रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
15 Feb 2022 - 9:47 am

बरेच दिवस कविता लिहिली नव्हती ,
पेपरमध्ये वाचले

"आम्हा घरी धन,*
*शब्दांचीच रत्ने..."
_ जगतगुरू तुकाराम

मी सुटलो... बुंगाट

आम्हा घरी धन,
शब्दांचीच रत्ने,
जुळवू प्रयत्ने,
यमके ही.

काय हे जाहले,
कोसळला बाजार,
कोणता आजार
म्हणावा हा?

जगाचा पोलीस पाटील,
तू ते तर मी हे करेन
भेदरला बिचारा युक्रेन
युद्ध ज्वर

लोक हैराण त्यात,
निवडणूक धुरळा,
जणू अंगावर झुरळा,
झटकती

वाहक ही गांजले
इथे ट्रॅफिक जाम
अमृतांजन बाम,
चोपडती

शिक्षणाचा खेळ खंडोबा
तास ऑनलाईन
इयत्तेला सलाईन
बोंबलाई

यात ही कुणी स्मार्ट
गाजवी आक्शन शार्क
मिळवूनी फुल मार्क
स्टार्ट अप!

अभंगकविता

प्रतिक्रिया

बाजीगर's picture

15 Feb 2022 - 2:12 pm | बाजीगर

शार्क = Shark tank
Tv show

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2022 - 1:08 pm | चौथा कोनाडा

जुळवू प्रयत्ने,
यमके ही.

छान, मस्त.
'सुरेख जमून गेलीय रचना !

यात ही कुणी स्मार्ट
गाजवी आक्शन शार्क
मिळवूनी फुल मार्क
स्टार्ट अप!

हे खुप आवडले. बर्‍याच जणांनी छाप पाडून इन्व्हेस्टमेण्टस पदरात पाडून घेतल्या.
खरोखर स्मार्ट नवउद्योजक !
मुळात शार्क टँक इंडिया हा कार्यक्रमच आवडला !

|| पुढील रचेनेच्या प्रतिक्षेत ||

बाजीगर's picture

19 Feb 2022 - 8:37 am | बाजीगर

चौथा कोनाडा जी आपल्या दिलखुलास दाद मुळे उत्साह वाढला आहे,
खूप धन्यवाद.