कुंडमळा, चिंचवड परिसर भटकंती आणि मिपाकराची चित्रे

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
14 Aug 2022 - 1:24 pm

कुंडमळा आणि चिंचवड परिसर.

कॅलक्यूलेटर यांनी दिलेला धागा पावसाळी भटकंती - कुंडमळा वाचून स्फूर्ती घेऊन लगेच ठरवलं की हे कुंडमळा ठिकाण पाहायचंच. जोडीला घोराडेश्वर लेणी डोंगरही करायचा. पण अचानक मिपाकर 'चौथा कोनाडा यांचेकडून कळलं की त्यांच्यासह आणखी चार चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन पु.ना.गाडगीळ कलादालन,( दुकानातच आत आहे )चाफेकर चौक,चिंचवडात १० ते १४ ओगस्टपर्यंत आहे. मग घोराडेश्वर रद्द करून कुंडमळा अधिक चिंचवड करू ठरवले. नेहमीप्रमाणे मुंबई - पुणे रेल्वेचे आरक्षण संपलेलंच. पावसाळ्यात रस्त्याने जाण्यापेक्षा रेल्वेने आरक्षणाशिवायही जाणे बरे.

कार्यक्रम
१)सकाळी मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसने लोणावळ्यापर्यंत (८:१०)अधिक लोणावळा -पुणे लोकलने बेगडेवाडी स्टेशन (९:००).
२) बेगडेवाडी स्टेशन ते कुंडमळा चालत निघालो. एका बाइकवाल्याने लिफ्ट दिल्याने वेळ वाचला.
३)फोटोशूट झटपट आणि २किमी अर्धा तास चालत परत.
४) १०:२०पुणे लोकलने चिंचवडास पावणे अकराला. मिपाकर चौथा कोनाडा यांना भेटून चिंचवड दर्शन - मोरया गोसावी मंदिर, शिवमंदिर, पुरोहितांसाठी पेशव्यांनी बाधून दिलेला वाडा, जुनी बाजारपेठ, पु.ना. गाडगीळ कलादालनातील चित्रे पाहून चिंचवड स्टेशनला परत.
५) लोणावळा लोकलने - लोणावळा - डेक्कन एक्सप्रेसने कल्याण.
परिसर रम्य आणि अडीचशे - पाचशे वर्षे मागे नेतो. पवना नदी दुथडी भरून वाहात होती.

विडिओ यादी (time duration ) data size
झटपट कुंडमळा फोटो स्लाइड शो.(00:00:30)12MB
https://youtube.com/shorts/3Qa7dPWyUHU

कुंडमळा विडिओ पहिला (00:01:58 )21 MB
https://youtu.be/F45mmSHfFtg

कुंडमळा विडिओ दुसरा (00:00:44) 34 MB
https://youtu.be/pWSIvkovWK4

कुंडमळा विडिओ तिसरा ( 00:03:34)51 MB
https://youtu.be/1dQxbiKZoWo

कलादालन फोटो स्लाईड शो (00:01:40)27MB
https://youtu.be/25pddONU3iE

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2022 - 1:54 pm | कर्नलतपस्वी

व्हीडीओ छानच आहेत. चित्र प्रदर्शना बद्दल आगोदर कळाले आसते तर भेट दिली असती.चित्रे सुदंरच आहेत.
चोथा कोनाड्याचा पाचवा कोना कळाला.

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2022 - 6:13 pm | चौथा कोनाडा

कंजूस सर, भारी कुंडमळा भटकंती. खळाळ पाण्याचे सर्व व्हिडिओज झकासच !
इतके दिवस व्यनीने भेट व्हायची काल प्रत्यक्ष भेटीचा योग आला, छान वाटलं! आवर्जून चित्र प्रदर्शन पाहायला आलात त्याबद्दल मनापासून थँक्यू! तुमच्या सानिध्यात तीन साडेतीन तास कसे गेले ते समजलेही नाही! मंगलमूर्ती वाड्यात लाकडी कोरीवनक्षीकाम, हंड्या झुंबरे हे पाहताना आपभान विसरून गेलात याचे कौतुक वाटले. माझीही आपणा सोबत बऱ्याच दिवसांनी नगर फेरी झाली.
असेच अनौपचारिकपणाने भेटत राहू !

थँक्यू कंजूस सर!

प्रचेतस's picture

14 Aug 2022 - 8:30 pm | प्रचेतस

सुरेख छोटेखानी भटकंती.
कुंडमळा अतिशय धोकादायक आहे, वाहत्या पाण्यात तिथल्या खड्डयांचा अंदाज अजिबातच येत नाही.
चौथा कोनाडा यांची चित्रे फार आवडली. वाडा तर सुंदरच आहे.
नेमके ऑफिस असल्यामुळे यायला जमले नाही.
वाड्याच्या जवळच ग्रामदैवत भैरवनाथ आहे. भैरवाची मूर्ती प्रेक्षणीय आहे.

सतिश गावडे's picture

14 Aug 2022 - 8:35 pm | सतिश गावडे

सुरेख छोटेखानी भटकंती.

हेच म्हणतो... आधी माहिती असते तर (कदाचित) आलो असतो. :)

चौथा कोनाडा's picture

16 Aug 2022 - 7:52 am | चौथा कोनाडा

धन्यवाद प्रचेतस.

हो, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात देखिल गेलो होतो, तेव्हा कंजूस सरांनी कल्याण मधील अशाच वाड्यांविषयी सांगितलेली महिती ऐकण्यासारखी होती.

टर्मीनेटर's picture

15 Aug 2022 - 11:16 am | टर्मीनेटर

छोटेखानी भटकंती आवडली 👍
सगळे व्हिडीओज पाहिले. पाण्याचा फोर्स चांगलाच जाणवतोय.

चौथा कोनाडा ह्यांचा 'दा विंची' पैलू नव्यानेच समजला! चित्रे फार सुंदर आहेत, व्हिडीओतली सगळी चित्रे त्यांनीच काढलेली आहेत का?

शारजाचा मित्र सध्या घरी आला आहे, त्याला पावसाळ्यातले सह्याद्रीचे सौन्दर्य दाखवायला परवा आम्हीही एक छोटेखांनी भटकंती केली. आम्ही तीन मित्र, एका मित्राचा मुलगा आणी माझा भाचा असे पाच जण होतो. पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी जायचे आता टाळतो त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून आमचे फेव्हरीट ठिकाण झालेल्या पेण तालुक्यातील बोरगाव-व्याघरेश्वर रस्त्यावरच्या 'विराणी' गावाजवळच्या परिसरात पोचलो. इथे नदी नाही, मोठे धबधबे नाहीत की जलाशय नाही. फक्त भरपूर सारी हिरवळ, छोटे छोटे झरे आणी अडीच-तीन हजार फूट उंचीवरून दिसणारी धरमतर खाडी, JSW कंपनीची जेट्टी, रात्रीच्या वेळी रोषणाई केल्यासारखे दिसणारे JNPT आणी नवी मुंबई परिसरातले लाईट्स अशी विहंगम दृष्ये, थंड वारा आणी भिजायला पाऊस!
पर्यटकांची अजिबात गर्दी नसल्याने मस्तपैकी प्रायव्हसी मिळते आणी खावून-पिऊन मजाही करता येते.
वेगळा धागा काढण्यासारखी ही भटकंती नाही, त्यामुळे इथेच काही फोटोज आणी एक व्हिडीओ देतोय 😀

1
.
2
.
3
.
4
.
5
.
6
.
भाचा आणी मित्राच्या मुलाची स्पोर्ट्स कारचे थोडे कर्तब बघण्याची इच्छाही मित्राने पूर्ण केली त्याचा एक छोटा व्हिडीओ खाली देत आहे.

ता. क. चौथा कोनाडा साहेब तुमचे अभिनंदन आणी पुन्हा तुमच्या चित्रांचे प्रदर्शन असेल तेव्हा कळवा, बघायला आवडेल!

मुक्त विहारि's picture

15 Aug 2022 - 12:25 pm | मुक्त विहारि

F And F

वाह! सुंदर छायाचित्रे
संजयभाऊ छान स्टंट,पण कार कोण चालवतय?

टर्मीनेटर's picture

17 Aug 2022 - 7:02 pm | टर्मीनेटर

@ भक्ती
कार चालवणारा 'राहील' नावाचा माझा मित्र आहे,

चौथा कोनाडा's picture

26 Aug 2022 - 5:43 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, टर्मीनेटर !

व्वा, टर्मीनेटर .... एक नंबर भटकंती !
हिरवे कंच प्रचि पाहून भारी वाटले !

स्पोर्ट्स कारचे थोडे कर्तब व्हिडिओ जबराट आहे !

मुक्त विहारि's picture

15 Aug 2022 - 12:26 pm | मुक्त विहारि

वाखूसा

आणि मोटरची गंमत.

सौंदाळा's picture

15 Aug 2022 - 1:54 pm | सौंदाळा

मस्तच कंजूस काका
चौको यांची चित्रे पण सही.

मुक्त विहारि's picture

15 Aug 2022 - 8:49 pm | मुक्त विहारि

+1

विंजिनेर's picture

15 Aug 2022 - 9:46 pm | विंजिनेर

सगळी चित्रे सुरेख! सुरवातीची काही चित्रं पाहून मिलिंद मुळीकांच्या शैलीची हटकून आठवण झाली - तुम्ही त्यांचे शिष्य आहात काय?

चित्रे छान आहेत, मिलिंद मुळीक यांच्या चित्रांची आठवण झाली.

चौको काकांची छान चित्रे जुने पुणे दिसतेय त्यात, मस्त!

कंजूस's picture

16 Aug 2022 - 9:14 am | कंजूस

चार चित्रकारांची तैलरंग, अक्रिलिक ओपेक आणि जलरंग या तीन प्रकारांत चित्रे होती. चौथा कोनाडा यांची जलरंगातली होती. हे अवघड माध्यम आहे. काम उत्स्फूर्तपणे भराभर एका हातकागदावर करावे लागते. चुकल्यास दुरुस्ती करता येत नाही. ( अक्रिलिक ओपेक रंगात ती करता येते.) जलरंग चित्रांत एक तरतरीतपणा असतो. त्यांची pen and ink प्रकारातली रेखाटनेही पाहिली. सध्या पूर्णवेळ या क्षेत्रांत स्वतंत्रपणे काम करतात.

चांदणे संदीप's picture

16 Aug 2022 - 10:34 am | चांदणे संदीप

कंजूसकाका छान भटकंती. कुंडमळा येथे सारखेच जात असतो. पावसाळ्यात मात्र धोकादायक असते हे ठिकाण. त्या मंदिरामागच्या बंधार्‍यावरून अतिशय रिस्क घेऊन कारवाले, बाईकवाले ये जा करत असतात.

चौथा कोनाडा यांची चित्रे सुरेख. प्रदर्शनाबद्दल माहिती असते तर नक्की आलो असतो.

सं - दी - प

कॅलक्यूलेटर's picture

16 Aug 2022 - 12:12 pm | कॅलक्यूलेटर

वा! वा सुरेख फोटो आणि विडिओ. चौ को साहेबांची चित्रे तर एकदम मस्त. पाण्याचा प्रवाह वाढलेला दिसतोय . आम्ही गेलो तेव्हा पूल बंद केला होता.

jo_s's picture

16 Aug 2022 - 8:50 pm | jo_s

वा, छानच भटकंती
चौथा कोनाडा चित्र भारी आहेत.

चौथा कोनाडा's picture

17 Aug 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा

कंजूस सरांनी नमुद केलेल्या कलादालन या व्हिडीउत्तम प्रतिसादओतील शेवटची १५ चित्रे (काळ्या कार्डबोर्डवरची) मी काढलेली आहेत. आधीची फ्रेम केलेली चित्रे कलाकार धिरज दिक्षित (पिंपरी) यांची आहेत. रसिकांनी प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिला.
🙏
चित्रं आवडल्याचे आवर्जून सांगणारे प्रचेतस, टर्मीनेटर, सौंदाळा, मुक्त विहारि, विंजिनेर, मनोभक्ती, चांदणे संदीप, जो_एस, आणि अर्थातच कंजुस सर आपणा सर्वांचे मनापासून आभार ! 🙏

राघव's picture

18 Aug 2022 - 5:43 pm | राघव

कंकाका, भारी विडीओज आहेत. तुम्ही सुद्धा चित्रे काढता काय?

चौको: मी वाकडलाच असतो. प्रदर्शनाबद्दल माहित नव्हते. पुढच्या वेळेस मिपावर माहिती टाकावी. नक्की येऊ! :-)

कंजूस's picture

18 Aug 2022 - 8:38 pm | कंजूस

पण मला चित्रं आणि फोटो प्रदर्शनं पाहायला आवडतात. जहांगिरला जाऊन १९७५- ८५ बरीच पाहिली.

चौथा कोनाडा यांनी अन्वर हुसेनचा लेख टाकला होता त्यातून मला त्यांच्या चित्रकारीची ओळख झाली. आमच्या
गप्पा झाल्या. चिंचवडकरांचा एक संस्कारभारती नावाचा हौशी गट आहे. त्यातून निरनिराळे कार्यक्रम आयोजित होतात हे कळले. त्या गटात सामील होऊन तुम्हाला कार्यक्रम समजतील. मागच्या महिन्यात एका चित्रकारास बोलावले होते चिंचवडात. त्याने एक चित्रकारीचे प्रात्यक्षिक सादर केले होते. त्यातील काही फोटो देत आहे. मी गेलो नव्हतो तेव्हा पण तुम्ही किंवा कोणी चिंचवडच्या आसपास राहातात त्यांना आनंद घेता येईल.
फोटो
पाहुणा चित्रकार प्रात्यक्षिक दाखवताना

फोटो
तयार चित्रासह

फोटो
काढलेले चित्र

फोटो
उपस्थित रसिकांसह . मिपाकर चौथा कोनाडा सर्वात उजवीकडे उभे.

राघव's picture

18 Aug 2022 - 10:52 pm | राघव

फारच सुंदर! सामिल व्हायला नक्कीच आवडेल! _/\_
संस्कारभारतीच्या गृपबद्दल माहिती असल्यास कळवावे.

चौथा कोनाडा's picture

26 Aug 2022 - 5:45 pm | चौथा कोनाडा

मस्त व्हिडीओ आहेत चेतनजी !
... मोठ्या पावसाच्या आधीचे असावेत ..... पात्रातील रांजण खळगे सुंदर दिसताहेत !

चौथा कोनाडा's picture

26 Aug 2022 - 5:56 pm | चौथा कोनाडा

प्रचेतस म्हणतात तसे

कुंडमळा अतिशय धोकादायक आहे, वाहत्या पाण्यात तिथल्या खड्डयांचा अंदाज अजिबातच येत नाही.

अगदी .... .. कालच कुंडमळा येथे एक युवक वाहून गेला, त्याला वाचवणार्‍या मित्राला मात्र वाचवण्यात यश आले.

https://www.lokmat.com/pune/a-young-man-who-jumped-into-the-water-to-sav...

अति-पावसात कुंडमळा येथे जाणे शक्यतो टाळावे, गेल्यास पात्रात, खडकावर उतरू नये, दुरुनच सौंदर्य अनुभवावे !

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Aug 2022 - 7:00 pm | चेतन सुभाष गुगळे

दुरुनच सौंदर्य अनुभवावे !

ही सूचना बर्‍याच ठिकाणी लागू होते.