शशक'२०२२ - कळ

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2022 - 7:43 am

१० वर्षाचे कोवळे पोरं ते. शिकायच्या नादात सायकल सरळ टपरीवर उभ्या असलेल्या राणाच्या बुलेटला जाऊन धडकली होती.
राणा ! झोपडपट्टीचा दादा ! आपल्या नव्याको-या बुलेटचा सायकलने उडवलेला रंग बघून त्याचे खोपडे सटकले.
"बच्चा है भाई, जाने दो !" टोळीने म्हणेपर्यंत त्याच्या हातात तो कुप्रसिद्ध सुरा चमचमायला लागला होता.
ह्या सु-याने राणा कसा एका झटक्यात पोटाचा कोथळा बाहेर काढतो हे बरेचदा ऐकले होते त्याने मित्रांकडून.
"मर साले अब " म्हणत एका झटक्यात सुरा त्याच्या पोटात फिरला. एक कळ उठली आणि रक्ताने त्याचे कपडे भिजायला लागले.
थडथडणा-या त्याच्या शरीराला राणा आता गदागदा हलवत बोलला..

उठ बाळा ! कपडे बदलवून घे ! सूसु ने गादी पण ओली झाली सगळी..

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

11 May 2022 - 9:13 am | कुमार१

+१

वामन देशमुख's picture

11 May 2022 - 10:04 am | वामन देशमुख

कथा आवडली पण शेवट काही कळला नाही.
?१

कॉमी's picture

11 May 2022 - 10:04 am | कॉमी

छान

मोहन's picture

11 May 2022 - 11:00 am | मोहन

+१

अनिंद्य's picture

11 May 2022 - 1:12 pm | अनिंद्य

राणा दिसे स्वप्नी :-)

+ १

चौथा कोनाडा's picture

11 May 2022 - 5:35 pm | चौथा कोनाडा

+१

हा .... हा .... हा ...., भीतीनं चड्डी ओली केली की राव !

वामन देशमुख's picture

11 May 2022 - 5:40 pm | वामन देशमुख

ओहो! आत्ता कळली!

+१

---

स्वगत: च्यायला, ही शशक कळायला इतका वेळ लागतोय, एखादी शशक लिहायला किती वेळ लागेल?

एमी's picture

11 May 2022 - 6:24 pm | एमी

+१

हर्षल वैद्य's picture

11 May 2022 - 8:02 pm | हर्षल वैद्य

+१

जव्हेरगंज's picture

11 May 2022 - 10:44 pm | जव्हेरगंज

=))
+१

गामा पैलवान's picture

12 May 2022 - 1:18 am | गामा पैलवान

+१

-गा.पै.

तर्कवादी's picture

12 May 2022 - 2:08 pm | तर्कवादी

थडथडणा-या त्याच्या शरीराला राणा आता गदागदा हलवत बोलला..

त्याला राणा का उठवत होता ? तो राणाचाच मुलगा आहे का ?

ब़जरबट्टू's picture

13 May 2022 - 6:28 pm | ब़जरबट्टू

एका लहान मुलाच्या स्वप्नाची कथा दिसतेय, तो राणाबद्दल विचार करतोय, पण त्याची आई किवा बाबा त्याला सु केली म्हणुन ऊठवताहेत :)

आंबट गोड's picture

13 May 2022 - 12:03 pm | आंबट गोड

तेच कळले नाही...राणा का उठवत होता?

टामोलीयन's picture

13 May 2022 - 6:44 pm | टामोलीयन

अहो , स्वप्न आहे ना ते, तो त्यातुन बाहेर येतपर्यन्त त्याला सगळे स्वप्नातले लोक्सस करत आहे असे वाटत असेल..
(कथा हमका नही है )

सुरसंगम's picture

13 May 2022 - 12:59 pm | सुरसंगम

तेच नावं चुकलंय वाटतं होतं.

टामोलीयन's picture

13 May 2022 - 6:41 pm | टामोलीयन

हा हा .. मस्त ..

प्राची अश्विनी's picture

16 May 2022 - 5:32 am | प्राची अश्विनी

+1

कॉमी's picture

22 May 2022 - 1:19 pm | कॉमी

मतदान

प्रमोद देर्देकर's picture

22 May 2022 - 8:04 pm | प्रमोद देर्देकर

+१