ऑफलाईन मराठी टायपिंग कसे करावे?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in तंत्रजगत
7 Jul 2022 - 4:21 pm

संदर्भ: उपाशी बोका यांचा धागा: http://misalpav.com/node/49825

ऑफलाईन मराठी टायपींगसाठी अनेक पद्धती आहेत. उपाशी बोकाने वर सांगितल्याप्रमाणे मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे. वरील धाग्यात बोकाने कळफलकचा कोड बदल केला असावा असे दिसते. मराठीबोला.कॉम च्या वेळी मराठी टायपींगसाठी मला असले अनेक प्रकार करावे लागले होते.

तर मंडळी, मी त्यातल्या त्यात ऑफलाईन टाईप करण्यासाठी दोन सोप्या पद्धती कोणत्या ते आपण पाहू.

तिसरी पद्धत ही मोबाईलवर टायपिंग करणे हे गमभनच्या जवळपास जाणारी प्रणाली आहे. त्यात "मराठी- अक्षरांतरण" हा कळफलक निवडल्यास तुम्ही मोबाईलमध्ये गमभनसारखे टाईप करू शकाल. फक्त अर्धा "र" म्हणजे वा"-या"ने सारखी अचूकता ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी इग्नोर मारावे. (किंवा तो अर्धा र दुसरीकडून कॉपी पेस्ट करावा.)

पद्धत १)
खाली दिलेला html कोड हा 1234.html या फाईलमध्ये सेव्ह करावा. त्यानंतर या फाईलला क्लिक करा. हि फाईल ब्राऊजरमध्ये ओपन होईल. त्यानंतर ब्राऊजरमध्ये एक टायपींग करायचा रिकामा बॉक्स दिसेल व त्याच्या वरती "type with:gamabhana fontfreedom Inscript Google" असे दिसेल. त्यातील "gamabhana" वर क्लिक करा. त्याचेनंतर
gamabhana गॅजेट लोडेड असा मेसेज येईल व रिकामा टेक्स्ट बॉक्सच्या कडा लाल होतील. मग तुम्ही त्यात नेहमीच्या गमभन किबोर्ड सारखे टायपींगसारखे टाईप करू शकाल.

<html>
<head>

<script src="http://www.gamabhana.com/gamabhanaWidget/add/?mode=all&c=&lang=0" ></script>

<title>type with:gamabhana</title>
</head>
<body>
<textarea rows="4" cols="50" style="background-color:gainsboro;">

</textarea>
</body>
</html>

यात तुम्ही ब्राऊजरमध्ये मराठी टाईप करू शकतात व ते कॉपी करून एखाद्या फाईलमध्ये सेव्ह करू शकतात.

पद्धत २)
मायक्रोसॉफ्ट भाषाइंडीया https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx या लिंकवर जा.

तेथे Indic Input 3 या परिच्छेदात असलेल्या ठिकाणावरून मराठी प्रणाली डाऊनलोड करा. हि प्रणाली बहूदा आपल्या मिपाकरचा यकू च्या वेबदूनीयाच्या कंपनीने केली असावी असे समजायला वाव आहे. कारण हेल्प फाईलमध्ये वेबदूनीयेचा लोगो दिसतो आहे. तसेच व्यक्तीश: मी हे Indic Input 3 प्रणाली मला मायक्रोसॉफ्टचे भाषाइंडीया माहित होण्याच्या पूर्वीही वेबदूनीयातून डाऊनलोड करून वापरत होतो.

Indic Input 3 इंस्टॉल झाल्यानंतर हेल्प वाचून किबोर्ड बदल करणे इत्यादी सरावाने जमेल. यात गमभनसारखाच किबोर्ड सेट करता येतो. अगदी "वा-याने" वगैरेही टाईप करता येते. मुख्य म्हणजे हि प्रणाली युनीकोड असल्याने तुम्ही याचा वापर कोणत्याही टेक्ट ब्राऊजरमध्ये करू शकतात. <strong>फाईल सेव्ह करू शकतात हा मोठा फायदा आहे.</strong> अगदी वर्ड एक्सेल मध्येही तुम्ही मराठी टाईप करू शकतात.

पद्धत ३)
मोबाईलमध्ये गमभन सारखे टायपिंग करणे

यासाठी खालील लिंकवरून Indic Project चे Indic Keyboard हे अ‍ॅप्लीकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. त्याच्या सेटींगमध्ये मराठी अक्षरांतरण निवडा व गमभनसारखे टाईप करायला सुरूवात करा.

अ‍ॅप्लीकेशनची लिंकः
https://play.google.com/store/apps/details?id=org.smc.inputmethod.indic

प्रतिक्रिया

तर्कवादी's picture

7 Jul 2022 - 8:38 pm | तर्कवादी

पद्धत १)
खाली दिलेला html कोड हा 1234.html या फाईलमध्ये सेव्ह करावा. त्यानंतर या फाईलला क्लिक करा. हि फाईल ब्राऊजरमध्ये ओपन होईल. त्यानंतर ब्राऊजरमध्ये एक टायपींग करायचा रिकामा बॉक्स दिसेल व त्याच्या वरती "type with:gamabhana fontfreedom Inscript Google" असे दिसेल. त्यातील "gamabhana" वर क्लिक करा. त्याचेनंतर
gamabhana गॅजेट लोडेड असा मेसेज येईल व रिकामा टेक्स्ट बॉक्सच्या कडा लाल होतील. मग तुम्ही त्यात नेहमीच्या गमभन किबोर्ड सारखे टायपींगसारखे टाईप करू शकाल.

हा पर्याय चांगला अहे पण स्क्रिप्ट ऑफलाईन कशी लोड होणार ?

पाषाणभेद's picture

8 Jul 2022 - 10:30 am | पाषाणभेद

अरे हो हा मुद्दा तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या नंतर लक्षात आला.
ऑफीसमध्ये पीआरला मराठी टायपिंगसाठी काहीतरी युटीलिटी लागत होती. त्याचे मिपावर लॉगईन नव्हते. तेव्हा हा प्रयोग करून बघीतला होता.
जे मिपावर नाहीत ते याचा उपयोग करू शकतात.

मिपावर लॉगिन नसलेल्यांकरिता नक्कीच खूप चांगली सोय आहे.

विजुभाऊ's picture

8 Jul 2022 - 11:49 am | विजुभाऊ

मी मिपा चा लेखन करा टॅब किंवा खरडफळा ऑप्शन उघडून ठेवतो . नंतर ऑफलाईन गेले तरी फरक पडत नाही

निनाद's picture

8 Jul 2022 - 12:07 pm | निनाद

कोड वापरून फाईल बनवली आणि वापरून पाहिली. छान सुटसुटीत पर्याय आहे.
आता सेव्ह करुन ठेवली आहे.

सस्नेह's picture

8 Jul 2022 - 4:24 pm | सस्नेह

पीसीवर मायक्रोसॉफ्ट मराठी आणि मोबाईल वर Gboard install करा. पटापट टाइप करता येते.

पाषाणभेद's picture

8 Jul 2022 - 4:49 pm | पाषाणभेद

तुमचे म्हणणे योग्य आहे, पण तुम्ही जे म्हणत आहात ते अ‍ॅप आहे व ते कितपत सुटसुटीत आहे हे वापरूनच समजेल. तसेच आपल्यापैकी अनेकांना मोबाईलवर जीबोर्ड आवडत नाही.

सोप्या पद्धतीने तसेच ज्याला गमभनची महती समजली आहे, वेग समजला आहे तो इतर पर्याय कमी प्रमाणात वापरतो.
तसेच वर पद्धत २) मध्ये मायक्रोसॉफ्ट भाषाइंडीया हा पर्यायही मराठी किबोर्ड इन्स्टाल करून Indic Input 3 ने अगदी सोप्या पद्धतीने व वेगाने आपण जसे "लिहीतो" तसे लिहीता येते.

अर्थात, ज्याला जे सोपे वाटते तो ते वापरतो.

धाग्याचा उद्देश, ज्यांना मराठी भाषेत संगणकावर टंकन करणे अवघड वाटते व त्यामुळे ते मराठी वेबसाईटवर कमी प्रमाणात येतात त्यांना सोपे करून देणे हा होता.

कसेही लिहा, पण लिहा अन मराठीत लिहा.

अजूनही मराठी लेखन अवघड आहे ?
http://www.misalpav.com/node/26332

गमभन चे एक टुल [ बहुतेक होते ] एचटीएमएमएल फाईल सारखे आधी उपलब्ध होते, जे डाऊनलोड करुन ठेवलेले होते, नेट कनेक्शन नसले [ ऑफ लाईन ] तरी मिपावर लिहतो तसेच त्यावर लिहिता यायचे. आता ते टुल माझ्याकडे नाही. :( गमभनच्या साईट वर देखील ते आता उपलब्ध आहे असे निदान मला तरी दिसलेले नाही.
जी-बोर्ड [ इंडिक लँग्वेज सिलेक्ट करुन ] अगदी भराभर मराठी-हिंदी-गुजराती आणि अन्य भाषां मध्ये सहज लिहीता येते.
विंडोजवर लँग्वेज बार टास्कबार मध्ये डॉक करुन तसेच मराठी आणि हिंदी भाषा इन्स्टॉल करुन लिखाण करता येते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekar

चौथा कोनाडा's picture

8 Jul 2022 - 7:21 pm | चौथा कोनाडा

पूर्वी कोणी एके काळी बराहा वापरत असे ऑफ लाईन टायपिंग साठी, सध्या सतत ऑन लाईन असल्याने गुगल इनपुट आणि मिपा, किंवा मोबाईल मधले स्वरलिपी सारखे की बोर्ड वापरत असल्याने ऑफ लाईन मराठी टंकन हा प्रश्न उद्भवलेला नाहीय!

विंडोज वर गूगल इंडिक चे टूल इन्स्टॉल केले होते खूप आधी आणि दोन्ही कीबोर्ड मध्ये स्विच करणे सुद्धा काही की कॉम्बिनेशन वर सेट केले होते. खूपच सोयीचे वाटले होते मला. आता काय स्थिती आहे माहित नाही.
मॅक वर नाही ही जाम चिडचिड झाली होती सुरुवातीला :-)

सध्या बहुतांश वेळा ऑनलाईन असतोच त्यामुळे, मिपा, गूगल ची इंडिक सेवा वगैरे साईट वापरतो. chrome चे एक्स्टेंशन पण सोयीचे आहे.
शिवाय gmail मध्ये पण पटकन कीबोर्ड बदलता येतो.