरेज करणे, जॅम, जेली, सॉसेस बनवणे इत्यादी कामे चालतात.
पर्यटकांना बॅचेसमध्ये कारखाना दाखवला जातो. १५ ऑगस्ट असल्याने कारखान्यात वर्कर्स नव्हते. त्यामुळे वर्कींग पाहता आले नाही. इतर सर्व विभाग गॅलरीतून दाखवतात.

अतिशय प्रसन्न वातावरणात ऑफीस व फॅक्टरी परिसर आहे.

बर्ड आय व्ह्यू ऑफ सह्याद्री फार्म्स, मोहाडी.

श्री. विलास शिंदे यांनी मोठ्या प्रयत्नातून शेतकर्यांसाठी हे काम केले आहे.

सह्याद्री फार्म्स ऑफीस.

जॅम, जेली, सॉसेस, पॅकेज्ड फुड, प्रोसेस्ड फुड आदी शंभराच्या वर उत्पादने आहेत.

१५ ऑगस्ट, २०२२. जय हिंद,
- माझी मुलगी, स्वराली.

झेंडा आमचा उंच फडकतो
प्रगतीचे शिखर गाठतो

सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथील १५ ऑगस्टचा झेंडा.

मिपाकरांची भेट १५ ऑगस्ट २०२२, मोहाडी, सह्याद्री फार्म्स.
डावीकडून पिंगू, पाभे, सौ. पाभे, कु. स्वराली, सौ. पिंगू, सौ. पालकर, मयुरेश पालकर.

परिसर खूप मोठा आहे. सह्याद्री फार्मच्या कार्पोरेट कार्यालयापुढे अतिशय उंच उभारलेला १५ ऑगस्टचा झेंडा फडकत होता. पाऊस अधून मधून सुरूच होता.

तशाच वातावरणात पुन्हा नाशिकला प्रयाण झाले.

पुढील कट्टा असाच गर्दी नसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ठरवू या अन तेथे भेटूया.

हे ठिकाणइतिहाससमाजजीवनमानप्रवासभूगोलमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Aug 2022 - 8:05 pm | मुक्त विहारि

फोटो छान आले आहेत ..

पाषाणभेद's picture

21 Aug 2022 - 8:16 pm | पाषाणभेद

तुम्ही मीस केलात.

मुक्त विहारि's picture

22 Aug 2022 - 4:51 pm | मुक्त विहारि

चालायचेच...

कुमार१'s picture

21 Aug 2022 - 8:22 pm | कुमार१

सुंदर झालाय...

कंजूस's picture

21 Aug 2022 - 8:57 pm | कंजूस

भारी जागा आणि फोटो. पुण्याच्या कट्ट्यांना गेलोय पण नाशिक भागातल्या नाही.

कर्नलतपस्वी's picture

21 Aug 2022 - 9:34 pm | कर्नलतपस्वी

फोटो छान आहेत.

कट्टा होऊन सचित्र वृत्तांत पण आला!! मस्तच.
प्रचेतस, नाखु, चौको, गणेशा, प्रशांत आणि ईतर पिंचि मिपाकर कधी भेटायचे?

करुयात लवकरच. एखाद्या शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सर्वजण भेटूयात.

पाषाणभेद's picture

22 Aug 2022 - 12:43 pm | पाषाणभेद

@सौंदाळा, मिपाकरांत पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असे स्वतंत्र विभाग नाहीत. म्हणून मिपाकट्टा हा सर्वांचा असतो, असावा. सर्वांना आमंत्रित करावे.
तुम्ही शनिवारी ठरवा म्हणजे बाहेरच्यांना रविवारी जायला वेळ मिळेल.

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2022 - 5:41 pm | चौथा कोनाडा

नक्की भेटुयात सौंदाळा.
अभ्याशेठ ही येणार असेल तर त्याला कट्टा अध्यक्ष करता येइल ! 😊

फोटो आणि वृत्तांत आवडले. मिपा कट्टा होणे नेहमीच आनंददायक असते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Aug 2022 - 1:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

कट्टा मस्त झालेला दिसतोय. असेच मिपाकरांचे कट्टे होत राहोत आणि प्रचि/लेख येत राहोत हीच शुभेच्छा!!

अवांतर- पिंचि कट्ट्यामध्ये पुणेकरांना यायला अलाऊड आहे काय? :)

सर्व ठिकाणचे मिपाकर येऊ शकतात.

कंजूस's picture

23 Aug 2022 - 7:51 am | कंजूस

अचानक घुसतातही आणि भेटतात.

विवेकपटाईत's picture

22 Aug 2022 - 3:26 pm | विवेकपटाईत

मस्त. बाकी प्रोसेस्ड कृषि उत्पादनांवर जीएसटी कमी केली तरी त्यांची विक्री वाढेल आणि शेतकर्‍यांची कमाई ही.

पाषाणभेद's picture

22 Aug 2022 - 3:34 pm | पाषाणभेद

नारायणगाव, जुन्नर परिसर औमुंपुठाडोंना मध्यवर्ती आहे.
शनिवारी ठेवा. आम्ही जरूर येऊ.

फोटो आणि वृतांत दोन्ही आवडले.
फोटो पाहिल्यावर काही वर्षांपूर्वी मी पैठणला गेलो होतो, तिथे एकनाथ महाराजांचा वाडा, समाधी मंदीर पाहिले होते ते या निमित्त्याने आठवले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

टर्मीनेटर's picture

22 Aug 2022 - 6:24 pm | टर्मीनेटर

मस्त 👍

फोटो आणि वृतांत दोन्ही आवडले.

शाम भागवत's picture

24 Aug 2022 - 1:36 pm | शाम भागवत

छान!

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2022 - 1:28 pm | चौथा कोनाडा

झकास कट्टा, छान फोटू आणि वृत्तांत!
पाभे,पिंगू, पालेकर या मिपाकरांना आणि कुटुंबीयांना पाहून मस्त वाटले.
♥ ♥

सह्याद्री फार्मचा भव्य परिसर छाप सोडून जातो.
इकडं आलो तर भेट द्यावीच असे वाटण्या सारखे ठिकाण !
पाभे आणि इतर कट्टेकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!

सतिश गावडे's picture

25 Aug 2022 - 2:06 pm | सतिश गावडे

मुंबईकर पिंगू नाशिक कट्ट्याला कसा काय टपकला? :)

पर्णिका's picture

26 Aug 2022 - 1:41 am | पर्णिका

छान आहे पावसाळी भेट!
वृत्तांत आवडला, मला फोटो दिसत नाही.

खिलजि's picture

26 Aug 2022 - 7:06 pm | खिलजि

कट्टा छान झालाय. पाभे तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. बरं वाटलं