पुतळे आदर्शाचे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
20 Dec 2021 - 9:27 am

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नका उखडू पुतळे आदर्शाचे
जे आम्हा पुजनीय असती
नका विटंबवू आदर्श आमचे
जे आमच्या हृदयात वसती

हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत
अगदीच लेचेपेचे नाहीत
ते जीवंत जरी नसले तरीही
कार्य त्यांचे तळपत राहील

पुतळे जरी नष्ट केले
आदर्श नष्ट होत नसतात
त्यांच्या येथल्या असण्याने
तुम्ही येथे राहत असतात

- पाषाणभेद
२०/१२/२०२१

वीररससमाजजीवनमान

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2021 - 10:29 am | ज्ञानोबाचे पैजार

काही अंशी भावनांशी सहमत देखिल आहे.

महाराजांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की असल्या फालतु लोकांनी केलेल्या मुर्ख कृतीने त्यांच्या बद्दलच्या आदराला जरा सुद्धा ओरखाडा जाणार नाही. उलट अशा घटनांना काडीचीही किम्मत देऊ नये असे मला वाटते.

पैजारबुवा,

मूर्तीची विटंबना कोणी केली? कायद्याप्रमाणे हा गुन्हा आहे का? कर्नाटक शासनाने या बद्दल काय पावले उचलली आहेत?
'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' ही म्हण आठवली.

कर्नलतपस्वी's picture

20 Dec 2021 - 1:31 pm | कर्नलतपस्वी

महाराज होते म्हणून मी तपस्वी अन्यथा.......

जाऊं देत.. काही लिहित नाही. कवितेचा राजकीय आखाडा/खफ व्हायचा! ;-)