पुस्तक परिचय लिहिताना

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in काथ्याकूट
29 Jul 2022 - 12:17 am
गाभा: 

नमस्कार.
मागच्या काही महिन्यात एक मराठी पुस्तक वाचण्यात आलं. त्यावर पुस्तक परिचय इथे मिपावर लिहावा असं मनात आहे. पूर्वी कधीही पुस्तक परिचय लिहिलेला नाही.

परिचय लिहिताना पुस्तकातील किती संदर्भ आपण जसेच्या तसे लेखात देऊ शकतो?
उदाहरणार्थ, पुस्तकाचा ५% भाग लेखात आला तर त्यासाठी प्रकाशकांची/लेखकांची परवानगी घ्यावी लागते का?

अनुभवी मिपाकर मार्गदर्शन करतील यात शंका नाही.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2022 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

लिहिण्याच्या आधी इथे मिपावरच पुस्तक परिचयाचे अनेक उत्तम लेख प्रसिध्द झाले आहेत ते वाचा. तुम्ही वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचा परिचय सापडतो आहे का ते पहा आणि त्याचाच अभ्यास करा. त्यातुन तुम्हाला तुमच्या बर्याच प्रश्णांची उत्तरे मिळतील.

पुस्तकाच्या ५% भाग प्रकाशित करणे म्हणजे फारच जास्त वाटते आहे.

तसेही पुस्तक परिचय म्हणजे त्यातले उतारेच्या उतारे कॉपी पेस्ट करणे नाही. पुस्तकात काय लिहिले आहे हे समजले तर ते कोणी वाचायलाच जाणार नाही. पुस्तक परिचयाचा उद्देश वाचकाची उत्सुकता चाळवणे हा असावा. खरेतर परिचयात पुस्तकातली वाक्ये टाळावीच, अगदी गरज असेल तरच त्या पुस्तकातले एखाद दुसरे महत्वाचे वाक्य परिचयात चालून जाउ शकते.

पुस्तकाचा साधारण विषय, त्याची बलस्थाने, ते पुस्तक तुम्हाला का आवडले किंवा का नाही आवडले याची कारणे इत्यादीचा समावेश परिचयात असावा, जेणेकरुन ते पुस्तक वाचण्याकरता वाचक उद्युक्त झाला पाहिजे. किंवा ते पुस्तक वाचणे का टाळावे हे त्याला समजले पाहिजे.

पुस्तकाचा कोणताही भाग पुन्हा प्रकाशित करण्यासाठी लेखकाची / प्रकाशकाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे अशा स्वरुपाची सुचना सहसा सर्व पुस्तकांवर पहायला मिळते. त्यातही हे ५% नक्की बसणार नाही.

रच्याकने :- मी या पूर्वी कधिही पुस्तक परियच लिहिलेला नाही, फुकट सल्ले द्याची हौस असल्याने हा प्रतिसाद लिहिला आहे, त्यामुळे माझे कोणतेही मत पटले नाही तर बिनधास्त फाट्यावर मारावे.

बाकी मिपावरचे जाणकार लोक योग्य त्या सुचना देतीलच

पैजारबुवा,

म्हणजे ते पुस्तक कोणत्या विषयावर आहे आणि ती कादंबरी आहे का इतिहास वगैरे. नंतर लेखकाचा याबद्दल संबंध काय? अनुभवावर आधारित आहे का भाषांतर का काल्पनिक. नंतर त्याचा उद्देश करमणूक/ माहिती/ निबंध/स्फुट आहे.
एवढं कळल्यावरच वाचक तिकडे वळतील. तर वाचकांना आनंद/ माहिती देण्यात लेखक किती यशस्वी झाला आहे याबद्दल तुमचे मत.

श्रीगणेशा's picture

29 Jul 2022 - 2:24 pm | श्रीगणेशा

धन्यवाद पैजारबुवा, कंजूस!
लिहिताना निश्चितच उपयोग होईल आपण दिलेल्या सल्ल्याचा.

पुस्तकाचा कोणताही भाग पुन्हा प्रकाशित करण्यासाठी लेखकाची / प्रकाशकाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे अशा स्वरुपाची सुचना सहसा सर्व पुस्तकांवर पहायला मिळते. त्यातही हे ५% नक्की बसणार नाही.

हीच शंका होती!

कर्नलतपस्वी's picture

29 Jul 2022 - 4:51 pm | कर्नलतपस्वी

पैजारबुवा,कंजुस सटीक प्रतीसाद.

सध्या मी आशोक समेळांचे"मी अश्वथामा चिरंजीव" वाचतोय. ते वाचताना मला प्रकर्षाने जाणवले की आपण सगळेच अश्वथामे आहोत.
https://www.misalpav.com/node/50427/backlinks

वाचलेल्या पुस्तकाबद्दल उत्कटतेने काय वाटले ते लिहा. समीक्षा आणी परिचय दोन वेगळे आयाम आहेत आसे मला वाटते.

श्रीगणेशा's picture

30 Jul 2022 - 8:31 am | श्रीगणेशा

धन्यवाद कर्नल साहेब.
फक्त परिचय किंवा समीक्षा यापलीकडे जाऊन पुस्तकातील विचारच आपलासा वाटू शकतो. पण दुसऱ्यांनी लिहिलेलं किती घ्यावं याचं भान मात्र ठेवायला हवं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 11:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला एखादी बाई आवडते, म्हणजे सुंदर वाटते. आपल्याला ती सुंदर का वाटते. तर, तीचे डोळे आपल्याला आवडतात. तिचं बोलणं आपल्याला आवडतं. तिचे नाजुक मुलायम बोटे आवडतात. तिची उंची, तिचं व्यक्तीमत्व, तिचे गाल, ओठ, नाक हेही सुंदर असतात, तिचा बांधा...शारिरीक ठेवण. परिधान केलेला ड्रेस, साडी अशी ती सुंदर असते. म्हणजे आपल्याला सारखं तिला बघावे वाटतं. आणि आपण काय सुंदर होती यार ती बाई, असे जेव्हा एखाद्याला सांगतो तेव्हा तीची ओळख सांगतांना आपण काहीच मोजक्या आणि महत्वाच्याच गोष्टी सांगतो. तसेच... (च्यायला, मिपाकरांना कसे कसे समजून सांगावे लागते मला)

पुस्तकाची ओळख करुन देतांना सुरुवातीला पुस्तक, पुस्तक लेखक, प्रसिद्ध लेखक असेल तर त्याची माहिती त्यांची पुस्तके, त्यांच्या इतर पुस्तकातील विषय आणि मग या नवीन पुस्तकाकडे वळायचे. त्यातील विषयाची, कथानकाची ओळख थोडक्यात करुन दिली पाहिजे. कथा विषयाची मांडणी लेखकाने कशी करुन दिली आहे, त्याबद्दल थोडक्यात लिहायचे. भाषाशैली कशी आहे, त्याचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो, आपल्याला ते कथानक का आवडले, वेगळे का वाटते त्यातला कोणता भाग विशेष आवडला. इत्यादि स्पष्ट करुन लिहिलं पाहिजे. पुस्तकातील ओळीच्या ओळी लिहिणे टाळलं पाहिजे. लिहिल्याच तर त्याखाली संदर्भ पृ.क्र. अमुक अमुकवर असे म्हटले आहे. असे स्पष्ट करुन सांगावे. आपल्याला त्या पुस्तकाबद्द्ल वाचकांना ओळख करुन द्यायची आहे, आपण पुस्तकाची ओळख करुन दिल्यावर वाचकाला पुस्तक वाचले पाहिजे किंवा आता ते पुस्त्क वाचले नाही तरी चालेल अशा निर्णायक वळणावर वाचकाला घेऊन गेले पाहिजे. असे वाटते.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jul 2022 - 11:48 am | ज्ञानोबाचे पैजार

आपल्याला एखादी बाई आवडते, म्हणजे सुंदर वाटते

या उदाहरणामुळे माझ्या सारख्या नवोदितांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

कारण "आपल्याला बॉ सगळ्याच बायका आवडतात म्हणजे सुंदर वाटतात". हाच न्याय जर पुस्तकांना लावायचा तर परिक्षण लिहीणेच अवघड होउन जाईल

जरा सोपे उदाहरण द्या,

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>"आपल्याला बॉ सगळ्याच बायका आवडतात म्हणजे सुंदर वाटतात"

असं नसतं. (असं माझं व्यक्तिगत मत आहे ) काही स्त्रिया विलक्षण सुंदर असतात. काही केवळ सुंदर असतात. काही कमी सुंदर, काही केवळ नीट-नेटक्या असतात. आपण हा जो काही फरक करतो त्यात प्रत्येकाची एक दृष्टी आहे, व्यक्तीपरत्वे आवडी निवडी असतात. काहींना मध्यम लठ्ठ सुंदर स्त्रीया आवडतात, काहींना सडपातळ. काहींना गो-या, काहींना सावळ्या, काहींना अगदी काळा रंग असलेल्याही स्त्रीयाही आवडतात.

आज हजारो पुस्तके बाजारात असतात आपल्याला काहीच मोजकी आवडतात, तसंच काहीसं. एखादे पुस्तक का आवडले, तेच तर पुस्तक ओळख सांगतांना आपण सांगत असतो. एखादे पुस्तक विशेष वेगळे वाटत असते इतकाच माझा मुद्दा उदाहरण सांगतांना होते. कदाचित उदा. सांगतांना माझा मुद्दा नीटही आलाही नसेल, मान्य. थांबतो. :) _/\_

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

30 Jul 2022 - 10:59 pm | कानडाऊ योगेशु

ह्यावर कै.तात्यांचे ट्रेडमार्क वाक्य होते. "ही आमची अनुष्का.हिच्यावर आमचा फार जीव"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2022 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय, तात्या गेला आणि मिपावरील काही प्रतिसादातला जीवतंपणा गेला.

आता केवळ आठवणी.

-दिलीप बिरुटे

उत्तम मुद्देसूद प्रतिसाद प्राडॉसर. मान गये, आपकी पारखी नजर और..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं प्रोत्साहन हेच मोडकं-तोडकं लिहिण्याचे बळ आहे, कायम असाच पाठीवर हात राहु देत. आभार.

-दिलीप बिरुटे
(नम्र)

हा आपला विनय आहे. आपण आम्हास लक्षात ठेवून नावाने संबोधिलेत इतके यश आम्हाला रग्गड आहे. एरवी वटवृक्षाच्या छायेखाली अनेक पांथस्थ येतात. वटवृक्षास त्याचे काय होय?

प्रचेतस's picture

30 Jul 2022 - 1:53 pm | प्रचेतस

तुमच्यासारख्या सालस, सभ्य, निगर्वी, अजातशत्रू पांथस्थ आल्यावर त्या महारुखालाही तुमचे कौतुक करावेसे वाटले असल्यास नवल नाही.

कवर घालून ठेवायचे का नाही?

वामन देशमुख's picture

2 Aug 2022 - 3:22 pm | वामन देशमुख

पण मग असे पुस्तक विकत घेऊन कवर घालून ठेवायचे का नाही?

प्रा डॉ नी सुरु केलेल्या चर्चेतसंदर्भात हे वाक्य वाचून मनाचा गोंधळ उडाला.

बाकी पुस्तकांना कवरे घालण्यापेक्षा ती काढून त्या पुस्तकाचा आस्वाद घेणे महत्वाचे की कसे वगैरे...

http://misalpav.com/node/28169

त्याचे परिक्षण लिहीतांना, लेखकाची परवानगी आणि त्यानेच पाठवलेला थोडासा भाग, इथे दिला होता...

बाय द वे, लेखकाची अथवा लेखिकेची परवानगी घेऊन, बिंधास्त परिक्षण लिहा.... तुमच्या मताशी, तुम्ही ठाम रहा

वर दिलीप बिरुटे सरांनी पुस्तक आणि बाई यांची तुलना केली आहे तीच मुळात अस्थानी आहे असे वाटते. शिवाय त्यातून एका जिवंत व्यक्तीमत्त्वाची तुलना आपण एका वस्तूशी करतो आहोत हा दोष देखील आपल्या माथी येतो.

व्यक्तीसापेक्ष आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात मग ती स्त्री असो वा पुस्तक मात्र पुस्तकाच्या परीक्षणाबाबत हे उदाहरण संयुक्तिक वाटत नाही.
माझा महाविद्यालयीन जीवनात एक मित्र होता. त्याला कोणतीही मुलगी आवडत असे, सुंदर वाटत असे मात्र आम्हा बाकी मित्रांना तसे अजिबात वाटत नसे. तो नेहमी म्हणायचा की 'अरे लोकाच्या लेकराला नाव ठेऊ नये'. त्या वयात आम्ही त्याची संभावना एका शेलक्या वाक्प्रचाराने करत असू मात्र आता जीवनाच्या पुढील टप्प्यावर आल्यावर त्याचे 'अरे लोकाच्या लेकराला नाव ठेऊ नये'. हे वाक्य कायम लक्षात बसले.

पुस्तके आपण हातात घेतो, मुखपृष्ठ, मलपृष्ठ बघतो, आतील पाने चाळतो, मजकूरावरुन नजर फिरवितो, जमल्यास पुस्तक विकत घेऊन पुर्ण वाचतो आणि मगच त्या विषयी मत बनवितो.
आपल्याला आवडलेल्या व्यक्तीचा आपण एवढा डिटेल्ड अ‍ॅनालिसीस करतो काय ? किंबहुना आपणास तशी संधी प्राप्त होते काय ?
"खत का मजमून भांप लेते हैं लिफाफा देख कर" असे म्हणणार्‍यांना एकच सांगावेसे वाटते की बाबांनो “पुस्तक का कवर देखकर पुस्तक के बारे में फैसला ना करें”
असो.

गणेशा यांना :

उदाहरणार्थ, पुस्तकाचा ५% भाग लेखात आला तर त्यासाठी प्रकाशकांची/लेखकांची परवानगी घ्यावी लागते का?

तांत्रिक बाबींची माहिती नाही पुस्तकातील भाग जसाच्या तसा प्रकाशित करण्यास काही अर्थ नाही. हे म्हणजे ट्रेलर दाखवून चित्रपट बघण्याचे आमिष देण्यासारखे झाले. अर्थात आज काल ट्रेलर मधे दाखविलेले भाग कधी कधी मुळ चित्रपटात देखील नसतात म्हणा. पुस्तकात काय म्हटले आहे हे थोडक्यात तुमच्या स्वतःचा शब्दात मांडा. मुळ पुस्तकातील उतारे वाचून नाही तर तुम्ही लिहिलेला परिचय वाचून वाचकाला पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. तुम्ही पुस्तकाचा परिचय लिहिण्याआधीच इथे चर्चा घडवून आणली याअर्थी ते पुस्तक तुम्हाला भावलेले असणार यात शंका नाही कारण नावडत्या पुस्तकाची समिक्षा लिहिण्यासाठी कोणी इतका विचार करणार नाही. तुम्ही व्यवसायाने टीकाकार नाही असे मी गृहित धरतो.
तुम्ही नक्की लिहा. एकदा लिहिले की नक्कीच उपयुक्त सुचना देणारे पुढे येतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>दिलीप बिरुटे सरांनी पुस्तक आणि बाई यांची तुलना केली आहे तीच मुळात अस्थानी आहे असे वाटते. शिवाय त्यातून एका जिवंत व्यक्तीमत्त्वाची तुलना आपण एका वस्तूशी करतो आहोत हा दोष देखील आपल्या माथी येतो.
बरं...!

>>>>व्यक्तीसापेक्ष आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात मग ती स्त्री असो वा पुस्तक मात्र पुस्तकाच्या परीक्षणाबाबत हे उदाहरण संयुक्तिक वाटत नाही.
बरं...!

बाकी, आपल्या मतांचा आदर आहे.

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा's picture

30 Jul 2022 - 8:48 pm | श्रीगणेशा

धन्यवाद प्रा. डॉ. सर.
तुमची समजावण्याची पद्धत, उपमा, हलकी-फुलकी वाटली.
प्रतिक्रिया पाहून तर चर्चा भरकटते की काय असंही वाटलं क्षणभर.
असे आत्मीयतेने शिकविणारे प्राध्यापक दुर्मिळ :-)

(थोडं साहस करून लिहीत आहे, हलके घेणे _/\_)

श्रीगणेशा's picture

30 Jul 2022 - 8:59 pm | श्रीगणेशा

धन्यवाद धर्मराजमुटके सर, तुमच्या संतुलित प्रतिक्रियेसाठी _/\_
पुस्तक परिचय लिहिताना सर्वस्वी त्र्ययस्थ म्हणून लिहिणं, तेही ज्या पुस्तकावर लिहीत आहे त्यातील कोणतंही लिखाण न घेता, थोडंसं अवघड वाटलं.
पुस्तक परिचय प्रथमच लिहीत आहे.

पण येथील चर्चेतून काही गोष्टी घेत, पुस्तक परिचय बराचसा संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे.
चर्चेत सहभागी असलेल्या सर्वांचे आभार _/\_

श्रीगणेशा's picture

30 Jul 2022 - 10:23 pm | श्रीगणेशा

सुरुवात केली आहे पुस्तक परिचय लिहायला, एका लेखमालेच्या स्वरूपात:
पुस्तक परिचय: मनात -- भाग १

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 9:53 am | श्रीगणेशा

लेखकांशी (अच्युत गोडबोले) ईमेलवर विचारणा केली परवानगीसाठी. त्यांनी काहीही हरकत नाही असं कळवलं, पण त्यांनी प्रकाशकांकडून परवानगी घ्यायला सूचना केली.
प्रकाशकांना ईमेल पाठविला आहे, त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे. काही दिवस वाट पाहून प्रकाशकांना फोनवर संपर्क करण्याचं नियोजन आहे.