शशक'२०२२ - तुटलेले दोर

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2022 - 12:28 pm

पहाटेच्या वेळी शहरातुन गावाकडे आलेल्या गाड्या गावच्या वेशीपाशी करकचुन ब्रेक लावुन थांबल्या.
गाडीतली पेंगत असलेली लहानथोर मंडळी दचकुन जागी झाली .

समोर नजरेतली ओळख हरवलेले शेकडो गावकरी उग्र मुद्रेने काठ्या घेउन उभे होते . त्यांनी गावात जाणारी वाट अडवली होती .

"पावणं , तुम्ही शहरातली रोगराई घेउन गावात येतायसा . तुम्हाला इथं प्रवेश नाही ."

" व्हय .आलात तसं गपगुमान माघारी जावा , न्हाईतर हि काठी पघितलीत. "

आलेले पाव्हणे निरुपायाने शहराकडे परतले .

यथावकाश रोगराई ओसरली . गाववाल्यांना रोजंदारीसाठी शहराकडे जाण्याची निकड भासु लागली .
गावाकडुन शहरातील पाव्हण्यांना रोज गोडीगुलाबीचे फोन , खुशाली विचारणारी पत्रे जाउ लागली.

पण त्यांच्या पत्रांना उत्तर मिळत नव्हते . फोन कट केले जात होते .

दोर कायमचे तुटले होते .

प्रतिक्रिया

भागो's picture

8 May 2022 - 1:06 pm | भागो

+1
कुणीतरी लिहायला पाहिजे होतेच

कुमार१'s picture

8 May 2022 - 1:25 pm | कुमार१

+१

Bhakti's picture

8 May 2022 - 2:01 pm | Bhakti

+१

सुरसंगम's picture

8 May 2022 - 4:30 pm | सुरसंगम

+१

मोहन's picture

8 May 2022 - 5:04 pm | मोहन

+१

नावातकायआहे's picture

8 May 2022 - 8:42 pm | नावातकायआहे

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2022 - 9:53 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

सुरिया's picture

8 May 2022 - 11:54 pm | सुरिया

टिपिकल ममव फॅनटसी.
असो.
ही पण नॉट प्लस वन.

तुर्रमखान's picture

9 May 2022 - 12:24 am | तुर्रमखान

छान!

सुक्या's picture

9 May 2022 - 8:48 am | सुक्या

+१

कल्पना छान आहे, पण असं होत नसतं. शहरातली प्रचंड मागणी अशा फँटसीला प्रत्यक्षात येऊ देत नाही.

नगरी's picture

9 May 2022 - 9:19 am | नगरी

+1

श्वेता२४'s picture

9 May 2022 - 11:36 am | श्वेता२४

+१

सौंदाळा's picture

9 May 2022 - 12:35 pm | सौंदाळा

+१

प्रचेतस's picture

10 May 2022 - 9:10 am | प्रचेतस

+१
आवडली

संजय पाटिल's picture

10 May 2022 - 4:57 pm | संजय पाटिल

+१

सौन्दर्य's picture

10 May 2022 - 11:23 pm | सौन्दर्य

काहीही झाले तरी अशी स्थिती येणं कठीण असतं. सुरतेच्या प्लेगच्या वेळी इतर शहरांनी सुरतच्या लोकांना आपल्या कॉलोनीत प्रवेश नाकारला होता पण ती लाट ओसरून गेल्यावर 'टु अँड फ्रॉम सुरत' असा नियमित प्रवास सुरु झाला.

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:26 am | तुषार काळभोर

+१

चौथा कोनाडा's picture

14 May 2022 - 11:01 pm | चौथा कोनाडा

+१

दोर कायमचे तुटले होते... प्रचंड परिणामकारक शेवट.

चौथा कोनाडा's picture

14 May 2022 - 11:01 pm | चौथा कोनाडा

+१

दोर कायमचे तुटले होते... प्रचंड परिणामकारक शेवट.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 10:53 pm | चेतन सुभाष गुगळे

खरंय ह्या कृतघ्न लोकांना धडा शिकवायला हवा.

nutanm's picture

26 May 2022 - 6:10 am | nutanm

मस्त कथा!! +1

प्रसाद_१९८२'s picture

31 May 2022 - 1:44 pm | प्रसाद_१९८२

+१

इतर ठिकाणचे माहित नाही, मात्र अशी परिस्थिती कोकणात नक्की होती.