मिपावरील हल्ले सुरूच...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
7 Dec 2008 - 7:39 am
गाभा: 

राम राम,

अजूनही आमच्या जुन्या संकेतस्थळावरील काही हित(?)मित्रांचे मिपावर हल्ले सुरूच आहेत. मशिन जनरेटेड हिट्स लावून मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त ताण दिला जात आहे. मिपाची वाढती लोकप्रियता आणि सभासद संख्या ही आमच्या मित्रांना (?) बघवत नाही आणि यांचे छुपे हल्ले सुरूच आहेत. तात्यावर समोरासमोर, नावानिशी वार करण्याची यांची हिंमत नाही. अहो स्वत:च्या वडिलांचंच नाव ज्यांना माहीत नाही ती मंडळी नावानिशी हल्ले तरी काय करणार?

असो..

या बाबतीत उपाययोजना सुरू आहे. येत्या काही दिवसात आम्ही काही ठोस उपाययोजना करू अशी खात्री आहे. सभासदांच्या झालेल्या/होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे..

आपला,
तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

7 Dec 2008 - 8:03 am | मदनबाण

अहो तात्या असं काय करता,,मुख्य पानावर एक गुलाबाचे चित्र लावा .. आणि खाली गांधीजींचे एखादे वाक्य लिहा म्हणजे हल्ला करणारा ते वाचेल व त्याचे मन पालटेल..(गांधीवाद) आपणही प्रयोग करुन पाहु काय? :D
बघा नक्कीच परिणाम होईल् !!

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

टारझन's picture

7 Dec 2008 - 12:42 pm | टारझन

असेच म्हणनार होतो. आपल्या इथल्या कलंत्री साहेबांसारख्या मान्यवर गांधीवादी लोकांनी मिपाच्या अशुभचिंतकांपर्यंत पोचेल असा एक सद् भावना लेख लिहावा.... :)

मिपाचे अशुभचिंतक , गेट वेल सुन

- टारझन

रामदास's picture

7 Dec 2008 - 8:14 am | रामदास

आपला डेटा कायमचा नाहीसा तर होणार नाही ना?
बरेच जण लिखाणाची प्रत ठेवत नसतील तर त्यांनी काही खबरदारी घ्यायला हवी का?

विसोबा खेचर's picture

7 Dec 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

मिपाचा बॅकप वरचेवर घेतला जातो.. तरीही प्रत्येकाने आपापल्या लेखनाची एक प्रत आपल्या ब्लॉगवर अथवा अन्य ठिकाणी जतन करणे आवश्यक आहे...

तात्या.

कपिल काळे's picture

7 Dec 2008 - 8:57 am | कपिल काळे

लॉगिन झाल्यावर वर्ड व्हेरिफिकेशन ची पायरी ठेवता येइल का?
तसेच ५० पाने वाचल्यावर आपोआप लॉगआउट व्हावे.

असे काही उपाय करता येतील का? ( जर ह्या मशीन जनरेटेड हिट्स असतील तर )

आप्ल्या हिथे संगनक हाबियंते हाय्त ना त्येंनी कायत्र शक्कल लडवावी बुवा ह्यावर.
येकवेळ मुंबैवर हल्ले करनारयास्नी शिक्षा करता यील. पन ह्ये आसले आतिरेकी? त्येंचं काय कराय्च?

विसोबा खेचर's picture

7 Dec 2008 - 9:00 am | विसोबा खेचर

येकवेळ मुंबैवर हल्ले करनारयास्नी शिक्षा करता यील. पन ह्ये आसले आतिरेकी? त्येंचं काय कराय्च?

हम्म! सुरू आहेत उपाययोजना. हा तात्या या मनोगतींना पुरून उरेल एवढं निश्चित..!

तात्या.

वेताळ's picture

7 Dec 2008 - 10:32 am | वेताळ

आल्यावर ५ मिनिटे जर का काही डेटा शेअर केला नसेल तर अटोमेटिक लोगऑफ होईल असे काहीतरी करायला हवे.
वेताळ

विकि's picture

7 Dec 2008 - 1:36 pm | विकि

काल मिपा चे संकेतस्थळ उधडतच नव्हते का ते कळत नव्हते आता कळाले.
संकेतस्थळांच्या आंतरष्ट्रीय राजकारणाने रौद्ररुप धारण केलेले आहे.संकेतस्थळांचे शीतयुध्द असे याचे वर्णन मी करेन.
प्रश्न-त्यासाठी तात्या नाटो,वार्सा करार करणार की अलिप्त राहणार?

नीलकांत's picture

7 Dec 2008 - 7:43 pm | नीलकांत

याविषयी अनेक शक्यता तपासून काही पर्याय समोर आलेले आहेत. त्यातील काही चांगले असूनसुध्दा त्यामुळे सदस्यांना अनावश्यक त्रास होईल एवढ्या कारणामुळे तात्यांना ते नकोय. मिसळपावचे साधे सोपे स्वरूप कायम रहायला हवे असा त्यांचा आग्रह आहे आणि नवीन लोकांचं नेहमी स्वागतच व्हावे अशी सुध्दा इच्छा आहे. त्यामुळे येण्याची नोंद केल्याशीवाय वाचता येणार नाही अशी आडकाठी टाकायचा विचार नाही. मात्र एक पर्याय म्हणून हा आजही आपल्या जवळ आहे.

मधातच कॅपचा टाका किंवा वारंवार अश्या साईट ओढणार्‍या आयपींना बॅन करा असे उपाय करता येतील.

आज मात्र सर्व मिपाकरांना एवढंच सांगू इच्छीतो आहे की या समस्येवर उपाय काढणे चालला आहे. सदस्यांना त्रासदायक उपाय टाळले पाहिजेत असा आग्रह असल्यामुळे थोडा विलंब होतो आहे.
मिपाकरांना होणारा त्रास मिपा व्यवस्थापनाला पुरेपुर ठाऊक आहे. मिपासाठी काम चाललेलं आहे.

आज पर्यंत मिपाकरांनी दिली तशीच साथ यापुढेही द्यावी. ह्या अडचणीवर आपण नक्की मात करू !

धन्यवाद.

विनायक प्रभू's picture

7 Dec 2008 - 8:21 pm | विनायक प्रभू

तात्या, निलकांत आगे बढो, हम तुम्हारे साथ है

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2008 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, निलकांत आगे बढो, हम तुम्हारे साथ है

सुनील's picture

8 Dec 2008 - 2:29 pm | सुनील

सहमत

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक पाचलग's picture

7 Dec 2008 - 8:13 pm | विनायक पाचलग

आताही १तास तोच प्रॉब्लेम होता

आनंद घारे's picture

7 Dec 2008 - 8:20 pm | आनंद घारे

सदस्यांना त्रासदायक उपाय टाळले पाहिजेत असा आग्रह असल्यामुळे थोडा विलंब होतो आहे.

कमांडोज घटनास्थळी पोचल्यावरसुद्धा अतिरेक्यांना मारायला इतका वेळ का लागतो आहे म्हणून काही लोक अस्वस्थ होत होते. नागरिकांचे किंवा पाहुण्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनाही काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. त्याची आठवण झाली.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

7 Dec 2008 - 9:13 pm | सर्वसाक्षी

तात्या,

घरातल्यांकडे 'गैरसोयीबद्दल दिलगीर' वगैरे भाषा वापरयची नसते, त्याची गरज नाही. मात्र खोड्या काढणार्‍यांचा बंदोबस्त अवश्य कर.

असे उद्योग करुन लोक मिपा वर यायचे थांबतील का? नाही; पण हे माहित असूनही ते काड्याघालु मिपावर हल्ले करीत आहेत तेव्हा हे फारच वैयक्तिक पातळीवर गेलेले दिसते आणि तेही अर्थातच हीन पातळीवर.

विकेड बनी's picture

8 Dec 2008 - 4:18 am | विकेड बनी

हे अमेरिकी शत्रू कोण ते कसे कळणार. आयपी काढता येतात का त्यांचे.

दवबिन्दु's picture

8 Dec 2008 - 8:38 am | दवबिन्दु

हे मनोगती म्हंजे कोनेत. ते असा दुष्टपना काहुन करुन राहिलेत, पोलिसकडे सांगितलं तर काही उपेग होईल का?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2008 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हास फक्त त्यांचे आय.पी. द्यावेत ! रोज एक नविन राउटर आणी मोडेम नाहि विकत आणायला लावला तर बोला !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

तात्या आणि नीलकांत,

तात्यांनी असा आग्रह धरणे समजू शकतो. पण....

"नाठाळाचे माथी हाणावी एक ती काठी " हे ही तितकेच खरे आहे.
तस्मात आम्हाला कितीही त्रास झाला तरी हे घुसखोर कायमचे पळवायचा उपाय
योजावा अशी नम्र विनंती.