दिवाळी अंक २०२१ : थोडक्यात

drsandeep's picture
drsandeep in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

थोडक्यात…

तंत्रज्ञानामुळे जग जसं जवळ आलंय, तसं आपल्याकडे 'प्रॉब्लेम ऑफ अ‍ॅबन्डन्स' झालाय, म्हणजेच कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा कित्येक पटींनी जास्त उपलब्ध आहे. त्यामुळे माणूस सतत भ्रमात राहतो की त्याला हवं ते सर्व लीलया उपलब्ध आहे, मात्र तो खरंच एखादी विशिष्ट गोष्ट शोधायला गेला की ती मग सहज उपलब्ध होत नाही. कारण उपलब्ध जे आहे ते इतकं आहे की आपल्याला नेमकं जे हवंय ते शोधण्यासाठी सर्व शोधून नाहीतर उचकटून पाहायला लागतं आणि मग त्यानंतरही हाती काही गवसलं तर बरं, नाहीतर नुसता वेळच जातो.

नव्वदीत बालपण किंवा तरुणपण घालवलेल्या पिढीस आठवेल, पूर्वी आपल्याकडे गाणी ऐकायला टेप आणि वॉकमन असायचे. आपण फार हौसेने आपण आवडत्या कॅसेट्स सांभाळून ठेवायचो. वॉकमन असणं ही एक चैनीची गोष्ट मानली जाई. मोबाइल आल्यावर मग रेडिओ मिर्ची, गाणी सगळं आपसूक हातात आलं. अगदी पुढ्यात येऊन ठाकलं! त्यातही आपण आधी आपल्या आवडीची लिस्ट ‘सेव्ह’ करून ठेवायचो. नंतर मग आता इंटरनेट सहज आणि स्वस्त उपलब्ध झाल्याने तर मग आता काहीच सेव्ह करायची तशी गरज उरली नाही. कारण जे हवं ते गाणे, चित्रपट इत्यादी हवं तेव्हा सहज उपलब्ध आहे, ही भावना कुठेतरी आहे, त्यामुळे सहसा कुणी विशेष प्रयत्नपूर्वक ‘कलेक्शन’ ठेवण्यास तितका वेळ दवडत नाही.

जी गोष्ट वॉकमनची, तीच कॅमेर्‍याची! आपल्याकडे ३६ फोटोज सामावू शकेल असा रोल असायचा, त्यामुळे आपण फोटो फार विचारपूर्वक, सांभाळून क्लिक करत असू. आता मात्र डिजि-कॅम आले, उत्तमोत्तम कॅमेरा असलेले मोबाइल्स आले, त्यामुळे आपण अगदी चालता-बोलता फोटो, सेल्फी इत्यादी काढतोय. फोनची मेमरी साधारणतः १६ जीबी जरी धरली, तरी त्यात हजारो फोटो, शेकडो व्हिडिओ सहज मावतात आणि ते सगळं आपण घेऊन फिरत असतो. मेमरी संपली की मग तो सारा डेटा कॉम्पुटरमध्ये किंवा हार्ड डिस्कमध्ये ‘सेव्ह’ करतो, आणि मनाला समाधान वाटतं की आपण तो ‘मिस’ नाही केला. गेली किमान पाच-सहा वर्षं तरी आपण हे करतोय. आणि मग आपसूकच आपल्या खूप साऱ्या फाइल्स, फोल्डर्स सेव्ह आहेत. छान! मात्र अशातच एखादा अमुक एक खास आठवणीतला क्षण टिपलेला फोटो पाहायची इच्छा झालीच, तर ते खरंच तितकं सोपं राहिलंय का?

थोडक्यात काय तर, गोष्टींच्या असण्याचा अतिरेक म्हणजेच 'प्रॉब्लेम ऑफ अ‍ॅबन्डन्स'मुळे, एकतर आपल्याकडे कशाची उणीव आहे ह्याची आपल्याला जाणीव होत नाहीये. तसंच, आपण किमान गरजेपुरत्या गोष्टी असण्याचं, बाळगण्याचं आणि त्याचा पुरेपूर उपभोग घ्यायचं नकळत विसरतोय. कदाचित आपल्याकडे जे आहे, त्याची किंमत आपल्या लेखी कमी होतेय. ह्यावर आज खरंच आत्मपरीक्षण करायची गरज वाटते.

जी गोष्ट वस्तूंची तीच नात्यांची. सुटीच्या दिवशी दिवसभर आपण घरी असलो तरी आपण घरातील लोकांपेक्षा सोशल मीडियावरील असंख्य लोकांशी ‘कनेक्टेड’ असतो. जुनेपुराणे मित्र, दूरवरचे नातलग सगळे कनेक्टेड आहेत. कित्येक मित्र किंवा नातेवाईक तर असे आहेत की ते चुकून अचानक समोर आले की आपण त्यांच्याशी पाचेक मिनिटंसुद्धा संवाद करू शकत नाही. आणि मग त्या वेळी कनेक्टेड असण्याचा फोलपणा आपल्याला जाणवतो, पण त्यातून खचितच आपण काही शिकतो.

अर्थशास्त्रात एक खूप महत्त्वाचा सिद्धान्त आहे - 'लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स' म्हणजेच, शुद्ध मराठीत बोलायचं झालं, तर 'घटत्या परताव्याचा कायदा' किंवा अगदी शब्दश: बोलायचं झालं तर, 'ऱ्हासमान उत्पन्न फल सिद्धान्त'! नाव जाऊ द्या, हा सिद्धान्त सांगतो की अमुक गोष्टी कच्च्या मालाच्या स्वरूपात अमुक इतक्या वाढवल्या की त्या प्रमाणात अमुक एक एकक उत्पन्नात वाढ मिळते, जी उत्तरोत्तर वाढत जाते, परंतु मग एक बिंदू येतो, त्यापुढे कच्च्या मालाच्या पुरवणीत कितीही वाढ केली, तरी त्या प्रमाणात उत्पादनात वाढ होत नाही. थोडक्यात काय, तर त्या बिंदूपर्यंत येईपर्यंतच खरी मजा!

आयुष्यातील तंत्रज्ञानाच्या स्थानाबाबतही असंच काहीसं आहे. एका बिंदूपल्याड माणूस त्यात कितीही झालं तरी रमू शकणार नाही. त्यामुळे कितीही जीबीची फोनची मेमरी किंवा हार्ड डिस्क फोटो, गाणी, चित्रपट, वेब सीरिज इत्यादींनी भरली असली, तरीदेखील, आयुष्यात एक रितेपण वास करत असतं आणि ते अधूनमधून उफाळून येत राहतं. त्यामुळे कुटुंबास त्याचबरोबर स्वतःस खास वेळ देणं ही आपल्या जगण्याची एक निकड आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

विज्ञान, तंत्रज्ञान रोज नवीन शोध लावील, जग आणखीन पुढे जाईल, पुढेमागे रोबो येतील, इत्यादी इत्यादी. त्या अनुषंगाने, आपलं जगणं बदलून जाईल, हे ओघानं आलंच, कारण काळानुरूप न बदललेली व्यक्ती इतिहासजमा होण्यास फारसा वेळ लागत नाही. मात्र, जग आणि आपलं जगणं कितीही बदललं, आपल्या गरजा कितीही बदलल्या तरी आपल्या जगण्याची मूळ अनुभूती बदलणार नाही. भर उन्हात, घामाच्या धारांनी न्हाहून जाऊन क्रिकेट किंवा तत्सम मैदानी खेळ खेळताना मिळणारा आनंद, त्यानंतर सपाटून लागणारी भूक, दुपारची ग्लानी, ह्यात खरंच खूप सुख आहे! तो आनंद कुठलाही मोबाइलवरील गेम खेळण्यात येणार नाही. आवडतं गाणं अचानक रेडिओवर ऐकायला मिळालं की मन जसं प्रफुल्लित होतं, त्याची सर हवं ते गाणं इंटरनेटवर सर्च करून ऐकण्यात येणार नाही, कारण त्यात ती आश्चर्यमिश्रित खुशीची 'किक' नसेल!

हजारो फोटो कॉम्पुटरवर बघत जो आनंद मिळेल आणि हातात पन्नासेक निवडक फोटोंचा अल्बम पाहताना जी मजा येईल, त्याची तुलना होणार नाही. कारण हजारेक फोटो पाहताना नकळत एक तोचतोचपणा येतो, थोड्या वेळाने कंटाळा येतो, रस निघून जातो. याउलट, पन्नासेक फोटोंचा अल्बम आपण एकाच वेळी २-३ वेळा उचकटून पाहू, आणि हवा तेव्हा लगेच उपलब्ध ! टीव्हीवर चोवीस तास गाणी दाखवणारी कित्येक चॅनेल्स आहेत, पण रविवार सकाळच्या दूरदर्शनवर लागणाऱ्या ‘रंगोली’ कार्यक्रमाची मजा न्यारीच!

थोडक्यात काय, तर मानवी आयुष्याची खरी मजा ‘थोडक्यातच’ आहे, हे जितक्या लवकर आपण समजू, उमजू, तितक़ं अधिक आपलं आयुष्य आपण अर्थपूर्ण जगू शकू. कारण जगण्यास फार काही लागत नाही, फक्त हवी सजगता, सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि संयम. त्यायोगे आपण आसपासच्या जगाशी, विकासाशी नातं जोपासून, उचित समन्वय राखून आपली नाळ जगण्याच्या मूळ अनुभूतीशी जोडून राहिलो, तर जगण्याची मजा अनुभवू, ह्यात मला शंका वाटत नाही.

संदीप आ. चव्हाण
४ एप्रिल २०२०

प्रतिक्रिया

थोडक्यात आणि अत्यंत महत्वाचे!

लेख अतिशय आणि मनापासून आवडला.

- (गरजा मिनीमलेस्टीक करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 8:27 pm | पाषाणभेद

+१
(थोडक्यात प्रतिसाद दिला!)

- मिनिमलायझेशनचा चाहता.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 6:05 pm | मुक्त विहारि

+2

तुषार काळभोर's picture

8 Nov 2021 - 8:33 pm | तुषार काळभोर

+३

Minimalistic होण्याचा प्रयत्न करणारा पैलवान

कुमार१'s picture

3 Nov 2021 - 5:55 pm | कुमार१

याउलट, पन्नासेक फोटोंचा अल्बम आपण एकाच वेळी २-३ वेळा उचकटून पाहू, आणि हवा तेव्हा लगेच उपलब्ध !

+११
आमच्या मधुचंद्राचे आम्ही मोजून 36 फोटो काढले होते.
तो अल्बम देखील मी शेवटचा कधी पाहिला आहे हे मला आता आठवावे लागेल 😀

क्या बात है. बेहद्द आवडलं.

स्वधर्म's picture

8 Nov 2021 - 6:21 pm | स्वधर्म

आहेत. असंच काहीसं वाटत होतं पण शब्दात पकडता येत नव्हतं; ते तुंम्ही खूप नेमकेपणाने केलंत. धन्यवाद.

Rajesh188's picture

8 Nov 2021 - 8:45 pm | Rajesh188

नसलेल्या गरजा निर्माण करून उत्पादन विकायचे हीच खरी मार्केटिंग स्किल आहे.
अनंत वस्तू आता लोकांकडे आहेत त्या खरेच गरजेच्या आहेत का? हा प्रश्न पडावा .