कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?
लोकहो,
पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734
त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ? मग २०००० कुठून कोंबायची? आणि त्यांतल्या काहींना ठार मारण्यासाठी फळ्यांवर नावं लिहायचा द्राविडी प्राणायाम कशासाठी?
एक साधा विचार करून पहा. पॉल पॉट आपल्याच लोकांना कशासाठी ठार मारेल? त्याचा काय फायदा त्यात? की अमेरिका कांभोजांना ठार मारेल? तिची निरपराध्यांचा जनोच्छेद ( = genocide ) करायची खाज हिरोशिमा, नागासाकी, कोरिया युद्ध, व्हियेतनामवरील आक्रमण इत्यादिंतनं पुरेशी स्पष्ट झालेली आहे ना ? काय खरं वाटतं ?
इथे कंबोडियाविषयी दोन लेख नोंदवले आहेत : https://www.misalpav.com/node/49427
तर उपरोक्त तीनही लेखांत पॉल पॉट क्रूरकर्मा म्हणून रंगवलाय. प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये. कसं ते पाहूया.
पहिल्याप्रथम मला माहित असलेला घटनाक्रम व तदनुषंगिक मतं देतो.
०१.
१९६२ / ६३ पासनं ख्मेर रूज नावाच्या लहानशा क्रांतीवादी गटाची स्थापना होऊन छोटीशी चळवळ सुरू झाली. पॉल पॉट हिचा कम्युनिस्ट नेता होता. ही चळवळ कंबोडियाचे राजे नरोत्तम सिंहनौक यांच्या विरोधात होती.
०२.
१९६५ साली अमेरिकेने व्हियेतनाममध्ये भूदल सैन्य घुसवलं. ज्याला ग्राउंड वॉर म्हणतात ते सुरु झालं. अमेरिकी सैनिक व्हियेतनामच्या जमिनीवर प्रत्यक्षांत उतरले.
०३.
सुमारे ३ वर्षं मनाजोगती प्रगती झाली नाही म्हणून तटस्थ कंबोडियात सैन्य घुसवायची परवानगी सिंहनौक यांच्याकडे मागितली. ती राजाने नाकारली. परिणामी अमेरिकेने लोन नोल या सेनानीस हाताशी धरून सिंहनौक यांना पदच्युत केलं. पुढे कंबोडियाच्या भूमीवर जबरदस्त बॉम्बफेक सुरू केली. सोबत मनसोक्त एजंट ऑरेंज फवारला. भरीस भर म्हणून अगणित भूसुरुंग पेरले. या हल्ल्यांची राजे सिंहनौकना कल्पना दिली होती. पण ते बलहीन असल्याने काही करू शकले नाहीत.
किसिंजरने या भीषण हल्ल्याचं समर्थन केलं. व्हियेतनामी सैन्य कंबोडियाचा आसरा घेत होतं, म्हणून अमेरिकेस हस्तक्षेप करावा लागला.
हे महाभयानक हल्ले १९७३ पर्यंत म्हणजे सुमारे ४ वर्षं चालू राहिले.
०४.
या हल्ल्यांमुळे ख्मेर रूज घाबरून गेले नाहीत. त्यांनी चिवटपणे कार्य चालू ठेवलं. तिहेरी अमेरिकी हल्ल्यांमुळे जनता उद्ध्वस्त झाली. खायला दाणा मिळेना व आसमंतात एजंट ऑरेंजचं विष भिनून राहिलं होतं. सर्वत्र भूसुरुंग पेरलेले होते. तरीपण खेर रूजने मिळेल तिथे धान्य पिकवणं चालूच ठेवलं.
परिणामी एका चिमुकल्या गटाचं विशाल लोकचळवळीत रुपांतर झालं. खेर रूज ने १९७५ साली राजधानी नोम पेन वर ताबा मिळवला. लोन नोल ची व त्याच्या पाठीराख्यांची हाकलपट्टी झाली. अमेरिकी हल्ले १९७३ सालीच थांबले होते ( निक्सनच्या सौजन्याने ).
०५.
या प्रयत्नांनी प्रभावित होऊन राजे सिंहनौक यांनी ख्मेर रूजला १९७५ साली पाठिंबा जाहीर केला. कम्युनिस्ट चळवळीस राजाचा पाठिंबा मिळाल्याची घटना जगात कुठेही घडली नाहीये. म्हणजेच पॉल पॉट हा राजमान्य व लोकमान्य नेता होता. पण अमेरीकामान्य नव्हता. हाच त्याचा गुन्हा. पुढे १९७६ साली लोकतांत्रिक कांभोजाची ( Democratic Kampuchea ) स्थापना झाली.
०६.
अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भाग पूर्णपणे बेचीराग झाला होता. त्यामुळे अन्न गिळायला प्रत्येकजण शहराकडे धावंत होता. शहरे प्रमाणाबाहेर फुगली. त्यातंच शहरांवर बॉम्बफेक होणार अशी आवई उठली. म्हणून सुरक्षेसाठी पॉल पॉट ने लोकांना ग्रामीत भागाकडे हलवायचं धोरण राबवलं. ग्रामीण भागात जिथे विषमुक्त जमीन मिळेल तिथे भातशेती सुरु केली. कंबोडियाने कुणाकडेही मदतीसाठी हात पसरले नाहीत.
अशीच सुमारे तीनेक वर्षं गेली.
०७.
१९७८ साली ख्मेर रूज यांच्या व्हियेतनामच्या सैन्याशी चकमकी झडल्या ( बहुधा सीमावादावरनं ). त्यातनं व्हियेतनामने कंबोडियावर आक्रमण केलं. क्षेत्रफळाने छोटा देश असला तरी व्हियेतनामी सैनिक अतिशय कडवे लढवय्ये होते. ख्मेर रूज त्या मानाने लढाईत यथातथाच होते. परिणामी त्यांना कंबोडिया सोडून सयामच्या जंगलात आसरा घ्यावा लागला.नोम पेन मध्ये परत एकदा सत्तापालट झाला व १९७९ साली कांभोज लोकप्रजासत्ताकाची ( People's Republic of Kampuchea ) स्थापना झाली. याच्या मागे व्हियेतनामी कम्युनिस्ट होते, व त्यांच्या मागे चिनी कम्युनिस्ट होते.
आज युरोप अमेरिकेत निर्वासितांचं अमाप पीक फोफावलं आहे. पण १९७८ च्या आधी 'कंबोडियन निर्वासित' हा पदार्थ कधी कोणी बघितलाय वा ऐकलाय तरी का ? नाही ना ? याला म्हणतात राष्ट्रीय स्वाभिमान. तो पॉल पॉट ने जोपासला. त्याला हुसकावून लागल्यावर कांभोजी निर्वासितांची रीघ लागली.
०८.
हा प्रयोग फारकाळ चालला नाही. कांभोज लोकप्रजासत्ताक कंबोडियात घुसलेल्या व्हियेतनामी सैन्याच्या जोरावर टिकून होतं. नाही म्हणायला ख्मेर रूजचा एक ( फुटीर ? ) गटही सरकारात सामील होता. या नाममात्र सहभागास सोव्हियेत संघ, अमेरिका, चीन व संयुक्त राष्ट्रासंघातल्या इतर काही देशांचा पाठिंबा होता. या देशांच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघातली ख्मेर रूज ची जागा राखून ठेवण्यात आली.
सगळ्या आक्रमणांचं होतं तेच व्हियेतनामी आक्रमणाचं झालं. त्यांना १९८९ साली कम्युनिझम कोसळल्याचं निमित्त होऊन त्यांना परत जावं लागलं. पुढे १९९१ साली सोव्हियेत साम्यवाद पूर्णपणे मोडीत निघाला. नंतर हे आघाडी सरकारही संपलं. १९९३ साली कांभोजची नवीन घटना तयार केली गेली. तीत शासन लोकशाही असून राजा नामधारी राहणार होता.
०९.
त्याआधीच १९८१ साली पॉल पॉट ने कंबोडिया कम्युनिस्ट पक्ष विसर्जित केला होता. त्याच वेळी ख्मेर रूजचं नेतृत्वही सोडलं. यापुढे तो फक्त मार्गदर्शक ( = mentor ) म्हणून राहणार होता. ख्मेर रूज मध्येही अनेकदा फाटाफूट झाली. आंतरराष्ट्रीय पाठिंबा १९९३ च्या नव्या घटनेच्या मार्गाने सत्तेत आलेल्या सरकारास होता. नव्या घटनेनुसार राजा आणि प्रजा एक झाले होते. साहजिकंच ख्मेर रूज ही दखलपात्र शक्ती उरली नाही.
१०.
पुढे १९९८ साली प्रकृती बिघडल्याने व हृत्शूल झटक्याने पॉल पॉट निधन पावला. काही जण म्हणतात की त्यास विष घातलं. काही म्हणतात की कुणी फितूर त्याला अमेरिकेकडे सुपूर्द करणार होते, म्हणून त्याआधीच स्वत:च विषप्राशन करून जीवन संपवलं.
असो.
पॉल पॉट व ख्मेर रूज यांचं खरं योगदान अमेरिकी हल्ल्यातनं कांभोज जनतेस परत स्वावलंबी बनवण्यात आहे.
---------x---------x---------
घटनाक्रम समाप्त. आता माझी मतं लिहितो.
---------x---------x---------
०१.
अमेरिकी हल्ल्यांची भीषण तीव्रता
एजंट ऑरेंजच्या परिणामांची नयनरम्य चित्रे खरंतर इथेच डकवणार होतो, पण धागा उडायचा. मात्र दुवा द्यायला हरकत नाही : https://www.google.co.uk/search?q=agent+orange+deformities&source=lnms&tbm=isch&sa=X आवडल्या सुंदरसुंदर प्रतिमा ? आता अमेरिकेने टाकलेल्या नापाम बॉम्बमुळे भाजलेल्या शरीराची चित्रे पहा : https://www.google.co.uk/search?q=napalm+burns++&tbm=isch झालं की नाही मन प्रसन्न ? आता अमेरिकेची पुढची भेट पाहूया. कंबोडिया हे अज्ञात भूसुरुंगांचं जगातलं सर्वात मोठं क्षेत्र आहे. हे सुरुंग काय पॉल पॉट ने हा#न मिळवले का? नाही बरं. ही किनई अमेरिकेची कृपा आहे. इथे माणशी ३००+ भूसुरुंग आहेत. जायचं का भात लावायला शेतात ? लावला भात अन गमावला हात. कसं वाटतंय ? किसिंजरचा ३०००००० ( अक्षरी तीस लाख ) टनांचा बॉम्बवर्षाव, ९५००० ( अक्षरी पंच्याण्णव हजार ) टनांचा एजंट ऑरेंज चा लोटलेला महापूर आणि ७००००००+ ( अक्षरी सत्तराधिक लाख ) भूसुरुंग उघड व्हायची वेळ आली. मग काय द्या सगळ्या हत्या पॉल पॉट च्या नावावर लोटून. कंबोडियाचा अधिकृत इतिहास हा शुद्धतम बकवास आहे. मार्गारेट थाचरच्या सरकारने अमेरिका ख्मेर रूजला पाठिंबा देत असल्याचं स्वीकृत केलं. पण अमेरिका पॉल पॉट च्या ख्मेर रूज ला का प्रशिक्षण देत होती? कारण की व्हियेतनामी सैन्याने अमेरिकेच्या नाकी नऊ आणले होते. व्हियेतनाम तर १९७६ साली हातनं गेलाच होता. नंतर कंबोडियाही गेला असता. म्हणजेच जोवर कामाचे आहेत, तोवर ख्मेर रूज ला मदत करायची आणि युद्धगुन्हे उघडकीस येऊ लागले की पॉल पॉट वर ढकलून द्यायचे. कंबोडियावर अत्याचार करणारे खरे गुन्हेगार कोण आहेत ते कळलं ना ? त्याच्या म्होरक्याचं नाव हेनरी किसिंजर. या माणसाला १९७३ साली शांततेचं नोबेल मिळालं. ---------x---------x--------- ०२.किसिंजर काकांची भेटवस्तू
कंबोडियातल्या लोकांनी किसिंजरचं वा अमेरिकेचं काय वाकडं केलं होतं? काहीच नाही. अशांवर निर्घृण अत्याचार करतांना किसिंजरास काय वाटलं? काहीही नाही. हा माणूस नव्हे नरपशू आहे. कल्पना करा तुमचा लहानगा खेळंत खेळंत घराबाहेर अंगणात गेलाय. तिथे त्याला किसिंजर काकांनी आकाशातनं टाकलेली भेटवस्तू मिळते. वस्तू रंगीबेरंगी व आकर्षक असते. मिकी माऊस किंवा डोनाल्ड डक सारखी दिसणारी असते. म्हणून तुमचं बालक ती वस्तू खेळायला घेतं. तेव्हा त्यावर एक बटण दिसतं. तुमचं बालक ते बटण मोठ्या उत्सुकतेने दाबतं. कसलासा आवाज येतो आणि आतमधून उकळतं तांबं तुमच्या बाळाच्या अंगावर फस्सकन पसरतं. बाळ भयाण किंकाळी मारतं. आईस तोवर त्याचा पत्ताही नसतो. कुठूनतरी ती येते तोच तिला मांसाचा लालबुंद गोळा तडफडत पडलेला दिसतो. किती रम्य दृश्य नाही? आवडलं तुम्हांस? तुमचं बाळ भाग्यवान असेल तर ते मरेल. अन्यथा तुमच्या मुलाला मांस चरचरत गेलेले व्रण किंवा तुटलेले वेडेवाकडे अवयव किंवा फुटलेला डोळा वगैरे परम सौख्य लाभेल. रम्य ते बालपण नाहीका ? मग बालपणाची आठवण आयुष्यभर राहायला हवी किनई ! इतक्या रम्य बालपणासाठी थोडीशी रडारड झाली तर इतका गहजब कशापायी ? किसिंजर काका किती दयाळू आहेत ते कळलं ना ? केव्हढ्या प्रेमाने त्यांनी ही खास भेटवस्तू पाठवली होती तुमच्या लाडक्या बाळासाठी. फक्त तिच्यावर नाव नव्हतं लिहिलेलं तुमच्या बाळाचं. कंबोडियातल्या दर २३६ पैकी एकाचा डोळा वा हातपाय नष्ट झालाय ( इंग्रजी लेख ) : https://www.deseret.com/1995/9/7/19195945/cambodia-land-of-mines-and-amputees ४० ते ६० लाख भूसुरुंग अज्ञातावस्थेत ( = undetected ) आहेत. दोन्ही प्रमाणं जगातली सर्वोच्च बरं का. ---------x---------x--------- ०३.एजंट ऑरेंज व त्याचे धागेदोरे
एजंट ऑरेंज मुळे विकृत बालकं जन्माला येतात. वर प्रतिमांसाठी दुवा दिला आहे. परत देतो : https://www.google.co.uk/search?q=agent+orange+deformities&source=lnms&tbm=isch&sa=X वाचकहो, एक गोष्ट जाणवली असेल. ती म्हणजे यातल्या जवळजवळ सर्व प्रतिमा हिंदचिनी ( = indo-chinese ) चेहऱ्यांच्या आहेत. म्हणजेच जगात इतरत्र कुठे झाली नसेल इतकी भीषण हानी अमेरिकेने कंबोडिया, व्हियेतनाम व लाओस ची केलीये. त्याची पावती मात्र पॉल पॉट च्या नावे फाडायची. खासा न्याय आहे ! एजंट ऑरेंज मुळे वनस्पतींचा सर्वनाश होतो. अशा ठिकाणी गिळायचं काय ? ४ वर्षांत तब्बल ९५००० टन ( अक्षरी पंच्याण्णव हजार टन ) फवारल्यावर जमिनीचं काय खोकडं होईल ? तरीही पॉल पॉट ने भीक मागितली नाही. उरल्या सुरल्या जमिनीत भात लावला व कंबोडियास स्वयंपूर्ण केलं. मोन्सांतो आस्थापन एजंट ऑरेंजचं उत्पादन करतं. तेच ते जनुकविचलित कृत्रिम बियाणं ( = genetically modified seeds ) निर्मिती करणारं आस्थापन. हे अस्थापन डाऊ ने विकत घेतलं. भोपाळ वायुकांड ( साल १९८४ ) घडवणारं युनियन कार्बाईड हे अस्थापनही डाऊ ने विकत घेतलं. हे डाऊ आस्थापन चाकणजवळ संयंत्र उभारणार होतं. त्यासाठी त्याला संत तुकाराम महाराज जिथे ध्यानासाठी जायचे तो भामाचा डोंगर फोडून नष्ट करायचा होता. याविरुद्ध संतवीर बंडातात्या कऱ्हाडकरांनी डाऊच्या सणसणीत कानाखाली वाजवली. परिणामी डाऊला गाशा गुंडाळावा लागला. आता कळलं जगात का व कसे व्यवहार होतात ते ? जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत. आज ठाणे-बेलापूत पट्टीस नवी मुंबई म्हंटलं जातं. मग तिला नाझी मुंबई म्हणावं का? ---------x---------x--------- ०४.निक्सनच्या वॉटरगेटाची गोष्ट
१९६९ साली कंबोडियात जनसंहाराची जी मोहीम सुरू केली ती अत्यंत गुप्त होती. अन्यथा जागतिक समुदायाने निषेध केले असते. मात्र तरीही विलियम बीचर नावाच्या कुण्या पत्रकारास कुणकुण लागलीच. त्याने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक सविस्तर लेख लिहिला. संक्षिप्त माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.history.com/this-day-in-history/reporter-breaks-the-news-of-secret-bombing-in-cambodia निक्सन पिसाळला. हे असलं काही उघड झालं तर त्याच्यावर महाभियोग दाखल व्हायचा. म्हणून किसिंजरने यानंतर टेलिफोन संभाषणं गुप्तमुद्रित करावयास सुरुवात केली. त्यातनं पुढे वॉटरगेट प्रकरण उद्भवलं. यावर श्रीगुरुजींनी एक लेखमाला लिहिली आहे : https://misalpav.com/node/48766 मात्र निक्सनने १९७३ साली कंबोडियातले हल्ले थांबवले. त्याची शिक्षा म्हणून वॉटरगेटाच्या नावाखाली त्यास राष्ट्राध्यक्ष पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडलं. जवळजवळ हाकलपट्टीच म्हणा ना. ---------x---------x--------- ०५.एप्रिल फूल व हायवे ८० वरील नरसंहार
१९९० सालची गोष्ट आहे. कुवेतने तिरप्या तेलविहिरी खोदून इराकचं तेल चोरायला सुरुवात केली. सद्दामने केलेल्या रीतसर तक्रारींना कुवेतने केराची टोपली दाखवली. सद्दाम वैतागला. त्याने अमेरिकेशी बोलणी सुरु केली. एप्रिल ग्लास्पी ही बाई तेव्हा अमेरिकेची इराकमधली राजदूत होती. सद्दामने तिला बोलावलं. तिच्याशी झालेल्या चर्चेत तिने 'अमेरिकेस अरब - अरब भांडणात रस नाही' असं सूचित केलं. यांस हिरवा कंदील समजून त्यावर विसंबून सद्दामने कुवेतात सैन्य घुसवलं. नंतर अमेरिकेने राष्ट्रसंघात इराकविरुद्ध बराच आरडाओरडा केला. परिणामी राष्ट्रसंघाच्या संयुक्त सैन्याने इराकवर आक्रमण केलं. हे सैन्य नावाला संयुक्त जरी असलं तरी प्रामुख्याने अमेरिकी होतं. अशा रीतीने पहिल्या आखाती युद्धास सुरुवात झाली. युद्धाचं उद्दिष्ट कुवेत मुक्त करणं होतं (चूभूदेघे). अपेक्षेप्रमाणे तो हेतू साध्य झाला. यथावकाश शस्त्रसंधी झाली. आता इराकी सैन्य माघारी जायला सुरुवात झाली. राष्ट्रसंघाच्या संधीच्या नियमानुसार सद्दामने काफिला बनवला. हा सुमारे १०० किमी लांब होता. तो कुवेतहून बाहेर पडला व बगदादच्या दिशेने हायवे ८० वरुन हळुहळू सरकू लागला. तो मोक्याच्या जागी येताच अमेरिकी वायुदलाने भीषण आक्रमण केलं. काफिला सैनिकांचा असला तरी ते सैनिक लढाऊ अवस्थेतले नव्हते. सोबत नागरिक व त्यांची बायकामुलेही होती. या कशाचाही विचार न करता नजीकच्या उंचीवरून त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आले. रस्त्यावर तुटक्याफुटक्या व वितळलेल्या वाहनांचा खच पडला. जिवंत माणूस नावालाही उरला नाही. कल्पना करा १०० किलोमीटर केवळ लोखंडी डबर ( = मलबा ) पडलाय आणि त्यात अर्धवट जळलेळी प्रेतं आडवीतिडवी पडलीत. १०० किमित इति भयाण शांतता पसरलीये की जणू काही झालंच नाहीये. कण्हायचाही आवाज येत नाहीये कारण कुणी जिवंतच नाहीये. हा हल्ला अमेरिकेने राष्ट्रसंघास अंधारात ठेवून केला. बघा, अमेरिकेने इराकला युद्धात कसं गोवलं ते पहा. एप्रिलबाईने सद्दामचा कसा एप्रिल फूल केला ते पहा. भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच. राष्ट्रसंघ ( = युनो ) ही अमेरिकेने ठेवलेली जीवघेणी रक्षापत्नी आहे. ही रखेल व तिचा जार दोघांचेही तुकडे तुकडे व्हायला पाहिजेत. कंबोडियात अमेरिकेने गुपचूप हल्ले केले. पुढे राष्ट्रसंघाने ख्मेर रूज साठी जागा राखून अमेरिकी हल्ल्यांवर पांघरून घालायचा प्रयत्न केला. हेच रखेलजार प्रारूप परत इराक मध्ये वापरलं गेलं. भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे? चर्चा व्हावी. ---------x---------x--------- ०६.कांभोजी कोण आहेत ?
कंबोडिया उपाख्य कांभोज प्रांतीचे लोकं हिंदू आहेत. जगातलं सर्वात मोठं विष्णूमंदिर अंकोरवट हे कंबोडियात आहे. प्रश्न असाय की तिथे अमेरिका इतके नृशंस अत्याचार करीत होती तेव्हा भारतीय शासन काय करीत होतं ? १९६९ नंतर जनता पक्षाची १९७७ ते १९८० ही अडीच तीन वर्षं सोडता सत्ता इंदिरा गांधीच्या हाती होती. मग तिने काहीच आवाज का उठवला नाही? १९६९ नंतर ती पाकिस्तानच्या फाळणीत गुंतली होती, असं आपण म्हणू शकतो. मग कंबोडियातल्या घटनांचा दबाव टाकून पूर्व पाकिस्तान भारतात सामील करून घेता आला असता. फार काय, पश्चिम पाकिस्तान देखील आक्रमण करून जिंकता आला असता. हे करायचं राहून गेलं खरं. कांभोजी हिंदूंनी किसिंजरचं काय वाकडं केलं होतं? तो पक्का हिंदुद्वेष्टा आहे. भारतीय हिंदूंच्यासाठी अमेरिकेचे हेच बेत आहेत. फक्त थेट आक्रमण करता येत नसल्याने मिशनरी, नक्षली, खलिस्तानी, बॉलीवूडी इत्यादिंच्या मार्गाने आक्रमण केलं जातंय. भरीत भर म्हणून प्रेम जिहाद, भूमी जिहाद, नशा जिहाद, हलाल जिहाद, वगैरे जिहादं आपापल्या भूमिका बजावताहेत. शिवाय बांगला, रोहिंग्या घुसखोरही उरावर येऊन बसलेत. अंतिमत: हिंदूंच्या नशिबी काय वाढून ठेवलंय ते कंबोडियात दिसलं ना ? गडचिंचले ( पालघर ) येथे हिंदू साधू व त्यांच्या गाडीचा चालक यांची पोलिसांसमोर निर्घृण हत्या झाली. ही मिशनरी आणि नक्षल्यांनी हिंदूंना दिलेली प्रेमळ भेट आहे. किसिंजर काकांची उणीव हे दोघे भरून काढताहेत. कमाल म्हणजे हत्या झालेल्या साधूंच्या बाजूने दिग्विजय त्रिवेदी नामे जो वकील उभा राहिला होता त्याचाही अपघाती मृत्यू झाला आहे. हीसुद्धा हत्याच असावी असा संशय आहे. हे टाळायचं असेल तर हिंदू राष्ट्र हवंच हवं. ---------x---------x--------- असो. पॉल पॉट हा एक बळीचा बकरा आहे. आपलाही तसाच बकरा व्हायला नको असेल तर आपणंच आपली लायकी वाढवून घ्यायला हवी. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे शासन मिळतं म्हणतात. पण लोकांनी स्वत:ची लायकी वाढवायची कशी याविषयी कोणीच काही सांगंत नाही. पण काही हरकत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय की राज्यकर्त्यांवर नैतिक दबाव टाकायचा असतो. त्यासाठी लोकांची साधना पक्की असावी लागते. आजच्या युगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे. तो करून आपणंच आपली लायकी वाढवून घेऊया. आ.न., -गा.पै.वर्गीकरण
वाचने
23093
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
अवांतर-
In reply to अवांतर- by प्रचेतस
सॅल्युट
In reply to अवांतर- by प्रचेतस
वायव्य कांबोज आणि आग्नेय कुंबज
In reply to वायव्य कांबोज आणि आग्नेय कुंबज by गामा पैलवान
कुंबज नव्हे कंबुज
In reply to अवांतर- by प्रचेतस
विचारधारा पूर्णतः चूकलेली आहे
आय.जी.फार्बेन
In reply to आय.जी.फार्बेन by बोका
बरोबर आहे तुमचं
लेख छान आहे गामाजी. पण
दोन्ही बाजूचं इतकं वाचलं जातं
बरीच नवीन माहिती मिळाली.
जेवहा अमेरिकेत हे सर्व केले (
In reply to जेवहा अमेरिकेत हे सर्व केले ( by चौकस२१२
कुंबज हिंदू होता व आहे
In reply to कुंबज हिंदू होता व आहे by गामा पैलवान
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच
In reply to आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच by चौकस२१२
+१
उत्तम माहितीपुर्ण लेख आहे.
त्या लेखातही शंका विचारली.
In reply to त्या लेखातही शंका विचारली. by पाषाणभेद
माझं मत सांगतो....
In reply to माझं मत सांगतो.... by गामा पैलवान
फिग्लेली = फुगलेली
पटले नाही
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि
In reply to एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि by बापूसाहेब
थोतांड
काय होतं की आपल्याकडे माहिती पोहोचते ती फेकलेली.
अमेरिका त्यात गुंतली असेल तर
Quora वरील एक उत्तर
भयानक राजकारण आहे
In reply to भयानक राजकारण आहे by राजेंद्र मेहेंदळे
क्यानडा देशाला यात इंटरेस्ट नाही काय?
In reply to भयानक राजकारण आहे by राजेंद्र मेहेंदळे
डिट्टो॓!
पॉल पॉट
In reply to पॉल पॉट by Rajesh188
कधी नाही ते या लॉजिकवर
In reply to कधी नाही ते या लॉजिकवर by रंगीला रतन
कधी नाही ते त्यांच्या पोस्ट
In reply to कधी नाही ते त्यांच्या पोस्ट by रावसाहेब चिंगभूतकर
अपवादाने
अवांतर
चंद्रसूर्यकुमार यांना उद्देशून प्रतिसाद
In reply to चंद्रसूर्यकुमार यांना उद्देशून प्रतिसाद by गामा पैलवान
तर आपल्यावरही असेच नृशंस
In reply to तर आपल्यावरही असेच नृशंस by चौकस२१२
अमेरिकेला
In reply to चंद्रसूर्यकुमार यांना उद्देशून प्रतिसाद by गामा पैलवान
गांधीहत्येपश्चात
In reply to गांधीहत्येपश्चात by Trump
रिॲलिटी आहे
In reply to रिॲलिटी आहे by Rajesh188
सहमत
In reply to सहमत by राजेंद्र मेहेंदळे
काही हत्या झाल्या. पण वेचुन
In reply to काही हत्या झाल्या. पण वेचुन by Trump
डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या
In reply to काही हत्या झाल्या. पण वेचुन by Trump
सांगली जवळील वाळवा तालुका हा
In reply to सांगली जवळील वाळवा तालुका हा by चौकस२१२
प्र ल मयेकर लिखित
In reply to सहमत by राजेंद्र मेहेंदळे
ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम
In reply to ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम by चौकस२१२
हा जो काही प्रकार आहे तो सर्व
In reply to हा जो काही प्रकार आहे तो सर्व by Trump
सर्व = बहुसंख्य
In reply to गांधीहत्येपश्चात by Trump
खालील पानावर आकडेवारी व
In reply to खालील पानावर आकडेवारी व by श्रीगुरुजी
माहीती वाचली. धन्यवाद.
In reply to खालील पानावर आकडेवारी व by श्रीगुरुजी
धन्यवाद श्रीगुरुजी!
In reply to खालील पानावर आकडेवारी व by श्रीगुरुजी
प्रत्यक्ष आकडा माहित नाही ..
In reply to प्रत्यक्ष आकडा माहित नाही .. by रामदास२९
नेत्यांच्या हत्ये नंतर
लेखन माहितीपूर्ण आहे,
In reply to लेखन माहितीपूर्ण आहे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाबद्दल आभार
पॉट क्रुर हत्या करुनही ८५
हे पण खरेच आहे
खाटीक गचकला
इतिहास चार हजार वर्षांपेक्षा
In reply to इतिहास चार हजार वर्षांपेक्षा by विवेकपटाईत
माहितीनिमित्त आभार