Skip to main content

शशक'२०२२ - कळ

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 11/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
१० वर्षाचे कोवळे पोरं ते. शिकायच्या नादात सायकल सरळ टपरीवर उभ्या असलेल्या राणाच्या बुलेटला जाऊन धडकली होती. राणा ! झोपडपट्टीचा दादा ! आपल्या नव्याको-या बुलेटचा सायकलने उडवलेला रंग बघून त्याचे खोपडे सटकले. "बच्चा है भाई, जाने दो !" टोळीने म्हणेपर्यंत त्याच्या हातात तो कुप्रसिद्ध सुरा चमचमायला लागला होता. ह्या सु-याने राणा कसा एका झटक्यात पोटाचा कोथळा बाहेर काढतो हे बरेचदा ऐकले होते त्याने मित्रांकडून. "मर साले अब " म्हणत एका झटक्यात सुरा त्याच्या पोटात फिरला. एक कळ उठली आणि रक्ताने त्याचे कपडे भिजायला लागले. थडथडणा-या त्याच्या शरीराला राणा आता गदागदा हलवत बोलला.. उठ बाळा ! कपडे बदलवून घे ! सूसु ने गादी पण ओली झाली सगळी..

वाचने 9592
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

+१

कथा आवडली पण शेवट काही कळला नाही. ?१

छान

+१

राणा दिसे स्वप्नी :-) + १

+१ हा .... हा .... हा ...., भीतीनं चड्डी ओली केली की राव !

In reply to by चौथा कोनाडा

ओहो! आत्ता कळली! +१ --- स्वगत: च्यायला, ही शशक कळायला इतका वेळ लागतोय, एखादी शशक लिहायला किती वेळ लागेल?

+१

=)) +१

थडथडणा-या त्याच्या शरीराला राणा आता गदागदा हलवत बोलला..
त्याला राणा का उठवत होता ? तो राणाचाच मुलगा आहे का ?

In reply to by तर्कवादी

एका लहान मुलाच्या स्वप्नाची कथा दिसतेय, तो राणाबद्दल विचार करतोय, पण त्याची आई किवा बाबा त्याला सु केली म्हणुन ऊठवताहेत :)

तेच कळले नाही...राणा का उठवत होता?

In reply to by आंबट गोड

अहो , स्वप्न आहे ना ते, तो त्यातुन बाहेर येतपर्यन्त त्याला सगळे स्वप्नातले लोक्सस करत आहे असे वाटत असेल.. (कथा हमका नही है )

हा हा .. मस्त ..

+1

मतदान

+१