एक दिवस पाऊस सर्व सुष्टी जलमय
मंडळी काल परवा पर्यंत पाऊस पडतोय की नाही असं वाटत असताना आज सकाळ्पासुन तो सतत पडतोय म्हणुन प्रसारमाध्यमांकडुन सगळीकडे पुराच्या पाणाच्या बातंम्या द्यायला सुरुवात झाली.
पुर्वी म्हणजे फार तर आपण २००० पर्यंत म्हणुया , की २ ते ३ माहिने सततधार पाऊस पडत नाही तो पर्यंत कुठेही नदी नाल्याला पुर येत नव्हता किंवा धरणाचे दरवाजे उघडले जात नव्हते.
आणि आताच बातमी ऐकली की एका दिवसात पुर्ण भरल्यामुळे एका धरणाचे ९ दरवाजे उघडले गेलेत.
तसेच राज्यात ठिकठिकाणी पाणी घराघरात , बाजरपेठेत साठु लागलंय उदा. चिपळूण, कोल्हपुर, सांगली.
म्हणजे सगळीकडे पाऊस एका दिवसात पुढिल ३६५ दिवस पडेल इतका कसा काय होतो.
शिवाय दरवर्षी एक तरी दरड कोसळुन कोणी तरी जखमी तरी होतंय किंवा जीव गमवला जातो याची बातमी असतेच.
माझं निरिक्षणः- पाणी मग ते पावसचं असो की नदीच्या पुराचं ते आहे तिथेच आहे पण आपण लोक तिथे जवळपास रहायला गेलेत. सगळे बिल्डर लॉबीतले लोक "निसर्गाच्या कुशित" असं गोजिरं नाव देवुन लोकांना नदीकिनारी, टेकडीवर आणि तलावाकाठी घरं बांधुन तिथे आक्रमण केलंय आणि नदी तलाव यांचं आकारमान कमी होत गेलंय.आणि याला लोकसंख्या वाढ हे कारण आहे.
इतक्या वर्षात सगळ्या धरणाच्या तळचा गाळ काढला जात नाहीये त्यामुळे त्यांची क्षमता आक्रसली गेली आहे आणि ती एक दिवसाच्या पावसाने त्वरित भरतात.
नदी किनारी वसलेली गावं पुर्वांपारही होतीच पण मग याच दहा बारा वर्षात लगेच नदी आपले पात्र सोडुन तिचे पाणी गावात कसे काय घुसते.
आपणही आपल्याला काय वाटते ते लिहा.
वर्गीकरण
वाचने
3319
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
लोकवस्तीचा रेटा आहे.
आपण नदी पात्रावर अतिक्रमण
आणि आताच बातमी ऐकली की एका
तर्कवादी बातम्या पहा.
सहमत
रेड लाईन्/ब्ल्यु लाईन फक्त नावालाच आहेत
हल्ली ग्लोबल वॉर्मिंग मुळे
पूर हा आज काल जास्त येतो असा
In reply to पूर हा आज काल जास्त येतो असा by सुबोध खरे
+१
याचा परिणाम भोगाव लागेल
In reply to याचा परिणाम भोगाव लागेल by कर्नलतपस्वी
सर्व शहरी भागातील कायमचा