रंजन आणि कल्पनाविस्तार (५)

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
18 Jun 2021 - 8:29 am
गाभा: 

भाग ४ इथे

.....................................
कल्पना लढवा !

खाली एका मराठी लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे.
तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.

ok


प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.

शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
.....
चित्र सौजन्य : माझी पत्नी.
साभार !

प्रतिक्रिया

संसाराचा दोलायमान
पुरुष एकाच बाजूस दोन्ही पाय टाकून संसार हाकण्याचा प्रयत्न करतोय. याउलट स्त्री दोन्ही बाजूस पाय टाकून समतोल साधून संसाराचा गाडा पुढे नेतेय. स्त्री कडील बाजू जास्त झुकलेली आहे याचा अर्थ असा नाही कि तिला झुकते माप दिले गेलेय तर स्त्री कडे संसाराचा भार जास्त असल्यामुळे ते झुकले गेले आहे. स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे.

गुल्लू दादा's picture

18 Jun 2021 - 2:22 pm | गुल्लू दादा

तुमचं निरीक्षण आवडलं. धन्यवाद.

स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे.

उलट पुरुषाची आसव्यवस्था अनैसर्गीक वाटत आहे... बाकि स्त्रि च्या सांसारीक वजनाने पुरुष हवेत लटकला आहे असेही अनुमान काढता येइल पण मला इथे लहान मुले दिसत आहेत स्त्रि अन पुरुष नाही त्यामुळे एकुणच त्यानुशंगे काही अनुमान काढणे अप्रस्तुत भासते

गॉडजिला's picture

18 Jun 2021 - 2:02 pm | गॉडजिला

उद्याला मोठाले होउ.

उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देउ...

आग्या१९९०'s picture

18 Jun 2021 - 2:03 pm | आग्या१९९०

स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा पुरुषापेक्षा वेगळी दिसत आहे ते का ते आत्ता मला सुचत नाही आहे

तारेवरची कसरत .

कुमार१'s picture

18 Jun 2021 - 4:03 pm | कुमार१

छान सुरवात !

यावेळेस shashu प्रथमच आलेत इथे. स्वागत !

नियमित सहभागींचेही अंतरिम आभार .

रात्रीचे चांदणे's picture

18 Jun 2021 - 4:38 pm | रात्रीचे चांदणे

मुलगाच हवा ह्या अतिरेकामुळे लग्नाला मुली मिळेना झाल्यात. आणि मुला मुलींच्या संख्येत जे नैसर्गिक संतुलन असते ते मुलगा पाहिजे ह्या आग्रहामुळे बिघडले आहे.

कधी वर -चांगले, कधी खाली- १९-२० असे अनेक प्रसंग आले तरी एकमेकांना पासून दूर असले तरी मैत्रीचे हात समाधानापुरते कधी हिंमतीसाठी पुढे सरसावतात आणि त्यामुळे हसू फुलल आहे.:)
(त्या दोघांचा एक हात मिळवण्यासाठी पुढे आहे, आणि गोड हसू आहे.)
-भक्ती

मला यांच्यामध्ये दोन वेगळ्या शक्यता दिसत आहेत.

पहिली शक्यता म्हणजे हा लेख मुलगा आणि मुलींच्या गुणोत्तरवर असेल. परंतु मुलाची बाजू हवेत आहे म्हणजे त्यातून नेमके काय सुचवायचं आहे याचा अंदाज येत नाहीये. असे काही आहे का की मुलांचे संसार असेच हवेत जातील...

दुसरे एक जे मला वाटते ते, वाढत्या शहरीकरणामुळे मुलांच्या खेळायच्या जागा कमी होत आहेत, त्याबद्दल काही असेल की काय असे देखील वाटते.

कुमार१'s picture

18 Jun 2021 - 9:00 pm | कुमार१

कल्पनेच्या सुंदर भराऱ्यामुळे खेळ आता रंगू लागला आहे...

कुमार१'s picture

19 Jun 2021 - 7:50 am | कुमार१

मुदत चार तासांनी वाढवली आहे

मला सोडून "तुम्ही" कशी लस घेतली??

https://m.youtube.com/watch?v=mYf2A-VlpbY

मला सोडून "तुम्ही" कशी लस घेतली??

https://m.youtube.com/watch?v=mYf2A-VlpbY

कुमार१'s picture

19 Jun 2021 - 10:58 am | कुमार१

१ तास राहिलाय...

कुमार१'s picture

19 Jun 2021 - 12:01 pm | कुमार१

सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार !

आपण सर्वांनी कल्पनेने लिहिलेला मजकूर उत्तम आहे. विविध प्रकारच्या उत्तरांनी खूप मजा आली.
कल्पनांची व्याप्ती सुंदरच.

मूळ लेखाबद्दल माहिती :

शीर्षक : मुलगा हवाच हो !
( उपरोधिक अर्थाने दिलेले)

त्या लेखामध्ये मुलगा होण्याचा अट्टहास, लिंग-असमतोल, कुटुंबनियोजन, गर्भलिंगनिदान चाचणी, त्यावर बंदीचा कायदा, इत्यादी मुद्द्यांवर विवेचन.