मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
21 Jun 2021 - 11:44 am

मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना काही विषय देऊन एक त्या विषयावर काढलेल्या छायाचित्रांची एक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले आहे.

स्पर्धकांना दि ५ जुलै २०२१ पर्यंत आपली छायाचित्रे साहित्य संपादकांना व्यनिने पाठवायची आहेत. तुम्ही तुमच्या प्रवेशिका sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल पत्त्यावरदेखील पाठवू शकता. काही अडचणी अथवा शंका असल्यास, इथेच प्रतिसादातून विचारल्या तरी चालतील, अथवा साहित्य संपादकांना व्यनिने विचारू शकता.

या स्पर्धेचे परिक्षण दोन प्रकाराने करावे असे ठरले. एक म्हणजे वाचकांची पसंती आणि दुसरे म्हणजे या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींची पसंती.

प्रसिध्द झालेल्या छायाचित्रांना सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. मिपा सदस्य दि. १५ जुलै २०२१ पर्यंत या छायचित्रांवर मतदान करु शकतील. प्रत्येक सदस्याला एका विषयाच्या धाग्यावर एकदाच मतदान करता येइल. जर दोन किंवा अधिक वेळा मतदान केले तरी पहिले मतच गृहित धरले जाइल व बाकीची मते बाद समजली जातील.

या सर्व प्रसिध्द झालेल्या छायाचित्रांचे परिक्षण या विषयातील जाणकार मंडळी स्वतंत्रपणे करतील. त्यांच्या मते जी छायाचित्रे कलात्मक व तांत्रिक दृष्ट्या सरस अशी छायाचित्रे निवडतील. त्यांचा निकाल प्रसिध्द करताना अर्थात त्यांनी निवडलेल्या छायाचित्रांचे रसग्रहणही निकाला सोबत प्रसिध्द होईल.

या समिती मधे खालील मिपाकर असणार आहेत.

१. जयंत कुलकर्णी
२. किल्लेदार
३. स्पा
४. MipaPremiYogesh

या स्पर्धे करता छायाचित्र पाठवण्यासाठी विषय आहेत
१. लॉकडाउन
२. निसर्गचित्रे
३. मुक्त विभाग (या विभागाला विषयाचे कोणतेही बंधन नसेल)

स्पर्धेचा अंतिम निकाल दि ३१ जुलै २०२१ रोजी प्रसिध्द केला जाईल

स्पर्धेचे अन्य नियमः

१) प्रत्येकजण एका विषयासाठी फक्त एकच चित्र पाठवू शकतो. अर्थात ते छायाचित्र स्पर्धकाने स्वत: काढलेले असावे व या पूर्वी कोठेही प्रसिध्द केलेले नसावे.

२) छायाचित्र पाठवताना ते कोणत्या विभागासाठी पाठवले आहे ते व्यनिच्या विषयात लिहावे. जर विषयाचा उल्लेख नसेल तर अशी छायाचित्रे मुक्त विभागात प्रसिध्द केली जातील.

३) सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

४) छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.

५) ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी.

६) प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.

७) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही.

८) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा.

९) सर्व छायाचित्रे प्रसिध्द होई पर्यंत स्पर्धेचे धागे वाचनमात्र ठेवले जातील. मिपा सदस्य दि ५ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ च्या दरम्यान मतदान करु शकतील.

१०) जर कोणाला आपली छायाचित्रे स्पर्धेत पाठवायची नसतील, पण ती या निमित्ताने प्रसिद्ध करायची असतील त्यांच्या साठी "मिपा छायाचित्रण कला स्पर्धे करता नाही" असा वेगळा धागा काढण्यात येईल. आपण आपली छायाचित्रे या धाग्यावर प्रकाशीत करु शकाल. हा धागा वाचनमात्र नसेल.

स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jun 2021 - 11:57 am | ज्ञानोबाचे पैजार

मजा येईल ही स्पर्धा अनुभवायला,
मिपाकरांना विनंती भरघोस सहभाग घेउन परिक्षकांचे काम अवघड करुन टाका
पैजारबुवा,

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jun 2021 - 12:13 pm | चंद्रसूर्यकुमार

ते छायाचित्र स्पर्धकाने स्वत: काढलेले असावे व या पूर्वी कोठेही प्रसिध्द केलेले नसावे.

स्वतःच्या फेसबुक भिंतीवर प्रसिध्द केलेले असेल तर चालू शकेल का?

कॉमी's picture

21 Jun 2021 - 1:05 pm | कॉमी

सेम, आणि exif data हा काय प्रकार आहे, कुठून दिसतो ?

कंजूस's picture

21 Jun 2021 - 1:46 pm | कंजूस

तो दिसत नाही. पण फोटोसोबत शटर,अपरचर,फोकल लेंथ, क्याम्रा मेक, जीपीएस वगैरे अनेक गोष्टी फोटोबरोबर जातात.
Photo metadata viewer ( https://play.google.com/store/apps/details?id=apps.syrupy.metadataviewer ) अशा appमध्ये फोटो उघडला की तो exif data दिसतो. /पाहता येतो.

फोटोचे नाव बदलणे, रीसाईज करणे, फोटोशॉप करणे असे संस्करण केल्यास मूळ exif data गायब होतो.

( फोनच्या क्याम्रा सेटिंग्ज मध्ये exif data पूर्ण/किंवा date, gps off/on करण्याचाही पर्याय असतो)

Bhakti's picture

21 Jun 2021 - 3:51 pm | Bhakti

हाच प्रश्न स्वत: च्या फेबू,इन्स्टावरचे फोटो चालतील का?

साहित्य संपादक's picture

22 Jun 2021 - 9:44 am | साहित्य संपादक

मतदान करताना मत केवळ छायाचित्र पाहून दिले जावे, आयडी किंवा व्यक्ती कडे पाहून नको या उद्देशाने स्पर्धकांची नावे मतदान पूर्ण होई पर्यंत जाहिर केली जाणार नाहीत.

जर एखादे छायाचित्र या आधि कोणी पाहिलेले असेल तर वरील उद्देश सफल होणार नाही.

या करता कोणत्याही माध्यमातून प्रसिध्द झालेले छायाचित्र नको अशी अट ठेवली आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Jun 2021 - 9:23 pm | अनिरुद्ध.वैद्य

हाच प्रश्न आहे मलापण
बाकि निसर्गचित्रे फारच मोठी कॅटेगरी! वाईल्ड लाईफ चालेल की लॅण्ड्स्केप्स?

साहित्य संपादक's picture

25 Jun 2021 - 9:35 am | साहित्य संपादक

अगदी बाल्कनीतला निसर्ग असला तरी चालेल

गुल्लू दादा's picture

21 Jun 2021 - 1:16 pm | गुल्लू दादा

मस्त उपक्रम. मज्जा येईल.

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2021 - 5:21 pm | चौथा कोनाडा

उत्सुकतेचा उपक्रम ! मजा येईल विविध फोटोज बघायला !
💯
सहभागींना आगाऊ शुभेच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2021 - 8:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम उपक्रम. सहभागी होऊच. आणि उत्तम फोटोला, आवडलेल्या फोटोला दाद देण्यात येईल.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

22 Jun 2021 - 7:41 am | प्रचेतस

उत्तम उपक्रम.
सहभागी मिपाकरांच्या छायाचित्रांच्या प्रतिक्षेत.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2021 - 7:52 am | श्रीरंग_जोशी

साडेतीन वर्षांच्या दीर्घ विश्रामानंतर मिपावरच्या या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन केल्याबद्दल साहित्य संपादकांचे मनःपूर्वक आभार.

गोरगावलेकर's picture

22 Jun 2021 - 12:39 pm | गोरगावलेकर

खूप सुंदर सुंदर फोटो पाहायला मिळतील.
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
"मिपा छायाचित्रण कला स्पर्धे करता नाही" असा वेगळा धागा आल्यास त्यात निश्चितच फोटो देण्याचा प्रयत्न राहील.

तुषार काळभोर's picture

22 Jun 2021 - 7:25 pm | तुषार काळभोर

त्या धाग्यावर सुद्धा भरघोस प्रवेशिका येतील हे नक्की!

त्यांचे हमखास उत्तम होत असे, शेवटी महत्प्रयासाने मी लोकांबद्दल वाइट चिंतन नियंत्रीत केले... त्यामुळे ही कथा मी उलट अर्थाने अक्षरशः जगलो आहे म्हटले तर अतिशयोक्ती नाही पण योगायोग नक्किच असावा :)

सर्वसाक्षी's picture

24 Jun 2021 - 4:57 pm | सर्वसाक्षी

एसएलआर, नॉन एसएलआर, मोबाईल... काही बंधन वा नियम आहे का

तुषार काळभोर's picture

24 Jun 2021 - 5:19 pm | तुषार काळभोर

मोबाईल छायाचित्रणाची स्वतंत्र स्पर्धा भविष्यात व्हावी ही जाहीर इच्छा इथे व्यक्त करतो.

गुल्लू दादा's picture

24 Jun 2021 - 6:03 pm | गुल्लू दादा

आमच्या सारख्या गरीबाकडे कुठून येणारेत मोठाले कॅमेरे ;(
पहिला नं. यावा असा वाटणारा गुल्लू दादा :)

साहित्य संपादक's picture

25 Jun 2021 - 9:32 am | साहित्य संपादक

हे सुध्दा चालतील

Camera

चित्र अंजा वरुन साभार

जेम्स वांड's picture

27 Jun 2021 - 2:27 pm | जेम्स वांड

पण ह्यावरून मोबाईल छायाचित्रणाची स्पर्धा भविष्यात होईल का नाही ह्यावर सुस्पष्ट असं काही समजत नाहीए, तितकं स्पष्ट करता आलं तर वैयक्तिक आभारी असेन.

साहित्य संपादक's picture

1 Jul 2021 - 7:44 am | साहित्य संपादक

अशी स्पर्धा नक्कीच व्हायला पाहिजे

सर्वसाक्षी's picture

25 Jun 2021 - 10:37 pm | सर्वसाक्षी

धन्यवाद

साहित्य संपादक's picture

1 Jul 2021 - 7:45 am | साहित्य संपादक

आपली छायाचित्रे पाठवण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक आहेत.

साहित्य संपादक's picture

3 Jul 2021 - 9:16 am | साहित्य संपादक

३ दिवस उरले

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Jul 2021 - 11:17 pm | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी
सगळ्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा !

गुल्लू दादा's picture

8 Jul 2021 - 7:26 am | गुल्लू दादा

मतदान कधी पासून आहे. आज 8 जुलै. 5 जुलै पासून होणार होतं ना की माझी काही गल्लत होतेय.

साहित्य संपादक's picture

8 Jul 2021 - 7:49 am | साहित्य संपादक

मतदान सुरु करायला थोडासा उशिर होत आहे त्या बद्दल दिलगिरी व्यक्तर करतो.
काही तांत्रिक अडचण आहे ती दूर झाली की लगेचच मतदानाचे धागे प्रसिध्द करु.
कृपया थोडासा धीर धरावा ही नम्र विनंती.

गुल्लू दादा's picture

8 Jul 2021 - 8:22 am | गुल्लू दादा

चालायचंच. मी आपली फक्त शंका बोलून दाखवली.तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.