दिवाळी अंक २०२१ : असे दुकानदार / ग्राहक येती राशीला

पियुशा's picture
पियुशा in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

काही काही दुकानदार आणि आम्ही म्हणजे अस्मादिक यांचे गेल्या जन्मीचे काहीतरी वैर असावे, असे मला राहून राहून वाटते. गेल्या जन्मीचे त्यांचे किंवा आमचे भोग म्हणून ते भोग पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघांनी या भूतलावर जन्म घेतलाय,. अशी शंका येते.

माझ्या शॉपिंग सेन्सचा माझ्या कुटुंबीयांना पहिल्यापासूनच धसका आहे. बाई काय घेऊन येईल याचा नेम नाही. बरं, आणलं तरी आणलेलं किती काळ तिच्याकडे राहील किंवा काही तासातच त्यावरच मन उडेल न आपण गंडलो, किंमत जास्त आहे, क्वालिटी इतकी खास नाही , सेम असच मैत्रिणीला स्वस्त मिळालं, किंवा चार लोकांपैकी दोन जणांना आवडल नाही अशी (फालतू) कारणे देऊन परत ते रिटर्न करायला जाईल (वर आपल्यालाहि सोबत घेऊन जाईल) अशी भीती त्यांना सतत वाटते. पण ते समजतात तितकी मी 'ही' नाहीये, बर'!

नवीन नवीन लग्न झाले, तेव्हा नवरा एकदम हौसेने मला मॉलमध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, "कर तुला काय शॉपिंग करायचंय ते." असे ऐकल्यावर दहा दिवस उपाशी असणाऱ्या मनुष्यासमोर पंचपक्वान्नाची थाळी ठेवल्यावर तो ज्या स्पीडने बकाबका खाईल, त्या स्पीडने मी बकाबका हे आपले धडाधड शॉपिंग करत गेले. ऐकते काय! कपड्यांच्या सेक्शनमध्ये आणले ढीगभर कपडे आणि प्रत्येक वेळी ट्रायल रूममधून बाहेर येऊन नवऱ्याला "कसं दिसतंय? कसं दिसतंय?" करून वैताग आणला. पण बिचाऱ्यची काय हिम्मत "वाईट दिसतंय" म्हणण्याची! बिचारा "छान, छान, मस्त, मस्त" करत गेला आणि घात झाला. (माझा नाही हो, त्याचा :)

घरी आल्यावर कपडे पुन्हा ट्राय केले, त्यातले २-३ काही सासूबाईंना इतके खास नाही वाटले. त्या काही म्हणाल्या नाहीत, पण त्यांचे हावभाव मी हेरले (हुश्शार मी). घरी येईपर्यंत रात्र झाली होती. म्हटले, उद्या काय तो सोक्षमोक्ष लावू.

सकाळी उठल्यावर नवऱ्याने प्रेमाने "गुड मॉर्निंग" म्हटले. म्हणे, "आज कुठे जाऊ या फिरायला?" मी म्हटले, कालच्याच मॉलमध्ये! परत शॉपिंग? नवऱ्याने एकदा माझ्याकडे, एकदा त्याच्या पकिटाकडे पाहिले. चहाऐवजी कारल्याचा ज्यूस पितोय असा त्याचा चेहरा झालेला. पण मी म्हटले, "घाबरु नकोस. शॉपिंग नाही करायची. काल आणलेले काही टॉप्स बदलायचे आहेत."

हे ऐकून नवरा ताडकन उडालाच. "आता कशाला बदलायचे? चांगलम आहे की सगळं, तुला आवडलाय ना? मग?" मी म्हटले, "अरे, ते मॉलच्या लाइटमध्ये खूप फ्रेश वाटत होते घातल्यावर, पण घरी घातल्यावर चक्क एकदम डल वाटते, म्हणजे लाइटमध्ये मला वेगळा कलर दिसला, घरी आल्यावर दिवसा वेगळा कलर आहे. मला नको असला dull कलर! मला रिटर्न करायचेत काही टॉप्स. आपण आपले पैसे परत घेऊ!"

झाले! नवऱ्याला वाटले, कुठून बुद्धी(दुर्बुद्धी) आली अन् हिला घेऊन गेलो. एकतर मुंबईची गर्दी, त्यात हिला लोकलमध्ये प्रवासाचा अजिबात अनुभव नाही, लेडीज डब्यामध्ये ही चढू शकत नाही, बरे, चढली तरी कुठे उतरायचे, किती सेकंदात उतरायचे हिला कळत नाही. मी उतरलो अन हिला नाहीच उतरता आले, तर ट्रेनमागे पळता पळता माझीच सिमरन व्हायची अन् ही बया हातहि नाही देणार राजसारखा! वरती ह्या बॅग सांभाळा, वर हिला सांभाळा! सगळीकडे गोचीच गोची!

"अगं बाई, असं नाही होत. cardने पे केलंय. रिटर्नच्या फंदात नको पडूस, आता घेतलेत तर वापर ना. कशाला चेंज करायची भानगड? घरात वापरून टाक नं!" बिचारा खिंड लढवत होता, पण 'मे तो अपने आप की भी नही सुनती|' गेलो बाई मॉलमध्ये. रिटर्न तर केलेच, वर आणखी २-४ही घेतले. पण है वैताग आणणारे होते - माझ्यासाठी नाही, नवऱ्यासाठी! मला तर लहानपणापासून experience आहे ना!

लहानपणी असेच एका दिवाळीच्या सिझनमध्ये मी आणि आई कापडबाजारात फिरत होतो. तेव्हा आमचे वय ना धड लेकरू, न धड तरुणी असे अडनिडे होते. असेच पाट्या वाचता वाचता, दुकाने फिरता फिरता एका दुकानात लटकलेला तो टी शर्ट बघताक्षणी माझ्या नयनचक्षूंनी हेरला न दुसऱ्या सेकंदाला माझ्या मनात भरला. आईला म्हटले, "मला आवडलाय. घ्यायचाय. घेऊन दे." आईने एकदा टी शर्टकडे अन एकदा माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिले. पण आम्ही दोघेही घाबरलो नाही. आईला म्हटले, "घ्यायचाय म्हंजे घ्यायचाच आहे" आणि ठिय्या मांडून बसले पायरीवर. घेतला नाही, तर काही वेळाने ही इथे जमिनीवर लोळायला लागते (माझी लहानपणीची सवय) की काय, ह्या भीतीने घेतला बिचारीने!

फुल्ल स्लीवचा पांढरा टी शर्ट, त्यावर लाल लाल मोठी वर्तुळे. त्या दुकानात चेंजिंग रूम वगैरे लाड नव्हते, त्यामुळे डायरेक्ट विकत घेऊन घरी जाऊन ट्राय करणे हाच एक पर्याय होता. बिचाऱ्या माझ्या आईला टी शर्ट बी शर्ट खरेदीचे नॉलेज नव्हते अन त्यात आमचे वय नादान असल्यामुळे तिला (मला) नाही म्हणण्याची सोयही नव्हती!

आली बै एकदाची आमची स्वारी घरी. कधी एकदा घालून पाहते, असे झाले होले. बाकीच्या भाऊ मंडळींना म्हटले, "थांबा जरा, आलेच." इतका हुरळून जाऊन जो टी शर्ट घेतला होता, तो घातल्यावर शेतातले बुजगावणे कोण आणि मी कोण? असा प्रश्न घरच्या आरशाला पडला असावा.

बराच वेळ झाला, तरी मी रूमच्या बाहेर न आल्याने मला हर्षवायू झाला आणि मी 'अशी ही बनवाबनवी'मधली सुधीर जोशी होऊन 'जिकडे तिकडे चोहीकडे आनंदीआनंद गडे' अशी नाचते की काय, अशी शंका आल्याने घरचे सारे दाराशी येऊन "बाहेर या माउली, आम्हालासुद्धा पाहू द्या" अशी साद घालू लागले.

कदाचित मला विचित्र वाटत असेल, घरच्यांना कळेल कसा दिसतोय तो.. या (भोळ्या) आशेवर मी बाहेर आले. सगळ्यांनी एकदा मला नीट पाहून घेतले नि जन्मभराचे एकदाच हसूनही घेतले. भाऊ तर म्हणाला, "अगं, हा मुलांचा टी शर्ट आहे, इतकं कळलं नाही तुम्हाला? बरं, घेतलास तर घेतलास, जरा नीट पाहून घेतला असता तर आम्ही कुणीतरी वापरला असता तरी.. हे चक्रीफूल कोण घालून फिरणारे?" माझ्या फुगलेल्या नाकपुड्या, लाल डोळे ह्यांना कुणी कुणी घाबरले नाही. मी रडवेली होऊन म्हटले, "चल मग, आपण बदलून आणू." आई तर माझी गायबच झाली. भावाला कसेबसे दादापुता करून घेऊन गेले.
दुकान दाराने मला काचेतून पाहिलं हातातली पिशवी पाहून समजल असेल त्याला , त्याची ती नजर पाहून हा कुठल्याही क्षणी आपल्याला ऍनाकोंडा( तेव्हाचा फेमस पिक्चर)सारखा गिळून घेतो की काय असं वाटलं मला, मी बिचारी आपल्या भावाच्या मागे पावसात भिजलेल्या मांजरा सारखी उभी होते भाऊ म्हणला ये रिर्टन करना है ? क्यू क्या प्रॉब्लेम है? आता काय सांगणार डोंबल ? भाऊ म्हणाला " साइज् बहोत बडा है, डिझाईन पसंद नहीं आया टी शर्ट लेलो, पैसे देदो " हे वाक्य "जुते देदो पैसे ले लो" च्या तालावर भारी वाटल अस्त गायला पण तो दुकानदार काय सलमान नव्हता अन् भाऊ काय माधुरी नव्हता दोघांची चांगली जुंपा जुंप झाली हो नाही करत घेतलेच पैसे परत सगळे क्रेडिट भावाला ! पण मी कानाला खडा लावला इथून पुढे कुणालाही घेऊन जायचं नाही बदलायची वेळ च आणायची नाही असा चंग बांधला . कसे बसे दीड दोन वर्ष काढले कपडे आवडले नाही तरी घातले, कधी कधी तर डिफेक्टिव होते तरी भीती पोटी परत नाही केले चक्क शिवून बिवून वापरले सांगता कुणाला? मग कॉलेजात गेल्यावर माझ्या सारखीच( सटकेली) मैत्रीण भेटली दर महिन्याला शॉपिंग ,चालू झालं नीट खातर जमा ,ट्रायल ,घासाघीस(bargening) इत्यादी अनुभवातून चुकत गेलो शिकत गेलो .
आपण शॉपिंग करतानाच नीट काय ते बघून घ्यायचं परत परत रिटर्नची झंझ ट नको अशा ठाम निर्धार केल्याचं बघून हळू हळू घरचे जरा काळजीमुक्त होउन माझ्या बरोबर शॉपिंगला येऊ लागले ,दुकानदारांना ४ सुखाचे दिवस येऊ लागले.
आधी माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या शॉपिंगच्या कर्तुत्व कहाण्या अनुभवलेले दुकानदार , आम्हाला पाहून " अरेरे वो माल तो खत्म हो गया ( खोटार्डे मेले) नेक्स्ट टाइम आएगा तो कॉल करता हु अशा थापा मारनारे दुकानदार आता आम्हाला या या बसा बसा नया माल आया है नया फैशन का है वैगेरे वैगेर सांगत होते ! हैला भारिच होत हे!
असे करत करत खुप वर्ष झाली माझी तर " दुकानदार " या विषयवार phd झाली दुकानदार आणि त्यांचे प्रकार यावर मी निंबध लिहू शकते.
म्हणजे बघा काही दुकानदारानी एक माणुस स्पेशल बाहेर खुर्ची टाकून बसवलेला असतो आपण नुसता दुकानाकडे पाहण्याचा उशीर, की ते लगेच टेप सुरू करता " क्या चाहिए था बेहेनजी, अंदर आओ ना सब है अपने पास साड़ी, कुर्ता लहंगा चोली, जींस बीन्स सब है अंदर तो आओ दो मिनिट , बर आपन नहीं नही कुछ नहीं चाहिए म्हटले तरी १०० मीटर पर्यंत आपला पाठलाग करतात मग अशावेळी मी म्हणते हमारे आजी को नौवारी साड़ी चाहिए है क्या तूम्हारे पास? बिचारा वो तो नहीहै म्हणून कानकोंडा होउन परत जातो. अजुन एक प्रकारचे दुकानदार असत्तात त्यांनी एक माणूस स्पेशल तुमची तारीफ करायला ठेवलेलं असतो तुम्ही नुस्त ड्रेस किंवा साडी लावून बघितली तरी यांची टेप चालू होते" अरे क्या मस्त कलर है भाभिजी, आपकी चॉईस का जवाब नहीं,ये कलर आपके गोरे रंग पे कित्ना खीलता है ! सर ये शर्ट में तो बहोत हैंडसम लग रहे आप !अशी स्तुति सुमने उधळून उधळून आपल्याला भरीस पाडत असतात.आणि काही प्रकारचे दुकानदार इतके मक्ख असतात की सगळं सेल्स मन च्या हवाले करून आपण काऊंटर वर नाही तर हिमालयावर बसलो आहोत अशी यांची धारणा असते काहीही विचारलं तरी एकच त्रासिक मुद्रा असते जणू काही त्यांना ग्राहक नावाच्या पामराच काही घेण देण नाही.
काही दुकानदार तर सेल्समन च्याच बाजूला उभे असतात " अरे भाई वो बॉक्स दिखा ,लेटेस्ट दीखा, वो नहि ये दिखां ,अमका तमका फलाना ढीमका दिखा करत करत डोक्याचा इतका भुगा करतात की आपण विसरून जातो की काय घ्यायच होत आपल्याला नक्की ! आपण काही रिटर्न करायचं म्हटल की आधी मधासारखे गोगोड्ड बोलणारे दुकानदार आपल्याला मध माशासारखे डंख मारू लागतात " तो one and only piece होता " रिटर्न चां टाईम दुपारी आहे ,अभी बहोत भिड है बादमे आव ,लेते टाईम ही ठीक से देख के लेनेका ना ? अशी कारणे देऊ लागतात काहीतर भांडायच्या मुड मध्ये पण असतात मग आपण त्यांच्या पेक्षा सटकलेले आहोत ( इथे तुमच्या अभिनय क्षमतेला वाव असतो) याची बारीकशी चुणूक दाखल्यावर देतात मग नाईलाजाने घेतात परत. असे लिहायला बसले तर सगळे दुकानदार हाणातील मला!

असो..
आताशा मी रिटर्न करत नाहीच अस नाहीये ,करते अधून मधून ,दुकानदार वस्तू काळ वेळ,मूल्य, यांचे योग जुळवून करते मी रिटर्न ! नाहीतर मी संत पदाला पोहचले असा तुमचा गैरसमज व्हायचा.. परवाच मी माझ्या लहानग्यासाठी एका साईट वरून तीनचाकी सायकल ऑर्डर केली आणि दिल खुश होगया पण सेम तीच सायकल दुसऱ्या साईटवर कमी किमतीला पाहून दिल फुस्स होगया नवऱ्याला म्हंटले ही order cancel करून त्या साईट वर ऑर्डर टाकू का ? तर त्याने मला खाऊ की गिळू असा लूक दिला ! आता त्याचेच पैसे वाचवत होते ना मी !

आता सुमारे ४ वर्षे नवरा माझ्याबरोबर शॉपिंगला येतो (न येऊन जाणार कुठे..), पण माझ्यापासून १० फुटाचे अंतर ठेवूनच असतो, म्हणजे मी हिच्याबरोबर नाहीच्चे असा इतरांना भासवण्याचा क्षीण प्रयत्न! माझे (शॉपिंग आणि रिटर्नचे किडे ) असा जुना स्वभाव कधीही उफाळून येईल की काय, ह्याची धास्ती वाटत असावी त्याला!

(हा लेख पूर्णतः काल्पनिक आहे.)

प्रतिक्रिया

मित्रहो's picture

2 Nov 2021 - 8:29 pm | मित्रहो

मजा आली वाचताना छान अनुभव आहेत खरेदी करण्याचे आणि परत करण्याचे. घेतलेली वस्तू परत करणे ही कला आहे. आताच्या मिंत्रा, ऍमेझॉनच्या काळात ती कला हरवत चालली आहे.
तो लेटेस्ट दिखाना वाचून हिंदी मिडियम मधला इरफान आठवला.

बोलघेवडा's picture

2 Nov 2021 - 8:50 pm | बोलघेवडा

हा हा!!! मस्त खुसखुशीत लेख (अस दिवाळी लेखाला म्हणायचा खास वाक्यप्रकार आहे).
लेख आवडला आणि कंसातील वाक्यांनी मजा आणली. :)

कानडाऊ योगेशु's picture

2 Nov 2021 - 9:04 pm | कानडाऊ योगेशु

मस्त खुशखुशीत लेख.
पत्नीच्य बाबतीत तिच्या सोबत कपडे खरेदीला जाणे म्हणजे ज्या मॉल/दुकाना मधुन कपडे खरेदी केले तिथे तेच कपडे बदलण्यासाठी परत एक ट्रीप अगदी ठरलेलीच असते.माझ्या बाबती माझे जे चार दोन कपडे आहे त्यातही काल कुठला घातला हे आज मला सहजासहजी आठवत नाही आणि पत्नी जवळ ढीगभर कपडे आहेत आणि कुठल्या वेळी तिने कुठली साडी नेसली होती कुठला ड्रेस घातला होता हे तिला अगदी लख्ख आठवते. तिचेच नाही तर बाकीच्या परिचित स्त्रियांनीही काय काय परिधान केले होते ते ही आठवते आणि त्यानुसार पुढच्या एव्हेंटवेळी नवीन ड्रेस निवडला जातो.
विशेषतः पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे पण खरेदी करताना माझेच कार्ड लागते. खरेदी केल्याचा फिल येतो असे तिचे म्हणणे आहे ह्यावर.
नवरोबांची दुसरी खासियत म्हणजे जेव्हा पत्नीसोबत मॉलमध्ये खरेदीला जातात तेव्हा बिलिंग काऊंटरला जायची घाई करणे.ह्याच विषयावर नवरोबांच्या बाजुनेही एक लेख यायला हवा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 11:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचता वाचता डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले,

वाटले अरे ही तर आपलीच गोष्ट आहे, प्रत्येक नवरा या चरकातून पिळवटून निघालेलाच असतो,

दोन दोन तास दुकानात घालवून घेतलेली साडी बदलावीच कशी लागते? हे कोडे मला आज पर्यंत सुटलेले नाही

आम्ही पुरुष पहा तिसऱ्या मिनिटाला दुकानातून बाहेर असतो तेही बिल देऊन, आणि ते कपडे वर्षानुवर्षे बिना तक्रार वापरात असतो

पैजारबुवा,

सुक्या's picture

3 Nov 2021 - 12:11 am | सुक्या

मी आधी खुप संकोची होतो या बाबतीत. नंतर मात्र अगदी निर्ढावलो .. आता अगदी धुतलेले शर्ट पण परत करुन आलो आहे.
फक्त वस्तु ची लेबले / पॅकिंग जपुन ठेवतो ... चेहेर्‍यावर मात्र अगदी साळसुद भाव असायला हवे ..

गेली दहा वर्षे बहुतांश खरेदी अमेरिकेत केल्यामुळे रिटर्न करताना वाद, घासाघीस करणे, त्याबद्दल त्रास होणे या भानगडी सुरवातीला वाचताना लक्षातच आल्या नाहीत. आमच्या एक शेजाऱ्यांनी किल्ली घरात विसरली आणि दार बंद झालं तर होम डेपोतून एक शिडी विकत आणली, गॅलरीतून वर गेल्यावर शीडी रिटर्न करून आले, देशी डोकी अशी चालतात!

हे हे :)खरच कोण कोणाच्या राशीला येईल सांगता येत नाही.
आमच्याकडे उलट आहे,आमचे हे हमखास कपडे रिटर्न करतात.
, ते मॉलच्या लाइटमध्ये खूप फ्रेश वाटत होते घातल्यावर, पण घरी घातल्यावर चक्क एकदम डल वाटते, म्हणजे लाइटमध्ये मला वेगळा कलर दिसला, घरी आल्यावर दिवसा वेगळा कलर आहे.
हे महान ज्ञान आमच्या ह्यांनी मला शिकवलं आहे.

नीलकंठ देशमुख's picture

3 Nov 2021 - 6:43 am | नीलकंठ देशमुख

छान. खरेदी केलेले कपडे परत करून दुसरे आणल्याशिवाय खरेदीचा खरा आनंद मिळत नाही असा तमाम स्त्री वर्गाचा समज,.
पहिल्या (धुंदीतल्या )काही वर्षानंतर मी हिच्यासोबत खरेदीला जाणे सोडून दिलंय. दुकानदारांवर दया यायची .

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 1:22 pm | मुक्त विहारि

आवडले

चार हाफ पॅन्ट आणि आठ हाफ शर्ट असले की, आमची कपडे खरेदी संपते

बायको बरोबर खरेदीला जाणे कधीच सोडून दिले आहे

लग्ना नंतर एकदाच साबुदाणा खरेदीला
( https://www.misalpav.com/node/21145 ) गेलो होतो, त्यानंतर गेलो नाही ....

Rajesh188's picture

3 Nov 2021 - 1:30 pm | Rajesh188

शॉपिंग करणे ही एक स्किल आहे.भाव कमी करणे ही अजुन अवघड स्किल आहे. आनी घेतलेल्या वस्तू परत करून पैसे परत घेणे ही खूप मोठी स्किल आहे.
लेख आवडला .
शॉपिंग करण्यात स्त्रिया ह्या खूप प्रगत असतात पुरुष एकदम अडाणी असतात.
बायकोला हो हो आणि छान छान इतकेच दोन शब्द बोलू शकतात (त्यांना त्या मधले काहीच कळत नाही काय बोलणार बिचारे)

प्रचेतस's picture

4 Nov 2021 - 5:00 am | प्रचेतस

हाहा,
एकदम भारी, खुसखुशीत लेख.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

4 Nov 2021 - 10:57 pm | सौ मृदुला धनंजय...

खूप सुंदर लेख .

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Nov 2021 - 12:44 am | ॲबसेंट माइंडेड ...

मजेशीर लेख.

श्रीरंग_जोशी's picture

5 Nov 2021 - 1:57 am | श्रीरंग_जोशी

खुसखुशीत अनुभवकथन आवडले.

आम्हाला आठवीत कुमारभारतीच्या पुस्तकात एक धडा होता ज्यात लेखक खरेदीच्या बाबतीत बुजरा असतो अन काही इरसाल माणसांचे त्यात वर्णन होते जे बिनधास्त दुकानात जाऊन महागड्या परफ्यूमच्या बाटलीचे झाकण (न विचारता) उघडून सुगंध घेतात अन एवढे करून खरेदी न करता बाहेर पडतात.

दुकानात वस्तू परत करणे ही गोष्ट अपवादात्मक असली पाहिजे असा माझा कटाक्ष असतो. अमेरिकेत कुठलेही प्रश्न न विचारता किंवा अगदी किरकोळ प्रश्न विचारून दुकानात वस्तू परत घेतल्या जातात. असे असूनही मी लहानपणापासूनच्या सवयीमुळे खरेदी करतानाच काळजीपूर्वक खरेदी करून वस्तू परत करण्याची वेळ येऊ देत नाही.

मदनबाण's picture

5 Nov 2021 - 7:16 pm | मदनबाण

मजेशीर अनुभव...
माझ्या बातीत एकदा घेतलेली वस्तु परत देण्याचा अनुभाचे प्रमाण उणे आहे. एकतर मी घेतल्या जाणार्‍या वस्तू बद्धल बरीच माहिती काढतो, त्यामुळे चुकीची खरदी शक्यतो होत नाही. आता हेच कपड्यांच्या बाबतीत देखील आहे, विशेषतः मी माझ्या बायडीला आज पर्यंत अनेक साड्या घेतल्या आहेत पण त्यातली तिला एकही आवडली नाही किंवा पसंतीस उतरली नाही असे झालेले नाही. साडी घेण्याची / खरेदीची ही दुर्मीळ आणि उद्भत कला मी माझ्या तिर्थरुपा़ंकडुत पिढीजात हातखंडा असावा अशीच शिकलो आहे.बायकोच्या माहेरच्या स्त्रियांकडुन तिच्या साड्यांचे भरपुर कौतुक झाले आहे आणि होते. होते यासाठी म्हंटतो, की मी प्रयत्नपूर्वक तिला दरवेळी वेगळ्या साड्या घेतो. नवरात्रात रोज वेगळ्या रंगाच्या साड्या हिंदू स्त्रिया मिरवणार नाहीत तर नवलच ! बायकोला सांगुन ठेवलेले आहे, जो कलर तुझ्याकडे नाही तो फक्त सांग... स्त्रियांचे विश्व हे इष्टमन कलर पेक्षा देखील अधिक रंगीत असते, हे त्यांच्या साडीच्या रंगांच्या छटांची नावे घेताना तुम्हाला लगेच कळते. श्रीखंडी पासुन अमसुली तर डाळींबी पासुन बॉटल ग्रीन ! स्त्रीयांच्या मनातील आणि शरीरातील हव्यास तुम्हाला जर पहायचा असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत साडी खरेदीला जाणे मस्ट आहे ! आहाहा... काय तो रम्य पागलपणा युक्त हव्यास पहावा ! :))) प्रत्येक साडीच्या पोताला हाताने चोळुन बघ, साडीच्या बॉर्डरला अंगठ्याने घासुन बघ, अचानक एखादी साडी उचलुन अंगावर टाकुन आरशात बघ ! असे आणि अगम्य चाळे हे जीव करतात हे माझ्या चाणाक्ष नजरेने अगदी हेरुन ठेवलेले आहे बघा. हल्ली ऑनलाईनच चा जमाना आहे, स्वतात अगदी चांगल्या साड्या मिळतात यावर आधी माझा विश्वास नव्हता, पण साडी खरेदीचे दुर्लभ प्रभुत्व अंगी असल्याने ऑनलाईन साडी खरेदीत देखील असामान्य महारत मै हासिल कर चुका हु ऐश्या मे बोला तो उसमे कुछ गलत नही बरं का ! :)
बायडीस पोचमपल्ली ते केरळासाडी पर्यंत सर्व प्रकार घेउन झालेत, मागच्या वेळी सांगितले तशी मस्त वारली प्रिंट देखील मीच निवडली होती. काही काळापुर्वी मी तिला आणि माझ्या मातोश्रींना ऑनलाईन खरेदीतुन "कोटा" साडी खरेदी करुन दिली. तर पाडव्याची भेट म्हणुन बायडीला"रामाग्रीन" रंगाची बनारसी सिल्क भेट दिली आहे. स्त्रियांच्या कलरफुल दुनियेतला हा नवा "रामाग्रीन" रंग प्रकार देखील यावेळीच कळला. साडी इतकी उत्तम निघाली की माझ्या मातोश्रींनी म्हणजे बायकोच्या सासुस देखील याच साडीचा आणि रंगाचा सोस निर्माण झाला ! आई असो वा बायको वा मुलगी. स्त्री हे रसायन आणि त्यांचे साचे निराळेच बघा ! :) तर आई ने जिने मला साडी नको तर त्या जागी पैसे दे असं म्हणली, तिनेच माझ्या बरोबर बसुन ऑनलाईन साडी पाहण्यास सुरुवात केली, पण "रामाग्रीन" तर आता अनअव्हेलेबल झाला होता, मग ती थोडी नाराज झाली. आई असली तरी ती स्त्री, मग मला तशीच हवी हा अट्टहास सुटणार कसा ? तरी मी कशी-बशी समजुत घालुन तिला मुक्त ऑनलाईन सफर घडवली आणि शेवटी तिचे ज्या रंगावर आणि पॅटर्नवर येउन मन थबकले ती "बनारसी कांजीवरम सिल्क" घेउन तिला तिची भेट दिली. :)

[साडी मास्टर]
मदनबाण.....

पियुशा's picture

5 Nov 2021 - 7:42 pm | पियुशा

@ मदन बाण म्हणजे तुमची phd झालीच म्हणा की साडी खरेदी च्या बाबतीत !

नूतन's picture

14 Nov 2021 - 12:34 am | नूतन

आवडला.

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

मस्त, झकास, खुसखुशीत !
+१
😀
शॉपींग म्हण्जे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे प्रकरण !
कधी बायकांचे तर कधी नवर्‍यांचे तर्‍हेवाईक शॉपिंग, बेजेटचं लफडं आणि घरच्यांच्या अपेक्षा या त्रिशंकूत !
आमचे एकएक अनुभव आठवले !

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2021 - 6:35 am | सुधीर कांदळकर

आम्ही कॉलेजात असतांना एखाद्या दुकानांत एखादी वस्तू नाही हे कलले की त्या दुकानात थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळा मुलगा ती वस्तू मागत असे. आमचे पाहून एका मित्राची वात्रट बहीण पण मैत्रिणींना घेऊन हेच प्रकार करीत असे.

छान चुरचुरीत फराळ लेखातून मिळाला. धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 10:23 am | प्राची अश्विनी

हलका फुलका खुसखुशीत लेख. आवडला.

तुषार काळभोर's picture

15 Nov 2021 - 12:03 pm | तुषार काळभोर

कानडाउ योगेश आणि पैजारबुवांच्या प्रतिसादाशी शब्दशः सहमत!

श्वेता व्यास's picture

15 Nov 2021 - 1:14 pm | श्वेता व्यास

खुसखुशीत लेख आहे. बाकी आमची खरेदी म्हणजे बघितलं, आवडलं किंवा नाही आवडलं इतकंच असतं, यामध्ये हे डिझाईन दाखवा त्यामध्ये तो कलर दाखवा असलं काही सुचतच नाही. आणि बार्गेनिंग म्हणजे तर अंगावर काटा :)

अनिंद्य's picture

15 Nov 2021 - 3:03 pm | अनिंद्य

खुसखुशीत लेख !

शॉपिंग 'आवडणाऱ्या' पुरुषांच्या प्रजातीत मोडत असल्यामुळे माबदौलत ओळखीतल्या सर्वांचे हक्काचे 'शॉपिंग बडी' आहेत. कधी कंटाळा नाही.

अगदीच पसंत पडल्याशिवाय (WOW फीलिंग आल्याशिवाय) स्वतःसाठी काही विकत घेतच नसल्यामुळे वस्तू परत करायचा योग मात्र येत नाही :-)

सध्या ऑनलाईन शॉपिंग मध्ये वस्तू परतवणे सोपे झाले आहे.