लक्ष्मणपूर, एक पडाव.....

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
29 Dec 2021 - 10:35 am

"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्‍या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता.

गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी),
‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".

" झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !".

पहिल्यांदा आगगाडीत बसलो तेव्हां कुदंन लाल सैगल यांची "बाबूल मोरा नैहर छुटो ही जाय" , वाली "फिलींग",आली. स्वर्गातून नरकात आल्या सारखे वाटत होते. आपण क्षणभर थट्टा बाजूला ठेवूयात पण आजचा लेख लिहीण्याचा उद्देश काही वेगळाच आहे.

मित्रांनो मी स्वतःला भाग्यवान समजतो. भारत सरकारने असेतुहिमाचल दर्शन घडवले. मी आयुष्यातील जवळ जवळ एक तप लखनौ या अनोळखी शहरात राहीलो, वाढलो ,घडलो आणी माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टींशीं या शहराचा जवळचा संबंध आहे. म्हणूनच ते मला खूप आपलेसे वाटते. आज या शहरा बद्दल चार शब्द लिहून थोडे उतराई व्हावे म्हणतो.

त्रेतायुग ते आजतागायत हे शहर आपले अस्तित्व नुसते टिकवून आहे असे नाही तर त्याची आपली एक स्वतंत्र ओळख आहे. ५००० ख्रिस्तपुर्व , त्रेता युगात याचे नाव लक्ष्मणपूर होते. असे म्हटले जाते की लक्ष्मणाने या नगरीची स्थापना केली व नगरीच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे एक किल्ला बांधला होता़. एवढेच काय रामपुत्र कुश याने बसवलेले कुशावत, कुशीनगर म्हणजेच गोरखपूर येथून काही तासावरच आहे.

हे शहर गोमती नदीच्या काठावर, इथेच प्रभू श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ केला. प्रभू रामचंद्र पुत्रद्वयीनीं इथेच रामकथा गायली आशी मान्यता आहे. गोमती नदी ही वसिष्ठ ऋषींची मुलगी आसा प्राचीन ग्रंथा मधे उल्लेख आहे. पिलीभीत या उत्तर प्रदेशातील शहरा जवळील "गोमत ताल बनाम फुल्लारी झील" मधून या नदीचा उगम झाला असून ती पुढे लखनौ, सीतापुर, जौनपुर वरून सहाशे मैलाचा प्रवास करत गंगे मधे समाविष्ट होते.

जवळच प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी आहे. अवध बिहारी हे प्रभू श्रीरामांचे दुसरे नाव. या प्रदेशातील बोली भाषा "अवधी ", म्हणूनही प्रभू रामचंद्र यानां अवध बिहारी या नावाने येथील लोक प्रेमाने संबोधतात. याला प्रमाण काय म्हणून विचारले तर मला सागंता येणार नाही.

दुसरी प्राचिनतम ओळख म्हणजे नैमिष्यारंण्य जिथे ८८००० ऋषींनी तप केले आणी ज्याचा प्राचीन ग्रंथात उल्लेख मीळतो ते स्थान सुद्धा गोमती नदीच्या काठावर. लखनौ पासुन ९० कि मी वर आहे. चक्रतीर्थ , व्यास गद्दी , हनुमानगढी सारखी अनेक तीर्थस्थळे तेथे आहेत.

महाभारत काळात व बौद्ध काळातही याचे अस्तित्व होते. लुम्बिनी, सारनाथ, कपिलवस्तू ही प्रसिद्ध बौद्ध तिर्थक्षेत्रे याच्या आसपासच आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे शहराला खुपच प्राचीन इतिहास आहे.

आजही 'लक्ष्मण टिला', नावाची एक छोटीशी टेकडीनुमा जागा आहे.इथेच श्री लक्षुमणाचे मंदिर होते ते मोगलांनी तोडून तेथे मशीद बांधली असे म्हणतात. "टिले वाली मस्जिद",या नावाने ती इथे बघावयास मिळते. लक्षुमण टिला आणी टिलेवाली मस्जिद मी बघितली आहे.

पठाण शासक हिंदुस्तानात आले आणि लुटमार करुन निघुन गेले परंतु मुघलिया सलत्नत, बाबर आणी त्याचे उत्तराधिकारी इथेच स्थिरावले व त्यांनी आपले साम्राज्य पसरले. अधिकारीक माहिती प्रमाणे, साधारणपणे १४००-१५०० इ. स. च्या दरम्यान मोहम्मद गझनी ने हिंदुस्तान वर आक्रमण केले तेव्हा त्याचा भाचा सय्यद सिलार " लक्ष्मणपूर", येथे आला व त्याने लक्ष्मण टिल्या (टेकडी) ' जवळ "लिकना किल्ला", बांधला व या शहराला लखनौ असे नाव पडले.

मोगलांना आपल्या राज्याचे छोटे भाग म्हणजे सुबे निर्माण करून त्यावर एक सुभेदार शासक नेमला. 'नवाब -वझिर' आसा खिताब देण्यात आला. लखनौ, फैजाबाद, बाराबंकी सर्व परिसर अवध प्रांत/सुबा (Oudh) या नावाने ओळखला जातो. मुघलीया सल्तनतचा एक सुबा ज्याचा प्रमुख सुभेदार परंतू ही नेमणूक वंशपरंपरागत नव्हती. पुढे मुघलीया सल्तनत रसातळाला जाऊ लागली तेव्हा इथले नबाब ताकदवर झाले. शुजा उदौला हा लखनौचा नवाब याने पानिपतच्या युद्धात मराठ्यांना मदत करू नये म्हणून नजिबखान रोहील्याने आकाश पाताळ एक केले. नबाबाने अब्दालीला मदत केली व मराठी साम्राज्याला एक वेगळेच वळण देण्यास कारणीभूत ठरला.

असफौद्दौला,चौथा नवाब याने प्रातांची राजधानी फैजाबाद इथे होती ती नंतर लखनौला आणली. या शहराचा खरा विकास नवाब असफौद्दौला याच्या काळात झाला. तो एक कुशल शासक व दयाळू होता. त्याच्या बद्दल म्हटले जाते की,

"जिसको न दे मौला, उसको दे असफौद्दौला".

त्याच्याच कारकिर्दीत बडा इमामबाडा ,रुमी दरवाजा ,दौलत खाना, चार बाग,मुसाबाग आशा कलात्मक आणी स्थापत्यकलेचा अदभुत ,आश्चर्य कारक इमारतीं आणी सुंदर बागा निर्माण झाल्या.
जेव्हां दुष्काळ पडला होता तेव्हा इमामबाडा बाधांयला सुरवात केली. दिवसा बांधकाम करायचे आणी रात्रभर ते तोडायचे कारण लोकांना काम मीळावे म्हणून ,खैरात , अनुदान देण्यास नबाब राजी नव्हता आशीही एक किवंदती.स्थानिक लोक लखनौला 'नखलवू' म्हणतात. इंग्रज याला 'लकनवू "(Lucknow) म्हणायचे.

येथील प्रत्येक वास्तूवर एक वेगळा धागा लिहीता येईल. येथील प्रत्येक इमारत आपली एक वेगळी ओळख जपून आहे, मग ती नबाबांनी, ब्रिटीशांनी कीवां स्वातंत्र्या नंतर बाधंलेली आसो. छतर मझिंल, सिकंदर बाग, दिलकुशा कोठी, रेजिडेन्सी,सतखंडा, बारादरी,बटलर पँलेस, जनरल पोस्ट आँफिस , ला मार्टिनियर स्कुल ( Claude Martin, French m Major General who fought for the British; established La Martiniere Schools at Lucknow on 1 Oct 1857. हि एक प्रख्यात स्कुल गोमती नदीकाठी आहे.) आगदी चार बाग रेल्वे स्थानक आणी विधानसभा सुद्धा प्रेक्षणीय आहे. सन सतराशे आणी त्यानंतर बाधलेल्या इमारती आता पडक्या ,जीर्ण झालेल्या आसल्या तरी त्यांचा गत वैभवशाली इतिहास सहज लक्षात येतो.

खंडहर की हर ईंट गवाह है
वीराने के पहले बहार हुआ करती थी
टुटे हुये छज्जे और मेहराब
बयाँ करते है
इमारते बुलंद और हस्तीयाँ
कितनी उचीं हुआ करती थी।

-कसरत

आताचे लखनौ जुन्या इमारती, मुस्लिम, नबाबी , फिरंगी संस्कृती च्या खुणा व नवीन गगनचुंबी इमारती, उड्डाणपूल, मेट्रो, बोट्यानिकल गार्डन तथा आंबेडकर पार्क सारख्या आधुनीक सुखसोयी याचा सुरेख संगम आहे. आमचे मीत्र सांगतात की शहरातील रौनक अजूनच वाढली आहे.

खुपच मोठा इतिहास व सांस्कृतिक वारसा असणारे हे शहर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ही आग्रणी होते. बेगम हजरत महल, उदो देवी सारख्या वीरांगनानीं स्वातंत्र्य वीरांच्या खाद्यांला खादां देत ब्रिटीश सरकारच्या तोंडचे पाणी पळवले होते.

Darogha Ubbas Alli in his book " The Lucknow Album " , या १८७४ च्या पुस्तकात फिरंग्याची स्तुती करताना स्वातंत्र्य वीरानां "Fanatic and barbarous foe ", म्हणले आहे.

इंग्रज कवी आल्फरेड लाँर्ड टेनिसन (Alfred Lord Tennyson ), यांनी लखनौच्या रणधुमाळीत फिरंगी कीती गलितगात्र झाले होते याचे वर्णन आपल्या , "The Defence Of Lucknow", पोवाड्यात (Ballad) केले आहे.

"we were every day fewer and fewer.

There was a whisper among us, but only a whisper that past ‘Children and wives

if the tigers leap into the fold unawares

Every man die at his post and the foe may outlive us at last

Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!"

वरील ओळीत " feeling of impending doom " चे भाव आणी तत्कालीन फिरंग्याचे नैराश्य स्पष्ट दिसून येते.

Lucknow (The capital of Oudh),
An illustrated guide to places of interest with history and Map, by
Lt Col H A Newell, यांनी स्वातंत्र्ययुद्धा नंतर लिहीलेले पुस्तक तत्कालीन शहराचे यथार्थ चित्रण करते. आताचे शहर तो वारसा अजूनही जपून आहे.

१८५७ चा स्वातंत्र्यलढा, याच शहरा जवळ चिनहट येथे झालेला पहिला स्वातंत्र्य संग्राम , रेजिडेन्सी मधे स्वतंत्रता सेनानी नी केलेल्या इग्रंजाचा दारूण पराभव, तब्बल सत्त्याऐशीं दिवस फिरंग्याना सळो की पळो करून सोडले होते, एक ना अनेक घटना प्रत्येक देशवासीयांना अभिमानास्पद आणी प्रेरणादायी आहेत.

"बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें
मोरा अपना बेग़ाना छूटो जाए |
बाबुल मोरा ...
अंगना तो पर्बत भयाssss और देहरी भयी बिदेस
जाए बाबुल घर आपनो मैं चली पिया के देस | बाबुल मोरा "

ही ठुमरी आपण कित्येकदा ऐकली असेल. गायक कुंदन लाल सैगल. बरेच जण यांच्या आवाजाचे चाहते असाल. ही ठुमरी शेवटचे नबाब वाजिद अली शाह नी लिहीली आहे.

इ स १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम जवळ जवळ संपत आला होता. अवधचा शेवटचा नवाब वाजिद अली शाह यांना ब्रिटिश फौजा पकडुन कलकत्त्याला घेऊन चालले होते त्यांना इतके दुःख झाले आणी त्यावेळी ही बंदिश त्यांनी बांधली. १७० वर्षानंतरही अजूनही तेवढीच पसंत केली जाते. नबाब वाजिद अली शहा एक बहुचर्चित बदनसिब नवाब होता. ३०० बायका, ऐय्याश वेगैरे. परंतू ठुमरी कथ्थक नृत्य ,अवधी खान पान याच्याच काळात नावारूपाला आले. "मोती बिर्याणी ", हे शाही पकवान याच बदनसीब नबाबाने लखनौला दिले. केसरबाग , बारादरी आणी आलम बाग या गोष्टी त्याच्याच काळातील. त्याला बुद्धिबळ, संगीत आणि नृत्य यात विषेश रुची. लखनौ घराणा हा तीन प्रमुख कथ्थक घराण्यात एक. कथ्थक आणी ठुमरी यांची सागंड घालण्याचे प्रयोग याच नबाबांनी केले. तो एक धर्मनिरपेक्ष नवाब होता. त्यानी भगवान श्रीकृष्ण करता लिहिलेली ठुमरी आज सुद्धा होळीच्या दिवशी गायली जाते,

" मोरे कान्हा जो आए पलट के,
अब के होली मैं खेलूंगी डट के..."

जेव्हा इंग्रज नबाबाला पकडायला आले तेव्हा तो आपल्या महालात होता. त्यावेळेस पायात जुती(चप्पला) चढवण्या करता कोणीही सेवक नसल्यामुळे तो पकडला गेला ( हमारे पैरोंमे जुतीया चढानेवाला हमारा खिदमतगार नही था, वरना फिरंगीयोमे कहाँ इतनी हिम्मत की जो हमे पकडने की जु़र्रत करते।) . याला काही इतिहासकारांनी दुजोरा दिला. "इसको बोलते है नबाब"।

जेव्हां लखनऊ वर इंग्रजांनी कब्जा केला तेव्हा नबाबाचा मुख्य प्रधान ओक्साबोक्शी रडू लागला तेव्हां नवाब वाजिद अली शाह म्हणाले " सिर्फ शायरी और मौसीक़ी (संगीत) ही मर्द की आँखो में आँसू ला सकते हैं"। ज्यावेळेस इंग्रज नबाबाला घेऊन चालले होते त्या वेळी ते बिलकुल शांत होते. "शतरंज के खिलाडी ", सत्यजित रे यांची एक फिल्म सुद्धा लखनऊ च्या नबाबा वर आहे ,सर्वानी पाहिलीच असेल. नबाबाचा मुख्य प्रधान याने पकडले जाण्याची कुणकुण लागताच राज्याचा खजीना शाही बावली (विहिर) मधे लपवला. इंग्रजानी जंग जंग पछाडले पण तो खजीना त्यांच्या हाती लागला नाही. शाही बावली स्थापत्यकलेचा कुटनिती व सुऱक्षे करता उत्तम उपयोग बडा इमामबाडा आणी शाही बावली मधे केलाय.

प्रसिद्ध," काकोरी कांड",ते रेल्वे स्थानक जवळच आहे. इथेच क्रांतीकारक पं रामप्रसाद बिस्मिल्ल, आणी साथीदारांनी फिरंग्याचे खजीना हस्तगत केला. फिरंगी इतिहासकार याला लुटला म्हणतात. लखनौ येथील " रींग थिएटर ",(आताचे जनरल पोस्ट आँफिस ) मधेच क्रांतीकारकां वर खटला चालवण्यात आला व फाशी आणी कठोर कारावासाची शिक्षा दिली गेली. खिलाफत मूव्हमेंट, काँग्रेस अधिवेशन आशा अनेक महत्त्वाच्या घटना इथे घडल्या.

हे शहर नज़ाकत,तहजिब ', टुंडे कबाब, पान की गिलोरिया, इक्का (टांगा), चिकनकारी, दशेहरी आम, वास्तु व स्थापत्यकला " याकरता जगभरात प्रसिद्ध आहे व देशी विदेशी प्रवाश्यांना आपल्याकडे आकर्षित करते.

“ तहजीब “, म्हणजे सभ्यता, शिष्टचार, एकमेकां बरोबर आदराने वागणे. इथे प्रत्येक जण स्वताःला किवां दुसर्‍याला “आप” असे आदरार्थी संबोधन वापरतात. जर एखाद्या व्यक्तीला “ तुम “ आसे संबोधित केले तर नक्कीच भांडण होणार म्हणून समजायचे. भाषा गोड आहे आणी कमालीची आदब येथील लोकांमधे दिसुन येते.

शोहरत,नजा़कत ,तहजी़ब,खानपान व लखनौ चे अस्तित्व हे नबाबां मुळे. येथील बहुतांशी गोष्टींचा उल्लेख त्या त्या काळातील नबाबा शिवाय होऊच शकत नाही. मग त्या प्रसिद्ध इमारती असो किंवा संगीत, नृत्य ,खान पान अथवा स्वतंत्रता संग्राम

येथील आंबा महोत्सव, वेगवेगळ्या महिन्यातील फुलांची जसे गुलाब, शेवंती(गुलदाऊदी), डेलिया, ग्लाडिओलस इ. ची प्रदर्शने तर नँशनल बोटॅनिकल गार्डन मधील विविध प्रकारच्या निवडुंगाच्या प्रजातीचे ग्रीन हाऊस एक ना दोन मंत्रमुग्ध करणारी स्थळे वर्षभर याचे नाविन्य टिकून राहण्यासाठी मदत करतात. इथला आंबा महोत्सव एक लाइफ टाइम अनुभव आहे.

आशी एक किवंदती, जेव्हां पानिपतच्या युद्धात मराठ्यांना अपयशाचा सामना करावा लागला त्याची बातमी लखनौमध्ये मराठ्यांच्या छोट्याशा छावणीत आली तेव्हां सर्व म्हणत होते "गडबड झाली, गडबड झाली " .जेथे ही छावणी होती त्या जागेला आजही "गडबड झाला ", या नावाने ओळखले जाते , खरे खोटे माहीत नाही

या शहरात मराठी समाज आपली ओळख जपून आहे. गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी, संक्रांत या सारखे सणवार आणी वार्षिक स्नेहसंमेलन उतम रीतीने साजरे होतात. या प्रसंगी महाराष्ट्रातील नाटय संस्था, प्रसिद्ध व्यक्तीनां बोलावले जाते. स्थानिक मराठी उत्साही कलाप्रेमी नट नाटकांचे मचंन करतात. सर्वश्री व पू काळे व लक्ष्मण देशपांडे याच्याशी व्यक्तीगत भेट इथेच झाली.

सदर बझार , तोफखाना, काली पलटन ,गोरी पलटन आशा नावाची ठिकाणे आजही बरेच शहरात बघावयास मीळतात. लखनौच्या सदर बाजारा जवळ एक देवधर आजी आजोबा व त्यांचा परीवार त्यांच्या मोठ्या विश्रामबागवाडा सदृश महालनुमा कोठी मधे राहात होते. तेथेच छपरी पंलग म्हणजे काय असतो बघायला मिळाला. पेशवाईतले त्यांचे पुर्वज इथे मुलुखगिरी वर आले ते इथेच स्थाईक झाले. त्यांच्या घरी दिवाळी अंक घेण्यासाठी गेलो आसताना आजींनी आमच्या सौं ची ओटी भरली, सागंण्याचा उद्देश जरी या लोकांनी महाराष्ट्र जरी पाहीला नाही तरी चालीरीती पाळून आहेत.

प्रसिद्ध भातखंडे संगीत महाविद्यालय,लखनौ(earstwhile United Province) ,संगीत शिरोमणी पंडीत विष्णू नारायण भातखंडे यांनी राय उमानाथ बली व तत्कालीन शिक्षण मंत्री राय राजेश्वर बली यांच्या बरोबर १९२६ मधे प्रस्थापित केले. पं सी आर व्यास,, अनुप जलोटा,तलत महमूद सारख्या मोठ्या हस्ती या विश्वविद्यालयातूनच शिकल्या. द टाईम्स ऑफ इंडिया चा १५० व्या वर्धापनदिनानिमित्त पं राजन साजन, गिरीजादेवी यांच्या अवीट सुरावटीचा आनंद दिलकुशा कोठी मधील आयोजनात मीळाला.

मोहम्मद तकी, तखल्लुस मीर तकी मीर (१७२३-१८१०) इथलेच ज्यांची गझल गेली तीनशे वर्ष सगीतप्रेमीच्या कानात विराजमान आहे.

" दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया
हमें आप से भी जुदा कर चले",

विविध क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आशा अलीकडच्या काळातील प्रसिद्ध व्यक्ती ज्यांना कुठल्याही प्रकारची ओळख करून देण्याची गरज नाही त्यां पैकी काही व्यक्ती म्हणजे जां निसार अखतर , नौशाद, अमृतलाल नागर, के पी सक्सेना(हास्य कवी) , श्री लाल शुक्ल (राग दरबारी) आणी आशा आनेक मान्यवरांची नावे सांगता येतील.

ऐतिहासिक स्थळाचे वर्णन म्हटंले की ओघाने वास्तूंचे फोटो अपेक्षीत पण त्या काळात क्लिक थ्री आणी आग्फा आयसोलीचे काढलेले फोटो सुद्धा इतीहासजमा झालेत. आतंरजालावर भरपूर फोटो आहेत. काँ पे मधे मजा नाही.

बरेच काही लिहिता येईल पण कंटाळवाणा होण्या आगोदर इथेच थाबंलेले बरे.
काही माहीती वाचण्यात आली , स्थानिक पुरातत्त्व वास्तूनां भेट दिल्यानंतर किंवा लोकांकडून ऐकायला मिळाली आणी सध्या अतंरजाला वर सुद्धा उपलब्ध आहे.

नोकरीप्रकटनलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Dec 2021 - 3:49 pm | प्रचेतस

एकदम सुरेख लिहिलंय.

बरेच काही लिहिता येईल पण कंटाळवाणा होण्या आगोदर इथेच थाबंलेले बरे.

अजिबात कंटाळवाणे होणार नाही. लखनौविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल. छान लिहित आहात, अजिबात थांबू नका. एक मस्त लेखमालिका येऊ द्यात.

तुषार काळभोर's picture

30 Dec 2021 - 11:48 am | तुषार काळभोर

अजिबात कंटाळवाणे होणार नाही. लखनौविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल. छान लिहित आहात, अजिबात थांबू नका. एक मस्त लेखमालिका येऊ द्यात.

चांदणे संदीप's picture

30 Dec 2021 - 12:19 pm | चांदणे संदीप

अजिबात कंटाळवाणे होणार नाही.

+१

अजूनही आठवणी नक्की लिहा.

सं - दी - प

सोत्रि's picture

1 Jan 2022 - 5:59 am | सोत्रि

अजिबात कंटाळवाणे होणार नाही.

हेच म्हणतो!

- (भटक्या) सोकाजी

श्रीगणेशा's picture

29 Dec 2021 - 5:00 pm | श्रीगणेशा

लेख आवडला!
लखनौ शहराची छान ओळख झाली. पुढेही वाचायला आवडेल.

सुरिया's picture

29 Dec 2021 - 5:13 pm | सुरिया

सुरेख ओळख. अप्रतिम लेखन.
अजुन येऊ द्या

प्राची अश्विनी's picture

29 Dec 2021 - 6:06 pm | प्राची अश्विनी

अजिबात कंटाळवाणे झाले नाही. अजून लिहा.
फकि लखनौला चार दिवसाची ट्रीप करुया असा नवरा केव्हाचा मागे लागलाय. पण एकाच शहरात चार दिवस कशाला, म्हणून टाळत होते. आता विचार बदलला. अर्थात कुणी चांगला वाटाड्या हवा.
असो.

कर्नलतपस्वी's picture

29 Dec 2021 - 6:38 pm | कर्नलतपस्वी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद.
भाग्यवान आहात, "बँग भरो निकल पडो" ,पण स्वताः प्लान करा. मुबंई पुण्यावरून रेल्वे, हवाई यात्रा सुकर आहेत. रेल्वेने निघा, झाशीला उतरा, तेथील किल्ला, लक्ष्मी पँलेस बघा. ओरछा जवळच आहे. जहांगीर पँलेस, रामराजा मंदिर, चौसष्ट योगीनी मंदिर बघा. १६५ कि मी वर खजुराहो एक दिवसाची भेट आठ मुख्य मंदिरात भेट द्या. तेथुनच अलाहाबाद, बनारस अयोध्या आणी दोन दिवस लखनौ बघा. वेळ आसेल तर दहा दिवस नसेल तर सात दिवस योजना आखली तर चांगली ट्रिप होऊ शकते. अधिक माहीती साठी आय टि डि सी च्या आँफिस मधून व आतंरजालावर भरपूर माहीती उपलब्ध आहे.
हार्दिक शुभेच्छा

कर्नलतपस्वी's picture

29 Dec 2021 - 6:39 pm | कर्नलतपस्वी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद.
भाग्यवान आहात, "बँग भरो निकल पडो" ,पण स्वताः प्लान करा. मुबंई पुण्यावरून रेल्वे, हवाई यात्रा सुकर आहेत. रेल्वेने निघा, झाशीला उतरा, तेथील किल्ला, लक्ष्मी पँलेस बघा. ओरछा जवळच आहे. जहांगीर पँलेस, रामराजा मंदिर, चौसष्ट योगीनी मंदिर बघा. १६५ कि मी वर खजुराहो एक दिवसाची भेट आठ मुख्य मंदिरात भेट द्या. तेथुनच अलाहाबाद, बनारस अयोध्या आणी दोन दिवस लखनौ बघा. वेळ आसेल तर दहा दिवस नसेल तर सात दिवस योजना आखली तर चांगली ट्रिप होऊ शकते. अधिक माहीती साठी आय टि डि सी च्या आँफिस मधून व आतंरजालावर भरपूर माहीती उपलब्ध आहे.
हार्दिक शुभेच्छा

टर्मीनेटर's picture

29 Dec 2021 - 6:40 pm | टर्मीनेटर

लेख मस्तच जमून आला आहे 👍

१९९५ च्या ऑक्टोबर महिन्यात झालेले खग्रास सूर्यग्रहण बघण्यासाठी बुंदेलखंड मधील हमीरपूर (फुलनदेवीचे गाव 😀) येथे शैक्षणिक सहलीला गेलो होतो. त्यावेळी परतीच्या प्रवासात ऐन दिवाळीत २ दिवस लखनौला मुक्काम होता. तेव्हा आपण उल्लेख केलेल्यातल्या काही गोष्टी पाहिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या!
काही ठिकाणे आठवतात, काही नाही पण पुन्हा त्या शहराला भेट द्यायला नक्कीच आवडेल.
धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

29 Dec 2021 - 6:53 pm | कर्नलतपस्वी

हौसला अफजाई के लिये शुक्रिया.

कर्नलतपस्वी's picture

30 Dec 2021 - 8:35 pm | कर्नलतपस्वी

आम्ही अलवर राजस्थान मधे बघीतले, लाईफ टाइम एक्सपिरीयन्स होता. सकाळी आठ वाजेपासून आँफिस करता तयार होऊन बसलो होतो व ग्रहणाचा काळोख होताच पक्षाची जी अवस्था झाली.

टर्मीनेटर's picture

31 Dec 2021 - 1:58 pm | टर्मीनेटर

आम्ही अलवर राजस्थान मधे बघीतले,

बरोबर, इराण मधे सुरुवात होऊन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम आणि मलेशिया असा त्याचा मार्ग होता पण भारतात राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ह्या तीन राज्यांतील काही भागातच ते 'खग्रास' सूर्यग्रहण ह्या प्रकारात दिसणार होते बाकी भागात 'खंडग्रास' दिसणार होते.

लाईफ टाइम एक्सपिरीयन्स होता.

+१०००
"दिन में तारे दिखाई देना" ह्या वाक्प्रचाराचा शब्दश: प्रत्यय आला होता. खगोल मंडळाने ती सहल आयोजित केली असल्याने २५० जणांच्या त्या ग्रुप मध्ये अनेक खगोल शास्त्रज्ञही होते, त्यांच्या कडच्या आधुनिक दुर्बीणी / फिल्टर लेन्स वगैरे उपकरणांतुन ते बघायला मिळाल्याने फारच मजा आली होती.

ग्रहणाचा काळोख होताच पक्षाची जी अवस्था झाली.

हो ना, आत्ताच दाणा पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडलो आणि लगेच कशी काय घरट्यात परतायची वेळ झाली असे वाटून पक्षांचा चांगलाच गोंधळ उडाला होता 😀

असो, फारच अवांतर झाले आहे त्यासाठी क्षमस्व!

कर्नलतपस्वी's picture

31 Dec 2021 - 2:24 pm | कर्नलतपस्वी

तेव्हा करोना (डायमंड रिगं ) प्रत्यक्ष बघितली

टर्मीनेटर's picture

31 Dec 2021 - 2:38 pm | टर्मीनेटर

येस्स... ते तर परमोच्च प्रेक्षणीय दृष्य होते.
बाकी काही असो ह्या प्रतिसादांमुळे माझे मन आत्ता थेट २४ ऑक्टोबर १९९५ मध्ये जाऊन पोचले आहे, करोना, डायमंड रिंग, चंद्राच्या सावलीचा पाठलाग करत निघालेली आकाशातली ती फायटर जेट विमाने अशा सगळ्या अविस्मरणीय गोष्टी डोळ्यांपुढे दिसू लागल्या आहेत 😀

कर्नलतपस्वी's picture

29 Dec 2021 - 6:44 pm | कर्नलतपस्वी

प्रचेतस, श्रीगणेशा, सुरैय्या,प्राची प्रतीसादा बद्दल धन्यवाद. पुढिल भाग लिहीत आहे लवकरच शेअर करेन.

मुक्त विहारि's picture

29 Dec 2021 - 6:44 pm | मुक्त विहारि

फोटो हवे होते

सुबोध खरे's picture

29 Dec 2021 - 7:12 pm | सुबोध खरे

लेख सुंदर आहे

लखनौ चे मूळ नाव लक्ष्मणपूर आहे हे माहिती नव्हते.

बाकी आता आता पर्यंत (२००१) तेथे नम्रता आणि शालीनता दुकानदारांपासून बलुतेदारांपर्यंत दिसून येत असे. अगदी आमच्या रूमवर कुर्ता पायजमा विकायला येणारा किंवा केश कर्तनालयातील कारागीर सुद्धा हुजूर हुजूर करून अदबशीर बोलताना आढळत.

गेल्या २० वर्षात लखनौला जाणे झालेले नाही. पण माझा रूम पार्टनर लखनौ चा होता.

१९८८ साली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक कोर्स साठी २ महिने आणि नंतर २००१ साली ज्युनियर कमांड कोर्स साठी १ महिना तेथे राहणे झाले होते.

त्यामुळे शहराचा बराच भाग पाहणे झाले होते

इमामबाडा मजुरांसाठी दिवस बांधून रात्री पाडला जात असे हि आख्यायिका सांगितली जाते. पण रात्री तो पाडण्याची मेहनत घेण्यापेक्षा दुसरी इमारत बांधता आली असते असे लहान मूल ही सांगेल.

अर्थात इमाम किती दयाळू होता हे सांगण्यासाठी ही आख्यायिका तयार झाली असेल.

बाकी लखनौची "तहजीब" अनुभवायची असेल तर कानपूरला जरूर भेट द्यावी आणि तितकेच (किंवा जास्त) उत्पन्न असलेले शहर किती बकाल आहे आणि त्या मानाने लखनौ किती सुसंस्कृत आहे हे समजून येईल.

असंख्य जुन्या सुंदर इमारती तेथे आपल्याला पाहायला मिळतात.

कर्नलतपस्वी's picture

29 Dec 2021 - 9:26 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसादा बद्दल धन्यवाद, दोन्ही वर्षात १९८८ आणी २००१ मी लखनौला होतो.

रमेश आठवले's picture

29 Dec 2021 - 10:15 pm | रमेश आठवले

लखनौला काही स्थानिक लोक नखलौ असे संबोधतात का ?

कर्नलतपस्वी's picture

30 Dec 2021 - 11:18 am | कर्नलतपस्वी

नक्की काही सांगता येत नाही पण एक कारण बोली भाषा असू शकते.
दुसरे असे की "पान की गिलौरीया" आणी त्यातूनच स्त्रवणारा मुखरस म्हणून सुद्धा बोलताना अपभ्रंश झाला असेल.

तीसरे असे कुठेतरी वाचले होते, "एरच"हिरण्यकश्यपूची राजधानी व तेथेच भगवान नरसिहने त्याचा वध केला व आपले शस्त्र गोमती नदिमधे विसर्जित केले व म्हणून नखलऊ.पण याला मला तरी कुठलाच आधार, संदर्भ सापडला नाही.
आमची कामवाली अशिक्षीत तीने कधीच लखनौ आसा उच्चार केला नाही.
फिरंगी याला लक नाऊ (Luck now) असे संबोधत.

त्या शहराचे / स्थानाचे मूळ नाव 'लक्ष्मणपूर' होते हे मान्य केल्यास हिंदीत लक्ष्मणास लखन असेही म्हणत असल्याने लक्ष्मणपूरचा (उकारांती शब्दांची रेलचेल असणाऱ्या) स्थानिक / अवधी बोली भाषेत 'लखनऊ' असे भाषांतर झाले असावे.
त्यामुळे लखनौ हेच नाव जास्त तर्कसुसंगत वाटते.
तिथल्या काही धर्मवेड्या लोकांना लखन पर्यायाने लक्ष्मणाचे नाव घ्यायचे नसावे म्हणुन त्यांनी लखनौ हे उलट करून नखलौ असेही म्हणण्यास सुरुवात केली असावी असे माझे वैयक्तिक मत! (त्यास आधार काही नाही 😀)
नावांची मोडतोड करून उच्चार करण्याची फॅशन तशी जुनी असावी, आमच्या डोंबिवलीचा उच्चार 'डोंबोली' वगैरे करणारे कित्येक सुशिक्षितही पाहिले आहेत (आपल्या मिपावरही आहेत ) त्यामुळे अशिक्षितांकडून लखनौ चा उच्चार 'नखलौ' होत असल्यास त्यात काही विशेष नाही 😀

बाकी लखनौची तहजीब आणि भाषेतील मीठ्ठास मात्र स्पृहणीय! वरच्या प्रतिसादात मी उल्लेख केलेल्या ट्रिपच्या वेळी आमच्या कॉलेजकुमारांच्या ग्रुपची बम्बईया टपोरी हिंदी (आ रहेला हैं... जा रहेला हैं.... खा रहेला हैं....पी रहेला हैं...क्या बोलता.... खालीपिली वगैरे शब्दसंपदा युक्त) भाषा ऐकून तिथल्या काही लोकांना फिट यायची पाळी आली होती, तर काहीजणांची प्रचंड करमणूक झाली होती 😀

कर्नलतपस्वी's picture

30 Dec 2021 - 8:49 pm | कर्नलतपस्वी

आमचे एक बँकंर दोस्त आमच्या एका लष्करी मीत्राला म्हणाले, "तुम शाम को बाहर नही गीरेगा तो हम आ जाऊगां"
त्यांनी म्हणायचे होते, जर तुम्ही उद्या बाहेर जाणार नसलात तर मी येईन.

पुण्यातील लोके दुपारी गिरते है |

रमेश आठवले's picture

31 Dec 2021 - 12:43 am | रमेश आठवले

हिरण्यकश्यपूचा वध नृसिम्हाने आपल्या नखानी त्याचे पोट फाडून केला असे चित्रातून दाखवतात. ती नखे गोमतीत विसर्जन केल्यामुळे नखलौ नाव झाले कि काय बुवा ?

Bhakti's picture

29 Dec 2021 - 10:41 pm | Bhakti

खुपचं भारी लिहिलंय!

पेशवाईचा अंत याच प्रदेशात झाला, त्या काळातील काही जुनी कुटुंबे त्या भागात टिकून राहिली. बिठूर, ब्रह्मावर्त हे प्रसिद्ध आहेच, पण चित्रकूट येथे अमृतराव पेशव्यांची शाखा होती. बाजूच्या माळव्यात आणि बुंदेलखंडात अनेक मराठी कुटुंबे स्थायिक झालेली होती.

चौकस२१२'s picture

31 Dec 2021 - 10:15 am | चौकस२१२

हो चित्रकूट जवळचे करवी गाव तिथे सध्या "कोतवाली " म्हणून जो वाडा आहे तो अमृतरावांचा / वंशजांचा होता
https://www.youtube.com/watch?v=sEfi4ZTNlR0
तसेच गणेशबाग
https://www.youtube.com/watch?v=agnlPVOete4
https://www.youtube.com/watch?v=2rTvlI_-oVk

सुरसंगम's picture

30 Dec 2021 - 9:25 am | सुरसंगम

मस्त लेखन. और आने दो कर्नल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Dec 2021 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

हापिसात काम करणारा एक मित्र नखलौचा आहे, प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळी तो नखलौला चला आसा आग्रह करतो, पण कधी जाण्याचा योग आला नाही.

पण त्याच्या कडून ही सगळी वर्णने अनेक वेळा ऐकली आहेत.

आंब्यांवरुन त्याच्याशी नेहमी वादंग होतात कारण त्याच्या मते नखलौ मधे जगातला सर्वोत्तम आंबा मिळतो, जे मी कदापी मान्य करणे शक्य नाही.

नखलौ मधल्या मराठी मंडळींबद्दल सुध्दा तो नेहमी सांगत असतो. तो नखलौच म्हणतो कधीच लखनौ म्हणत नाही.

त्याचे बोलणेही अत्यंत आदबशीर असते, पण वागायला?.... जाउदे.... त्या बद्दल नंतर केव्हातरी लिहिन.

त्याने माझ्या मुलीला एक गाणे शिकवले होते

एक लोमडी बडी सयानी,
दो बच्चोकी थी वो नानी,
तीन दिनो की भुखी प्यासी,
चार घडी रही उपासी,
पाच बार जंगल मे आयी,
छे दीन तक घुमी पछतायी,
सात देखकर गुछ्छे सुंदर,
आठ बार वो उछ्ली उपर,
नौ घंटेमे थककर चुर,
दसवी बार हुई मजबुर
बोली खट्टे है अंगुर

बघु कधी जमते ते नखलौला जायला?

पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

30 Dec 2021 - 9:47 am | सुबोध खरे

दशहरी आणि हापूस यात चांगला कोण हा वाद नेहमीच असतो.

दशहरी हा एकसुरी गोड असतो आणि हापूस हा किंचित आंबट असून मधुर असतो त्यामुळे तो जास्त चांगला लागतो.

यात अर्थात मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्यामुळे येणारा कल किंवा पूर्वग्रह ( bias) असेलच

पण माझ्या बहुतांश लष्करी मित्रांनी ज्यांनी हापूसचा सुद्धा स्वाद घेतला आहे. त्यांनी हापूसचा स्वाद हा दशहरी पेक्षा जास्त चांगला आहे हे मान्य केले आहे.

गुल्लू दादा's picture

30 Dec 2021 - 10:09 am | गुल्लू दादा

नवीन माहिती समजली. धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

30 Dec 2021 - 11:28 am | कर्नलतपस्वी

खरे आंबा प्रेमी फरक करण्याच्या भानगडीत पडत नाही.

असल्या लेखाने लखनौचा पाहूणचार घेण्याची इच्छा प्रबळ झाली.

स्वराजित's picture

31 Dec 2021 - 1:26 pm | स्वराजित

खुप छान लेख

सौंदाळा's picture

1 Jan 2022 - 7:14 am | सौंदाळा

सुंदर लेख.
उत्तर प्रदेशची हिंदी, संस्कृती, चाली रिती, पुरातन वास्तू, संगीत सगळेच लेखात आले आहे. पण वर अनेकांनी म्हंटल्याप्रमणे यातील प्रत्येक गोष्टीवर तपशीवार लेख होईल. तुमची लिहायची शैली सुंदरच आहे त्यामुळे आणखी वाचायला आवडेल.
लखनौच्या खानपानाबदल पण जरूर लिहावे ही विनंती.

चौकस२१२'s picture

7 Jan 2022 - 10:33 am | चौकस२१२

महाराष्ट्रात जश्या विविध बोलीभाषा तश्या उत्तर प्रदेशात हि आहेत हे लहानपणी माहिती नव्हते वाटायचे कि सगळेच "वाजपेयी हिंदी" बोलता असणार
बुंदेलखंडात चककर मारली आणि तेथील बोली ऐकली तेव्हा कळले ( "खडी बोली" बहुतेक )

गोरगावलेकर's picture

2 Jan 2022 - 8:11 pm | गोरगावलेकर

खूप छान ओळख करून दिली आहे लखनौ शहराची

सिरुसेरि's picture

3 Jan 2022 - 2:27 pm | सिरुसेरि

लखनौ शहराची छान माहिती . "ये है लखनौकी सरजमीन " असे गाणे परिचीत आहे . पाकीझा , उमराव जान या चित्रपटांच्या कथाही लखनौ शहराच्या पार्श्वभुमीवर घडतात . एकंदरच येथे कला , खानपान , तहझीब यांचा पुरेपुर मेळ आहे .

चौकस२१२'s picture

7 Jan 2022 - 10:29 am | चौकस२१२

का कोण जाणे लखनौ चे वर्णन ऐकून अमिताभ ने रंगवलेल्या ह्या व्यक्तिरेखेची आठवण झाली
https://www.youtube.com/watch?v=HPvcX5zpD20

अनिंद्य's picture

6 Jan 2022 - 4:58 pm | अनिंद्य

लेख आवडला.

'मजाज़' च्या शब्दात सांगायचे तर :-

फ़िरदौस-ए-हुस्न‌‌‌‌-ओ-इश्क़ है दामान-ए-लखनऊ
आँखों में बस रहे हैं ग़ज़ालान-ए-लखनऊ
सब्र-आज़मा है ग़मज़ा-ए-तुर्कान-ए-लखनऊ
रश्क-ए-ज़नान-ए-मिस्र कनीज़ान-ए-लखनऊ

तिथली लोकं आणि त्यांची जुबान फार मिठ्ठास आहे. तसेच लखनवी खानपान एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्याबद्दल तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

चौकस२१२'s picture

7 Jan 2022 - 10:24 am | चौकस२१२

उत्तर प्रदेशात ऐकलेली हि चारोळी .. संधारब कोणास माहिती आहे का ?

चाचा चाची की दुकान
चाचा लाये है बादाम
चाची फोड़ फोड़ खाये
चाचा खड़े खड़े ललचाये