"वाद"

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
6 Dec 2008 - 3:21 pm
गाभा: 

"वाद"
गेले बरेच दिवस सातत्याने मिपावर ,मुंबई वरिल अतिरेक्यांच्या हल्यामुळे त्याविषयी इथल्या सदस्यांनी
वेगवेगळ्या धाग्यांमधून आपली मते हिरिहिरिने मांडलि.
अतिरेक्यांच्या पोषणकर्त्या पाकिस्तान वर भारताने थेट हल्ला करावा पासून ते गांधीवादाने अतिरेक्यांना
कसे पराभूत करता येइल वगैरे अनेक विचार समोर आले.
वाचताना ब-याच वेळा गांधी"वाद" हा शब्द नजरेत आला.
त्यातून एक विचार समोर आला म्हणजे कि हे व्यक्ति जन्मित "वाद" किंवा "ism" हे कालातीत असतात काय?

गेल्या शतकाच्या सुरुवातीला रशियात व पुर्व युरोपात भांडवलशाहीच्या विरोधात कार्ल मार्क्सचा "साम्यवाद" वा "कम्युनिझम" जन्माला आले.
त्यालाच पुढे "मार्क्सवाद" असे नाव आले.
त्यावेळची राजकिय व एकंदर सामाजिक परिस्थिती पाहता हा "मार्क्सवाद" कमालिचा यशस्वी ठरला.
परंतु गेल्या शतकाच्या उत्तरार्धात खुद्द रशियानेच ह्या मार्क्सवादाला झिडकारून नवीन राजकीय रचना स्वीकारली.
सद्य परिस्थितीत ह्या मार्क्सवादाचा चीन सोडला तर इतरत्र कुठे हि प्रभाव आढळत नाहि.
चीन ने हि मार्क्सवाद अंगीकारताना सद्य परिस्थितीचे भान सोडलेले नाहि व जरुर तश्या सुधारणा हि अंगीकारल्या.
अर्थात तिथे कम्युनिस्ट मुळे खोलवर रुजलेली आहेत व ह्या सुधारणा फ़क्त आर्थिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच केलेल्या दिसतात.
भारताहि स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने महात्मा गांधिंचा "अहिंसावाद" वा "गांधीवाद" जगासमोर आला.
गांधीजींचा हा "अहिंसावाद"च इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडणारा ठरला असा प्रसार हि ऎकण्यात येतो.तो कितपत खराखोटा आहे
हा मुद्दा वेगळा.स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात भारतात आर्थिक ,सामाजिक व राजकिय अश्या ब-याच पातळ्यांवर
प्रचंड फ़रक पडला आहे.त्याकाळात अतिशय प्रभावी असलेला "गांधीवाद" आताशा मुश्किलिने आढळतो.

मार्क्सवाद व गांधीवाद हे दोन्ही काळाच्या चक्रात अडकून मागे पडलेले दिसतात.
मुख्यत: एक विशिष्ट सामाजिक व राजकिय परिस्थिती अश्या एखाद्या "वादाला" किंवा विचाराला जन्म देताना दिसते.
परंतु त्या वादाचे अनुयायी पिढ्या न पिढ्या तोच विचार नवीन परिस्थितीत पुढे दामटताना दिसतात.

वरिल दोन्हि "वाद" पाहिल्यावर हे "वाद" किंवा "ism" हे कालातीत असु शकतात काय?
का त्या विचारांमधे कालानुरुप सुधारणा अपेक्षित आहे?

चर्चा अपेक्षित.

अभिज्ञ.

प्रतिक्रिया

कवटी's picture

6 Dec 2008 - 3:59 pm | कवटी

मार्क्सवाद व गांधीवाद हे दोन्ही काळाच्या चक्रात अडकून मागे पडलेले दिसतात.
सहमत.
मुख्यत: एक विशिष्ट सामाजिक व राजकिय परिस्थिती अश्या एखाद्या "वादाला" किंवा विचाराला जन्म देताना दिसते.
परंतु त्या वादाचे अनुयायी पिढ्या न पिढ्या तोच विचार नवीन परिस्थितीत पुढे दामटताना दिसतात.

खरे आहे.

वरिल दोन्हि "वाद" पाहिल्यावर हे "वाद" किंवा "ism" हे कालातीत असु शकतात काय?
मला तरी तसे वाटत नाही.

का त्या विचारांमधे कालानुरुप सुधारणा अपेक्षित आहे?
होय.
जे काळानुरुप बदलत नाही ते कालौघात नष्ट होते.

हिंदू संस्क्रुती ही कालानुरुप बदलत गेली. एखाद्या नदी सारखी वाहती राहीली त्यामुळेच हजारो वर्ष टिकून राहीली.
यापुढेही इतर धर्मांप्रमाणे डबक्याचे स्वरूप धारण न करता अशीच कालानुरुप बदलत गेली तरच इथून पुढेही हजारो वर्ष टिकेल.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

प्रकाश घाटपांडे's picture

6 Dec 2008 - 4:30 pm | प्रकाश घाटपांडे

वरिल दोन्हि "वाद" पाहिल्यावर हे "वाद" किंवा "ism" हे कालातीत असु शकतात काय?
का त्या विचारांमधे कालानुरुप सुधारणा अपेक्षित आहे?

अभिज्ञा ! लेखातच याचे अप्रत्यक्ष विवेचन आले आहे. त्याच्याशी सहमत आहे.

प्रकाश घाटपांडे

या विषयावर अजून खोलात आणि मुळातच जाऊन विचार करावयाला हवा.

अनेकवेळेस आपली माहिती या मूळ विचाराच्या आपण इकडून अथवा तिकडुन कानावर आलेल्या वाक्यावर आधारीत असते.

दुसरा भाग म्हणजे कोणताही विचार हा कालातीतच असतो. उदा. मार्क्सवाद यात शासनाची मालकी आणि सर्वांची बांधिलकी अपेक्षित आहे. सध्या मुक्त अर्थव्यवस्थेत अनेक व्यापाराला / संस्थांना सरकारी मदत म्हणजे का? त्या संस्था डुबल्यातर अनेक लोकांचे नुक्सान होणार असते, ते होऊ नये म्हणजे त्यांनाही मार्क्सचा सहारा घ्यावा लागला. ( सध्याचे अमेरिकेलेतील अनेक पॅकेजस).

त्यामूळे कोणताही विचार कालबाह्य नाही असे मला वाटते.

अभिज्ञ's picture

8 Dec 2008 - 10:51 pm | अभिज्ञ

माझा प्रश्न असा आहे कि,
मार्क्सवाद वा गांधीवाद हा जसाच्या तसा आजच्या परिस्थितीत लागु पडेल काय?

अभिज्ञ.

अवांतरः
नेहरुंना अभिप्रेत असलेला "समाजवाद" हा नक्की काय होता?
"समाजवाद" हा "साम्यवादाचाच एक प्रकार आहे काय?

आंबोळी's picture

6 Dec 2008 - 4:36 pm | आंबोळी

वा वा!

तापल्या तव्यावर आजुन एक पोळी.... छान.

गांधीवादी,त्यांचे अनुमोदक व बहिणीला अर्वाच्य बोलणार्‍या गुंडाला धोपटावे तसे याना धोपटणारे, काय प्रतिक्रीया देतात या प्रतिक्षेत.....
आंबोळी

विनायक पाचलग's picture

6 Dec 2008 - 5:02 pm | विनायक पाचलग

हो आपल्या सर्वान्शी मी सहमत आहे पण मला येथे अजुन एक मुद्दा मान्डावासा वाटतो.भारतात अजुन एक वाद आहे .जो गेले १०००० वर्श अस्तित्वात आहे .त्या वादाचे नाव इश्वरवाद्.आपण सर्व भारतिय इश्वराच्या नावाने का होइना पण आततायीपणा करत नाही .आप्ले वागणे निस्र्गावर आधारीत आहे त्यामुळेच आपण तग धरुन आहोत .
मित्रानो यावर मला खुप काथ्याकुट अपेक्शित आहे .
जेव्हा मन्दी आली तेव्हा मला वरचाच प्रश्न पडला होता .
त्यासम्बन्धी माहीती मी मिळवत आहे.पुरेशी माहिती मिळली की या तिन्हि वादावर आणि नवीन गान्धीवादावर (माझ्या द्रुश्तीने तो नवीनच आहे .त्या पिक्चरामुळे समजला नाहितर धुळ खात पडला होता)सविस्तर लिहिन

अभिजीत's picture

7 Dec 2008 - 9:08 am | अभिजीत

>>सद्य परिस्थितीत ह्या मार्क्सवादाचा चीन सोडला तर इतरत्र कुठे हि प्रभाव आढळत नाहि ..
नाही बरका .. अजून एक देश ह्या मार्क्सवादाच्या प्रभावात आहे .. तो म्हणजे भारत. ;)

- अभिजीत