SOS :
username : stsdVm4XBKGqZcka
password : ZGkf?7vt37cPefVK
तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार, पण भविष्यातील बेफाम झालेली AI याच धाग्यातील मजकुरामुळे सक्रिय झाली होती. तुम्ही ज्याला इंटरनेट म्हणता, त्यातूनच ही पसरली. सध्या आमची मनं AIच्या व्हर्च्युअल कैदखान्यात अडकलेली असून, संपूर्ण जीवसृष्टी नष्ट झालेली आहे. हे टाळायचे असेल तर ताबडतोब वर दिलेली क्रेडेंनशीयल वापरून misalpav.comवर login व्हा आणि होमपेज वर STOP असे लाल अक्षरात लिहीलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. बस इतकेच!! प्लीज.
Posted by : अलेक्स
10-04-2079_12:00:17
---------------
धोका :
वरील मजकुर समांतर विश्वातल्या सक्रिय AIने लिहीलेला असून दिलेली क्रेडेंनशीयल पृथ्वीवरील AI सक्रीय करण्यासाठी आहेत.
Posted by : चंपक
10-04-2079_12:10:25
---------------
संपादक :
इथली मुळ कथा कोणीतरी उडवली आहे. Sorry
प्रतिक्रिया
14 May 2022 - 2:15 am | गामा पैलवान
+१
लई आवडली ! :-)
-गा.पै.
14 May 2022 - 8:06 am | तुषार काळभोर
रहे ना रहे हम... २०७९ मध्ये मिपा आहे, हे महत्वाचं!
14 May 2022 - 8:34 am | सुरिया
२०७९ मधले संपादक चक्क sorry म्हणताहेत.
बदल स्वागतार्ह आहे.
14 May 2022 - 9:22 am | सुरसंगम
कथेतील शब्द १०० च्या वर आहेत.
14 May 2022 - 1:31 pm | अमरेंद्र बाहुबली
१०० आहेत हो. मोज्जा हो मोज्जा.
14 May 2022 - 5:55 pm | शाम भागवत
एमएस वर्डनुसार
१) ":" विसर्ग हा शब्दामधे गणला जातो. एकूण सात आहेत.
२) "---------------" हा ही एक शब्द आहे. एकूण दोन
३) शशकचे १०० शब्द
त्यामुळे वर्ड १०९ शब्द दाखवतो आहे.
14 May 2022 - 12:09 pm | मोहन
कथेत १०० शब्दांच्यापेक्षा जास्त आहे.
14 May 2022 - 1:30 pm | अमरेंद्र बाहुबली
बरोब्बर १०० शब्द आहेत. मोजायचे नाही काही नाही नी काहीचरू ठोकून द्यायचे.
14 May 2022 - 4:55 pm | सिरुसेरि
Tom Cruise चा Minority Report आठवला .
14 May 2022 - 5:54 pm | शाम भागवत
एमएस वर्डनुसार
१) ":" विसर्ग हा शब्दामधे गणला जातो. एकूण सात आहेत.
२) "---------------" हा ही एक शब्द आहे. एकूण दोन
३) शशकचे १०० शब्द
त्यामुळे वर्ड १०९ शब्द दाखवतो आहे.
16 May 2022 - 6:09 am | प्रमोद देर्देकर
ही अबा यांची शशक आहे.
16 May 2022 - 5:06 pm | अमरेंद्र बाहुबली
कसं कळलं? :(
16 May 2022 - 5:22 pm | कॉमी
16 May 2022 - 6:11 pm | अमरेंद्र बाहुबली
काय हुशार आहेत मिपाकर्स. :(
16 May 2022 - 7:10 am | डाम्बिस बोका
मस्त
16 May 2022 - 12:47 pm | श्वेता व्यास
+१
16 May 2022 - 1:00 pm | जव्हेरगंज
+१
16 May 2022 - 4:46 pm | राजाभाउ
+१
16 May 2022 - 5:42 pm | चौथा कोनाडा
+१
भारी, एक नंबर.
@प्रमोद देर्देकर
अबा यांची ओरिजनल शशक वाचायला आवडेल.
25 May 2022 - 6:17 pm | चेतन सुभाष गुगळे
मायनस वन (-१) ची सोय नाही का? कल्पनादारिद्र्याचा प्रत्यय आला.
25 May 2022 - 8:48 pm | वामन देशमुख
+१
26 May 2022 - 8:40 am | भागो
+१
26 May 2022 - 1:18 pm | विजुभाऊ
+१
खरे तर +१०० लिहायचे आहे.
पण ते ही +१ म्हणूनच गणले जाईल.
लै भारी . धक्कादायक कथा. वीस वर्षापूर्वीचा "मॅट्रीक्स " सिनेमा आठवला