मराठी पाऊल पडते पुढे?????

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
7 Dec 2008 - 3:02 pm
गाभा: 

आतंरजाला वरती सहज फिरता फिरता एक लेख ,मराठी लोक परप्रांतियाच्या नजरेतुन कशी दिसतात ह्या विषयी आढळला. सदर लेख सर्वानी वाचवा अशी विनंती.
http://rapidshare.com/files/153792586/Marathi_Manus_Dusaryanchya_Najaret...
वेताळ

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

8 Dec 2008 - 6:31 am | चंबा मुतनाळ

लेख वाचताना कुठेतरी स्वतःची ओळख पटत होती. विचार करावयास लावणारा लेख

मैत्र's picture

8 Dec 2008 - 9:25 am | मैत्र

डाउनलोड होत नाहीये. इथे चढवल्यास सोयीचे होईल. हे मिपाच्या धोरणात बसते अशी आशा आहे.

मराठी_माणूस's picture

8 Dec 2008 - 9:52 am | मराठी_माणूस

फाईल उघडत नाही

वेताळ's picture

8 Dec 2008 - 9:58 am | वेताळ

इथे कटपेस्ट करु शकेल का?
वेताळ

विसोबा खेचर's picture

8 Dec 2008 - 10:34 am | विसोबा खेचर

लेख चाळला...

मराठी माणूस हा आहे हा असा आहे आणि याचा एक मराठी म्हणून मला अभिमान आहे. तो कुणा परप्रांतीयाला कसा वाटतो याच्याशी मला काहीहीह देणंघेणं नाही.. मी कुणाही परप्रांतीयाचे चार चव्वल देणं लागत नाही, ना की कुणा परप्रांतियाच्या दारात जात नाही!

आपला,
(मराठी) तात्या.

दिगंबर's picture

8 Dec 2008 - 11:34 am | दिगंबर

तात्या तुमच्याशि सहमत

वेताळ's picture

8 Dec 2008 - 12:11 pm | वेताळ

पण लेख वाचताना आणखी एक गोष्ट जाणवते ते म्हणजे ह्यात ज्या ज्या परप्रांतियाचे मत घेण्यात आले आहे ,ते सर्व उच्चवर्गिय परप्रांतियाचे प्रतिनिधी आहेत.त्याना जे अनुभव आले आहेत ते पुर्ण महाराष्ट्रातील लोकांचे आहेत हे समजणे चुक आहेत. पंजाब्याचे जे उदाहरण दिले आहे त्याबाबत मी काल पासुन विचार करत आहे. त्यात मला तरी पंजाब्याचा महाराष्ट्रियन लोकांबाबत मत पुर्वग्रह दुषित वाटते.खायलाप्यायला फक्त पंजाब मध्ये मिळते व महाराष्ट्रात मिळत नाही हा विचार निव्वळ मुर्खपणा वाटतो.
वेताळ

रामदास's picture

8 Dec 2008 - 12:31 pm | रामदास

काही मुद्दे ग्राह्य आहेत.पण संपूर्ण लेखाचा विचार केला तर लेख एकाच बाजूला झुकल्यासारखा वाटतो आहे.(पूर्वग्रह दूषीत म्हणावा इतका ).

रामपुरी's picture

8 Dec 2008 - 12:36 pm | रामपुरी

सगळीच उदाहरणे पूर्वग्रह दुषित वाटतात. आणि पंजाब मधे भाज्या मिळतात आणि इथे मिळत नाहीत याला तर "joke of the year" द्यायला हवे. खरंतर उत्तरेत मलातरी भाज्यांचे जास्त प्रकार सापडले नाहीत. पालक ही मुख्य पालेभाजी. याखेरीज हुडकायला गेलात तर एका हाताच्या बोटावर मोजुन संपतील. बाकिच्या भाज्यांमध्ये बटाटा आणि फ्लॉवर.
बाकीचे मुद्द्यांमधेही काही दम नाही. अगदी ते खोडून काढण्याइतकासुद्धा.
अवांतरः आमचा एक पंजाबी मित्र होता. सर्व उत्तरभारतीयांप्रमाणे 'स्टडी ला ईस्टडी' म्हणणारा. त्याला आम्ही म्हणायचो "xxxx तुम्हे कुछ महीनोतक सिर्फ यहांकी सब्जीयोंपे रखना चाहिये. तब ठिकसे बोल सकोगे. सिर्फ आलू और पनीर खाके तुम्हारी जबान ऐसी हुई है"

इनोबा म्हणे's picture

8 Dec 2008 - 1:13 pm | इनोबा म्हणे

'तुमच्याकडे कसं काहीच नाही आणि आमच्याकडे कसं सगळं छान छान आहे' असल्या गप्पा मारणार्‍यांना एकदा विचारायला हवे होते की, एवढं तुझं गाव सर्वगुणसंपन्न आहे तर महाराष्ट्रात झक मारायला आला आहेस काय?
महाराष्ट्रात इतकी वर्षे राहुनही ज्यांना महाराष्ट्र,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती आपली वाटली नाही त्यांनी आमच्याकडून आपूलकीची अपेक्षा ठेवायची गरजच काय?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सखाराम_गटणे™'s picture

8 Dec 2008 - 1:39 pm | सखाराम_गटणे™

एवढं तुझं गाव सर्वगुणसंपन्न आहे तर महाराष्ट्रात झक मारायला आला आहेस काय?
+१

यशोधरा's picture

8 Dec 2008 - 1:48 pm | यशोधरा

ईनूभाव एकदम सहमत, आणि एवढ्या शिव्या घालून कोण तो परप्रांतिय डॉक्टरबाबू म्हणे मराठीच मुलीशी लगन करतो अन् दरवर्षी महाराष्ट्रातल्या मुंबैला भेट देतो!! कशाला म्हणे?? :?

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2008 - 7:08 pm | प्रभाकर पेठकर

गुण दोष सर्वांमध्ये असतात. फक्त दोष पाहात गेलं तर दोषच दिसतात. आणि ज्यांची मते घेतलेली आहेत त्यांच्या 'मराठी संपर्काचा' आवाका किती आहे ह्याचा उल्लेख नाही. एक दोन मित्रांना, त्यांच्या कुटुंबांना भेटून 'मराठी माणसांबद्दल' मत बनवायचं ही वरील लेखातील त्या त्या पात्राची बौद्धीक पातळी समजायची की ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या भाषक समाजाची? त्यांचाच निकष लावून ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या समाजा बद्दल मत बनवायचे ठरवले तर, दिल्लीकर, उत्तरप्रदेशी ज्या प्रदेशात जातात, राहतात, शिक्षण, नोकरी, पैसा कमावतात तिथल्या समाजाशी एकरूप होऊ शकत नाहीत उलट त्या उपकारकर्त्या समाजालाच दुषणे देण्याचा कृतघ्नपणा करतात.
पंजाबातील (पंजाबी/शीख दोन्ही) पंजाबी भाषक जमात पुण्या-मुंबईत सुतारकाम, ऑटो-स्पेअरपार्ट व्यवसायात आहेत. त्यांचा अनुभव घेऊन वाचकांनी स्वतःचे मत बनवावे.
मी दिल्लीत एका शर्मा नांवाच्या मित्राकडे ३ दिवस राहिलो होतो. हा मस्कतमध्ये पोलीस खात्यात नोकरी करीत होता. रोज संध्याकाळी सुरापान त्याच्या साठी 'जिवनावश्यक' होते पण त्याला दारूचे परमीट मिळत नव्हते. तो वरचे वर माझ्याकडून (माझ्या परमीटवर) दारू प्यायचा. (अर्थात, पैसे द्यायचा). मस्कत सोडल्यावर तो दिल्लीला परतला तेंव्हा 'कधी दिल्लीस आलास तर माझ्या घरीच राहायचं' असा सज्जड आग्रह त्याने केला होता. पुढे ३-४ वर्षांनी दिल्लीत गेलो तेंव्हा त्याच्या घरी राहिलो होतो. ते शाकाहारी कुटुंब असल्या कारणाने डाळ (मसूराची जी सहसा विरघळत नाही), भाजी, जाडजाड रोट्या आणि बारीक तांदूळाचा भात असा आहार होता. त्याच्या बायकोचा मोठ्ठा गैरसमज की मराठी लोकं 'उकडा' तांदूळच खातात. त्यामुळे बारीक तांदूळाचा भात म्हणजे आमच्यासाठी 'मेजवानी'च ठरली असणार. त्या बाईने ते चक्क माझ्या तोंडावर बोलून दाखवीले. तसेच एकदा आम्ही बोलत बसलो असताना, दिल्लीत आम्ही त्यांच्या घरी उतरल्यामुळे माझे, 'हॉटेलचे बरेच पैसे वाचले असणार' असेही विधान केले. दुसर्‍या दिवशी आम्ही दिल्ली सोडली. असो. हा वैयक्तिक अनुभव झाला. म्हणून सर्व पंजाबी असेच असणार असे मी अजिबात म्हणणार नाही.
'दिल्लीचे ठग' माझ्या जन्माआधीपासून प्रसिद्ध आहेत. त्यावर काय बोलावे?
सदर लेख मी पूर्ण वाचला नाही. पण असाच (की हाच?) लेख पुर्वी एकदा कुठेतरी वाचनात आला आहे. त्यातील सुरुवातीची हास्यास्पद उथळ विधाने वाचून पुढे वाचायची इच्छाच झाली नाही. असो.
मराठी माणसांमध्ये दोष आहेत हे मान्य पण ते लेखात रंगविल्याइतके भडक नाहीत आणि घरात आलेल्या 'पाहूण्या'ने ते दाखवून द्यावेत इतके जाचकही नाहीत. असो.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Dec 2008 - 9:19 pm | llपुण्याचे पेशवेll

मला जी मूर्ख पणाची विधाने वाटली ती खालील प्रमाणे
१. उत्तरेतले लोक कायम गार पाण्याने आंघोळ करतात आणि आपण मात्र उकाड्यातही गरम पाण्याने आंघोळ करतो, अशाप्रकारे उत्तरेचे लोक निसर्गावर मात करून राहतात म्हणून ते जास्त धाडशी असतात.
स्प. अत्र्यांचे अशा गोष्टी अशा गमती हे पुस्तक वाचा म्हणाव. त्यात अख्खा गावच कसा सकाळी उठून नदीवर आंघोळीला जाई याचे वर्णन आहे. ही झाली जुनी गोष्ट.
सध्या मी भारतात असतो तेव्हा कोणताही ऋतू असला तरी गार पाण्याने आंघोळ करतो. मीच नव्हे माझे वडील, भाऊ देखील. माझ्या माहीतीतले माझे अनेक मित्रही सर्रास गार पाण्याने आंघोळ करतात १२ ही महीने. त्यात नवल ते काय? हे बघायला पाहीजे की हे लोक खरेच थंडीतही गार पाण्याने आंघोळ करतात का. आणि हे लोक असेच डॅशिंग असतात म्हणूनच तिकडे गुंडगिरी जास्त असते. आणि म्हणूनच लालू , मुलायमादी नेते तिथे निर्माण होतात. आणि या डॅशिंग लोकाना भिका मागायला इकडे यायला लागते.
२. त्या डॉक्टरला म्हणे सगळे मराठी लोक त्याची बायको धरून विचित्र वाटतात.
स्प. भाड्या मराठी मुलीशी लग्न करायला आम्ही सांगितले होते. आता भोग फळे नाहीतर हो मराठी. म्हणे त्याला कोणी घरी जेवायला बोलवले नाही घरी. आणि बोलवले तेव्हा काय म्हणे साधेच जेवण दिले. तू काय महाराजा लागून गेला का रे? आणि असलास तर गेलास तेल लावत. आम्ही फक्त शिवा़जी महाराज आणि राणाप्रतापाना ओळखतो. कारण हे २च राजे स्वाभिमानी होते. बाकी सगळे मोगली सत्तेचे अंकीत, लाचार.
३. मराठी माणसे म्हणे दूर दूर राहतात. कोचावर बसले तरी एकमेकाना स्पर्ष होणार नाही असे बसतात. मात्र भय्ये मात्र अगदी मिठ्या मारतात, होळीला नाचतात.
स्प. हो आम्ही बाईच्या अंगाला हात लावत नाही. दारू पिऊन बायकोला मारणार्‍या माणसाला किंवा दारू पिऊन बायकोशी तिची इच्छा नसताना संग करणार्‍या माणसाला आमचा समाज असभ्यच म्हणतो. साला उठसूट पोरीना मिठ्या मारण्याची पध्दत नाही इकडची.

बाकी इनोबा, पेठकरकाकांशी सहमत.

पुण्याचे पेशवे

जृंभणश्वान's picture

9 Dec 2008 - 8:46 am | जृंभणश्वान

असला भंपक लेख उभ्या आयुष्यात वाचला नव्हता.

लेखात म्हणले आहे, लोकांचा पाहुणचार होत नाही इथे -
एकाने म्हणले आहे, मराठी मित्राने कधी घासभर खायला घरी बोलावले नाही. दुसऱ्या एकाला बोलावले तर त्याने स्वयंपाकाची मापे काढली [चांगली बटाट्याची भाजी दिली लेकाला आणि पोळीचे तुकडे करुन घातले तर कुत्ते के माफिक म्हणे] तिसऱ्या XXXXच्याला तर दिवाळीला फराळाला बोलावले, लाडू, चिवडा, चकली दिली, प्रेमळ दटावणी केली सगळे संपवा म्हणून...तिथेही मापे काढतो आहे.
नाही बोलावले जेवायला तर तक्रार, साधे जेवायला बोलावले तरी तक्रार, दिवाळीला बोलावले तरीसुध्दा तक्रार - माणसाने करावे काय?
चहा नुकताच झालाय वगैरे तर काहीपण फंडे दिले आहेत - कथाकथने वाचून आणिक ऐकिव.
मी रस्त्यावरुन चाललो असलो तर आमचा नारायण पेठेतला कोब्रा मित्र खिडकीतून हाक मारुन मेनु सांगुन खायला बोलावतो वर मला. ज्याला चहाचा असा खरोखर अनुभव आला असेल त्याने पूर्वी चहाची उणीदुणी काढली असतील !

नातेसंबंधांचे दारिद्र्य -
स्कोप आहे का ह्या मुद्द्याला, मुंबईचे उदाहरण दिले आहे, कुठल्याही शहरात जीवन थोड्या प्रमाणात तुटक असतेच त्याचा मराठी लोकांशी संबंध लावण्यात काय अर्थ आहे?
इथल्या लग्नाच्या याद्यांना एकदा जावून बघा म्हणाव, ब्रह्मदेवाला पण कळणार नाहीत अशी नाती शोधुन काढतात लोक आणि २ दिवसांनी वर्षोनुवर्षे ओळख असल्यासारखी उठबस सुरु होते.

पैसा आला तरी देण्याची वृत्ती नाही -
देण्याची वृत्ती आहे हो, पण कुठे चार रुपये दिले तर लगेच आमच्या आज्जाच्या नावाची पाटी लावता का असे विचारत नाही आणि दानाची जास्त वाच्यता पण करत नाही.

महत्त्वाकांक्षा नाही -
जरा जास्तच होते आहे हे, उदाहारण तरी काय - जवळचे कॉलेज शोधतात म्हणे, असे असते तर पिंपरीहून कोकलत PICT ला गेले नसते कुणी.

जाता जाता, लेखात ‘जय महाराष्ट्र घोषणाही भय़ंकर श्रेष्ठत्ववादी आहे’ असे वाक्य आहे. असे थर्ड क्लास वाक्य आजपर्यंत वाचले नव्हते. जय महाराष्ट्र म्हणल्याचा अर्थ आमच्यापलिकडे जग नाही आणि आम्हाला माज आहे असे दिसत असेल तर बोलायची सोयच नाही. मग सरळ जय गॅलॅक्सि वगैरे म्हणावे - उगाच देशापुरते तरी संकुचित का रहा ?

पूर्ण लेख विचित्र आणि विरोधाभासांनी भरलेला आहे - असा दुसऱ्या समाजावरचा लेख कुठे वाचायला मिळू शकेल बरे.

पाषाणभेद's picture

9 Dec 2008 - 7:00 pm | पाषाणभेद

हा लेख कुणी लिहीला आहे? असले १०० लेख मी भयट्ट्यांबद्द्ल व त्यांच्या अनुभवावरुन लिहु शकतो. माझे काहि फारच छान मित्र यू. पी. (बिहारचे सुध्धा आहेत.) पण त्यांनी कधी अशी तक्रार केली नाही.
आपण सुध्धा तिकडे जास्त दिवस राहिलो तर त्यांचेहि पाय पाण्यात असलेले दिसतिल. आपण जसा गॉगल घालू तसे जग दिसेल.
-( सणकी महाराष्ट्र्प्रेमी )पाषाणभेद

झकासराव's picture

9 Dec 2008 - 8:45 pm | झकासराव

फालतु आणि पुर्णपणे पुर्वग्रहदुषित लेख आहे तो.
पुर्ण वाचुच शकलो नाही.
प्रत्येक ठिकाणच्या परंपरा वेगळ्या असणारच ना.
राजस्थानात जाउन मी, मला पुरणपोळी मिळत नाही म्हणुन, राजस्थानी मला बोलवुन पुरणपोळी वाढत नाहीत कसले वाइट आहेत हे म्हणण्यात काय पॉइन्ट??

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao