खुळावलो ग सखये मी खुळावलो

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
6 Oct 2021 - 9:10 pm

जादु अशी , कळेना मला , काय केली
नयनांनी या , ओठांनी या , मी खुळावलो.
खुळावलो ग सखये मी खुळावलो.
सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो.

केस तुझे , पाऊस धारा, गुणगुणणे भिन्नाट वारा.
मिटे पापणी, सूर्यास्त झाला , रस्ता ओला ,सागर किनारा.
धुंद वादळाची नशा आगळी , आयुष्य गान्याच्या ओळी.
सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो.
खुळावलो ग सखये मी खुळावलो.
सांगू कसे , सखये तुला, मी स्वप्नी पाहीले जे.
फुलपाखरू भिरभिरणारे, फुलांसवे हसणारे तू.
मी दिसता, प्राजक्त की, फूल निरागस झालीस तू
सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो.
खुळावलो ग सखये मी खुळावलो.

र्‍हदयी काटा रुतला, माफी दे प्रेमा मजला.
दगडाला देव बनवला,प्रीतीचा अर्थ उमजला.
साथीने तुझिया सखये , जगायचे हे स्वप्न मला
सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो.
खुळावलो ग सखये मी खुळावलो.
चकोर शाह....

स्वप्नकविता

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 9:15 pm | गॉडजिला

याड लागलं ग…

प्रचेतस's picture

7 Oct 2021 - 1:05 pm | प्रचेतस

मस्त विजुभौ.

पाषाणभेद's picture

12 Oct 2021 - 5:28 pm | पाषाणभेद

नादमयरित्या येणारा खुळावलो शब्दाने जादू केली आहे. छान आहे कविता.