शांतीत्व...
------------
मी जगत आहे वर्तमानाचा भरभरून आनंद घेत
भविष्यातील अत्याधुनिक स्वप्नांना
निद्रिस्त पापण्यांआड
रंगवत...
निदान माझं एवढं तरी खरं आहे
की, मी जपतो आहे
मीठ-मिरची-भाकरीचा
सुवर्ण
भूतकाळ...
म्हणूनच आज मी उभा आहे स्वाभिमानाने
सुखादुखाला पचवून छातीत
माती माखले पाय माझे
घट्ट रोवून
मातीत...
- सुनील दौलत खोडके
मु. पो. डोणगाव ता. मेहकर जि. बुलढाणा पिनकोड- 443303,
मोबाईल. 7057591117
वाचन संख्या
3784
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
समृद्धी आली तरी मी जूने दिवस
In reply to आवडली by ज्ञानोबाचे पैजार
वाह
आवडली
आशा जागवणारी कविता ! आवडली.
सुंदर!!