एक दिवस पाऊस सर्व सुष्टी जलमय

सुरसंगम's picture
सुरसंगम in काथ्याकूट
5 Jul 2022 - 8:30 pm
गाभा: 

मंडळी काल परवा पर्यंत पाऊस पडतोय की नाही असं वाटत असताना आज सकाळ्पासुन तो सतत पडतोय म्हणुन प्रसारमाध्यमांकडुन सगळीकडे पुराच्या पाणाच्या बातंम्या द्यायला सुरुवात झाली.

पुर्वी म्हणजे फार तर आपण २००० पर्यंत म्हणुया , की २ ते ३ माहिने सततधार पाऊस पडत नाही तो पर्यंत कुठेही नदी नाल्याला पुर येत नव्हता किंवा धरणाचे दरवाजे उघडले जात नव्हते.

आणि आताच बातमी ऐकली की एका दिवसात पुर्ण भरल्यामुळे एका धरणाचे ९ दरवाजे उघडले गेलेत.

तसेच राज्यात ठिकठिकाणी पाणी घराघरात , बाजरपेठेत साठु लागलंय उदा. चिपळूण, कोल्हपुर, सांगली.

म्हणजे सगळीकडे पाऊस एका दिवसात पुढिल ३६५ दिवस पडेल इतका कसा काय होतो.

शिवाय दरवर्षी एक तरी दरड कोसळुन कोणी तरी जखमी तरी होतंय किंवा जीव गमवला जातो याची बातमी असतेच.

माझं निरिक्षणः- पाणी मग ते पावसचं असो की नदीच्या पुराचं ते आहे तिथेच आहे पण आपण लोक तिथे जवळपास रहायला गेलेत. सगळे बिल्डर लॉबीतले लोक "निसर्गाच्या कुशित" असं गोजिरं नाव देवुन लोकांना नदीकिनारी, टेकडीवर आणि तलावाकाठी घरं बांधुन तिथे आक्रमण केलंय आणि नदी तलाव यांचं आकारमान कमी होत गेलंय.आणि याला लोकसंख्या वाढ हे कारण आहे.

इतक्या वर्षात सगळ्या धरणाच्या तळचा गाळ काढला जात नाहीये त्यामुळे त्यांची क्षमता आक्रसली गेली आहे आणि ती एक दिवसाच्या पावसाने त्वरित भरतात.

नदी किनारी वसलेली गावं पुर्वांपारही होतीच पण मग याच दहा बारा वर्षात लगेच नदी आपले पात्र सोडुन तिचे पाणी गावात कसे काय घुसते.

आपणही आपल्याला काय वाटते ते लिहा.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Jul 2022 - 8:52 pm | कंजूस

लोकवस्ती बारक्या गावातून मोठ्या गावाकडे सरकत आहे. हेच कारण आहे. पाणी वाहून जाण्यासाठी मिळणारी जागा अडवली गेली आहे. त्यामुळे मोठा प्रवाह लवकर वाहत नाही, पाणी त़ुंबते.

विवेकपटाईत's picture

5 Jul 2022 - 9:22 pm | विवेकपटाईत

आपण नदी पात्रावर अतिक्रमण करतो, जमिनीतून पाणी उपसून गटारीच्या माध्यमान नदीत ओततो. नदीला नियंत्रित करतो.परिणाम भोगावे लागणार.

तर्कवादी's picture

5 Jul 2022 - 9:46 pm | तर्कवादी

आणि आताच बातमी ऐकली की एका दिवसात पुर्ण भरल्यामुळे एका धरणाचे ९ दरवाजे उघडले गेलेत

एका दिवसात धरण कस काय भरु शकतं ? कोणतं धरण आहे हे भातुकलीच्या खेळातलं ?

सुरसंगम's picture

6 Jul 2022 - 8:19 am | सुरसंगम

तर्कवादी बातम्या पहा.
पूर्णा प्रकलपाचे सगळे ९ दरवाजे एक सेटींमीटर ने उघडलेत.
पिंगळाई नदी आणि कोकणातल्या सर्व नद्या भरून वाहत आहेत.
तसेच कोल्हापूर मधील पंचगंगा नदी चे पाच प्रकल्प पूर्ण भरून वाहू लागलेत. एका रात्रीत १७ फूट उंची गाठली आहे.
मुबंईतील पवई तलाव वाहू लागलाय. सर्व धबधबे ओसंडून वाहू लागलेत.

सौंदाळा's picture

6 Jul 2022 - 11:54 am | सौंदाळा

सहमत
पाण्याचा निचरा होण्यासाठी जमीन नाही, डोंगर उंच / सखल भागात वाढलेल्या वस्त्यांंमुळे पावसाचे पाणी नद्या / नाल्यांमधे मिळण्याची सोय नाही. कित्येक नाले तर बुजवले गेले आहेत. वर लिहिल्याप्रमाणे गाळ काढला जात नाही आणि उलट नदीपात्रात भराव घातले जात आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jul 2022 - 1:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

१. शहरात नाले बुजवुन किवा बाजुबाजुने भराव घालुन वाट लावली जात आहे. पुण्यातील मोठे उदाहरण म्हणजे आंबील ओढा. दोन वर्षांपुर्वीच्या पावसात ओढा इतका पसरला की आजुबाजुची सगळी वस्ती इतकेच काय मोठमोठ्या इमारतीसुद्धा धोक्यात आल्या. तळघरातील पार्किंगमध्ये शेकडो गाड्या अडकल्या. पाण्याची वाट अडवली की ते कुठुनही वाट शोधणारच. पुण्यात रामनदी किवा मुंबईत मिठि नदी हा सुद्धा असाच एक नेहमी चर्चेचा विषय. तिला नदी का म्हणायचे कोणास ठाउक.
२. गावात पाणथळ जमिनी,गायराने अशा पाणी साठायच्या जागा भराव घालुन किवा कुंपण घालुन बळकावल्या जात आहेत.
३. जंगलतोडीमुळे धरणात जास्त गाळ वाहुन येत आहे आणि त्यांची साठवण क्षमता कमी कमी होत आहे. त्यामुळे धरणे लवकर भरतात.
४. सर्वपक्षीय राजकारणी आणि बिल्डर लॉबीची नजर आता राहिलेल्या टेकड्यांवर आहे. काही ना काही नियम बदलुन तिथे जागा बळकावायची लगबग चालु आहे.

हल्ली ग्लोबल वॉर्मिंग मुळे पाऊस सुद्धा एका दिवसातच भरपूर पडतो. ढगफुटीसम वर्षाव होण्याचे प्रमाण वाढले आहे.
काही ठिकाणी एका दिवसातच १०० मिमी पाऊस पडतो.
इतक्या त्वरेने पाण्याचा निचरा जमिनीत होऊ शकत नाही.
यात भर म्हणजे पाणी जमिनीत मुरण्यासाठीच्या वाटा आपण सिमेंटचे रस्ते बनवून बंद केलेले आहेत.
त्यामुळे नदी देखील इतके पाणी पचवू शकत नाही.

सुबोध खरे's picture

6 Jul 2022 - 2:57 pm | सुबोध खरे

पूर हा आज काल जास्त येतो असा म्हणण्याची पद्धत पडली आहे.

चिपळूण शहरात १९२५ पासून दर वर्षी पूर येत असे असे आमचे आजोबा सांगत असत आणि वसिष्ठी नदीवर फरशी (पाण्याच्या पातळीपेक्षा थोडासा उंच असा पूल ) यावरून दर वर्षी निदान एक दोन माणसे वाहून जात असत. फरशींवरून पाणी वाहत असताना त्यावर वाहने चालवू नयेत असा बोर्ड मी तेथे पाहिलेला आहे.

बाकी झाडी तुटल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग झाले यामुळे पाऊस कमी झाला पासून अतिवृष्टी आणि ढगफुटी होते पर्यंत सर्व दावे वाचनात येतात

चालायचेच

कुमार१'s picture

7 Jul 2022 - 12:20 pm | कुमार१

ढगफुटी होते पर्यंत सर्व दावे वाचनात येतात

बरेच दावे वाचनात येतात.
त्यामुळे नक्की विश्वासार्ह कशाला समजायचे ते कळत नाही.

कर्नलतपस्वी's picture

6 Jul 2022 - 8:25 pm | कर्नलतपस्वी

आमच्या भागातल्या जमिनिवर सोसायत्या झाल्या. पावसाळ्यात कमरेभर पाणी रस्त्यावर साठते. वाहातुक कोन्डि होते पण तीन तीन णगर्सेवक ,आमदार काहिही करत नाही..

सुबोध खरे's picture

7 Jul 2022 - 7:39 pm | सुबोध खरे

सर्व शहरी भागातील कायमचा झालेला प्रश्न आहे.

चिखल होतो पासून साप येतात पर्यंत सर्व तक्रारींवर एकच उपाय म्हणून इमारतीकच्या आजूबाजूला सिमेंटचे किंवा पेव्हर ब्लॉक्स चे अंगण केले जाते.

यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण लक्षणीयय रित्या कमी होते यामुळे हे सर्व पाणी थेट गटारात सोडले जाते आणि गटारे ओव्हर लोड होतात.

पूर्वी जेंव्हा जमिनी मोकळ्या होत्या तेंव्हा मोठा पाऊस झाला कि त्यातील बरेच पाणी जमिनीत साठवले जात असे आणि ते हळूहळू गटारात उतरतसे यामुळे गटारे भरून वाहण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

याशिवाय बहुतांश गटारांच्या कडेला/ गटारावर फळ्या/ स्लॅब टाकून त्यावर सर्वत्र झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत. या झोपड्यात कचरा आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या या थेट गटारातच टाकल्या जातात. यामुळे गटारे तुंबण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. एकदा गटार तुंबले कि पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला कि हे पाणी सर्वत्र रस्त्यांवर साठून राहते.

यामुळे महापालिकांनी कितीही उपाय केले तरी पाणी तुंबून रस्त्यावर ओढे वाहण्याचे प्रमाण काही कमी होत नाही.

हि माहिती उपायुक्त मुंबई महापालिका पापुजनि ( पाणी पुरवठा आणि जलनिःसारण) विभाग यांच्याशी चर्चा करताना समोर आली.

सोसायट्यांना असे करू नका सांगायची सोय नाही. कारण बहुसंख्य ठिकाणी हि कामे स्थानी नगरसेवक / आमदार यांच्या निधीतून होतात नि तेथे त्यांच्या मोठ्या पाट्या लावल्या जातात.

तेंव्हा हे असेच चालणार आहे.