ध्रांगध्रा - २१ ( अंतीम )

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
29 Jan 2022 - 12:35 am

मला माझ्या मानेवर कसलासा थंड पणा जाणवतो. कसलासा थंड ओला स्पर्ष.माझ्या डावी कडे आणि उजवीकडे दोन मांजरे येऊन बसली आहेत. रानमांजरापेक्षा मोठी आहेत. त्यांचे तोंड मात्र माकडासारखे आहे. पाठीच्या कण्यातून बर्फाची लादी फिरवावी तशी शिरशिरी जाते. .... मर्कट व्याळ........ कथापुराणातून ऐकलेला , कधी शिल्पात पाहिलेले प्राणी माझ्या आजूबाजूला जिवंत बसलेत. महेश म्हणत होता ते खोटं नव्हतं.. माझ्या बाजूला बसल्यावर त्यांचं गुरगुरणं थांबलंय.
खिरलापखिरला माझ्याकडे थंड नजरेने पहातोय. त्याची ती नजर मी टाळू शकत नाही.

मागील दुवा ध्रांगध्रा - २० http://misalpav.com/node/49829
" धन्यवाद . माझी यंत्र मुद्रा परत आणलीस." ... खिरलापखिरला बोलल्याचा आवाज येत नाही. माझ्या मनात त्याचे शब्द उमटतात.
" माझा..... माझा मित्र महेश..... कुठे आहे?" माझ्या तोम्डातून शब्द फुटत नाहीत. दातखीळ बसलीये बहुतेक.
" त्याने गुन्हा केलाय. त्याची शिक्षा त्याला मिळाली"....माझ्या मनातला प्रश्न त्याला ऐकू गेला त्यावर त्याने उत्तर दिलंय.
" हे माझे मंदीर आहे. इथे आमचं राज्य चालतं. इथे आलात हा एक गुन्हा आणि त्यापेक्षा मोठा गुन्हा त्याने केला. त्याने माझी ध्रांगध्रा यंत्र मुद्रा चोरली." खिरलापखिरलाचा आवाज येत नाही. त्याचे शब्द मनात उमटताहेत पण त्या शब्दातल्या रागाची तीव्रता जाणवतेय. ही जाणीव अख्ख्या शरीराला होते. आत कुठेतरी सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात. असली अघोरी अनुभूती कोणालाच येवू नये कधी.
" कसलं यंत्र? " मी विचारतो.
" ध्रांगध्रा यंत्र. महर्षी विश्वामित्रांकडून मिळवलेलं ध्रांगध्रा यंत्र. ते त्यांनी सिद्ध केलंय. काळ्या पाचूच्या अष्टकोनी स्फटीकावर सिद्ध केलेलं यंत्र " माझ्या मनात शब्द उमटताहेत.
" म्हणजे ती तबकडी?"
" हो आम्हाला सर्वात पवित्र ध्रांगध्रा यंत्र मुद्रा. तुझ्या मित्राने ती चोरली.त्याची शिक्षा त्याला मिळाली. त्याला त्याच वेळेस शिक्षा देता आली असती. पण आमच्या रक्षकांनीच हलगर्जीपणा केला.
" म्हणजे काय शिक्षा केली त्याला"
"तो आता इथेच रहाणार"
"म्हणजे?"
त्या तळघराची दारे बंद झाली . ज्या वेळेस राहू मकर राशीत , मंगळ मेश राशीत वक्री आणि शनी धनू राशीत असेल त्याच वेळेस हे दरवाजे पुन्हा उघडतील. तो या गावात राहील येथून बाहेर पडू शकणार नाही.
मला काहीच कळत नाहिय्ये.
" कळून तरी काय करणार आहेस? पण तरी सांगतो. हे देवालंय माझे आहे. महर्षी विश्वामित्रांकडून प्रतिसृष्टी करायचं तंत्र मी अवगत करून घेतलं गुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी रहस्य देखील माहीत करून घेतलं. राक्षसांना पुन्हा जिवीत करण्यासाठी संजीवनी मंत्राची पारायणे करणार्‍या ब्रम्हवृंदात मी होतो.माझ्या सगळ्या मित्रांना आप्तांना मी जिवंत केलं . ही देवळातली शिल्पे बघतोस ना ती शिल्पे नाहीत. हे सगळे जिवंत आहेत. विश्वामित्रांकडुन प्रतिसृष्टी करण्याची विद्या अर्धवटच शिकायला मिळाली. राजा त्रिशंकूला सदेह स्वर्गात नेण्याचे वचन त्यांनी दिले. ब्रम्ह्याने ते पूर्ण करू दिले नाही म्हणून महर्षीनी प्रतिसृष्टी बनवली. पण ब्रहस्पतींच्या आदेशामुळे विश्वामित्रांना ती करताना त्यांचे सगळे तप वापरावे लागले. त्यांचे पुण्य कामी आले. ही शिल्पे बघतोस ना ती जिवंत आहेत. तुझ्या कडच्या यंत्राने त्यांची छायाचित्रे घेतलीस ना. ती नीट पहा परत एकदा. मी माझी सृष्टी निर्माणकेली आहे. प्रतिसृष्टी करण्याचं तंत्र शिकताना मी पकडला गेलो. आणि विद्याही अर्धीच आत्मसात झाली. महर्षीनी शाप दिला ते वेगळंच मी शिल्पांमधे जीव ओतू शकतो पण त्यांना वेगळा चेहेरा देऊ शकत नाही. सगळे एकाच छापाचे होतात. इथे आलेल्या माणसांचे चेहरे मी काडुन घेतो आणि ते माझ्या सृष्टीतल्या माणसांना देतो.
मी ऐकतोय .... कधी कल्पनाही केली नव्हती असं. इथल्या गावातल्या सगळ्या लोकांचे चेहरे एकसारखे कसे ते समजतंय. विश्वास बसत नाही पण ते या डोळ्यांनी पाहिलंय.
" नवीन चेहरा मिळाला की त्या शिल्प सजिवाला इथे वरच्या सभामंडपात स्थान मिळतं. आणि ज्याचा चेहेरा काढून घेतला त्याला माझ्या सृष्टीतल्या शिल्पाचा चेहेर देऊन टाकतो. या गावातली माणसे पाहिली असशीलच तू येताना. सगळी कशी एकाच यंत्रातून काढल्यासारखी. एक सारखी. एकाच छापाची दिसतात. मी त्या सगळ्यांचे चेहरे काढून घेतले आहेत." खिरलापखिरला सांगतोय ते खरं आहे. खाली सभागृहातल्या शिल्पांचे चेहरे एकसारखे होते. जुळ्यांसारखे आणि इथे गाभार्‍यातल्या शिल्पांचे चेहरे वेगवेगळे आहेत.
" तु तू खोटं बोलतो आहेस... तु बहुरूपी आहेस. असल्या कपोलकल्पीत गोष्टी साम्गून मला घाबरवू नकोस." कुठून कोण जाणे माझ्यात प्रश्न विचारायचम धाडस आलंय.या माणसाने. राक्षसाने महेशला गायब केलंय.याचा मला राग आलाय. रागाने भितीवर मात केली असावी.
" कपोलकल्पीत...... हा हा हा...." खिरलापखिरला कुत्सीत हसतो." तुझ्या शेजारी दोन्ही बाजूला बसलेत ना त्या दोन प्राण्यांकडे पहा जरा. आणि मग साम्ग कपोलकल्पीत काय आहे ते !"
माझ्या दोन्ही बाजूला कमरे इतक्य औंचीचे मर्कट व्याळ बसलेत. ही जाणीव मला माझ्या हतबलतेची आठवण करून द्यायला पुरेशी आहे आपण एका अमानवी आस्तित्वाच्या समोर आहोत. पाठीवरून एक घामाचा ओघळ खाली पायापर्यंत वहात पोहोचलाय. समजतंय पण मन आपण हतबल आहोत हे मान्य करत नाही. माझं मन आणि शरीर यांत द्वंद्व चाललंय.
" मला माझ्या शक्तिचा आंदाज आहे. तो तुला नाहिय्ये. तुला तो पटवून द्यायची मला गरज नाही." खिरलापखिरला शब्दातून त्याच्या समोर मी किती क्षुल्लक आहे हे दाखवून देतो.
" महेश.... महेश .... माझा मित्र कुठे आहे?"
"तो तळघरात आहे. त्याने गुन्हा केलाय त्याची शिक्षा भोगेल तो."
" म्हणजे... म्हणजे....... तो ..... तो " मला तो महेशचे काय करणार आहे याची कल्पनाही करवत नाही.महेश कुठल्यातरी एका अमानवी शक्तिच्या हातात सापडलाय. त्याला यातून बाहेर काढायलाच हवं. मी पूर्ण प्रश्न विचारू शकत नाही.
" नाही नाही तु म्हणतोस तसं की त्याचे काही करणार नाही. की त्याला कसला त्रासही देणार नाही. मी राक्षस कुळातला आहे. योद्धा आहे. फसवून त्रास द्यायला मी पिशाच्च कुळातला नाही. त्याने माझ्या राज्यात येवून आमच्या महान ध्रांगध्रा यंत्राला हात लावला. चोरलं. त्याची शिक्षा मिळेल त्याला"
" क....क क काय शिक्षा देणार त्याला?" माझे विचारही आता चाचरत येताहेत. एखादी अमानवी शक्ति माणसाला काय शिक्षा देऊ शकते याचा विचारही करता येत नाही.
" तु... तुम्ही त्याला काय करणार आहात.?" अघटीताच्या विचाराने मी आता आणखीनच चाचरतोय. " तुम्ही त्याला....."
: नाही मी त्याला ठार करणार नाही. ... मी फक्त त्याचा चेहेरा काढून घेणार. आणि तो तळघरातल्या एका मूर्तीला देणार." खिरलापखिरला कय बोलतोय ते मला कळंत नाही. पण महेश जिवंत आहे. सूखरूप आहे हे माझ्यापर्यंत पोहोचतं.
" चेहेरा काढल्यानंतर त्याला मूर्तीचा चेहेरा मिळेल गावातल्या इतर लोकांसारखा."
" हे ... हे हे भयंकर आहे. एखाद्याचा चेहेरा काढून घ्यायचा म्हणजे...." मी कुठल्या अवसानाने बोलतोय मलाच सांगता येत नाहिय्ये. कोपर्‍यात सापडलेलं मांजर पळून जायला जागा नसली की समोरच्यावर उलटून हल्ला करतं. तस्म असेल. माझ्य अबोलण्याने रागावून हा मलाही महेशसारखाच बंदी करेल
" नाही मी तुला काही करणार नाही."
माझे विचार तो वाचू शकतो हे मी विसरलोच होतो.
" तुझे आमच्यावर अगणीत उपकार आहेत. तुझ्यामुळे आम्हाला हे ध्रांगध्रा यंत्र परत मिळालय.. तू नसतात तर तुझ्य अजित्राने ते परत आणलं नसते. आम्हाल उपकारात रहायची सवय नाही. त्याची परत फेड म्हऊन तुला काही करणार नाही. हे माझं वचन आहे. मात्र तेही काही मर्यादेपर्यंत पाळू शकेन. पुढच्या अर्ध्या घटीकेपुरतंच. त्या दरम्यान तू येथून निघून जा. अन्यथा हे व्याळ तुझं कय करतील हे वेगळम साम्गायला नको." खिरलापखिरलाच्या पुढे आपण किती हतबल आहोत हे पुन्हा एकदा जाणवलं. वातावरणात काहीतरी वेगळं जाणवतं.
कसलासा ओल्या गवताचा आणि काहितरी कुबट जळाल्याचा तीव्र वास येतोय.हा असला घाणेरडा वास इथे आतापर्यंत कधीच आला नाही.डोळ्यांना काहीतरी वेगळं जाणवतंय. वार्‍याने रांगोळी विखरंत जावी तसा खिरलापखिरला विखरंत चाललाय....तो अदृष्य होतोय. अगोदर त्याचा चेहेरा...... मग छाती.... हात .. कम्बर... पाय..... संपूर्ण हवेत विरून गेलाय.
माझ्या दोन्ही बाजूंचे व्याळ आता गुरगुरायला लागलेत. भिम्तीच्या आठही कोपर्‍यांकडून एक एक व्याळ बाहेर येताहेत. मी मागे सरकतो. दुसरा पर्यायच नाही.मी आणखीन माग एजातो. व्याळ आता दुपटीने वाढतात.आधी दोन होते. मग चार आठ, आता ते पंधरा सोळा असतील. मला पूर्ण घेरलंय. त्यांचे हिंस्त्र चेहरे पाहून कोनाचंही रक्त थिजून जाइल . ते सगळे माझ्याकडे दात विचकून पहाताहेत. मी आणखी मागे सरकतो. ते एक एक पाऊल माझ्याकडे येताहेत. मी मागे मागे सरकत त्याच्म्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो. थोडा दूर जातो. मग पाठमोरा फिरतो. आणि जोरात पळायला लागतो.
जीव अक्षरशः मुठीत घेऊन पळतो. देवळाच्या बाहेर कधी पडलो. गावातल्या रस्त्यावर कधी आलो.... खंदकाच्या पायर्‍यांवर येवून पाण्यात धावायला लागलो. ते समजलेच नाही. संध्याकाळ होऊन अंधार पडलाय. हे ही लक्ष्यात आले नाही. वाघ मागे लागल्यासारखे पळणे म्हणजे काय हे अनुभवतोय. छातीचा लोहाराचा भाता झालाय.खंदकात पाय घसरला की कय झाले ते समजत नाही. मी पाण्यात गटांगळ्या खातो. मी धडपडत उभा रहातो.पळत रहातो. त्या राक्षसी व्याळांपासून स्वतःला वाचवायचंय. कसंही करून. एखादा दुसरा असता तर दगड मारता आला असता. पण हे संख्येने कितीतरी आहेत. एकाने एक लचका तोडायचा म्हंटलं तरी मी दोन मिनीटात होत्याचा नव्हता होईन.
मी पळत रहातो. डोंगराच्या मुख्य पायवाटेवर आलोय. मागे वळून पहाण्याच धाडस माझ्यात नाही. जिवंत रहायचं असेल तर त्या व्याळांनी अपला फडशा पाडण्यापासून वाचायचं असेल तर पळत रहायचं.इतकंच मला समजतं. उतारावर पळताना तोल जातो. मी ठेचकाळतो. मी पुन्हा उभा रहातो. पळतो. जीव खाऊन पळतो.
डोंगराचा उतार संपला. थोड्या अंतरावर समोर महेशच्या कांची गाडी उभी आहे. मी गाडीजवळ पोहोचतो. किल्लीसाठी खिसे चाचपतो. गाडीची किल्ली सापडत नाही. खिशाचा कोपरान कोपरा तपासतो. गाडीची किल्ली सापडत नाही. ते व्याळ......माझ्या मागावर आहेत. ..... सापड किल्ली सापड....सापड किल्ली सापड.
मी मनात धावा करतोय. खिसे पुन्हा पुन्हा तपासतोय.अचानक आथवते. गाडीची किल्ली आपण सॅकच्या आतल्या कप्प्यात ठेवली आहे.मी सॅक तपासतो. हाताला किल्ली लागते. जीव भांड्यात पडतो.
किल्लीने गाडीचे दार उघडून मी आत बसतो. गाडी चालु करतो. अ‍ॅक्सीलेटर दाबून वेगात उलटा फिरत मुख्य रस्त्याला लागतो. माझी नज रीयर व्ह्यू मिररवर आहे.मागून काही येताना दिसतंय का पहातोय.
गाडीने सणकत एक तासभर तरी पुढे आलो असेन. घामाने माझे सर्वांग ओलं झालंय.मागून कोणी आता येत नाहिय्ये याची खात्री झाल्यावर खिडकीची काच उघडतो. गार वार्‍यामुळे जरा बरे वाटते.
थोड्या दूरवर एक दिवा दिसतोय. धाबा असावा. तो दिवा जवळ आल्यावर मी गाडी थांबवतो. आणि तसाच बसून रहातो.ढाब्यावरचा माणूस काय हवं ते विचारायला येतो. मी त्याला खुणेनेच पाणी मागवतो.तो आणतो. पाणी प्यायल्यावर जरा मन शांत झालंय.
मी मोबाइल काढतो. स्क्रीनवर सकाळी अष्टकोनी सभामंडपात काढलेला व्हिडीयो आहे. मी यांत्रीकपणे व्हिडीओ प्ले करतो. त्यातलं दृष्य पाहून माझे डोळे विस्फारतात.व्होडीओ मधे खांबावरच्या भिंतीवरच्या मूर्तींचे डोळॅ हलताना दिसताहेत. त्याचंया चेहेर्‍यावरचे हावभाव जिवंत माणसांच्या चेहेर्‍यावरच्या हावभावाप्रमाणे बदलताना दिसतात.
तो खिरलापखिरला म्हणाला होता ते खरं आहे. त्या मूर्ती जिवंत आहेत...... महेशला त्यांच्या तावडीतून सोडवायचंय.
हा प्र्श्न आहेच... माझ्यापुढे आणखी एक वेगळाच प्रश्न उभा आहे. महेशच्या काकांना गाडी नेऊन देताना त्यानी महेश कुठे आहे विचारलं तर काय सांगायचं?

समाप्त.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

29 Jan 2022 - 2:29 am | श्रीगणेशा

काय शेवट होईल याची उत्सुकता होती.
छान झाला शेवट आणि संपूर्ण कथा मालिकाही _/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jan 2022 - 9:59 am | ज्ञानोबाचे पैजार

याचा सिक्वेल येउ द्या,
ज्या वेळेस राहू मकर राशीत , मंगळ मेश राशीत वक्री आणि शनी धनू राशीत असेल त्याच वेळेस हे दरवाजे पुन्हा उघडतील आणि महेश दरवाज्यातून बाहेर पडेल...

पैजारबुवा,

विजुभाऊ's picture

29 Jan 2022 - 2:48 pm | विजुभाऊ

विचार चालू आहे यावर

धर्मराजमुटके's picture

29 Jan 2022 - 9:50 am | धर्मराजमुटके

छान झाली कथा ! लिहित रहा.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

29 Jan 2022 - 10:04 am | ॲबसेंट माइंडेड ...

कथा आवडली.

Bhakti's picture

29 Jan 2022 - 10:35 am | Bhakti

भारी रहस्यमय, गूढ कथा होती.

गवि's picture

29 Jan 2022 - 11:03 am | गवि

आवडली. छान थीम.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jan 2022 - 1:45 pm | कानडाऊ योगेशु

सगळेच भाग उत्कंठावर्धक झालेत विजुभौ!

फारच छान ! आज संपूर्ण मालिका वाचली. आवडली.

असंका's picture

29 Jan 2022 - 5:10 pm | असंका

सुरेख!!
धन्यवाद!!

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2022 - 5:31 pm | चौथा कोनाडा

जबरी भारी रहस्यमय, गूढ कथा होती, गुंगवून टाकलेत !
मजा आली !
+१
विजूभाऊ _/\_

कर्नलतपस्वी's picture

29 Jan 2022 - 8:50 pm | कर्नलतपस्वी

गुढ कथेतील गुढ शेवटपर्यंत कायम ठेवत वाचकांना पुढील भागात काय होईल यावर विचार करायला भाग पाडले.उत्तम कथा. धन्यवाद

आता सुरवातीपासून वाचायला घेतो

शित्रेउमेश's picture

31 Jan 2022 - 8:30 am | शित्रेउमेश

भारी.....

सुखी's picture

31 Jan 2022 - 3:46 pm | सुखी

Prequel Ani sequal दोन्ही लिहून पूर्ण कराच अशी आग्रह पूर्वक विनंती