दिवा़ळी अंक २०२१ : कोर्टस्य प्रथम दिवसे

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

'पहिल्या'चे महत्त्व काही वेगळेच असते. खरे तर कुठलीही घटना, गोष्ट आपण अनुभवतो, त्या वेळी पहिलीच असते. तरीसुद्धा पहिले अमुक, पहिले तमुक अशा असंख्य 'पहिल्याचे'कौतुक असंख्यांना असते आणि बरेच जण त्या पहिल्याविषयी लिहीत असतात.
कालिदासाने आषाढाच्या पहिल्या दिवसावर लिहिलेय!
आता मी कोर्टातल्या पहिल्या दिवसावर!

कोर्ट, जज्ज, वकील, पोलीस इ. केंद्रस्थानी असलेल्या सिनेमांवर 'पोसलेल्या' मला, वकील झालो की वकिलीच्या पहिल्याच दिवशी डायरेक्ट मर्डरची केस चालवायला मिळेल, आपण ती वकिली कौशल्याने जिंकू.. सोबत एखाद्या खूबसुरत हसीनाचे दिलही, अशी अलनाश्चरी स्वप्ने पडत. कदाचित त्यामुळेच मी ठरवले की होईन तर वकीलच!
त्या काळी लॉला प्रवेश घेणे अवघड नव्हते. घेतला प्रवेश. मग यथावकाश, सावकाश, मजल दरमजल करत वकिलीच्या भोज्याला शिवलो. पंचवार्षिक योजना! १९७५ ते १९८०.

नातेवाईक, शेजारपाजार्‍यांचे, "इतर काही जमलं नाही, झाला वकील! आता काय दिवे लावतो ते पाहू" अशा कुत्सित शेर्‍याकडे दुर्लक्ष करत पुढची तयारी सुरू केली.
आतापर्यंत फक्त शिनेमातच पाहिलेल्या कोर्टाशी प्रत्यक्ष संबंध येणार, या कल्पनेनेच मोहरून की काय म्हणतात तसे गेलो होतो.
वकिलीच्या पहिल्या दिवशी, आधीच खरेदी केलेले पांढरा शर्ट, पांढरी पॅट घालून, वर काळा कोट चढवून कोर्टात जायला निघालो. रिकामे जाणे बरे नाही, म्हणून हातात एक कातडी बॅग घेतली. कोर्टातल्या कामकाजाच्या नोट्स घ्याव्यात, उपयोग होतो, असे लॉला प्रवेश घेतला तेव्हा कोर्टातून सीनियर कारकून म्हणून रिटायर झालेल्या शेजारचे काकांनी सांगितल्याचे लक्षात होते. त्यांचे एक साहेब वकिलांना नेहमी असा सल्ला द्यायचे म्हणे!
बॅगमध्ये वही, पेन टाकले. स्वतःकडे वाहन, अगदी सायकल पण नव्हती. पहिलाच दिवस होता. त्यामुळे जाण्यासाठी कोपर्‍यावर सायकल रिक्षा ठरवली. त्याने सावज बरोब्बर हेरलं. "कोर्ट चलने का क्या वकील साब?"- तो.
वकीलसाब म्हणून कुणीतरी पहिल्यांदाच संबोधले होते. मनातल्या मनात, गुदगुल्या झाल्यावर वाटते तसे वाटले.
"हां. कोर्ट ही जानेका है, कोट पहनके सिनेमा देखने थोडे जायेंगे?" मी विनोद केला. खूश होतो. "दो रुपया लगेगा."
माझ्या विनोदाकडे दुर्लक्ष करत तो सरळ धंद्याचे बोलला.
कोर्टापर्यंत जायला दीड रुपया ठीक होता. दोन जास्तच होते. पण पहिल्याच दिवशी घासाघीस करणे नको वाटले. "ठीक है, चलो, लेकिन दुसरेको नही लेना. हम अकेलेच होंगे."' बीडच्या हिंदीतून त्याचा प्रस्ताव मान्य करत, पण काही अटी शर्ती घालत रिक्षात बसलो. रस्त्याने जाताना आजूबाजूचे लोक आपल्याकडे पाहात आहेत, असे वाटत होते. संकोचणे आणि कॉलर टाईट होणे एकाच वेळेस!
वाटेत एका गल्लीत रिक्षाची चेन घसरली. रिक्षावाला खाली उतरून ती लावायचा प्रयत्न करू लागला.
रस्त्यावर दोनचार टारगट पोरं, बहुधा शाळा बुडवून गोट्या खेळत होती. "ऐ वकील बघ. नवा दिसतोय! रिक्षात चाललाय" असे म्हणत अकारण खिदळू लागली. माझे वकील असणे, नवीन असणे व रिक्षातून जाणे यात त्या कार्ट्यांना हसण्यासारखे काय वाटले, ते त्यांनाच ठाऊक. अकारण ओशाळलो. रिक्षातून उतरून जावे असे वाटले.
"अरे हुवा के नही दुरुस्ती?" अधीर होऊन विचारले.
उत्तर देण्याऐवजी तो सीटवर बसला व पायडल मारू लागला. कारट्यांच्या कॉमेंट चालूच होत्या.
कोट उगीच घातला. उद्यापासून कोट बॅगेतच ठेवायचा, कोर्टात गेल्यावरच घालायचा, असे ठरवले. कोट अंगावर नसला की पायी जाता येईल. आज ठीक आहे, रोज रिक्षा कशाला? विचारात असतानाच रिक्षा थांबली.
'न्यायमंदीर' असा फलक समोर होता. न्यायमंदीर मधील 'दी' र्‍हस्व आहे, दीर्घ नाही. जाऊ दे. आपल्याला काय करायचंय? दीर्घ तर दीर्घ. हे मनातल्या मनात.
खाली उतरलो. तसे आधी कोर्ट पाहिले होते. पण आज वकील म्हणून पहिले पाऊल! आजूबाजूची मंडळी कौतुकाने पाहतील वाटले. पण कुणी ढुंकूनही पाहिले नाही.
आवारात गर्दीच गर्दी होती. वकील होते. वकिलांची टेबले होती. काही वकिलांच्या टेबलांपाशी इतर लोकही होते. पटकेवाले, धोतरवाले, टोप्यावाले. बोडखे. तर्‍हेतर्‍हेचे. काही वकिलांशी बोलत होते. काही खुळ्यासारखे उभे होते. काही आपसात बोलत होते. काही टेबलांजवळ
फक्त वकीलच होते. त्यापैकी काही जण शून्यात नजर लावून, तर काही प्रवेशद्वारावर नजर लावून बसलेले. काही वकील नुसतेच फिरत होते. काही टेबलांजवळ एकापेक्षा जास्त वकील आपापसात बोलत होते. काही टेबलांवर टाइपरायटर होते. समोर टाइपरायटर चालवणारे होते. ते टाइपरायटर चालू होते. काहींना वकील मजकूर सांगत होते, ते तो टाईप करत होते. काही टाईपवाले जवळचे कागद वाचून टाईप करत होते. दोन-तीन टेबलांवर विक्रीसाठी स्टॅम्प, बॉंडपेपर ठेवलेले होते. विकणार्‍यांसमोर विकत घेणारे होते. विकताना, घेणार्‍याचे नाव, गाव, पत्ता रजिस्टरमध्ये लिहून घेत होते.
"रामभाऊ,एकोणीसशे सत्त्याहत्तरचा मार्चचा बॉडपेपर आहे का?" 'एकाने स्टॅम्प विक्रेत्याला हळूच विचारले. तो 'कोर्टबाज' आणि त्या रामभाऊचा 'खास माणूस' असावा. रामभाऊने त्याला डोळा मारून गर्दी कमी झाल्यावर ये अशी खूण केली. हाताने बोटे दाखवून काही इशाराही केला. डोके हालवून तो निघून गेला. तीन वर्षांपूर्वीचा स्टॅम्प पेपर कशाला हवा होता?
जुने कोरे स्टॅम्प पेपर मागच्या तारखेतले दस्त तयार करायला लागतात, त्यामुळे त्यांना भलती डिमांड असते, असे कुणीतरी सांगितले होते, ते आठवले.
एका झाडाखाली पोलिसांची मोठी गाडी उभी होती. जवळच हातकड्या घातलेले दहाबारा कैदी बसले होते. त्यांच्याभोवती लहान पोरे कडेवर घेतलेल्या, तर काही नुसत्या,बायका, आपापल्या माणसांना भेटायला आलेल्या! काही पुरुषही होते. आणलेले जेवणाचे डबे, तंबाखू, सिगारेट, बिड्या, आणखीही काहीबाही आपल्या माणसांना देण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी बंदोबस्तावरच्या पोलिसांना विनवत होते. पोलीस कावून गेले होते. कैद्यांवर, त्या पब्लिकवर डाफरत होते. अधूनमधून परवानगीही देत होते.तिथे एक दोन वकीलही होते.

कोर्टाच्या आवारातच कोपर्‍यात कँटीन होते. तिथे काम करणारी पोरे, पोलीसगाडीजवळ जाऊन चहा, पोहे, भज्याच्या ऑर्डरी घेऊन जात होते. ऑर्डरी प्रमाणे पदार्थ पोहचवत होते. कँटीनमध्ये कुणी ओळखीचे दिसते का, पाहण्यासाठी तिथे डोकावलो. गर्दी होती. आत व बाहेर बाकांवर अनेक वकील, पक्षकार, त्यांच्यासोबतची माणसे नाष्टा-चहापाणी करत होती. कोर्टकामाची चर्चा, साक्ष काय द्यायची त्या सूचनांची देवघेव सुरू होती. 'इरुद्धी बाजूनी गोप्या येणारय साक्षीला. धंदाच है त्येचा. लयी बेणं हाय" एक पटकेवाला वकीलसाहेबांना सांगत होता. त्यांनी फक्त मान हलवली. "कोणी बी येऊ दे साक्षीला! वकीलसाहेब पार उलटा करून टाकत्येल.: सोबतच्या टोपीवाल्याने पटकेवाल्याला आश्वस्त केले. "आमच्या दाव्याच्या टाईमला काय झालंतं" असं म्हणून तो आपली हकीकत सांगू लागला. वकीलसाहेब काडीने दात कोरत आपले कवतीक ऐकू लागले. पटकेवाल्याचे चेहर्‍यावर वकीलसाहेबाविषयी आदर ओसांडून वाहू लागला.

बाजूच्या टेबलांवर वकिलांचे आपापसात हास्यविनोद सुरू होते. काल कोर्टात काय गमती झाल्या, अमुक वकिलाला डिस्टीकजज साहेबांनी कसा झापला, वगैरे वगैरे.कँटीनमधल्या पोरांवर मालकाचे ओरडणे ,ऑर्डरी सांगणे, पोरांचे मोठ्या आवाजात कुठल्या टेबलाचे किती बील झाले ते सांगणे सुरू होते. असा संमिश्र कोलाहल ऐकून डोके गरगरायला लागले. कुणी ओळखीचे नव्हते.

बाहेर आलो. शेजारी पानटपरीवर टपरीवाला कुणाला एकसोबीस तीनसो पान, तर कुणाला प्लॅस्टिकमध्ये तंबाखूचा मावा घोटून देत होता. नेहमीचे गिऱ्हाईक असणार! पान, मावा तोंडात भरून त्याचा आनंद घेणारे तृप्त होऊन आजूबाजूला पिचकार्‍या सोडत होते. एखादी पिचकारी आपल्या पांढटया प्यांटवर नक्षीकाम करील, या भीतीने पटकन बाजूला सरकलो. तेवढ्यात प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या रिक्षातून 'सभ्य गृहस्थ' या वर्गात मोडणारा, बुशकोट-पँट घातलेला एक जण उतरला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुणाला तरी शोधत असावा. वैतागलेला दिसला. पिचकारी चुकवण्याच्या प्रयत्नात मी त्याला धडकलोच होतो. 'डोळे फुटलेत का'असे भाव त्याच्या डोळ्यात दिसले. तो माझ्यावर डाफरणार, इतक्यात "ओ साहेब, एफेडीवीट करायचंय का? इकडे या." कुणीतरी कोर्टकामासाठी आलेला नवखा दिसतोय असे समजून वकिलाच्या टेबलाजवळ उभ्या इसमाने त्याला मदत देऊ केली.स.गृ. माझ्याऐवजी त्याच्यावर भडकला, पण न बोलता भराभरा पुढे चालू लागला. मागून पांढर्‍या कपड्यातला शिपाई पळत पळत आला. स.गृ.ने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. त्याने स.गृ.च्या हातातील बॅग घेतली. गर्दीतून वाट काढत, स.गृ.ला एस्कॉर्ट करण्यासाठी तोंडाने 'शूक शूक' आवाज करू लागला. तो ऐकून लोक वाट देऊ लागले.
"नाम्या, डोकं फिरलं का? माणसं कळत नाहीत? अरे, नवीन आलेलं कोर्ट आहे नं ते! त्यालाच एफेडीवीटचं विचारलंस! गनिमत त्यांनी पोलिसाला बोलवलं नाही! नाहीतर तुझ्याबरोबर माझीही खैर नव्हती. आता इथं थांबू नकोस. सरळ घरी जा. दोन चार दिवस इकडं तोंड दाखवू नकोस." टेबलावरच्या वकिलाने नाम्याला खडसावले. नाम्या ओशाळला."मला काय माहीत? कपाळावर थोडंच लिहिलेलं असतं." असं काहीतरी पुटपुटत पसार झाला. आता सगळा प्रकार लक्षात आला. ते स.गृ. जज्जसाहेब होते. परगावाहून डायरेक्ट कोर्टात आले असावेत. त्यांना घेण्यासाठी प्रवेशद्वारा उभा शिपाई नेमके ते यायच्या वेळी गायब झाला होता. तो न दिसल्याने हे वैतागून निघाले. ते दिसताच तो पळत आला, पण तेवढ्यात हा घोटाळा झाला होता.

आल्यापासून कोर्टाच्या आवारातच जे काही दिसत होते, ते पाहून कारण नसताना 'सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति' अर्थात अंगांग ढिले, तोंडाला कोरड अशी स्थिती होऊ लागली. पण तसाच नेटाने पुढे कोर्टाच्या इमारतीत गेलो.

इमारत एकमजली, पण भव्य होती. मध्यभागी असलेल्या कोर्ट हॉलमध्ये बरेच लोक दिसले. आत शिरलो. या हॉलमध्ये मात्र सिनेमाची आठवण यावी तसे थोडेफार वातावरण होते. उंच, भव्य डायस. भिंतीवर राष्ट्रपुरुषांचे फोटो. भिंतीलगत कपाटे. काहीत पुस्तके, काहीत फायली. डायसवर मधोमध एका मोठ्या खुर्चीवर जज्जसाहेब बसलेले. त्यांच्या बाजूच्या टेबलावर एक बाई टाइपरायटरवर टाइप करत होत्या. दुसर्‍या बाजूच्या टेबलजवळ एक चश्मिस्ट उभा राहून हातातली फाईल जज्जसाहेबांना दाखवत होता. त्यांनी मान हलवली.

डायसच्या खालच्या बाजूस असलेल्या टेबलासमोर तीन चार वकील ओळीने बसलेले. पैकी एकाला जज्जसाहेबांनी किती साक्षीदार आले आहेत?असे विचारले. त्यांनी मागे उभ्या पोलीस जमादाराला जवळ बोलावून आपसात कानाफुसी केली व उभे राहून 'चार आले आहेत, पण दोन घ्यायचे आहेत' असे सांगितले. आरोपीचे वकील रिलॅक्स झाल्यासारखे आणि जज्जसाहेब नाराज झाल्यासारखे दिसले.
मध्यभागातल्या खुर्च्यावर काही वकील बसले होते. काही खुर्च्या रिकाम्या होत्या. तिथे बसायची भीती वाटली.
जज्जसाहेबांनी "ही केस चालवता का?" असे विचारले तर काय घ्या? लांब बसावं हेच बरे! दरवाजालगतच्या बाकड्यावर जाऊन बसलो. कामकाजाच्या नोट्स घेण्यासाठी बॅगमधून पेन-वही काढू लागलो. तितक्यात शिपाई जवळ आला व भिंतीकडे बोट दाखवले. 'आरोपी बसायची जागा'असे तिथे लिहिले होते. जज्जसाहेब माझ्याकडे चमत्कारिक रीतीने का पाहात होते, ते ध्यानात आले. चटका बसल्यागत उठलो व हॉलमधल्या शेवटच्या ओळीतल्या खुर्चीवर भीत भीत बसलो. शिपायाने बरोबर अशी मान हलवली. जीव भांड्यात पडला.

काम सुरू झाले. 'स्टेट विरुद्ध पिल्या' आरोपींना बोलवा. कारकून शिपायाला म्हणाला. त्याने बाहेर जाऊन पुकारा केला. पोलीस तीन आरोपींना घेऊन आत आले. आधी मी बसलो होतो त्या बाकावर त्यांना बसवून स्वत: दोन्ही बाजूला बसले. बाहेर बायकापोरांचा कोलाहल सुरू होता. शिपायाने जाऊन दम दिला, मग तो बंद झाला.
खटल्याचे काम सुरू झाले. सरकारी वकिलानी एका फाटक्या दिसणार्‍या इसमाला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात घातले. माझ्या बाजूला बसलेल्या वकिलाने, साक्षीदार पंचनाम्यावरचा पंच आहे असे सांगितले. मी तसे वहीत लिहून घेतले. कारकुनाने पंचाला शपथ दिली. सराईत असावा. न अडखळता सोपस्कार पूर्ण करून साक्ष दिली.
दोन चार वाक्यातच साक्ष संपली. आरोपीच्या वकिलाने काहीच विचारले नाही. नंतरचे साक्षीदार डॉक्टर होते. हेसुद्धा बाजूच्या वकिलाने सांगितले. तेही लिहून घेतले. डॉक्टर अगम्य इंग्रजीत बोलत होते. जज्जसाहेबांचा टायपिस्टवर तिच्या इंग्रजीवर विश्वास नसावा. प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग सांगून, ते बरोबर टाईप झाले आहे याची खातरी करून घेत होते. काय चाललेय, काहीच कळत नव्हते. कंटाळा आणि झोप मात्र येत होती. माझ्या शेजारीसुद्धा तीच स्थिती असावी. बाजूच्या वकिलाच्या आणि दोनतीन डुलक्या झाल्या, तेव्हा साक्ष संपली आणि या खटल्याचे कामही! जज्जसाहेब आत निघून गेले.
हॉल रिकामा झाला. वहीत 'साक्षीदार पंच,''साक्षीदार डॉक्टर 'एवढ्या नोंदी झाल्या होत्या. उठून बाहेर आलो .

बाजूला दुसरे कोर्ट होते. कोर्टाचे बाहेर दोन वकीलांचा संवाद कानी पडला. ''साहेब बराच तापलेला दिसतोय. झापाझापी चालू आहे."-एक वकील.
"भाजीत मीठ कमी पडलं असंल !"-दुसरा वकील.
एकमेकाला टाळ्या आणि हाहाहा...
कोर्टात डोकावून पाहिलं. बापरे! सकाळचे 'स.गृ.'च तिथे डायसवर होते. त्यांचा पारा चढायचे कारण भाजीतले मीठ नसून मी आणि एफेडीवीट होते. पण सांगायचे कुणाला अन कशाला? लगेच तिथून सटकलो.
आतापर्यंतचे तीन साडेतीन तासात सिनेमासारखे कोर्ट दिसले नव्हते. जे दिसले, तो रुक्ष मामला होता. ओळखीचेही कुणी दिसले नाही. कंटाळून विमनस्क की काय तसा फिरत होतो.
व्हरांड्याच्या टोकाला अंदाजे दहा बाय पंधराची खोली होती. डोकावून पाहिले. एक मोठ्या टेबलाजवळ चारपाच जण बसले होते. टेबलापल्याड एक काळा कोटवाला खाली मान घालून काही वाचत होता. टेबलाच्या अल्याड दोन काळे कोटवाले होते. टेबलाच्या दोन्ही बाजूला दोघे साध्या कपड्यातले! दारालगत एका बाकावर एक पटका, एक टोपी. बाकी दोन खुर्च्यावरील काळे कोटांमध्ये एक कॉलेजातला मित्र होता. वाळवंटात मृगजळच दिसले. वकिलांची खोली असावी. आत शिरलो आणि त्याला जोरात आवाज दिला.
माझ्या हाकेने तिथले वातावरण गंभीर बनले. टेबलाच्या बाजूचे दोघे, समोरचे वकील, माझा मित्र, त्याच्या बाजूचा वकील सगळेच एकदम मला गप्प करायचा प्रयत्न करू लागले. टेबलापल्याडच्या कोटवाल्याने कागदातून लक्ष काढून बेल वाजवली, माझ्याकडे रागाने पाहात "इथे काय नाटक सिनेमा चाललंय काय?" विचारले. बेल ऐकून बाहेरून शिपाई धावत आला. मित्राने उठून माझा हात ओढला. "अरे, कोर्टाचे काम चालू आहे. गप्प बस" असे कानात सांगू लागला. नीट पाहि,ले तेव्हा त्या कोटावरचा गाऊन दिसला. हे कोर्ट होते व ते जज्ज साहेब! धक्काच बसला. आ वासून उभा राहिलो. त्यांचा पारा चढलेला होता. मोठ्याने बोलून मी कोर्ट कामात व्यत्यय आणला, 'कंटेप्ट ऑफ कोर्ट' केला असे त्यांचे मत झाले असावे. मित्राने बाजूच्या वकिलास मी वकील आहे, आज पहिल्यांदाच कोर्टात आलोय वगैरे सांगितले. वकिलांनी तेच जज्जसाहेबाना सांगितले.
"म्हणून काय झाले? एवढी साधी गोष्ट कळत नाही?" ते घुश्शातच होते. "आणि बँड का लावला नाही?"'मला उद्देशून विचारले.
"बँड?" कोर्टात वकील म्हणून पदार्पण करताना बँड लावावा असा कायदा आहे की काय? याविषयी मला तर कधीच कुणी सांगितले नव्हते. आता काय करायचे? अगदी साधा बँडवालेसुद्धा कमीत कमी तीन-चारशे रुपयाच्या खाली सुपारी घेत नाहीत. एका नवख्या, उत्पन्न
नसलेल्या वकिलाने कुठून हा खर्च करायचा? हे चुकीचे आहे. असा काही नियम असला तर बदललायला हवा. मनात विचार चक्र फिरू लागले, पण गप्प उभा होतो.
मित्र त्याच्या गळ्याकडे बोट दाखवून काही खाणाखुणा करत होता. पण माझे लक्ष नव्हते.
"काय विचारतोय?" - जज्जसाहेब.
"आज नाही लावला, पण पास झाल्यावर गावी बँड लावूनच शेरणी वाटली होती" कसेतरी धैर्य गोळा करून मी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. हे ऐकून जज्जसाहेबांचा नूर बदलला. ते खुदकन हसले. मग वकीलमंडळीही हसली. टोपी पटकेवाल्याला सगळी मंडळी का हसताहेत हे कळेना. ते एकमेकाकडे पाहू लागले.
"अरे, मी या बँडविषयी बोलतोय." माझ्या भोळेपणाची दया येऊन जज्जसाहेबांनी आपल्या गळ्याभोवती लावलेल्या पांढर्‍या दुहेरी पट्ट्याकडे निर्देश केला. आता माझी ट्यूब पेटली. मी काळा कोट तर घातलेला, पण वकिलांच्या पोषाखात आवश्यक पांढरा बँड गळ्याभोवती बांधला नव्हता, त्याविषयी ते विचारत होते. बँड होता. पण कोटाच्या खिशात. लावायला विसरलो होतो. तो काढून दाखवला.
जज्जसाहेबानी माझा नाद सोडला. "समजावुन सांगा त्यांना. तुमच्या मित्र आहेत नं?" जज्जसाहेबानी मित्रावर माझी जबाबदारी सोपवली. माझ्यावरचे लक्ष काढून त्यांनी समोरच्या कागदात लक्ष घातले.

मित्राने मला बाहेर नेले, "कोर्ट आहे लक्षात आले नाही का? किती जोरात ओरडलास?''
"दहा बाय पंधराची खोली, ना डायस, ना साक्षीदाराचा पिंजरा, एका टेबलावर सगळे बसलेले असे कुठे कोर्ट असते का? सिनेमात तर...'' मी खुलासा करू लागलो.
मला गप्प करत त्याने दारावरची पाटी दाखवली - '८वे सह दि.न्या.क.स्त.व ज्युमॅफक्ला.'
'दिन्याकस्त' म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व 'ज्युमॅफक्ला' म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास.
"नवीन आहेत. अजून कोर्ट हॉल मिळाला नाही. ही तात्पुरती व्यवस्था केलीय. अजून खूप पाहायचंय तुला. चल, दुसर्‍या कोर्टात जाऊ." मित्र म्हणाला.
"आता पुन्हा कोर्टात नको, आजच्यासाठी एवढा अनुभव पुरे," मी म्हणालो.
''ठीकयं, मग बारमध्ये जाऊ.'' - तो.
"बार? तेही दुपारी? बरीच प्रगती केलीस की! तू जा एकटा. मी नाही. घरी कळले तर हाकलूनच देतील!" मी सरळ नकार दिला.
"अरे, तो बार नाही, बार रूम, वकिलांची बसण्याची जागा!" माझ्या अज्ञानाची कीव करून त्याने खुलासा केला. निमूटपणे त्याच्या मागे बारमध्ये गेलो.
बार रूम प्रशस्त होती. भिंतीलगत पसरलेल्या गाद्यांवर काही वकील आराम करत होते. काही झोपले होते. काही घोरत होते. काहींची गप्पाष्टके रंगली होती, हास्यविनोद चालले होते. घोरणार्‍या वकिलांमुळे झोप मोडते, म्हणून त्यांच्याकडून जास्त वर्गणी घ्यायला हवी, असे एकाने सुचवले. हशा पिकला. आम्हाला बसायला जागा नव्हती. मध्यभागी खुर्च्या टेबले होती. काही जण पेपर तर काहीं कायद्याची पुस्तके वाचत होते, तर कुणीकुणी फायली! क्यांटीनमधून चहा येत होता. चहापानही सुरू होते.
भिंतीवर खुंट्यांना कोट लटकले होते. अधूनमधून वकिलांना शोधत पक्षकार येत होते, त्यांना पाहून ते ते वकील बाहेर जात होते.

एका कोपर्‍यात वकिलांचे कोंडाळे बसले होते. पत्त्याचा डाव सुरू होता. चक्क रमी! माझा वीक पॉईंट!
सिगारेट पाकिटाच्या मागच्या कोर्‍या भागावर एक जण मार्क लिहीत होता. सगळ्यात कमी मार्कवाला विजेता. आम्ही हॉस्टेलवर खेळत असू. आपली माणसे भेटल्यागत झाले. एका खेळाडूच्या शेजारी बसलो. त्यांचे नाव गोटे होते असे नंतर कळले. खेळणार्‍याच्या बाजूला गप्प बसून खेळ पाहाणारा 'खरा रमीवाला' असूच शकत नाही. खेळणारा चुकीचे खेळतोय, नको ते पत्ते घेतोय व टाकतोय, हाताशी आलेला डाव उधळतोय, आपण खेळतो तर केव्हाच रमी दाखवून इतरांचे फुलहॅड घेतले असते या ठाम समजुतीने, खेळणार्‍याच्या कानात
'जोकर तिथे लावा, तो गुलाम घ्या, राणी टाकू नका' वगैरे सल्ले देतो, तो हाडाचा रमीवाला! बारमध्ये नवखा होतो, तरी खरा रमीवाला होतो मी गोट्यांना सल्ले देऊ लागलो. त्यांनाही उपयोग होऊ लागला. मी रमीत रमलेला बघून मित्र निघून गेला. काही वेळाने गोट्यांचा एक पक्षकार, 'कोर्टात पुकार झाली आहे 'असे सांगत आला. नाइलाजाने पण गडबडीत ते उठले. माझ्या हाती स्वतःचे पत्ते दिले. नीट खेळा असे सांगून खुंटीवरचा एक कोट अंगावर अडकवून ते निघाले. "अरे, तो माझा कोट आहे." एक वकील खेळाडू ओरडले. पण ते ऐकायला गोटे वकील तिथे नव्हते. ते आधीच गेले होते.
"कोर्टात माझी केस निघाली, तर काय घालू?" - खेळाडू वकील. "त्याचा कोट घाल!" दुसर्‍या खेळाडू वकिलाने सल्ला दिला. "काहीतरीच काय, ते केवढे, मी केवढा!" - खेळाडू वकील. "पुकारा होईल तेव्हा बघू, आता खेळात खोडा नको." असे दुसरे खेळाडू वकील म्हणाले. त्यांना या डावात चांगले पत्ते आले असावेत.
पुन्हा खेळ सुरू झाला. सुदैवाने मला चांगले पत्ते येत गेले. सलग तीन-चार डाव जिंकले. इतरांनी जे जिंकले, त्यात फार कमी मार्क दिले. सगळे खेळाडू वकील माझ्या रमीकौशल्याने प्रभावित झालेले दिसले. अंदाजे पाऊण तासानंतर खेळ संपला. मार्क मोजणी सुरू झाली. तेव्हा गोटे वकील परतले. "काय झालं?" त्यांनी विचारले. आपण हरलो असणार याची त्यांना खातरी होती.
"नवा भिडू,फार तयारीचा आहे हो !" माझे कौतुक करत, मार्क मोजणाराने गोटे जिंकल्याचे जाहीर केले.
गोट्यांनी माझी पाठच थोपटली.

आता बार रूम रिकामी झाली होती. फक्त खेळाडू वकील होते. त्यांचे हिशोब पूर्ण होऊन आर्थिक देवघेव झाली. त्यांच्या रितीप्रमाणे गोट्यांनी क्यांटीनमध्ये 'के एम टी' (खारा मिठाई टी)ची पार्टी दिली. मीही होतोच. माझ्या रमीकौशल्याची चर्चा सुरू झाली. नंतर माझी विचारपूसही झाली. ज्युनियरशिप कुणाकडे करू? असे मी विचारले. त्यावर सर्वांनी खल केला. एकाने एका वकिलाचे नाव घेतले की दुसरा ते खोडून काढी, आणि त्यांच्याकडे गेलो तर माझे नुकसान होइल हे सोदाहरण पटवून दिले जाई. अशा रितीने कोर्टात कार्यरत असलेल्या सर्व जेष्ठ वकिलांची नावे चर्चेअंती बाद केली गेली. ही चर्चा भलतीच गरमागरमीत झाली. खूप मतभेद झाले. चर्चेचा गोषवारा साधारण खालीलप्रमाणे होता -
गोखले वकील सिव्हिलमध्ये किडा आहेत, पण तुसडा!
चव्हाणाकडे क्रिमिनलचे खूप काम आहे, पण आधीच खूप ज्युनियर वकील आहेत.
डोंगरेकडेपण चांगले काम आहे, पण रात्री आठनंतर जायची सोय नाही. गडी टाईट असतो.
केंबळेकराचे वाचन दांडगे आहे, ल्यायब्ररी मोठी आहे. पण काम फारसे नाही. पुस्तके काय अंथरायची की पांघरायची?
टिंगरे ज्युनियरकडून काम खूप करून घेतो, पण हातून पैसा सुटत नाही.
जोशी म्हणजे बडे प्रस्थ, पण आता स्वतः काम करत नाही. पोरावर सोडलंय सगळं. आणि तो तर दिव्य आहे.
शिंगणे हुशार आहे, पण स्वतःला फार शहाणा समजतो.
वगैरे वगैरे..
शेवटी मी स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणे फायद्याचे आहे, असा निष्कर्ष निघाला. मी रमीत एक्स्पर्ट आहे, म्हणून रोज खेळायला यावे यावर मात्र सर्वांचे एकमत झाले.
एव्हाना सहा वाजून गेले होते. बहुतेक वकील, पक्षकार निघून गेले होते. आवारात फारसे कुणी नव्हते. क्यांटीन, पानटपरी बंद होण्याच्या मार्गावर होते. मी निघायचा विचार करू लागलो. एका खेळाडू वकिलांनी रीक्षात लिफ्ट देऊ केली. अगदी घराजवळ सोडले.
कोर्टातल्या पहिल्याच दिवसाची कमाई घेऊन घरी परतलो, रमीची सिंडिकेट जिंकून दिल्याबद्दल गोटे वकिलांनी दिलेले वीस रुपये!

नीलकंठ देशमुख.

(कै.द.मा. मिरासदार यांच्या स्मृतीस अर्पण)

प्रतिक्रिया

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2021 - 9:07 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.आपल्या अभिप्राय बद्दल. लिहायचे बरेच आहे डोक्यात..
पाहूया कितपत जमतंय ते.

मस्त आहे लेख. एका वेगळ्या जगाची झलक.
पहिला दिवस तर दिसला.. आता इतर पुढे घडलेले किस्से येऊद्या.

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2021 - 9:10 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. प्रयत्न तर आहे.. आपल्या सासारख्या वाचकांच्या शुभेच्छा मुळे शक्य होईल असे वाटते

टुकुल's picture

8 Nov 2021 - 11:07 pm | टुकुल

छान लिहिले आहे, आधी मला वाटल कि पुर्ण स्वानुभव आहे, पण नंतर लक्षात आले कि थोडा कल्पना विलास पण आहे, पण छान जमलं आहे.

तुमचे न्यायाधीश पणाचे अनुभव वाचायला आवडेल. मि ऐकलं आहे कि न्यायाधीशांना बरीच बंधन असतात Conflict of Interest होवु नये म्हणुन.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2021 - 2:30 pm | नीलकंठ देशमुख

आभारी आहे प्रतिसादाबद्दल. कधीतरी लिहियचे डोक्यात आहे.

अनिंद्य's picture

9 Nov 2021 - 11:29 am | अनिंद्य

@ नीलकंठ देशमुख,

चित्रदर्शी वर्णन, खुसखुशीत किस्से.

आणखी अनुभव नक्की लिहावे हीच विनंती.

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2021 - 2:32 pm | नीलकंठ देशमुख

खूप आभारी आहे. लिहीत असतोच. आठवते, सुचते तसे .

लोकांना चांगले वाटते, आवडते हे कळल्यावर हुरूप येतो

जुइ's picture

10 Nov 2021 - 8:12 am | जुइ

कोर्टाचे चित्र डोळ्यासमोर उभे केले. लेखनाची शैली आवडली.

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2021 - 10:04 am | नीलकंठ देशमुख

आभारी आहे.आपल्या प्रतिसादाबद्दल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Nov 2021 - 1:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

कोर्टासारखा गंभिर विषय असूनही हलका फुलका आणि खुमासदार झाला आहे.

कामा निमित्त अगदी कोर्टात नाही पण ट्रायब्युनल पर्यंत अनेकदा जाणे झाले आहे. त्या मुळे वाचतना अरे? हे तर आपणही अनुभवले आहे असे वाटत होते. त्यामुळे वाचताना अजूनच मजा आली.

एकदा एका ट्रायब्युनलच्या सुनावणीला सरकारी वकिल काहीही तयारी न करता आले होते आणि त्यांनी तयारी करण्या करता पुढची तारीख मागितली. त्या वेळी मी त्याला चिडून जोरात अक्षेप घेतला, कारण ही त्यांची सातवी का आठवी वेळ होती पुढची तारीख मागण्याची, प्रत्येक वेळचे कारण वेगवेगळे होते. सुनावणी साठी प्रत्येक दिवशी आम्हाला पुण्यावरुन मुंबईला यावे लागायचे, जर काही कामकाज झाले नाही तर संपूर्ण दिवस वाया जायचा.

अक्षेप फक्त वकिलानेच घ्यायचा असतो हे मला तो पर्यंत माहित नव्हते, माझ्या मधे बोलण्याला सरकारी वकिलांनी अक्षेप घेतला, पण त्यांना गप्प करुन तीनही न्यायमुर्तींनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि त्या नंतर सरकारी वकिलांचे जाहिरपणे कान उपटले. तसेच या पुढे जर तारीख मागीतली तर प्रत्येक तारखेसाठी वकिल महोदयांना रु १०,००० दंड करु अशी ताकिदही दिली. बाहेर आल्यावर आमचे वकिल मला म्हणाले बरे झाले बोललास नाहीतर या लोकांनी आपल्याला फेर्‍या मारुन मारुन दमवले असते.

त्या नंतर पुढच्या दोन हिअरींग मधे ती केस संपली आणि निकाल आमच्या बाजूने लागला.

पैजारबुवा,

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2021 - 7:10 pm | नीलकंठ देशमुख

माझे लिखाण आवडले, मजाआली हे वाचून आनंद झाला.
वकील हजर असूनही
तुम्हाला बोलायची परवानगी मिळाली,
तुमच्या बाजूने निर्णय झाला हेही छान झाले.

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2021 - 8:33 pm | प्राची अश्विनी

मस्त खुसखुशीत लेख.

नीलकंठ देशमुख's picture

11 Nov 2021 - 10:36 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

नावातकायआहे's picture

10 Nov 2021 - 9:08 pm | नावातकायआहे

सुंदर लेख! वाचताना मजा आली!!

नीलकंठ देशमुख's picture

11 Nov 2021 - 10:39 am | नीलकंठ देशमुख

आभारी आहे. लिखाण आवडले वाचून छान वाटले.

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 Nov 2021 - 9:32 pm | बिपीन सुरेश सांगळे

लेखन आवडले
नर्मविनोदी खुसखुशीत लेखनशैली

नीलकंठ देशमुख's picture

11 Nov 2021 - 10:41 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
वाचकांकडून प्रतिसाद मिळाला की आनंद होतो.

सुधीर कांदळकर's picture

11 Nov 2021 - 6:48 am | सुधीर कांदळकर

कोर्टातले वातावरण छान उभे केले आहे. चालू कोर्टात आपण बेसावधपणे घुसल्याचा प्रसंग मस्त. छान अनुभवलेखन. आवडले. धन्यवाद.

नीलकंठ देशमुख's picture

11 Nov 2021 - 10:46 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. तसे हे स्वानुभवकथन नाही .आजूबाजूला घडलेले प्रसंग, अनुभवलेले वातावरण, दिसलेली माणसे,आणि कल्पना विलास यातून हा दीर्घ किस्सा तयार झाला. वाचणा-यांना आनंद देतो, मजा येते हे कळल्यावर छान वाटते.

श्वेता व्यास's picture

11 Nov 2021 - 6:30 pm | श्वेता व्यास

छान खुसखुशीत लिहिले आहे, चित्रपटात पाहिलेल्या कोर्टाच्या आवारावरून कल्पना करून प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.

नीलकंठ देशमुख's picture

11 Nov 2021 - 10:11 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. छान वाटले प्रतिक्रिया वाचून.

सुबोध खरे's picture

12 Nov 2021 - 12:28 pm | सुबोध खरे

खुमासदार लेख आहे. शैली पण सुंदर आहे.

वाचताना काही गोष्टी खटकल्या. उदा. कोणाचीही ओळख न काढता किंवा कोणाबरोबर न जाता एल एल बी झालेला वकील पहिल्यांदा थेट अनोळखी कोर्टात जाईल हे पटत नाही.
एखादा डॉक्टर एम बी बी एस पास झाल्यावर थेट अनोळखी रुग्णालयाती एका वॉर्ड मध्ये राउंड चालू असताना जाईल हे जसे पटत नाही तसेच.

किंवा गळ्याच्या बँड आणि वाजवायच्या बँड मध्ये गल्लत होईल हे पटले नाही.

असो. तपशीलात जाऊन रंगाचा भंग होऊ नये

बाकी खालच्या कोर्टातील असे वातावरण पाहिलेले आहे. तेथे सुशिक्षित असलात तरी तुमचा इतका कालापव्यय होतो आणि इतके बेशिस्त वातावरण असते कि खरेच कोर्टाची पायरी चढू नये हे पटते.

पण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मात्र खरोखरच वातावरण अतिशय गंभीर असते. अगदी सिनेमात दाखवतात तसे.

पण बार रुम मध्ये मात्र भरपूर भंकस चालू असते. एखादा अनभिज्ञ माणूस गेला तर वरिष्ठ वकिलांबद्दल गैरसमज होईल इतका.

थोडा थोडका नव्हे तर चांगला साडे तीन वर्षांचा अनुभव आहे.

नीलकंठ देशमुख's picture

12 Nov 2021 - 5:13 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. हे स्वानुभव कथन नाही.
पहिल्याच दिवशी असे गोंधळून गेलेले काही नववकील पाहाण्यात आहेत.
विनोद निर्मितीसाठी विसंगती, अतिशयोक्ती, शब्दांचे खेळ या सोबत कल्पना स्वातंत्र्य अशा क्लृप्त्या वापरणे गैर नाही हे सर्व मान्य आहे.
असो. तुम्ही पूर्वी वकीली केली आहे का? सध्या काय ? हे सहज...

सुबोध खरे's picture

12 Nov 2021 - 7:46 pm | सुबोध खरे

मी वकील नाही.

लष्करात डॉक्टर होतो. तेथून नोकरी सोडण्यासाठी तीन वेळेस राजीनामा देऊनही सुटका होत नव्हती म्हणून मुंबई उच्च न्यायालयात रिट अर्ज केला. तेथे केस जिंकलो.

त्यावर भारत सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे केस जिंकलो आणि लष्करातून सुटका झाली.हे सर्व प्रकरण साडे तीन वर्षे चालू होते. त्यामुळे कोर्टबाजीचा लांब लचक अनुभव घेतला आहे.

आता मुंबईतच डॉक्टरकी करतो. फावल्या वेळात( जो मला भरपूर आहे) मिपा वर येत असतो.

मित्रहो's picture

14 Nov 2021 - 5:21 pm | मित्रहो

खूप छान लेखन. लिखाणाची शैली आवडली. कोर्ट डोळ्यासमोर उभे राहिले.

नीलकंठ देशमुख's picture

14 Nov 2021 - 10:04 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून छान वाटले.