सरकार व्यवस्थेची कोव्हिड हाताळणी तोलण्याचे निकष काय असावेत ?

Primary tabs

कॉमी's picture
कॉमी in काथ्याकूट
10 Jun 2021 - 11:14 am
गाभा: 

चालू घडामोडी वरुन नवीन धागा. इथे भागवतजी म्हणतात त्याप्रकारे सांख्यिकी चर्चा झाली तरी हरकत नाही. आणि सगळे आकडे बकवास आहेत म्हणुन पट उधळुन लावणार्‍यांचे इथे काम नाही.

तर, राज्य/इतर व्यवस्थापन प्रदेशांच्या कामगिरीचे निकष काय असू शकतात-

१. केस संख्या, मृत्यु संख्या तसेच त्यांचे बाधितांसोबत्/लोकसंख्येसोबत गुणोत्तर-
ह्या निकषात थेट आकड्यांची तुलना तर चुकीची आहे हे स्पष्ट आहे. बाधितांच्या संख्येची एकूण लोकसंखेशी तुलना केल्यास त्या प्रदेशात संसर्ग किती पसरला हे समजेल. सरकारी व्यवस्थेच्या हातात खालीलप्रमाणे हत्यार असतात, संसर्ग रोखण्यासाठी-
१. टाळेबंदी, संचारबंदी, सो.डी. इत्यादी इतर नियम.
२. चाचण्या जोरात करुन बाधित व्यक्तींना वेगळे करणे.
३. लसिकरण. (अजुन सुचत असल्यास नक्की वाढवणे.)
वरील तिन गोष्टी निकष असू शकतात.
त्यापलिकडे, केवळ संसर्ग वाढला हा निकष पुरेसा नाही तर वरील पैकी कोणते हत्यार वापरले नाही हे सुद्धा समजणे गरजेचे आहे.
मृत्यु गुणोत्तराबाबत सुद्धा तेच मत आहे. केवळ मृत्त्यु गुणोत्तर हा निकष असू शकत नाही. तर, वैद्यकीय सुविधांअभावे किती रुग्णांचा मृत्यु झाला हा निकष असावा. त्यामुळे, ह्याबद्दलचा विदा भविष्यात उपलब्ध होईल अशी आशा करतो. कारण रुग्ण सेवेत सरकारी संस्थांचा सहभाग संसाधने उपलब्ध करुन देण्यापलिकडे असू शकत नाही.

२. वैद्यकिय संसाधने यांची उपलब्धता- प्राणवायू, व्हेंटिलेटर्स, औषधे, रुग्णपलंग संख्या, अतिदक्षता विभाग पलंग संख्या, वैद्यकिय कर्मचार्‍यांची संख्या.
ही संसाधने किती वेगाने उपलब्ध करण्यात आली, किती लवकर यांसाठी हालचाल सुरु झाली हा निकष असू शकतो.

हा झाला निकषांपुरता भाग. सांख्यिकी चर्चेसाठी प्रदीप यांच्या प्रतिसादांतून मिळालेले काही स्त्रोत-
https://www.covid19india.org/
https://www.mohfw.gov.in/
https://www.misalpav.com/comment/1110509#comment-1110509- आधी झालेली चर्चा

प्रतिक्रिया

कॉमी's picture

10 Jun 2021 - 11:17 am | कॉमी

हे वरील विवेचन मुलभूत आहे. ह्यात आपापल्या मते निकष काय वाढवले जावेत जरुर सांगा.

शाम भागवत's picture

10 Jun 2021 - 12:07 pm | शाम भागवत

प्रदीप यांनी दिलेला पहिला तक्ता

प्रदीप यांनी मृत्यूदराचा रकाना वाढवून दिलेला दुसरा तक्ता

टेस्ट किती झाल्या याचे महत्व मांडणारा कॉमी यांचा तक्ता

ही इमेज इथे देता येत नाहीये.
त्यासाठी एकूण लोकसंख्येच्या किती टक्के कोवीड टेस्ट झाल्या ती टक्केवारी लिहून काठलीय. दशलक्षातील आकड्यांपेक्षा टक्केवारीचे आकडे सोपे वाटतात.

यातील ४०+ टकी शहरीकरण झालेली राज्ये
केरळ ५८.३३%
महाराष्ट्र २९.८४%
तामीळनाडू ३६.९४%

कर्नाटक ४५.३९%
छत्तीसगड ३२.१५%
उत्तर प्रदेश २१.६७%
राजस्थान १३.३३%
बंगाल १३%

दिल्ली ६४.१४%

कॉमी's picture

10 Jun 2021 - 12:34 pm | कॉमी

टेस्ट इमेज

महीती एकत्र केल्याबद्दल धन्यवाद.

Rajesh188's picture

10 Jun 2021 - 1:10 pm | Rajesh188

Rt PCR टेस्ट किती झाल्या
आणि antigen test किती झाल्या ह्याची वेगवेगळी आकडेवारी असेल तरच टेस्ट च्या आकडेवारी ला किमंत आहे.
तशी वेगळी आकडेवारी नसेल तर टेस्ट कोणत्या राज्याने किती केल्या ह्याला काही अर्थ नाही.
Rt pcr hi standerd टेस्ट आहे तिचेच रिपोर्ट ग्राह्य धरले पाहिजेत.

कॉमी's picture

10 Jun 2021 - 1:23 pm | कॉमी

तसे काही नाही. अ‍ॅन्टीजेन टेस्ट सुद्धा आकड्यांच्या बाबत उत्तम आहे. कारण तिथे (माझ्या माहीतीप्रमाणे) फॉल्स पॉजिटिव्ह रेट हा फॉल्स निगेटिव्ह रेट पेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे अ‍ॅन्टीजेन टेस्ट ने सुद्धा झाला तर आकडा जास्त फुगेल, कमी होणार नाही.

Rajesh188's picture

10 Jun 2021 - 2:51 pm | Rajesh188

Antigen टेस्ट ची sensivity खूपच कमी असते .
अर्धे किंवा त्या पेक्षा जास्त covid बाधित लोकांची antigen टेस्ट निगेटिव्ह येवू शकते.
२)लक्षण नसलेल्या रुग्णांची ही टेस्ट निगेटिव्ह येवू शकते.
घसा किंवा नाकातून घेतलेल्या sample मध्ये विषाणू ची संख्या कमी येते आणि ह्या antigen test madhye विषाणू amplify केला जात नाही.
त्या मुळे टेस्ट निगेटिव्ह येवू शकते.

कॉमी's picture

10 Jun 2021 - 3:02 pm | कॉमी

अच्छा असय का बर

रावसाहेब चिंगभूतकर's picture

4 Jul 2021 - 1:05 pm | रावसाहेब चिंगभूतकर

Antigen टेस्ट ला false positive नसतो

कुठेतरी उडत उडत वाचलेलं, चूक असेल.

पण १८८ म्हणतात फाल्स निगेटिव्ह जास्त आहेत त्यामुळे अँटीजेन टेस्ट बघणे चूक- हे कितपत योग्य ?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

4 Jul 2021 - 3:25 pm | रावसाहेब चिंगभूतकर

Antigen टेस्ट चा रिझल्ट त्वरित 15 मिनिटात येतो.
जर रिझल्ट positive असेल तर कोव्हीड कन्फर्म.
जर रिझल्ट negative असेल तर कोव्हीड असू ही शकतो.
तेव्हा मग RTPCR करावी. त्यातही negative तर मग कोव्हीड negative च.

काही लोक उगाच खुसपट काढून antigen टेस्ट करून टेस्ट केलेल्या लोकांची संख्या वाढवून स्वतःची लाल करतात त्यांना नाव ठेवत असतात.

नावातकायआहे's picture

10 Jun 2021 - 4:47 pm | नावातकायआहे

क ड क!

मार्कस ऑरेलियस's picture

10 Jun 2021 - 4:36 pm | मार्कस ऑरेलियस

तुम्हाला असं वाटतंय का की - "सरकार करोनाला नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले " ह्या मुद्द्याला धरुन लोकं पुढच्या निवडणुकीत मतदान करतील अन सत्तादारी पक्षाला सत्तेतुन खाली खेचतील ?
इथे निम्मी लोकं म्हणत आहेत की हे मोदींचे अपयश आहे अन निम्मे लोकं म्हणत आहे ठाकरेंचे अपयश आहे अन उरलेले निम्मे म्हण्त आहेत की जिल्हाधिकार्‍यांचे अपयश आहे ! आता बोला ! कुठं अन कसला ताळमेळ लावणार आहात ?

" सर्कार सपशेल अपयशी ठरले अन करोना पसरला तरी बेहत्तर पण टरबुज्या अणाजीपंत सत्तेत आला नाय पाहिजे परत" ही असली विधाने मी सर्रास ऐकत आहे सातार्‍यात !

सगळं सत्ताकारण हे फक्त जातीपातीच्या गणितांमध्ये खेळते बस्स. सरकारची कार्यप्रणाली, प्रभावशीलता वगैरे गोष्टींशी लोकांना काहीही घेणे देणे नाही.

ह्या असल्या बौधिक चर्चांचा नेमका उद्देश अन उपयोग तरी काय ?

कॉमी's picture

10 Jun 2021 - 7:04 pm | कॉमी

तुमचे म्हणणे खरे आहे. कोव्हिड हा मतदानातील मुद्दा होण्याची शक्यता जवळपास शून्यच आहे. मतदान होणार ते जातीधर्मावरुनच होणार. तसेही कोणाचे मत बदलता येते असे मला वाटत सुद्धा नाही. पण तरी हे जजमेंट करणे गरजेचे वाटते, आणि मुख्य म्हणजे, रोचक सुद्धा वाटते.

गॉडजिला's picture

10 Jun 2021 - 7:42 pm | गॉडजिला

तसेही कोणाचे मत बदलता येते असे मला वाटत सुद्धा नाही.

कोइ बात नही... जल्दबाजीमे कुच भी नही करना चाहिये.

साहना's picture

10 Jun 2021 - 11:39 pm | साहना

+१. दुःखद सत्य आहे.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन कुणाला निवडून देणार ? केंद्रांत मोदी सरकारने बऱ्याच गफलती केल्या असल्या तरी त्याला पर्याय म्हणून राहुल गांधी किंवा मन्नू साहेब असते तर नेसूचे सुद्धा गेले असते. फडणवीस मुख्यमंत्री असते तर काही वेगळे घडले असते अशी समजूत करून घेण्याची काहीही गरज नाही. कोविड ह्या हमाम मध्ये केजरीवाल पासून ठाकरे पर्यंत आणि मोमोता पासून प्रमोद सावंत पर्यंत सर्वांच्याच मर्यादा उघड पडल्या आहेत.

कोविड असो व चिनी आक्रमण ह्या गोष्टी कुणाच्या तरी हिरोगिरी ने सॉल्व होत नाहीत. देशांतील विविध पायाभूत यंत्रणा किती चांगल्या आहेत आणि योग्य तत्वावर चालत आहेत कि नाहीत ह्यावर सर्व अवलंबून आहे. अमेरिकेत ट्रम्प साहेबानी कितीही गोंधळ घातला आणि फोची सारखा मूर्ख माणूस जरी CDC मध्ये असला तर सध्या लसीची कमतरता अजिबात नाही आहे. कॉवीड आटोक्यांत आला आहे. आणि इतर राष्ट्रांना मदत करण्यासाठी अमेरिका पुढाकार घेत आहे. संपूर्ण कोविड मध्ये अमेरिकन व्यवस्तेचे वाभाडे निघाले असले तरी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इत्यादी देशांकडे पाहता अमेरिकन संस्थांनी खूप चांगले काम केले असे दिसून येते आणि ते सुद्धा सरकार कुणाचे आहे ह्यावर जरा सुद्धा अवलंबून न राहता.

आपल्या इथे जवळ जवळ प्रत्येक स्तरावर अत्यंत लज्जास्पद असे प्रकार घडले. संकटांत कठीण निर्णय घ्यावे लागत असले तरी ते तारतम्य आणि तर्क वापरून घ्यावेत अशी अपेक्षा असावी पण आमच्या इथे ते सुद्धा घडले नाही.

आता सुद्धा काही बदलेल असे वाटत नाही, जात आणि धर्म आणि व्यक्तिपूजा ह्यावरूनच मते दिली जातील.

प्रदीपभौ यांनी दिलेला तक्ता व कॉमी यांनी दिलेली टेस्टची टक्केवारी या दोन्हीच्या मिलाफावरून नवीन तक्ता बनवला पाहिजे असे वाटते. मात्र लोकसंख्येची घनता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. शहरीकरण हे लोकसंख्येची दाट घनता प्रदर्शित करत असल्याने त्याला महत्व दिले पाहिजे. अर्थात येथे लोकसंख्येची घनता हा मुद्दा ढोबळमानाने समाविष्ट केला आहे असं म्हणता येईल. यासाठी शहरीकरणाची स्थिती एकसारखी असलेली ३ राज्ये विचारात घेतली आहेत. ती तीन राज्ये म्हणजे महाराष्ट्र, केरळ व तामीळनाडू. दिल्ली सध्या तरी वगळलेले आहे.

यात केरळची टेस्टची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे ५८.३३% टक्के असल्याने, इतर दोन राज्यांंमधेही तेवढेच टेस्टिंग झाले असते तर लागण किती झाली असती हे काढणे महत्वाचे ठरते तसेच त्यानुसार मृत्यूदर काढणे आवश्यक आहे. तेच खालील तक्त्यात मांडले आहे.
उदा. महाराष्ट्रातले टेस्टिंग केरळच्या निम्मे आहे यास्तव महाराष्ट्रातील लागण जवळपास दुप्पट करून दोन्ही राज्ये तुलनेसाठी समपातळीवर आणली आहेत.

राज्य लागण टक्केवारी सुधारित टक्केवारी
केरळ 7.38 7.38
महाराष्ट्र 4.71 9.21
तामीळनाडू 2.92 4.61

वरील तक्त्यावरून दिसून येईल की, महाराष्ट्रात दर ११ व्यक्तिंमागे एकाला लागण झालेली आहे तर तेच प्रमाण तामीळनाडूमधे सर्वात कमी म्हणजे दर २२ व्यक्तिंमागे फक्त एक माणूस कोवीड बाधीत झाला आहे. तर केरळ दोन्हीच्या मधे म्हणजे दर १३ व्यक्तिंमागे एक व्यक्ति पॉझीटीव्ह सापडली आहे.

१. लॉकडाऊनचे योग्य व्यवस्थापन, परदेशातून आलेल्यांचे विलगीकरण व जनतेची स्वयंशिस्त यात तामीळनाडू सर्वात पुढे आहे. त्यामानाने केरळ खूप मागे आहे. तर महाराष्ट्रात फारच खराब परिस्थिती आहे.
किंवा
२.असे म्हणता येईल की लॉकडाऊन मधे वाधवान प्रकरणासारखी उच्चपातळीवरील प्रकरणे व पोलीस शिपाई पदावरील छोटी प्रकरणे तामीळनाडू मध्ये सर्वात कमी होती.
३. विशेषकरून महाराष्ट्रात निवडणुका नसताना देखील इतकी खराब परिस्थिती असणे हे फार आश्चर्यकारक आहे.

मृत्यूदराचे आकडे किती जणांना लागण झाली त्या संख्येवर अवलंबून असल्याने त्यानुसार मृत्यूदराचे आकडे निश्चीत केले आहेत.

राज्य लागणाशी मृत्यूदर सुधारित मृत्यूदर
केरळ 0.39 0.39
महाराष्ट्र 1.74 3.4
तामीळनाडू 1.23 1.94

याबाबतीत मात्र केरळने परिस्थिती खूपच चांगली हाताळली असं म्हणता येईल. केरळ मधली आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राच्या ९ पट व तामीळनाडूच्या ५ पटींनी चांगली आहे असे म्हणता येइल.
प्रगत महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था इतकी का खालावली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

शेवटच्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्येच्या घनतेत वरील राज्यांमध्ये फार मोठी तफावत आहे. केरळ, तामिळनाडू,महाराष्ट्र- अनुक्रमे- ८५९, ५५५, ३६५ प्रति वर्ग किमी. पण नऊ वर्षात हा पॅटर्न बदलला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शहरीकरण जोरात झाले आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2021 - 7:01 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रानेही ११,०००+ कोरोना मृत्यु लपविले, अशी आज दिवसभर बातमी आहे.

कॉमी's picture

10 Jun 2021 - 7:38 pm | कॉमी

महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यापासून रिकन्सिलिएशन मृत्यु म्हणुन ९,००० मृत्यु नोंदवले आहेत. पण, हे स्वत:हून केलेले आहे, त्यामुळे तुम्ही जे ११००० म्हणताय ते हेच का माहीत नाही.
मला वाटतं की सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात मृत्यु आकडेवारी लपवलेली असणार. मेरठ मध्ये स्मशान आणि सरकारमान्य आकड्यांमध्ये ७ पट फरक होता. https://www.newslaundry.com/2021/05/01/ups-meerut-is-reporting-seven-tim...
भारताबाहेर सुद्धा असे आकडेवारी लपवण्याच्या घटना घडत आहेत.
खरी परिस्थीती हळूहळू बाहेर येईल असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2021 - 8:07 pm | श्रीगुरुजी

आज दिवसभर अनेक वाहिन्यांनी ही बातमी दिली आहे. महाराष्ट्राने अंदाजे ११,५०० मृत्यु लपविले असे बातमीत सांगितले जात आहे. एबीपी माझाने काही लहान शहरातील काही रूग्णालयात जाऊन तेथील आकडेवारी तपासून अधिकृत आकडेवारी व प्रत्यक्ष आकडेवारी यातील फरक शोधला आहे. तसेही भारतातील अंदाजे ३,६०,००० मृत्युंपैकी महाराष्ट्रात अंदाजे १,०५,००० मृत्यु झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. त्यात साडेअकरा हजार वाढल्याने फार फरक पडत नाही.

Rajesh188's picture

10 Jun 2021 - 9:34 pm | Rajesh188

जगातील उत्तम वृत वाहिन्या बीबीसी, सीएनएन,ह्यांनी सांगितले असते तर विश्वास ठेवला असता.
पण ह्या वृत्त वाहिन्यांनी महाराष्ट्र विषयी अशी काही न्यूज दिलेली नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2021 - 11:24 pm | श्रीगुरुजी

ही यासंबंधी कॉंग्रेसच्या मुखपत्रातील बातमी

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/coronavirus-more-than...

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Jun 2021 - 10:00 am | अनिरुद्ध.वैद्य

कितीही प्रयत्न केले, तरी जनपदध्वन्सक (पॅन्डेमीक्स) रोगांना रोखणे कठीण असते. सरकार, जनता ह्यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच ते शक्य होऊ शकते.

जिथे जिथे प्रामाणीक प्रयत्न झालेत, तिथे परिस्थिती नियंत्रणात आली. दुर्दैवानी, अशी उदाहरणे फार नाहित.

Rajesh188's picture

12 Jun 2021 - 10:09 am | Rajesh188

फक्त सरकार च्या प्रयत्नांनी काही होणार नाही .जनतेनी स्वतः सहकार्य केले पाहिजे.सर्व नियम पाळले पाहिजेत.
सरकारच काम medical सुविधा आणि औषध ह्यांची सोय करणे हे आहे.
धांधली ,काळाबाजार थांबवणे हे आहे ते त्यांनी प्रामाणिक पने करावे.
बाकी साथीच्या रोगांना तुम्ही जो मराठी शब्द निर्माण केला आहे.
मस्त आहे.
जनपदधंनसक.
लीहता पण येत नाही.

बाकी शब्द बरोबर आहे

त्यामुळे 10 गुण कमी करण्यात येत आहे... ;)

सुबोध खरे's picture

12 Jun 2021 - 7:01 pm | सुबोध खरे

धांधली ,काळाबाजार थांबवणे हे आहे ते त्यांनी प्रामाणिक पने करावे.

धांधली ,काळाबाजार जनताच करत आहे. सरकार नव्हे.

सरकार त्याकडे डोळे झाक करत आहे.

माझ्या मित्राच्या मावसभावाला कोव्हीड झाला तेंव्हा हर्णै यावरून पुण्याला घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स वाल्याने ४० हजार रुपये घेतले.

४-५ किमी अंतरावर असणाऱ्या रुग्णालयात घेईऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका ५ हजार रुपये घेत असत.

सॅनिटायझर २५०० रुपये ५ लिटर ला मिळणारा आता ३५० रुपयात मिळतो आहे. अल्कोहोल ची किंमत ४० रुपये लिटर आहे ते सुद्धा ७० % वापरले तर २८ रुपयाचे अल्कोहोल त्यात काही मॉइश्चरायझर मिसळून अगोदर ५०० रुपये लिटरने कुणी विकलं?

शवागारात मृत व्यक्तीचा चेहरा दाखवण्यासाठी कर्मचारी ३००-४०० रुपये घेत असत.

इ पास काहीही करा मिळत नसे आणि १००० रुपये दिले कि घरपोच मिळत असे.

रेम्डेसीवीर चा काळा बाजार कुणी केला?

अशा किती गोष्टी लिहाव्या?

लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळतं या अर्थ ची इंग्रजी महान आहे ती आपण सत्य ठरवली आहे.

गॉडजिला's picture

12 Jun 2021 - 7:03 pm | गॉडजिला

व्यवस्थित प्रतिसाद _/\_

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Jun 2021 - 3:55 pm | अनिरुद्ध.वैद्य

यांनी तयार केला हो हा शब्द. आम्ही फक्त वापरायचा प्रयत्न करतो जनपदध्वन्सक.

कॉमी's picture

23 Jun 2021 - 6:47 pm | कॉमी

सीआरएस, म्हणजेच सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टम ही जन्म-मृत्यु संबंधातील सरकारी आकडेवारी नोंदवणारी प्रणाली आहे. जानेवारी २०२१-मे २०२१ मधील सर्व कारणांमुळे झालेल्या मृत्युंची आकडेवारी हळूहळू राज्यांकडून येत आहे. ही आकडेवारी का महत्वाची आहे ? तर, याच काळामध्ये साधारण किती मृत्यु यामागच्या कोव्हिड मुक्त वर्षांमध्ये , म्हणजे २०१८-१९ मध्ये झाले होते, त्याच्याशी यावर्षीच्या जान-मे मृत्युंशी तुलना करणे.

तर, ज्या राज्यांसंदर्भात आकडेवारी मिळाली आहे ती अत्यंत भेदक चित्र दाखवती आहे. मे महीन्यात जवळपास सर्व राज्यांमध्ये मृत्युसंख्या मागील वर्षांपासून एकदम जास्त वाढली आहे, आणि काही प्रमाणात जाने-अप्रिल महिन्यांत पण. मे महीन्यात झालेली विलक्षण वाढ बघता, त्यातील कोविडचा वाटा जास्त असणार हे म्हणण्यास हरकत नसावी.

आकडेवारी खालीलप्रमाणे-

पूर्वीच्या   तुलनेत अधिकतम मृत्यु
राज्य दुसर्‍या लाटेतले कोव्हिड बळी अधिकतम मृत्यु (जाने.-मे २१) पट केवळ मे मधील अधिकतम मृत्यु स्त्रोत
केरळ 6700 14372 2.145075 8400 The   News Minute
आंध्र   प्रदेश 3822 129030 33.75981 103745 Scroll
मध्य   प्रदेश 4461 188661 42.29119 133357 Scroll
तामिळ   नाडू 20158 60773 3.014833 Not Found The   Hindu
कर्नाटक 16523 53728 3.25171 Not Found The   Hindu
Note- TN & Karnataka excess deaths are for   months of April & May 2021 only.
कॉमी's picture

23 Jun 2021 - 6:49 pm | कॉमी

अधिकतम शब्द चूकीचा आहे. जास्त, वाढलेली संख्या- हे योग्य ठरेल.

कॉमी's picture

23 Jun 2021 - 7:02 pm | कॉमी

@Rukmini या ट्विटरवर इतर राज्यांसंबंधी वरील माहीती मिळाल्यास देत आहेत.

कॉमी's picture

25 Jun 2021 - 10:36 am | कॉमी

उत्तर प्रदेशची मर्यादीत माहीती.पूर्वीच्या   तुलनेत अधिक मृत्यु
राज्य दुसर्‍या लाटेतले कोव्हिड बळी अधिक मृत्यु (जाने.-मे २१) पट केवळ   मे मधील अधिक मृत्यु स्त्रोत
केरळ 6700 14372 2.1 8400 The   News Minute
आंध्र   प्रदेश 3822 129030 33.8 103745 Scroll
मध्य   प्रदेश 4461 188661 42.3 133357 Scroll
तामिळ   नाडू 20158 60773 3.0 Not Found The   Hindu
कर्नाटक 16523 53728 3.3 Not Found The   Hindu
उत्तर   प्रदेश 4537 197000 43.4 NA Scroll
Notes-
1. TN & Karnataka excess deaths are for months of April & May 2021 only.
2.Uttar Pradesh Data is only for 24 districts out of 75, and the data is for a longer period than others-(Jul20-March 21) It does not yet factor in April and May 21.
प्रदीप's picture

25 Jun 2021 - 7:58 pm | प्रदीप

जरा अधिक उलगडून सांगा:

  • "दुसर्‍या लाटेतले कोव्हिड बळी" व "अधिक मृत्यु (जाने.-मे २१)" ह्या दोघांत इतकी तफावत कशी?
  • 'पट' मधे काय, कशाच्या पट? बहुधा २०२० मधील जाने- मे ह्या पीरीएडचा २०२१ मधील त्याच पीरीएडशी तुलना अभिप्रेत असावे असे वाटते आहे. हेच म्हणायचे आहे का?

"दुसर्‍या लाटेतले कोव्हिड बळी" व "अधिक मृत्यु (जाने.-मे २१)" ह्या दोघांत इतकी तफावत कशी?

कोव्हिड मृत्यूचा अधिकृत आकडा आणि मागील वर्षांपेक्षा जास्त मृत्यूची संख्या.

तफावत- अधिकृत कोव्हिड बळींची संख्या अंडररिपोर्ट झाल्यामुळे.

पट- अधिकृत कोव्हिड मृत्यूच्या किती पट "अधिक मृत्यू" आहेत ? असं.

कॉमी's picture

25 Jun 2021 - 8:08 pm | कॉमी

अधिक मृत्यू म्हणजे १८-१९ मध्ये त्याच महिन्यांमध्ये झालेल्या मृत्युंच्या संख्येपेक्षा जास्त १०-२०/२१ मध्ये झालेले मृत्यु.

प्रदीप's picture

25 Jun 2021 - 9:00 pm | प्रदीप

अनेकदा, कोव्हिड्ने आजारी असलेल्या व्यक्तिचा मृत्यू, शेवटी शरीरांतील इतर अवयव निकामी होऊन होत असला, तर तसा मृत्यू, त्या त्या सदरांत नोदवला जात असावा- उदा. हृदयक्रिया बंद पडून, अथवा किडनी निकामी झाल्याने. हा माझा निव्वळ अंदाज आहे; ह्याविषयी त्या क्षेत्रांतील जाणकारांनीच सांगितलेले उचित ठरावे.

कॉमी's picture

25 Jun 2021 - 9:26 pm | कॉमी

हो.

पग त्यामुळे आत्ता जो मृत्युदर आणि मृत्यूचा आकडा सांगितला जातो तो एका प्रकारे फसवा झाला, असे वाटते.

प्रदीप's picture

25 Jun 2021 - 9:38 pm | प्रदीप

मला वाटते, हे सगळीकडेच होत असावे. न्यूयॉर्कच्या संबंधांतही असेच काही वाचल्याचे आठवते.

इथे दिसते आहे की ५०% अंडर रिपोर्ट झालेल्या- १.५ पट. पण आपल्याकडे ३ पट ते ४० पट इतके भयंकर जास्त आकडे दिसत आहेत, नक्कीच वेगळ्या लीगमध्ये आहे.

कॉमी's picture

29 Jun 2021 - 4:52 pm | कॉमी


पूर्वीच्या तुलनेत अधिक मृत्यु (२०१९-२०२१ Months-On-Months excess deaths)
राज्य दुसर्‍या लाटेतले कोव्हिड बळी (a) अधिक मृत्यु (जाने.-मे २१) (b) पट   (b/a= approx. understatement) केवळ   मे मधील अधिक मृत्यु स्त्रोत
केरळ 6700 14372 2.1 8400 The   News Minute
आंध्र   प्रदेश 3822 129030 33.8 103745 Scroll
मध्य   प्रदेश 4461 188661 42.3 133357 Scroll
तामिळ   नाडू 20158 60773 3.0 Not Found The   Hindu
कर्नाटक 16523 53728 3.3 Not Found The   Hindu
उत्तर   प्रदेश 4537 197000 43.4 NA Scroll
बिहार 7717 82500 10.7 NA Scroll
Notes-
     1. TN & Karnataka excess deaths are for months of April & May 2021   only.
     2.Uttar Pradesh Data is only for 24 districts out of 75, and the data is   for a longer period than others-(Jul20-March 21) It does not yet factor in   April and May 21.

आणि, स्त्रोत
अमेरिकेत मार्च २०२०-जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या excess mortality पैकी ७२% मृत्यु कोव्हिडमुळे झाले होते. भारतात ह्याचे प्रमाण खुप जास्त वेगळे असायचे कारण दिसत नाही. भारतात पाच राज्यान्मध्ये जानेवारी-मे २०२१ मध्ये ४,६०,००० जास्त मृत्यु झाले. त्यापैकी फक्त ६% मृत्यु कोव्हिड मृत्यु म्हणून नोंदवले गेले आहेत. आणि ही excess mortality एप्रिल आणि मे मध्येच सामावली आहे, त्यामुळे या मृत्युंचे कारण एकतर कोव्हिड/पोस्ट-कोव्हिड रोग किंवा इतर रोगांसाठी उपचार न मिळणे हे आहे असे दिसते, नाहीतर एप्रिल-मे मध्ये इतक्या जास्त संख्येत मृत्यु होण्याचे इतर काही कारण असू शकत नाही.

भारताचा अधिकृत कोव्हिड मृत्युदर सुद्धा इतर देशांच्या तुलनेत खुप कमी दिसत आहे.

आणि, राज्यनिहाय आकडेवारी- excess mortality च्या किती टक्के मृत्यु कोव्हिड मृत्यु म्हणुन नोंदवले गेले- ही माहीती- (जितके जास्त-तितके अन्डरर्रिपोर्टिन्ग कमी)

एकूण काय, मृत्युचा आकडा खूप जास्त अन्डररिपोर्ट झाला आहे.

कॉमी's picture

3 Jul 2021 - 5:31 pm | कॉमी

अधिकृत कोव्हिड मृत्यु- ९६७७
अधिक मृत्यू- ३४८९७
- ३.६×
स्रोत

ज्यांची कुठेच नोंद नाही ह्यांची आकडेवारी तर उपलब्ध च नाही.
भारतात अशी अनेक खेडेगाव आहेत ते दुर्गम भागात आहेत.corona म्हणजे काय हेच तेथील लोकांना माहीत नसेल.
टीव्ही मुळे माहीत समजा असले तरी .
जवळपास टेस्ट करण्याची सुविधा नाहीत,डॉक्टर नाहीत.
आणि पैसे पण नाहीत.
ती लोक घरीच मेली असतील त्यांची काहीच नोंद नसेल .

रावसाहेब चिंगभूतकर's picture

4 Jul 2021 - 5:54 pm | रावसाहेब चिंगभूतकर

उगीच भारतीय व्यवस्थेची टिंगल करणे बरोबर नाही. अगदी निवडणुकीत सुद्धा प्रत्येक शेवटच्या मतदारपर्यंत भारतीय व्यवस्था पोहचू शकते. त्यामुळे व्यवस्थेला हे अशक्य नक्कीच नसते. काही वेळा अनास्था असू शकेल हे मान्य पण संपूर्ण अनागोंदी आहेच हे मानणे म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर अन्याय आहे.

कॉमी's picture

4 Jul 2021 - 5:59 pm | कॉमी

हे फक्त कोव्हिड मध्येच नाही तर कोव्हिड नसताना सुद्धा असते. एस्टीमेटेड मृत्यू आणि रिपोर्टेड मृत्यू यांच्यात नेहमी तफावत असते. केरळ आणि महाराष्ट्रात ही तफावत अत्यल्प आहे तर उत्तर प्रदेश, बिहार, इथे बरीच जास्त असते. २०१८ च्या अहवालानुसार. (टेबल ३.१३.२)

त्यामुळे, वर घेतलेले अधिक मृत्यूचे आकडे सुद्धा मुळात किंचित ते बऱ्यापैकी अंडररिपोर्टेड आहेत.

प्रदीप's picture

9 Jul 2021 - 11:07 am | प्रदीप

तेथे सध्या नक्की काय चाललंय ज्यामुळे कोव्हिड्चा दर इतर राज्यांच्या तुलनेत बराच जास्त आहे?

भारतांतील कोव्हिडविषयी बराच विदा एकत्र करणार्‍या, मला माहित असलेल्या एकमेव दुव्यावरून घेतलेल्या माहितीनुसार खालील तक्ता दिसून येतो:

.

हा तक्ता, टेस्ट्स/ लाख ह्या कॉलमवरून, सर्वाधिक ते सर्वांत कमी असा सॉर्ट केलेला आहे. ते हे अधोरेखित करण्यासाठी की, टेस्ट्स/ लाख हे केरळमधे इतर राज्यांच्या तुलनेत बरेच अधिक आहे, हे कारण दिसत नाही.

अर्थात, आपल्या सर्व राज्यांत टेस्ट्स करण्याच्या पद्धतीत (RT- PCR की इतर काही), त्यांचे रिझल्ट्स प्रकाशित करण्याची पद्धती, त्यांतील खरेखोटेपणा इत्यादी भाग येथे जमेस धरता येत नाहीत.

कुणी ह्यावर प्रकाश टाकेल काय?

प्रदीप's picture

9 Jul 2021 - 8:36 pm | प्रदीप

आता हे काय नवीनच?

टाईम्स ऑफ इंडियाने RTI द्वारा माहिती मिळवून असे दर्शवून दिले आहे की केरळमधे आतापर्यंत कोव्हिडने मृत्यू पावलेल्यांच्या, तेथील स्थानिक स्वराज्यसंस्थांनी नोंदवलेल्या संख्येत व राज्य सरकारने दर्शवलेल्या संख्येत तब्बल ६,००० ची तफावत आहे.

जाणकारांनी ह्यावरही प्रकाश टाकावा.

हो, एक्सेस मोर्तलिटी पण ७६७२ ने जास्त आहे. ६००० म्हणजे जवळपास जुळते आहे. पण एक्सेस मोर्तलिटी च्या सर्वात टक्के वर्गवारी कोव्हिड मृत्यू म्हणून केरळातच आहे.

त्यावरील तक्त्यात आणखी एका फॅक्टरचा विचार व्हावा- घनता. दिल्ली सोडल्यास घनता सुद्धा सर्वोच्च केरळचीच आहे.

प्रदीप's picture

10 Jul 2021 - 6:13 am | प्रदीप

तुमचा मुद्दा बरोबर आहे. तसा हा तक्ता सर्वच फॅक्टर्स लक्षांत घेऊन बनवलेला नाही. फक्त, पूर्वी आपल्या ह्याच विषयावरच्या चर्चेंत टेस्ट्स्/मि. केरळमधे, इतर राज्यांच्या तुलनेंत बर्‍याच जास्त आहेत, व तेथील कोव्हिड केसेसची संख्या जास्त असण्याचे ते एक कारण आहे, असे म्हटले गेले होते. त्या अनुषंगाने, ह्यांत फक्त त्या एकाच फॅक्टरचा विचार केला. व सध्यातरी तो लक्षणीय फॅक्टर आहे असे दिसत नाही, हे दर्शवण्यासाठी तो तक्ता बनवला.

पण आता हा प्रश्न राहतोच. असे नक्की केरळांत काय असावे, की तेथे कोव्हिडने इतका धुमाकूळ घालावा? कदाचित ह्याची काही जनुकीय स्वरूपाची कारणे असू शकतील.

जनुकीय कारणं काय असतील कल्पना नाही. पहिल्या वेव्ह मध्ये सुद्धा देशभरात केसेस कमी कमी होत आलेल्या तरी काही दिवस केरळात वाढतच होत्या. कारण केसेस ची वाढ सुद्धा इतर राज्यांपेक्षा ग्रॅज्युअल होती.

इथे काही कारणे एपिडेमोलॉजिस्ट्स नी सांगितली आहेत.