ध्रांगध्रा - ५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Jan 2022 - 8:24 am

अंधार होत चाललाय. त्याही अवस्थेत मी वर पहातो. सुर्याला एका काळ्या मातकट ढगाने झाकून टाकलंय. उजेड संपत चाललाय.
जाणवण्यासारख्या दोनच गोष्टी. माझ्या मनगटावरची घट्ट होत जाणारी महेशची "पकड" आणि अंधार......
मागील दुवा ध्रांगध्रा - ४ http://misalpav.com/node/49734
आ......ह. कुणीतरी टाळूवर थेट हातोडीने हाणलं असावं असं दुखतय डोकं.
मी डोक्याला मागे हात लावतो. बोटाला काहितरी ओलसर चिकट लागतं. अरे बापरे. हे काय....... रक्त!
माझे डोके दगडावर आपटलं. मागच्या बाजूला खोक पडली आहे. आजूबाजूला अंधारच दिसतोय. माझ्या बाजूला कसलंसं मुटकुळं पडलंय....... ते काय आहे ..कळायला मार्ग नाही. आसपास बराच अंधार आहे. जे काय आहे त्याची आउट लाइन दिसतेय. ते आता थोडेसे हललं.....
शिवा..... शिवा...... अरे हा तर महेश चा आवाज. हा इथे कसा? मग मी कुठे आहे? माझी नजर वर जाते. वर मोकळे आकाश दिसतय, बाजूला डोंगराचा कडा दिसतोय.....
अरे हां.... आपण महेशबरोबर आलोय सातमळ्याच्या डोंगरावर.
आत्ता माझ्या आलं लक्ष्यात. दुपारी आम्ही दोघे या पायवाटेने डोंगर चढत होतो. अगोदर ते चहावाले झेलेआण्णा भेटले. त्यानी इकडे डोंगरावर जाऊ नका सांगितले. त्या नंतर तो त्यांच्यासारखा दिसणारा माणूस आपल्याला दिसला.आणि मग...
अरे आपल्याला चक्कर आली. आणि महेशला पण त्याच वेळेस चक्कर यावी? हा कसला विचित्र योगयोग...
माझ्या बाजूला पडलेलं ते मुटकुळं सॉरी महेश ..... तो उठून बसलाय.
आम्हा दोघानाही इतका अंधार का आहे ते समजत नाहीये. हातातल्या घड्याळात साडे आठची वेळ दिसतेय.
बापरे इतकी रात्र झाली!...... आम्ही इथे आलो तेंव्हा दुपारचे जेमतेम अकरा साडे अकरा झाले होते. म्हणजे गेले आठएक तासे आम्ही इथेच पडून आहोत. मी आसपास पहातो. माझ्या बाजूला आमची सॅक पडली आहे.सॅकची चेन व्यवस्थित आहे. साईड पॉकेट मधे पाण्याची बाटली तशीच आहे. ....
महेश सॅकची चेन उघडून बघतो. आत सगळे व्यवस्थित आहे.
काय झालं रे..... आपण इथे कसे पडलो? महेशला कंठ फुटलाय. अंधारामुळे मला फक्त त्याची बाह्याकृतीच दिसतेय. पण बोलणं आणि हालचाली मघाशी होत होत्या तशा स्लो मोशन मधे होत नाहियेत.
"माहीत नाही. पण आपण इथे बराच वेळ झाला असेच पडलोय. मला चक्कर आली. आणि तू मला हाताला घट्ट धरून ओढत होतास. तुला काय होत होतं?"
"काय माहीत! तू अचानक फिल्म अडकते तसं थांबून थांबून चलायला लागलास. मला वाटलं तुला काहितरी होतय. म्हणून तुझा हात पकडला तर लाकडी काठी पकडावी तस्म वाटलं. आणि मग तूच मला ओढायला लागलास. मग अचानक गरगरल्यासारखे झाले. तुला पण खाली पडताना पाहिलं. तसेच फिल्म अडकत थाम्बत थांबत पुढे जावी तसं.
भास असेल रे.... अरे मलाही असंच झालं.
"दोघांनाही एकाचवेळेस एकसारखा भास ?"
हो ना. योगायोग म्हणायचा झालं. बाकी काय!"
"कसला विचीत्र योगायोग म्हणायचा रे हा! " योगायोग विचित्र खरा. पण महेशला त्या योगायोगाची गंमत वाटतेय.
"मला डोक्याला लागलंय.मागे खोक पडली आहे."
बापरे... माझेही डोकं ठणकतय.पण खोक वगैरे काही नाही.पण आपण इतका वेळ इथे पडलोय. या वाटेवरून कोणीच कसे आले गेले नाही? कोणाला दिसलो तरी असतो" महेशला ही पण गम्मत वाटतेय. बोलत असताना महेशने मला उभे रहायला हात दिला. मला मघाचा स्पर्ष आठवला. ... क्षणभर अंगाला शहारा आला. कसला शुष्क लाकडासारखा अमानवी स्पर्ष वाटत होता तो!
महेशला इतक्यावर्षात कितीतरी वेळा शेकहॅंड केला असेल. पण त्याचा स्पर्ष असा कधीच जाणवला नव्हता. त्याच्या हाताचा आधार घेऊन मी उठतो. या वेळेस स्पर्ष मघासारखा नाही. हा स्पर्ष नेहमीसारखाच आहे. शक्य आहे मघाशी चक्कर येत होती. त्यामुळे तसे वाटले असेल.
आम्ही उभे राहिलो. समोर एक विलक्षण देखावा दिसतोय.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

Bhakti's picture

4 Jan 2022 - 9:48 am | Bhakti

कथेतील उत्कंठा वाढत आहे.

गवि's picture

4 Jan 2022 - 11:17 am | गवि

भारी चालूय.. पण या स्टेजपर्यंत मात्र महेशला तरीही यात गंमतच वाटतेय हे जरा जड गेले. अर्थात पुढे काय होते त्यावर मत बदलेलही.

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Jan 2022 - 9:31 pm | बिपीन सुरेश सांगळे

विजुभौ
ध्रांगध्रा
या गावी वडलांची बदली होती . त्यामुळे सलग तीन वर्ष ते निवांत गाव निवांत पाहिले आहे .
नाव वाचल्यावरच उत्सुकता वाटली .
आपण विपुल लिहिता . उत्तम !
पुलेशु पुलेशु !

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Jan 2022 - 9:37 pm | बिपीन सुरेश सांगळे

मालिका छान चालू आहे .मी वरच्या - शीर्षक संदर्भामुळे कनेक्ट झालो , रिलेट झालो .
अर्थात शीर्षकाचा संदर्भ लागण्या साठी वेळ लागणार आहे का ?

कळावे
आभार

मुक्त विहारि's picture

5 Jan 2022 - 6:38 am | मुक्त विहारि

उत्कंठा वाढत आहे

विजुभाऊ's picture

5 Jan 2022 - 7:49 am | विजुभाऊ

पुढील भाग
ध्रांगध्रा - ६ http://misalpav.com/node/49739

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2022 - 9:56 pm | चौथा कोनाडा

चला, दोघेही चहावाले झेलेआण्णाच्या चकव्यातून बाहेर निघाले !
हुश्श् !
वाढत आहे उत्कंठा !

सुखी's picture

31 Jan 2022 - 8:43 am | सुखी

मस्त